शाळा
लेखनविषय (Tags)
सकाळ झाली आज शाळेत जायचा कंटाळा आलेला होता. पण काय करणार कंटाळा करुन जमणार नाही. शाळा उघडणे तर आवश्यक होते. मुले वाट पाहत बसुन असतात. आई वडील शेतात कामाला गेले की त्यांना घरात कोणी राहु देत नाही. कुलुप लावले की मुलांचे व पालकांचे हक्काचे ठिकाण म्हणजे शाळेचे मैदान आणि शाळाच. त्यांचा विचार येताच गणेशने आळस झटकला आणि सकाळची त्याच्या वाटणीची कामे करु लागला. स्वाती आणि गणेश दोघे जिल्हा परिषदेत शिक्षक. दोघांचा सकाळ पासुनचा दिनक्रम हा घड्याळ्याच्या काट्यावर बांधलेला. चुका करण्यास, वेळ वाया घालवण्यास सक्त मनाई. मुलाला शाळेची तयारी करुन पाळणाघरात सोडुन गणेशने एकशिंगी घोड्याचा कान पिळला आणि १५ मिनिटात स्वातीला तिच्या शाळेजवळ सोडले. रस्त्यावर मित्रांमध्ये खाणाखुणा होउन आपल्या नित्याच्या संगमावर भेटण्याचे ठरले.
संगमावर ऑगष्टच्या शेवटी होणार्या विद्यार्थ्यांच्या चाचणीवर चर्चा सुरु झाली. शासन कसे मुर्खपणा करते ते हे सगळे कसे बरोबर आहे इतपत सगळी मते मांडुन झाल्यावर चहा संपवुन मंडळी आपापल्या संस्थानांकडे रवाना झाली. रस्त्यात एका खाजगी हिंग्लीश शाळेतील टीचरने सरल च्या माहितीतील अडचणी विचारल्या त्यांना मागचीच माहिती देत मनात त्यांच्या प्रशासकीय अशिक्षितपणाचा उध्दार करत शाळा गाठली.
शाळेत येताच मुलांनी गाडीला घेरले आणि चाबी मिळालेली मुलगी लढाई जिंकल्याचा आनंद साजरा करत पळाली. पाठीवरचे धोपटे उतरवुन शाळा झाडणे आणि सफाई करे पर्यंत गणेशने सकाळ पासुनचे आलेले संदेश आणि शुभप्रभात पाहुन काऊंट शुन्यावर आणला. परिपाठ झाल्यावर चार वर्गांचा अभ्यास दिला. पाढे, उजळणी, शुध्द्लेखन दिले. पहिलीमधील सुमीत लगेच आला त्याला गणेशने न बघताच अक्षर चांगले काढ म्हणुन परत पाठवले. हजेरी भरताना जोडीदार कधी येणार आणि हा वनवास संपेल असे वाटु लागले. पुन्हा त्याला जोडीदार त्याची सततची गैरहजेरी, गावकर्यांची निष्काळजीपणा, प्रशासनातील अधिकार्यांचा काम करणारे आणि पैसा देणारे यांच्यातील आपपरभाव बाळगणारी बुध्दी यावर संताप होउ लागला. त्यात मुले बिचारी पाट्या दाखवायला येत होती. गणेश कंटाळवाण्या प्रकारे त्यांच्याशी बोलत होता. त्याला समजत होते की मुलांचा काहीच दोष नाही पण वळत नव्हते. त्यातच एक दोन मुलांना नीट वाचता आले नाही म्हणुन गणेशने छडीच मारली. मुलांचा चेहरा कळवळला. गणेशने स्वतःला प्रश्न विचारला काय करतोस? त्या मुलांचा काय दोष? त्यांच्यामुळे थोडीच तु शाळेवर एकटा आहेस? तुझ्या मुलाला तु लगेच मारतो का? त्याने लगेच स्वताला सावरले. पुन्हा सगळ्याना गोल करुन बसवले स्वतः त्याच्या जवळ जावुन बसला आणि कपाटातील रंगीत दगडांची पिशवी काढुन त्यापासुन अक्षरे बनवुन मुलांशी रममाण झाला. ज्यांना मारले तेही मार विसरुन हसु बोलु लागले गणेशला जरा बरे वाटले. सल थोडी कमी झाली.
अर्धा एक तास त्यांना शिकवुन मग गणेशने तिसरीच्या गणिताकडे मोहरा वळविला. पुन्हा जोडीदार आठवला. तिसरीचा वर्ग मागील दोन वर्ष त्याच्या जोडीदारा कडे होता. त्यांना साधे १०० पर्यंत अंकही लिहिता आणि वाचता येत नव्हते. पुन्हा त्यांना सचित्र बालमित्र काढुन अंकओळख लिहायला दिली. परत संताप सोडुन चौथीला शिवरायांचे बालपण व शिक्षण शिकवु लागला. त्यातील नवीन वाक्यरचना वाचुन त्याला त्याच्या बाईंनी चौथीत शिकविलेला ईतिहास आठवला. सध्या सर्वत्र चाललेला महाराष्ट्र भुषण पुरस्कारावरील वाद, बाबासाहेबांचे शिवचरित्र, आव्हाडांचे विचार, मिपावरील वाद आणि चर्चा यांचा डोक्यात कचरा झाला. म्हटला गेले उडत सगळे. धडा शिकवुया. पण वाचताना पुन्हा अडकला. शहाजीं राजेंच्या देखरेखीखाली अनेक शिक्षक रा़जेंना शिक्षण देत होते. हे वाचुन विचारांचा गलका झाला. आपल्या मुलाला कोणता ईतिहास शिकायला मिळेल यावर विचार करु लागला. पुन्हा सगळ झटकुन धडा शिकवला आणि जबाबदारीतुन मुक्त झाल्याचे समाधान करुन घेतले. तितक्यात सैपाकीण बाई आल्या त्यांना त्याची मागील थकबाकी पाहिजे होती. गणेशने ते काम मुख्याध्यापकाचे आहे तो आल्यावर देईल असे सांगुन घोंगडे झटकायचा प्रयत्न केला. बाई म्हणाल्या "तो भाऊ कधी येणार अन पैसे देणार राम जाणे" मग गावाला मिळालेले अगोदरचे शिक्षक आणि मुख्या. यांची तुलना चालली. त्यातच दुपारच्या जेवणाची वेळ झाली. मुले पटापट ताटे घेउन खिचडी खायला रांगेत उभी राहिली. आजही नुसतीच दाळ तांदुळ घातलेली खिचडी. बटाटे नाही की टमाटे नाही. कांदा तर सांगण्याची सोयच नाही. भाज्या टाकायला सांगितले की बाई लगेच सांगते कोण आणणार? रेटायचा प्रयत्न केला की मग नवीन बाई शोधणे आले. गणेशने मुकाट डबा उघडला आणि जेवण करु लागला.
ठरवले विचार करायचा नाही. शिक्षक आहेस, आहे त्यात समाधान मान, पोरांकडे बघ, जेवढे होईल तेवढे कर, त्या पोरांना आनंद झाला की बरे वाटते तोच अनुभव पुन्हा घे. गणेशने मनातील निराशेची काजळी पुसली आणि जेवण करुन मुलांच्या गप्पांमध्ये रंगला आणि रमलाही.....
प्रतिक्रिया
:(
चांगला प्रयत्न ! तुम्हाला
हो बराच काळ जि. प. शाळांशी
जाणवतय
माझी
सुचेता तुमच्या बहिणीला माझे
+१
माझी
खरं आहे
छान मांडलय
१+
ज्या प्राथमिक शिक्षणाच्या
माझी शाळापण अशीच होती दोन
लेख आवडला
प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून
जानराव कसाय?
जहा मै जाता हू वही चले आते हो
हा तुमचा भ्रम आहे...
ते रंजन न भ्रम न उल्ल्ल्लूलू
हा आमच्या गुर्जीन्चा अपमाण
तसा आय डी वेगळाच आहे. ज्या
मस्त मस्त सर.
एकदा बारस झाल की मग नाव
मिपावर स्वागत ! अनुभव कथन
क्या बात है जानराव मास्तर.
सुन्दर शैली आणी दुख्खद वास्तव
अनुभव कथन आवडले.
सत्य परिस्थिती आहे .
समर २००७
त्यांच्याशी बोलताना आणि
किती श्रीमंत आहात तुम्ही!!
किती श्रीमंत आहात तुम्ही !!!
मुद्दाम लॉगइन करून आवर्जून
+१११११
जानु चे बाबा,
मिपावर स्वागत !
या निमित्तानं आणि उद्याच्या
अरी ससुरे तबहु बोले की लल्ला
ई तो हमार पोल खोल दिया!
घनतमी एकच पणती.
आपल्याला सांगायला आनंद वाटेल
सुंदर!! धन्यवाद!!