Skip to main content

मातृभक्ति आणि मराठे

लेखक raudransh_27 यांनी बुधवार, 19/08/2015 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
या भूमि तील मातृभक्ति, मातृप्रेम वादातीत आहे मातृ देवो भव: पितृ देवो भव: अतिथि देवो भव: असे म्हणताना प्रथम आईला दैवतसमान म्हटले आहे महाराष्ट्राचा सुर्वणकाल, शतके ज्यांनी इथे राज्य केले असे "सातवाहन" त्यांचा सर्वात पराक्रमी राजा "गौतमीपुञ सातकर्णी " स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावतो श्रञियकुलावतंस छञपती शिवराय यांच्या बालपणापासुन आयुष्याच्या प्रत्येक कालात त्यांच्या आईचा -जिजाऊ माँसाहेब- प्रभाव त्यांच्यावर आढळतो. शिवरायानां स्वतंञ राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा, मार्गदर्शन, पाठिंबा आणि स्वातंञ्यदिनानतंरच ज्यानी श्वास सोडले त्या माँसाहेब छ.शिवरायांबरोबर तमाम मराठ्यानां वंदनीय भारतीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले परवापरवा पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमण करताना माझे मिञ एका हातात भगवा अन् एका हातात तिरंगा घेऊन होते माझ्या जवळच्या मिञाने Group Discussion च्या वेळी मांडलेला एक मुद्दा मला आजही आठवतो, तो म्हणत होता की मी Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल माझे अनेक मिञ फक्त आईच्या समाधानासाठी देवळात जातात (मी धरुन) (Partially atheist ) जगप्रसिध्द MAXIM GORKY, साने गुरुजी सारखी मोठी माणसे जगभरात मातृप्रेमाचा जयजयकार करत आजही दिसतात.. राष्ट्रवादाचा (Nationalism) चा उदय पण मातृभुमिप्रेमातुनच.. जगातल्या प्रत्येक प्रांतात मातृभक्ति आढळते.. पण मराठ्यांची मातृभक्ति वादातीतच , इथे जन्मला की प्रत्येक मानव दोन्ही आईंसाठी मातृभक्ति By default मातृभक्ति हा मराठ्यांसाठी फक्त शब्द नाही, ही एक विचारधारा आहे.. हा एक Religion आहे.. ही एक Lifestyle जीवनशैली आहे.. ही अशी स्वंयभु संकल्पना आहे in that we believes. जय जिजाऊ, जय शिवराय _/\_ (लहानपासुन ज्या विचारधारेवर विश्वास ठेवतो त्याला प्रचंड विसंगत वाक्यांमुळे, आरोपांच्या विरोधी, आम्हाला शुद्र दाखवणार्या स्वंयघोषित महान विचारधारेमुळे हा लेखनपंप्रच. हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत" सभासद बखर, बेंद्रे, JN Sarkar, Grand duff , मुघल दरबार पञे, कुरुंदकर, राजवाडे, देशमुख आणि सांळुखे सर ईत्यादी इतिहासअभ्यासकाचीं थोडीफार पाने वाचलीत, सगळ्या ९६ कुळाचां पण नाही माहिती, जेवढे थोडेफार माहितेय त्याततरी "मराठे आई विकायला कमी करत नसत " असे एकही उदाहरण आढळले नाही... आजोबाअंधअनुयायीनीं काही माहिती असल्यास सांगावे, नाहीतर तुमच्या एकांगी लेखनाच्या विश्लेशणाला सरळ ब्राह्मणद्वेषी किंवा ब्रिगेडी सांगुन नेहमीप्रमाणे उत्तर न देता स्वतःची लाल म्हणुन पळ काढावा.. )

वाचने 34805
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

In reply to by प्रदीप साळुंखे

मी या धाग्याला फाट्यावर मारणार होते. तुमच्या या एका प्रतिक्रियेत तो विचार बदलायचं सामर्थ्य आहे. अभिनंदन !! भट म्हणजे विद्वान हे मान्य आहे का? बर्र !!!

ऐका जरा. तीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले याच्यामधले किती ९६के होते हो? आणि राहीलच तर जे हसत हसत मृत्यूला सामोरे गेले त्यात किती तुमचे साडेतीन टक्के वाले होते होते मोजा बरे जरा. अहो कमीत कमी उदाहरणे तरी आपल्या स्वतःच्या मुद्द्याला मारणार नाहीत अशी निवडायची हो.

लेखक महाशय काडी टाकून गेले आहेत. आपण बसलोय लेखण्या ताणत :)

In reply to by कपिलमुनी

दुर्लक्ष करणे! आता लेखक सांगत फिरत असतील कसा ५० लोकांना नडलो ते :D

आयला अजून कोनीच कसे आले नाय वो? त्या भट बाबा पुरंदरेला॑ दिलेला पुरस्कार परत घेतला पाहिजे. (आता देऊन झालाय म्हणजे बोलायला मोकळे) दादू कोंडदेवाचे नाव इतिहासातून पुसून टाकले पाहिजे.. त्या जेम्स लेन ला मसाला पुरवतो म्हणजे काय? त्या जातीयवादी कादंबरीवर बंदी घातली पाहिजे.. शिवरायांची/मासाहेबांची बदनामी केली म्हणजे काय? मग त्या वाक्यांचा मागचा पुढचा संदर्भ काहीही असो. शिवरायांच्या आईबद्दल घाणेरडी(?) वाक्य काढणार्‍याची जीभ मुळापासून उपटली पाहिजे (आमच्या आईवडिलांना आम्ही कुत्र्याची देखील किम्मत देत नसलो तरीही) असो. मला एकच प्रश्न, भर दरबारात कोण तो भूषण "शिवबा न होते तो सुन्नत सबकी होती" असे काहीबाही बरळतो, आणि महराजांचे अष्टप्रधान मंडळ गप्प बसते म्हणजे काय? त्यांंना महाराजांचा धर्मनिरपेक्ष स्वभाव माहीत नव्हता काय? तिथल्या तिथे त्या भूषणला चेचला नाही म्हणून ही भाटांची पिलावळ सोकावलीय.

In reply to by आदूबाळ

जे ज्यूंचा झाला तेच होणार आहे. फक्त कधी ? हा प्रश्न आहे. ट्रिगर इव्हेंट काय असेल ? मध्ये शरद पवारावर हल्ला झाला तो व्यक्ती जर ब्राह्मण असता तर पुन्हा १९४८ रीपीट झाले असते.

In reply to by कपिलमुनी

मला नाय वाटत तसं काही होईल म्हणून. १९४८ ला देखील काय झाले म्हणे? किती ब्राह्मणांचे शिरकाण करण्यात आले? घरे जाळली हे खरे, पण किती लोकांना मारले? तेव्हा जे झाले खूप वाईट झाले, पण त्याला जिनोसाईड म्हणणे म्हणजे जिनोसाईड या कल्पनेवरच विनोद केल्यापैकी आहे. ब्राह्मणविरोधी १९४८ चे जे दंगे झाले ते देशभर झाले का? महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्र सोडून कुठे झाले? पश्चिम महाराष्ट्रातही जास्त प्रमाण कुठे होते? जिथे दंगे झाले तिथे वित्तहानी किती आणि जीवितहानी किती झाली? लोकांचे ब्राह्मणांशी दंग्यांनंतरचे वर्तन कसे होते? याचा जरा अदमास घ्या अशी विनंती आहे. त्याचा अदमास घेऊन जर पाहिले तर ज्यूंच्या शिरकाणाशी तुलना करणे म्हणजे काय म्हणावे हे कळत नाही.

In reply to by बॅटमॅन

१९४८ ला सामाजिक वातावरण आजएवढे प्रदूषित नव्हते. मिडिया , सोशल मिडियामुळे बातम्या , अफवांचा वेग प्रचंड वाढला आहे. शहानिशा न करता त्यावर लोकं विश्वास ठेवतात आणि रीअ‍ॅक्ट होतात ( विटंबनेच्या अफवेवरून अशाच दंगली झाल्या आहेत) १९४८ ला सर्वसाधारंण लोका हिंसक नव्हती त्यामुळे बर्‍याच ठिकाणी घरे जाळाली तरी आतल्या लोकांना बाहेर काढले होते पण काही ठिकाणी सामूहिक शिरकाण झाले होते. सुदैवाने त्यांना सरकारी सपोर्ट नव्ह्ता ( जो शिख हत्याकांडामध्ये होता) सध्या जमाव जमला की हिंसक आणि क्रूर होतो. अगदी पाकीटमारापासून ते रस्त्यावरच्या गाडीचा धक्का लागल्यानंतरचा खून अशी उदाहरणे आहेत. हा वाढता हिंसकपणा पाहिला तर जिनोसाईडची भिती वाटणे साहजिक आहे . आज किंवा नजीकच्या काळात नाही किंवा ज्यूंएवढे मोठे नाही . पण समाजकंटकांना एखादा मोठा ट्रिगर ( हत्या ई.) मिळाला तर जिनोसाईडची छोटी आवृत्ती घडू शकते .

In reply to by कपिलमुनी

ह्या बाकी खरा. तेव्हापेक्षा आजचे वातावरण खूप जास्ती प्रदूषित झालेले आहे. कदाचित होईलही (न होवो). बायदवे, १९४८ साली शिरकाण कुठे झाले हे सांगू शकाल कय?

In reply to by कपिलमुनी

मुनीवर माझे व्यवसायानिमित्त एक छोटेसे निरिक्षण आहे. कदाचित तो बदलत्या समाजमनाचा आरसा असावा. ग्रुप्स, प्रतिष्ठाने, मंडळे, संस्था, सेवाभावी संस्था, संघटना आधीपासुन असायच्या. आता त्यांची बेसुमार पैदास झालीय ते सोडा पण पुर्वीच्या मंडळांचे संस्थांचे लोगो सुर्योदय, पणती, दिवा, मदतीचे हात, सुर्य, मंगलचिन्हे असे असायचे. आताच्या कुठल्याही ग्रुपला वाघ, सिंव्ह, तलवारी, बंदुका, जाळ, क्वचित कवट्या असेच लोगो लागतात. महाभारतकालीन वाघसिंह शौर्याचे प्रतिक म्हणून वापरत असत पण आजच्या जमान्यात फालतू फालतू लोकांची अन संघटनांची ती युध्द्जन्य चिन्हे पाहून कीव येते.

In reply to by बॅटमॅन

+१ वर ही सिम्बॉल्स असली तरी त्यामागे..हल्लीचे तयार झालेले निरनिराळे ग्रुप्स असतात. पुण्यातली दहिहंडीची पोस्टर्स पाहिली तरी समजतं लगेच. बेकारी,निरुत्साह या समस्येत असलेली वय १५ ते २२ गटातली पोरं या ग्रुप्स मधे बेसुमार भरती होत आहेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बेकारी,निरुत्साह
+१ आणि यांचे फ्लेक्सांवरचे हावभाव युद्ध जिंकून आल्या सारखे असतात ते वेगळेच!!!

In reply to by अभ्या..

जबरदस्त निरीक्षण! अगदी खरे आहे. एकंदरीत झुंडशाही वाढलेली आहे हे खरे. आणि डोक्यात जातात ती अशी वाक्ये: नाद करायचा नाय... बघतोस काय? मुजरा कर! सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची! (सिंहाचे दात जबड्यात हात वगैरे घालून का मोजायचे ह्या प्रश्नाचं मला अजून उत्तर मिळालेलं नाही. थोडं वाचन केलं तरी सहज कळेल. हे पद्धतशीरपणे जातीय तेढ वाढवण्याचे, वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न! ब्रिगेडधर्म!) राजे/दादा तुम्हीच! (पण काय?) दहशत घालून मोठेपण मान्य करायला लावण्याचं हे तंत्र खूप धोकादायक आहे. हे ब्रेंडिंग सुरु झालं आणि आपल्या समाजाचा पोत बिघडला. आता तो दुरुस्त होणं कठीण आहे.

In reply to by समीरसूर

भले
सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची
हाच तर प्रयत्न होता. स्वताला संभाजी समजून सिंह शिवशाहिरांच्या पुरस्काराला हात घालायला निघाले …. पण दात राहिले बाजूला हात बाहेर आल्यावर मोजणारी बोटे सुद्धा हातावर उरली नाहीत की. संभाजीचा आव आणणारा शास्ताखान निघाला म्हणायचे

In reply to by समीरसूर

सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, मोजीन दात, ही जात मराठ्याची! (सिंहाचे दात जबड्यात हात वगैरे घालून का मोजायचे ह्या प्रश्नाचं मला अजून उत्तर मिळालेलं नाही.
आणि मजा म्हणजे ही कन्सेप्ट सर्वांत अगोदर शाकुंतल नामक नाटकात सांगितलेली आहे. त्याहूनही मजा म्हणजे हे नाटक साडेतीन टक्केवाल्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे. तेव्हा ज्यांच्या विरुद्ध दंड थोपटायचे त्यांच्याच कल्पना चोरायच्या म्हणजे किती बुद्धिदारिद्र्य असेल पहा तुम्हीच.

In reply to by बॅटमॅन

अरे गंमतीची गोष्ट म्हणजे सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दातवाली मंडळी जेव्हा चुकुन घरी येतात तेव्हा कुत्रा मोकळा आहे का बांधलेला आहे ह्याची खात्री केल्याशिवाय गेटला पण हात लावत नाहित. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ते कुत्र्याचे सोनेरी पट्टे वडलोपार्जित जमिनी (काळी आई) विकून गळ्यात मिरवत असतात....! सरसकटीकरण नाही करत पण बर्‍याच केसेस पाहिल्यात. सॉरी मालोजीराव, गॉगल्या आणि इतर लोक...

In reply to by कपिलमुनी

सुदैवाने त्यांना सरकारी सपोर्ट नव्ह्ता ( जो शिख हत्याकांडामध्ये होता)
या धाग्यावरची बाकी चर्चा खरेच माहित नाही ब्याटमनरावांचे प्रतिसाद फॉलेकरत या प्रतिसादा पर्यंत पोहोचलो. या धागा चर्चेत शीख समाजाचा संबंध कोणता आणि कसा लावला जातो आहे ? शिख हत्याकांडामध्ये होता म्हणजे कोणते ? अफगाणीस्तानातले का नॉर्थवेस्ट फ्रंटीयरचे ? आणि त्यात सरकारी सपोर्ट या साठी कोणते संदर्भ आहेत ? शिख हत्याकांडास सरकारी सपोर्ट यातून प्रतिसाद कर्त्यास काय ध्वनीत करावयाचे आहे ? sandarbha hava

In reply to by बॅटमॅन

ऐला मी तिकडे कथेच्या जिलब्या पाडू राहिलोय, तिथे कोन फिरकत पण नाही आणि प्रतिक्रिया पण देत नाही. थांबा आता मी पण एक कॉन्ट्रोव्हरशीअल का. कु. धागा काढतोच…

In reply to by बॅटमॅन

मस्त...पटेश. तसा हि आज सेक्युलरीझम चा जो अर्थ आहे त्यामानाने आम्हि नॉन-सेक्युलरच बरे.

In reply to by कपिलमुनी

ज्यूं चे भयानक हाल झाले आणि अणि महा पाशवी निर्दयी शिरकाण झालं. तेव्हढं काही १९४८ ला झालं नव्हंत. गावगुंडांनी तेंव्हा हात धुवून घेतले हे मात्रं खरं. अर्थातच परिणाम फारच मोठे झाले हे मान्य पण ज्यूं च्या अत्याचारांशी तुलना योग्य नाही.

In reply to by आदूबाळ

त्यांनी तर संघ पण टाकलाय हो राजे हो .. Genocide is always organized, usually by the state, often using militias to provide deniability of state responsibility (the Janjaweed in Darfur.) Sometimes organization is informal (Hindu mobs led by local RSS militants) or decentralized (terrorist groups.) तरीपण, मला वाटते आपण लेव्हल ६ कधीच गाठलीय.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ळॉळ =))

प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत>> मराठे म्हणजे मराठी माणसं असा उल्लेख असावा . शिवपूर्व काळाची भयाण परिस्थिती लक्षात घेतली तर छोट्या छोट्या वतनांसाठी, थोड्या पैशांसाठी अत्यंत लाचार होणारे लोक असं करतहि असतील कदाचित .

हेच टाकायला येणार होतो...धन्यवाद ! खेडेकरांनी भारतातील प्रत्येक ब्राह्मणास ठार करु अशी धमकी दिलेली याप्रसंगी आठवत आहे... त्यांच्या पुस्तकातील इतर अनेक धमक्या नेटवर सापडतील बहुदा....

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ओह येस..नेहमीची मेथडॉलॉजी हो. पुरुषांना ठार मारा आणि बायका आपसात वाटून घ्या. नवा पार्ट इतकाच की इतके सगळे करूनच्या करून बहुजनांचे कैवारी असल्याचे मिरवून घ्यायचे.

पुरंदरे यांचे लेखन वाचल्याशिवाय लिहिलेला हा लेख आहे. बाकी महाराष्ट्रात खरोखरच कुणी मराठी आहे का? बाकी सत्य एकच आहे, पुरंदरे मुळे लोकांना शिवाजी माहित झाला. (माननीय नेहरू यांचे शिवाजी आणि मराठ्यांबाबत काय विचार होते, एकदा तपासून पहा) पुरंदरे नसते तर सेकुलर सरकारने शिवाजीचा धडा हि शाळेत शिकविला नसता. संभाजी ब्रिगेडने पुरंदरे यांचे आभार मानले पाहिजे. (जर ते शिवाजी राजेना आपला राजा मानीत असतील तर). बाकी लोकसभेचा पराभव साहेबाना अजून पचला नाही आहे, गादी विना त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

In reply to by विवेकपटाईत

पुरंदरे मुळे लोकांना शिवाजी माहित झाला.
साहेब उगा काहीही बोलू नका. बाबासाहेबांचे कार्य महान आहे पण शिवाजीमहाराजांची स्मृती त्यांच्याही अगोदर खूप जणांनी गाजवलेली आहे. बाबासाहेबांपायी बाकीच्यांचा अपमान करू नका.

In reply to by बॅटमॅन

पटाईत साहेबांच्या प्रतिसादातला शिवाजीमहाराजांचा एकेरी उल्लेख खटकला हे नमूद करतो! शेवटी ज्याची त्याची मर्जी, त्याने महाराजांचे कर्तुत्व काही कमी होणार नाही पण "पुरंदरे यांचे लेखन वाचल्याशिवाय लिहिलेला हा लेख आहे" या वाक्यात आपण पुरंदरेंना आदराने संबोधित करू शकता ते राजांच्या बाबतीतही फारसे अवघड नसावे असे वाटते! बाकी आप तो भावानावो में बह गये!! असाच एका धाग्यावर कोणीतरी "पुरंदरे यांचा अपमान म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान" असे लिहिलेले वाचले! अरे काय चाललंय, म्हणजे एखाद्याला मोठ्ठ दाखवायचं म्हणून काहीही बोलायचं? अशी सुद्धा मा. पुरंदरे यांना अशा प्रकारे ओळख देण्याची काही गरज नाहीये! महाराष्ट्र त्यांना शिवचरित्रकार म्हणून आधीपासूनच असाही ओळखतोच. दोन्ही बाजूंना हे टोक किंवा ते टोक एवढाच पाहायला मिळतंय! अवघड आहे!

In reply to by बॅटमॅन

अहो ज्ञानेश्वरीमुळे गीतेचे ज्ञान अगदी तळागाळातल्या सामान्य जनतेपर्यंत पोचले अशा अर्थाचे वाक्य आहे ते . गीता आधीपासून होतीच की. छत्रपतींच्या बद्दल अनेक बखरी आणि लेखन उपलब्ध होते मान्य पण सामान्य जनमानसात किती पोचले होते ? पेशव्यांच्या कारकिर्दीबद्दल पण अनेक साहित्य उपलब्ध आहे पण सामान्य लोकांना माहिती किती आहे? अशा अर्थाने
पुरंदरे मुळे लोकांना छत्रपतीं माहित झाला.

In reply to by कहर

नाही, तेही चूक आहे. बाबासाहेबांच्या अगोदर ललित लेखन किंवा काव्यनाटक वगैरे रूपांनी शिवचरित्र भरपूर तळागाळात पोहोचले होते. शिवचरित्रविषयक कादंबर्‍या किंवा नाटक वगैरेंना तुफान पॉप्युलॅरिटी अगोदरपासूनच होती. सामान्य जनमानसात शिवचरित्र पुष्कळ पोहोचले होते.

In reply to by बॅटमॅन

वाच्यार्थानं चरित्र म्हणता यावे असे पाहिले मराठी शिवचरित्र केळुसकर यांनी लिहिलेले होते ना?

In reply to by अस्वस्थामा

याच्या तळघरात "दि लायब्ररीयन " सारखी एखादी गुप्त आणि मोठी एखादी लायब्ररी असेल . .

कश्यात काय अन फाटक्यात पाय!! ह्यांची मर्दुमकी ब्राह्मण पुरुष मारा ते एड्स चे विषाणु असतात वगैरे इतपत असते त्याच्यापुढे नाही! उगाच धागा उघडला भाऊ!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

http://www.genocidewatch.org/aboutgenocide/8stagesofgenocide.html
3. DEHUMANIZATION: One group denies the humanity of the other group. Members of it are equated with animals, vermin, insects or diseases. Dehumanization overcomes the normal human revulsion against murder. At this stage, hate propaganda in print and on hate radios is used to vilify the victim group.

"शिवबा न होते तो सुन्नत सबकी होती" असे काहीबाही बरळतो, आणि महराजांचे अष्टप्रधान मंडळ गप्प बसते म्हणजे काय?>>> मग ? हे विधान चूक आहे काय ? महाराज धर्मनिरपेक्ष होते हे निर्विवाद सत्य आहे . त्यांच्या सैन्यात अनेक इतर धर्मीय लोक होते . आग्र्याला असताना महाराजांचा एकनिष्ठ सेवक मदारी मेहतर त्यांच्यासोबत होता . पण हिंदुस्थानवर राज्य करणारे त्यावेळचे राज्यकर्ते धर्मनिरपेक्ष नवते ना . शिवपुर्वकालीन हिंदूंची स्थिती आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर ची स्थिती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे . तेव्हा शिवाजी महाराज नसते तर कलशाने उच्चारलेलं वाक्य सत्य सुधा होऊ शकलं असतं .

शतका बद्दल धागाकर्त्याला शिवचरित्राचे सर्व खंड देउन सत्कार करण्यात येत आहे. मिपा पडीक सत्कार समीती. अध्यक्ष - जेपी उपाध्यक्ष - नाखू (नाखू यांचा सद्याचा पत्ता माहीत नाही) बाकी सगळे मिपा पडीक कार्यकर्ते

In reply to by खटपट्या

थोडासा उचित बदल सुचवतो. शतका बद्दल धागाकर्त्याला बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्राच्या प्रत्येक आवृत्तीची एक एक प्रत देउन सत्कार करणेत येत आहे. तसचं जाती/वंशश्रेष्ठत्वाची जी काविळ झालेली आहे त्यामधुन सदर महाशय लौकर बरे व्हावेत ह्यासाठी सद्ध्याचे लोकप्रिय आद्यदैवत जयदेवा जयदेवा खंडेरायाला प्रार्थना करण्यात येत आहे. -सर हेपीतेखा जेपी- (अध्यक्ष,अखिलमिपापडिकसत्कारसमिती) -श्री.श्री.बॅटुकराजे गॉथमहळ्ळीकर- (-संस्थापक व अध्यक्ष, रोचकऐतिहासिकसंदर्भसमिती, मिपावाडी) -कॅजॅस्पॅ- (अध्यक्ष,धरलाकीहाणपळलाकीसोडकुत्रा ब्रिगेड) आणि असंख्य कार्यकर्ते.

In reply to by कपिलमुनी

खिक्क.. टका ने बगा कसा आगदी मनावर घेतलाय.. ;)

मातृगौत्र निदर्शक नांव धारण करणारा गौतमीपुत्र सातकर्णी हा काही पहिला राजा नाही. असे मातृगौत्र निदर्शक नांव धारण करण्याची प्रथा/पद्धत त्यापुर्वीही म्हणजे अगदी वैदिक काळापासुन प्रचलित होती. बहुपत्नीत्वाची पद्धत अस्तित्वात असलेल्या समाजात विशिष्ट राणीपासून झालेली मुले इतर राण्यांच्या मुलांपासून वेगळी अशी ओळखता यावीत यासाठीची ती परंपरा होती. ही पद्धत केवळ राजघराण्यापुरतीच मर्यादित नसून सामान्य जनतेतही अशी नावे अस्तित्वात होती. इथे मातेबद्दल आदर वगैरे सुचविण्यासाठी गौतमीपुत्र सातकर्णी ने हे नाव धारण केलेले दिसत नाही. ….बादवे….. सातकर्णी (घराणे) हे क्षत्रिय घराणे नसून ब्राह्मण घराणे होते. संदर्भ – महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर , इतिहास : प्राचीन काळ (खंड १) पान क्र. १६५ व ४८५

In reply to by अर्धवटराव

नाही हो. बाकी सातवाहन ब्राह्मण होते का क्षत्रिय हा विवाद्य विषय आहे. हा संपूर्ण डोलारा गौतमीपुत्राच्या नासिक शिलालेखातील 'एक ब्राह्मणनस' (एक ब्राह्मण) ह्या शब्दावर आधारित आहे. ह्या व्यतिरीक्त सातवाहन हे ब्राह्मण अथवा क्षत्रिय असल्याचा कुठलाही पुरातत्वीय उल्लेख नाही.

In reply to by प्रचेतस

असहमत... नाशिक शिलालेखात ’एक ब्राह्मणनस’(एक ब्राह्मण)(दुरूस्ती : मुळ शब्द ’एक बम्हण’ (एक ब्राह्मण) असा आहे.) ह्या शब्दाच्या आधी देखील एक शब्द आहे. ’खतिय दप मान मदण’ म्हणजे क्षत्रियांचा अहंकार चिरडणारा. आणि हा शिलालेख गौतमीपुत्राचा नसून त्याचा मुलगा ’वासिष्ठीपुत्र पुलुमावी’ ( अर्थात अनेक राण्यांपैकी एक वासिष्ठी या राणीचा पुत्र ) याच्या राजवटीतील आहे.

In reply to by परश्या

मूळ प्राकृत शब्द एकबम्हणस असा आहे. एककुसस एकधनुधरस एकसूरस एकबम्हणस रामकेसवाजुनभीमसेनतुलपरकमस बाकी हा शिलालेख पुळुमावीने कोरुन घेतलेला असली तरी लेखाचा उद्देश हा पुळुवामीच्या आजीने (आणि गौतमीपुत्राच्या आईने) हे लेणे धर्मकार्यार्थ कोरवून घेतले हे नमूद करण्याचा आहे.

फ़ालतू धागा. पूर्ण वाचायच्या भानगडीत पडलो नाही. छत्रपती व्यवस्थित लिहीणे तरी शिकून घ्यावे किमान.

प्यारे१ बरं . नीलमोहर मलाही तो प्रश्न पडतो . भूछत्रासारख्या गल्लीबोळात उगवलेल्या संघटनांनी उच्छाद मांडलाय नुसता . आक्षेप घेणार्यांनी स्वतः कधीही आक्षेप घेतल्या जाणार्या गोष्टीचा इतिहास वाचलेला नसतो . वाहणार्या गंगेत हात धुवून घ्यायचा म्हणून गावगुंड काहीतरी धुडगूस घालत बसतात . आणि लई झालं आता . एकाच विषयावर किती धागे आलेत ओ . दुसरं कैतरी लिवा आता . इनोदी , भयकथा वगेरे

हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत"
यावरून बाबासाहेब पुरंदरेंना शिव्या घालणार्यांनी या अभंगावर कधी टिप्पणी केलेली आठवत नाही . झविली महारे । त्याची व्याली असे पोरे ॥ करी संतांच मत्सर । कोपे उभारोनी कर ॥ बीज तैसे फळ । वरी आले अमंगळ ॥ तुका म्हणे ठावे । ऐसे झाले अनुभवे ॥

In reply to by कपिलमुनी

हा सारासार ब्रह्मणी कावा आहे. हा अभंग प्रक्षिप्त आहे. तुम्हाला कळत नाही का? बहुजन तुकोबा असे काही लिहिणे शक्यच नाही. तुकोबांना मारल्यावर त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी कोणीतरी हा अभंग त्यांच्या गाथेत घुसडला आहे.

मुख्य मुद्द्यावर जे रणकंदन चाललंय ते चालू द्या. पण
Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल
याबद्द्ल ... हा दिव्य मुलगा "तिच्या आईची काळजी घेईन" असं ठामपणे सांगणार का?

In reply to by अंतरा आनंद

तिच्या आईवर अवलंबून असावं. -राजकुमार हेमामालिनी कमलाहासन पद्मिनी कोल्हापुरे चा कुठला रे तो चित्रपट??????