✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फस्ट साईट लव....

च
चेतन677 यांनी
Tue, 08/18/2015 - 18:28  ·  लेख
लेख
राहुल एकदा कोथरुड डेपोवरुन चिंचवडला येत होता...पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती.थोड्याच वेळात डेक्कन आलं.तिथुन एक तरुणी बस मध्ये बसली.तिने बाकीच्या मुलींप्रमाणे पुर्ण चेहरा स्कार्प मध्ये लपवला होता.बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती.थोड्याच वेळात तिने स्कार्प काढला.ती अतिशय देखणी मुलगी होती.का कोणास ठाऊक राहुलच्या ह्रदय अजुन जलद गतीने धडधडायला लागलं.त्याच्या कंटाळवाण्या चेहर्‍यावर हास्य फुलले.क्षणभरात ती मुलगी राहुलला हवीहवीशी वाटत होती. मित्रांनो बर्‍याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर काही चित्रपटही बनवले गेलेत.हे नक्की प्रेम असतं की आकर्षण?अशामध्ये किती लव स्टोरीज सक्सेस होतात आणि किती फेल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं.??
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
15766 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

च्यायला

चाणक्य
Tue, 08/18/2015 - 18:59 नवीन
मला आधी वाटलं शशकच आहे.
  • Log in or register to post comments

+१

अभ्या..
Tue, 08/18/2015 - 19:04 नवीन
+१ . . आमच्या मिक्याच्या शब्दात " यु आर लेट, यू फूल" ;)
  • Log in or register to post comments

फस्ट साईट लव

जिन्क्स
Tue, 08/18/2015 - 19:07 नवीन
फस्ट साईट लव.... मला वाटल लेखक गवंडी आहे आणि तो काम करत असलेल्या पहिल्या साईटच्या प्रेमात पडला.
  • Log in or register to post comments

संपादक्स प्लीज हा धागा ऊडवू

अभ्या..
Tue, 08/18/2015 - 19:09 नवीन
संपादक्स प्लीज हा धागा ऊडवू नका हं. प्लीज्च. मला लै स्टोर्‍या लिहायच्यात. लै काय काय वाटतं मला.
  • Log in or register to post comments

जे काही लिहिणार असाल ते

यशोधरा
Wed, 08/19/2015 - 20:08 नवीन
जे काही लिहिणार असाल ते अर्धवट न ठेवता पूर्ण करा म्हंजे झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चेहरा स्कार्फच्या आड असताना

अस्वस्थामा
Tue, 08/18/2015 - 19:10 नवीन
चेहरा स्कार्फच्या आड असताना प्रेमात पडला असतात तर ते तुमचे शाश्वत चिरंतन प्रेम. स्कार्फ काढल्यावर तोंड पाहून पयले तो आकर्षणच होयेगा ना भौ.. (प्रेमाच्या बाबतीत डोपमिन रोल बाबत कुठलीही शंका नसलेला)
  • Log in or register to post comments

म्हण्जे? नुसतीच फिगर बघुन

भीमराव
Wed, 08/19/2015 - 11:44 नवीन
म्हण्जे? नुसतीच फिगर बघुन होतं ते प्रेम शाश्वत प्रेम का? बराय बराय, आम्ही ऊगाच त्याला आयटॉनिक समजत होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

विषय उच्च पातळीवर चालू असताना

प्यारे१
Wed, 08/19/2015 - 12:05 नवीन
विषय उच्च पातळीवर चालू असताना अकारण खाली घसरणाऱ्या बाबूदादांचा सौम्य निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

अशा तर्हेने आजवर १,२४,३४५

संदीप डांगे
Tue, 08/18/2015 - 19:22 नवीन
अशा तर्हेने आजवर १,२४,३४५ वेळा प्रेमात पडलोय. कदी कदी तर एका सायटीत चार चार वेळा पडलोय चार जणींच्या. तेबी बिनास्कार्पवाल्या पोरींच्या. त्येनी आमची 'साईट' पवून पटपट स्कार्प चडवले हे येगळं. काय कथा सांगायच्या तुमाला आणि तुमी बी आयकायच्या... मिपाचं सर्वर परत डाऊन व्हइल आणि पोर्न कोनतं फायला पायजेल त्याची चर्चा ऐन्वेळंला बंद पडंल...
  • Log in or register to post comments

हा हा हा

एक एकटा एकटाच
Tue, 08/18/2015 - 19:38 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कदी कदी तर एका सायटीत चार चार

बॅटमॅन
Wed, 08/19/2015 - 17:44 नवीन
कदी कदी तर एका सायटीत चार चार वेळा पडलोय चार जणींच्या
"सायटीत" चा नेहमीचा अर्थ घेतल्यामुळे अर्थ समजलासे वाटले पण नंतर कळालं की इशय वेगळाच आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

;-) तुमची ती साईट वेगळीच है

संदीप डांगे
Wed, 08/19/2015 - 17:57 नवीन
;-) तुमची ती साईट वेगळीच है दादा...! अहो, लोक एका 'फायटीत' चार चार जणांना लोळवतात, आम्ही एका सायटीत चार चार जणींच्या प्रेमात ळोळतो. खी खी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सकुनाल सायेबांच्या धाग्यावर उडवायची राहिलेली राळ इथे उडवावी !

माम्लेदारचा पन्खा
Tue, 08/18/2015 - 19:34 नवीन
आता पुना एकदा हळहळ ,भळभळ ,चळवळ ,तळमळ बघणे आले !
  • Log in or register to post comments

>>> स्कार्प म्हन्जे?

प्यारे१
Tue, 08/18/2015 - 19:54 नवीन
>>> स्कार्प म्हन्जे?
  • Log in or register to post comments

प्यारेजी...

चेतन677
Tue, 08/18/2015 - 20:25 नवीन
सोप्या भाषेत म्हणजे मुली ज्याने आपला पुर्ण चेहरा आणि डोके झाकतात फक्त डोळे ऊघडे ठेवतात तो म्हणजे स्कार्प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फ कधी वापरतात मग?

प्यारे१
Tue, 08/18/2015 - 22:14 नवीन
फ कधी वापरतात मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन677

नाशिकचे काका वापरतात तेव्हां

खेडूत
Wed, 08/19/2015 - 14:09 नवीन
नाशिकचे काका वापरतात तेव्हां ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गूड वन!

प्यारे१
Wed, 08/19/2015 - 14:16 नवीन
गूड वन! -मूर्ती लहान किर्ती महान बाहुबली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

घालमेल झाली होती का ?

द-बाहुबली
Tue, 08/18/2015 - 19:55 नवीन
घालमेल झाली होती का ?
  • Log in or register to post comments

हां ... हे मत्वाचं!

नाव आडनाव
गुरुवार, 08/20/2015 - 22:14 नवीन
हां ... हे मत्वाचं! "घालमेल" शबूद याया पायजे ष्टूरीत, तर कुढं गोष्ट पुढं सर्कती... र्‍हावल्याला यकदा इचारून यावा लेकक शेट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी

रातराणी
Tue, 08/18/2015 - 20:04 नवीन
पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती .बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती ही वाक्य वाचून मीच काय घोड मारलं होत पी एम टी च असं वाटल. :(
  • Log in or register to post comments

कमी गर्दीची पीएमटी....

चेतन677
Tue, 08/18/2015 - 20:19 नवीन
कमी गर्दीची पीएमटी हवी असेल तर रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी प्रवास करा.....
  • Log in or register to post comments

परवाचा प्रेम की आकर्षण धागा

अजया
Tue, 08/18/2015 - 20:53 नवीन
परवाचा प्रेम की आकर्षण धागा वाचा हो भौ.तिथे बरीच उत्तरं मिळतील.
  • Log in or register to post comments

धागा स्किप मारला तरी चालेल...

पिलीयन रायडर
Tue, 08/18/2015 - 22:19 नवीन
धागा स्किप मारला तरी चालेल... प्रतिक्रिया नक्की वाचा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

प्रेम = आकर्षण

जडभरत
Tue, 08/18/2015 - 21:26 नवीन
प्रेम = आकर्षण आकर्षण = प्रेम पोपशास्त्री यांच्या सिद्धांताचा अनुयायी!!!
  • Log in or register to post comments

मित्र

मी-सौरभ
Wed, 08/19/2015 - 18:49 नवीन
हे लव बिव सगळ झूट असतं. आपल्या मुठीत जोर असला की सगळं व्यवस्थित होतं
  • Log in or register to post comments

+१

सूड
Wed, 08/19/2015 - 18:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मिपा वयात आलं. _/\_

बॅटमॅन
गुरुवार, 08/20/2015 - 18:18 नवीन
मिपा वयात आलं. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

खाटुकाशी शमत!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/20/2015 - 22:50 नवीन
Image removed. खाटुकाशी शमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ख्या ख्या ख्या!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/20/2015 - 21:25 नवीन
ख्या ख्या ख्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

वैश्विक सत्य

खटपट्या
गुरुवार, 08/20/2015 - 22:45 नवीन
वैश्विक सत्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

आपल्या मुठीत जोर असला की सगळं

प्रसाद गोडबोले
Mon, 09/07/2015 - 16:11 नवीन
आपल्या मुठीत जोर असला की सगळं व्यवस्थित होतं
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मला पहिल्यांदा वाटलं चेसुगु

कोमल
Wed, 08/19/2015 - 20:45 नवीन
मला पहिल्यांदा वाटलं चेसुगु यांची नव्याने यंट्री झाली की काय..
  • Log in or register to post comments

चेसुगु म्हणायचं नाही.

प्यारे१
Wed, 08/19/2015 - 21:06 नवीन
चेसुगु म्हणायचं नाही. आवडत नाही त्यांना. काय आत्मुबुवा? बरोबर ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

बराब्बर .. चेसुगु डूख धरतात.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/20/2015 - 22:49 नवीन
Image removed. बराब्बर .. चेसुगु डूख धरतात. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फुस्स फुस्स!! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 08/21/2015 - 06:52 नवीन
फुस्स फुस्स!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

एवढा छोटा फुत्कार नसतो. पानभर

प्यारे१
Fri, 08/21/2015 - 11:37 नवीन
एवढा छोटा फुत्कार नसतो. पानभर मोठा असतो. त्यात नक्की कुठे आहे तो शोधावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चेसुगु कोण? कुणीतरी कृपया

जडभरत
Fri, 08/21/2015 - 20:41 नवीन
चेसुगु कोण? कुणीतरी कृपया लिंक द्या!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फक्त कोण आहे याची खात्री करुन घ्या !

Sanjay Uwach
गुरुवार, 08/20/2015 - 21:08 नवीन
आमच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये मुली फारच कमी होत्या याचा परिणाम म्हणून कि काय मुले बाहेरील गार्डन मध्ये गवत कापायला येणाऱ्या मुलीना बघून लांबून खिडकीतून उगीचच शिट्या मारीत असत य़ाला तुम्ही कसले आकर्षण म्हणणार. त्यात उन्हाळ्यात सर्व सरदारजी मुले सुटीच्या दिवशी त्याचा डोक्यावरून नाहण्याचा कार्यक्रम असायचा.अंघोळ झाली कि ती पाठीवर केस सोडून सुकवण्यासाठी बाहेरच्या गार्डन मध्ये ओळीने बसत होते . बघणाऱ्या व्यक्तीला असे वाटायचे कि या सर्व गवत कापणाऱ्या मुलीच ओळीने बसल्या आहेत . मग शिट्यांचा सिलसिला जोरात चालू होत असे . या वर मात्र एक शेर आठवणीने म्हणत होतो "दूर से देखा दिल बेकरार था,दूर से देखा दिल बेकरार था, नजदीक से देखा साला सरदार था
  • Log in or register to post comments

अरेरेरेरे!!! स्वप्नभंग!!!

जडभरत
Fri, 08/21/2015 - 20:48 नवीन
अरेरेरेरे!!! स्वप्नभंग!!! अपेक्षाभंग!!! फुस्स्स्स्स्स!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach

तुमच्या कॉलेज बाहेरील गार्डन चे गवत कापायला

gogglya
Mon, 08/24/2015 - 15:24 नवीन
मुली येत असत? लय भारी कॉलेज होत तुमचे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Uwach

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा