शनिवारपासून श्रावण सुरू झाला. आता महिनाभर वेगवेगळे उपास केले जातील. उपासाला साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, आणि आरोग्यासाठीही तो हितकर नाही. शिंगाडा हा कंद उपासासाठी वापरल्या जाणाय्रा पदार्थांपैकी एक असला तरी आपण त्याचा फार कमी वापर करतो. आयुर्वेदिकदृष्ट्या शिंगाडा ऊर्जावर्धक आहे, त्यापासून पीठ तयार करतात. हे पीठ थालिपिठासाठी वापरतात. त्याची खीर, लाडूही करतात.
साहित्यः शिंगाड्याचे पीठ दोन वाट्या, पिठी साखर दीड वाटी, साजूक तूप पाऊण वाटी, सुक्या खोबय्राचा कीस अर्धी वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी, वेलची पावडर.
कृती: शिंगाड्याचे पीठ कढईत घ्यावे. त्यात तूप घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे, गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून, भाजून घ्यावे, शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून घ्यावे. भाजलेले पीठ गार झाले की त्यात पिठीसाखर, दाण्याचे कूट, सुक्या खोबय्राचा कीस बारीक करून मिसळावा. स्वादानुसार वेलची पावडर घालावी. सर्व पीठ नीट मिसळून लाडू वळावेत. लाडू नीट वळले जात नसतील तर गरजेनुसार साजूक तूप घालावे.
यामध्ये डिंक तळून , खारीक पावडरही घालता येईल. फक्त त्यानुसार लागल्यास पिठीसाखरेचे प्रमाण वाढवावे. या प्रमाणात १५/१८ लाडू होतील. हा लाडू अतिशय पौष्टिक आहे, लहान मुलांना अवश्य द्यावा.


वाचने
9971
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप सुंदर दिसताहेत लाडू.
आवडली पाकृ.
छान सात्विक पाकृ!
पाकृ आवडली.. इथे आम्हाला काहि
छान आहे पाककृती :)
मस्त दिसतायेत लाडु ...करुन
पाकृ आवडली
सुंदर दिसतायत लाडू.
श्रावण स्पेशल! नक्की करून पहा.
खूप छान, सोप्पी पाककृति.
मस्त मस्त लाडु
छान आहेत लाडू !!
लाडू मस्त दिसतायत.
मला पायजे.
गुर्जी ,
In reply to मला पायजे. by अत्रुप्त आत्मा
मस्त दिसतायत लाडू :)
रत्नागिरीत करतात असे प्रकार अत्रुप्तजी!
अनन्न्या, दुत्त!! दुत्त!!!
In reply to रत्नागिरीत करतात असे प्रकार अत्रुप्तजी! by अनन्न्या
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروحशिंगाड्याचे लाडु मस्त
वा!
भारी पाक्कृती.