Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] मातृत्व

लेखक सिंधू वडाळकर यांनी शुक्रवार, 14/08/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
अनाथ आश्रमात लहान मुलांची किलबिल होती. मानसी व मानस दोन्ही मोठ्या अधीरतेने त्या मुलांना पाहत होती... कारण आज खूप प्रतीक्षेनंतर त्यांना एक मुलगी दत्तक मिळणार होती..... तेवढ्यात त्यांना बोलावण्यात आले. त्यांनी मुलीला दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. तिला घरी आणले. मोठ्या जोरात तिचे बारसे झाले. "मृणाल" नाव ठेवले. मृणालला येऊन तीन महिने झाले. मानसी व मानसला मृणालचा लळा लागला. घर गोकूळ झाले. लग्नाला बारा वर्षे होवूनही घरात पाळणा हालला नव्हता, म्हणून तिचे कोड कौतुक होत होते. तिला हवे ते मिळत होते. अचानक एक दिवस मानसी चक्कर येऊन पडली. तिच्या पोटात दुखू लागले. डॉक्टर मनिषा तपासून म्हणाल्या,"अभिनंदन, तुम्ही आई होणार!"

वाचने 3970
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

+१ अशीच एक घटना एका परिचितांच्या बाबतीत घडली आहे. कथा आवडली

+१

+1

+१

+१ कथा आवडली.

+१

+१

+१

+१

+१ मस्त. यामागचे अध्यात्मिक लॉजिक एकाने सांगितले होते ते आठवले.

छान

+१ आणि अ'ता जिलबी येत्ये ,तर टाकतोच! ;-) सिक्वेल चा हिशेब नीट जमला आहे...पण, तेव्हढ्याच साठी हा भाग थांबला आहे! ;-)

+१

+१

+१

+१

+१ पन असा खरा अनुभव कुणाला माहिती असेल, तर वाचायला उत्सुक.

पण मृणालच काय. माझ्या मावशी च्या मुली सोबत असं झालं आहे. त्यांनी पण एका मुलीला दत्तक घेतलं आहे. आणि ते दत्तक मुलगी आणि त्यांच्या मुलां सोबत खूष आहेत. तिला ते कधीच दूर करत नाही.

+१