Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] सामक्षा

लेखक सूड यांनी शुक्रवार, 14/08/2015 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं गाव काय हे न्हवे. ते तिते तळकोकणात!! किनार्‍यावरना गोरे आले, धर्मांतरं सुरु केल्यानी. भरीसभर शाहाची माणसा होतीच. मग आमच्या सासर्‍यांच्या पणजोबांनी सगळा बाडबिस्तारा उचलल्यानी नि आले हिकडे आडगावात!! चांगली जागा बघून घर बांधू म्हटले, गावकरी सांगत जागा बरी नाय. दुसर्‍या कुटंव्ह बांदा पण हिते नको. पणजोबा पण खमके, घर बांधून दाखवलंनी. सगळं नीट झालं, घर बांधून गाठीस पयशे र्‍हायले. म्हयन्याभरान घरभरणीचा मुहूर्त काढल्यानी. पणजीबाई पंगतीसाठीचे तांदूळ सडायला म्हणून उभ्या र्‍हायल्या नि दोन घाव घातले नाय की लकाटल्या. विंचवान सरळ टाळूवरच डंख मारलान. "मोठी सून फार जगत नाय ह्या जागेत", असं गावकरी म्हटले होते. ती पणजीबाईंपासना चाललेली परंपरा माझ्यापर्यंत चालल्ये.

वाचने 7481
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

मतकरी श्तायल !

+१

+१ शीर्षक फकत कळले नाही. सामक्षा म्हणजे?

In reply to by मधुरा देशपांडे

सामक्षा म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रचिती (?), अनुभव येणे. गोष्ट सिद्ध करणारा पुरावा!!

+१

कुल कथा.

+१

बाब्बो ! आता कस हुनार ?

+१ मस्त कथा!

गोष्ट सांगण्याची ष्टाईल आवल्डी!

+१

+१

+१

+१ आमच्या गावाला नेहमी वापरतात हा शब्द.

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

आवडली :)

कथा आवडली

+१

+1

>>>> पणजीबाईंपासना चाललेली परंपरा माझ्यापर्यंत चालल्ये. हे 'अत्मनिवेदन' आहे तर 'अत्म्या'चे. सामक्षा म्हणजे प्रचिती हे पहिल्यांदा समजलं. +१

+१

+१

+१ छान

+१.