२५ जुलै - कारगिलच्या विजयी वीरांना आदरपूर्वक ...
हिमगिरीच्या धवल शिखरावर
फडफडणारे तिरंगी निशाण ...
त्याच्या वाटेवर शिंपले आहेत
रक्ताचे सडे ..
उधळले गेले आहे
सुवासिनींचे कुंकु ...
त्याचा लालस केशरी रंग
जाणवतो अजून नजरेला
मरणाची भिती , शिकवलीच नाही कुणी
बर्फाच्छादित वाटांवरुन चालताना
आठवले नाहीत कधीच आपले संसार
मातृभूमिच्या काळजात
खुपसलेल्या खंजिराची कळ
उठते आहे मस्तकात
तळपत्या तेगीचा निर्धार
रुतला आहे मनामनात
कुठुन, कधी आणि किती येतील ते
आणि पडेल काळाचे जाळे
सांगता येत नाही काहीच
समोरुन येतील ,
कि पाठीवर करतील वार
हे ही ठाऊक नाही
अंतरी आहे फक्त एकच जाणीव
जपायचे आहे हे निशाण
प्राणांची ओंझळ करुन
त्याच्या भोवती घोंघावणारे
अमंगल वारे,
त्याला वेढणारे ते
अभद्र कडे,
दूर करण्यासाठी
झुंजायचे आहे अथक
त्याच्यासाठी जगायचे,
मरायचे ही त्याच्यासाठीच
जेव्हा कोसळतील
श्वासाचे बांध आणि
जळेल देहाची समिधा
या रणयज्ञात
तेव्हा सांगतील माझी मुलं ..
आणि पूर्वज सुद्धा -
अभिमानाने ....
"इथे वाहणार्या रक्त नद्यात
वाहतो एक थेंब आमचा
या निशाणात मिसळले आहे
आम्ही आमचेही रक्त"
मग, गुंजतील या अवकाशात
आनंदाचे पडघम
उठतील तृप्तीचे तरंग
या रक्तरंगी हिमनद्यांवर
होईल जयजयकार
मनमुक्त कंठातून
येतील हजारो वीर
सरसावून आपले बाहू
आणि राहील निरंतर
या निशाणाची शान
अभेद्य , अभंग ..
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.. आवडली
छान.. आवडली
असेच म्हणातो
In reply to छान.. आवडली by शैलेन्द्र
+१
कारगील विरांना सलाम.
अर्धवटराव
" जो शहीद हुए है उनकी
" जो शहीद हुए है उनकी
जरा याद करो कुर्बानी | "
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !
केवळ अप्रतिम !
....अगदी हेच मनात आलं. स्वातंत्र्यदीनाच्या शुभेच्छा.
छान कविता!
छान कविता!
जय हिन्द! छान कविता. Salute
जय हिन्द!
छान कविता.
Salute
जय हिन्द! छान कविता. Salute
जय हिन्द!
छान कविता.
Salute