Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] प्रतारणा

लेखक सौन्दर्य यांनी शुक्रवार, 14/08/2015 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक महिने नीट झोप लागली नव्हती, विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. शेवटी आज रात्रीच काम तमाम करण्याचा निश्चय केला तेव्हा जरा बरं वाटलं. हिच्या एकूण वागणुकीवरून तिचे बाहेर काहीतरी लफडं चालू असल्याची दाट शक्यता होती. फोनवर हळू आवाजात बोलणं, मी दिसल्याबरोबर बोलणं थांबवणं, फोन पासवर्ड घालून लॉक ठेवणं. ‘त्याच्याशी’ सतत हसत बोलणं आणि माझ्याशी बोलताना कपाळाला आठ्या……! रात्री ती झोपायला गेली त्यावेळी हॉलमध्ये सर्व तयारीनिशी टीव्ही बघत बसून होतो, लक्ष मात्र बेडरूमकडेच होतं. मध्यरात्री धीर करून बेडरूममध्ये जाऊन काम फत्ते करूनच बाहेर पडलो. सकाळी, मी रात्री ठेवलेले घटस्फोटाचे कागद, सही करून तिने टेबलावर ठेवले होते.

वाचने 3973
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

:) अमोल पालेकरच्या चित्रपटा सारखे वाटले.

+१

+१ एकदम बाहुबली चित्रपटासारखा END केलाय तुम्ही. मला ह्या गोष्टीचा दूसरा भाग वाचायचाच आहे

+१ सही कशी मिळवली ह्याचे कुतुहुल आहे! सीक्वेल ची प्रतिक्षा...

In reply to by gogglya

+१ टू गोगल्या. आणि पुढचा भाग चांगला पडेल या आशेवर या भागाला प्लस वण!

+१

+१

+१

+१

आवडली. या कहाणीचा प्रि-क्वेल वाचायला आवडेल.

+१

सस्पेन्स

+१

+१

+१

+१


पुभाप्र

In reply to by मृत्युन्जय

हेच म्हणतो.
रात्री ती झोपायला गेली त्यावेळी हॉलमध्ये सर्व तयारीनिशी टीव्ही बघत बसून होतो, लक्ष मात्र बेडरूमकडेच होतं. मध्यरात्री धीर करून बेडरूममध्ये जाऊन काम फत्ते करूनच बाहेर पडलो.
या वाक्यामुळे गोंधळ वाढतोय.

In reply to by मृत्युन्जय

स्पर्धेतील कथेवर प्रतिसाद किंवा स्पष्टीकरण द्यायला परवानगी आहे की नाही ते माहित नसल्यामुळे तुम्हाला व्यनी केला आहे.

+१ सहीच. मगापासुन झपाटल्या सारख्या नविन शशक वाचतोय. मधे ३/४ दिवस जास्त कथा आल्या नाहीत. पण आता अनेक उत्तम कथा शेवटचे २ दिवस असुन येतायत.

शशक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. फक्त १०० शब्दांत एक अर्थपूर्ण कथानक उलगडून सांगणे ही एक कसोटीच आहे असे मला वाटते. मराठीत हा कथाप्रकार रुजवणार्यांचे आणि मिपावर त्याची स्पर्धा योजणार्यांचे हार्दिक अभिनंदन.