Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] - अंगार !

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 13/08/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
"अच्छा हुआ वो पाववालेका दुकान जला दिया. बच्चा देखके बेवकूफ बनाता था वो. ऐसाहीच मांगता था उसको. अब कलसे हम चाचाके दुकानसे पाव लेंगे..." सायंकाळच्या वेळी शहर जाळपोळींनी उजळून निघाले होते. तसाच उजळलेला तो एक निरागस चेहरा. पाववाल्याला धडा मिळाला, आणि उद्या सुद्धा शाळेला सुट्टी असणार, या दुहेरी आनंदात झोपी गेला.. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शहर पुन्हा उठले. पुन्हा पेटले. उजाडता उजाडता काही दिवे, पुन्हा मालवले.. कायमचेच.. त्याचे मात्र आज काहीतरी बिनसले होते. आवळलेल्या मुठी, अन चिमुकल्या डोळ्यात फुललेला अंगार. ज्यात एक अख्खा जमाव जाळायची ताकद होती. पण एक मूक आक्रोश करत त्याने ईतकेच विचारले, ओये ऽऽ चाचा को क्यू मारा??..

वाचने 7513
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

+१

+१

+१

जबरी लिहिली आहे

+१

१०० शब्दात बरीच मोठी गोष्ट सांगीतलिस भावा

+१

+१

मस्त!

+१

जबरा !

+१ नागवं सत्य

सत्य, पन इसर्लिया जनु !

+१११११११

+१

+१

+1

+१

+१

+१.

+१

+1

+१

येक लम्बर....

+१

दारुण वास्तव!

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+1