Skip to main content

बीबीसीची बातमी : हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ?

लेखक हाडक्या यांनी गुरुवार, 13/08/2015 04:07 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता. परंतु हे वाचले Are Hindu nationalists a danger to other Indians? आणि भयंकर वैताग आला. असे नाही की मला मोदी अथवा भाजप सरकार बद्दल फार काही प्रेम आहे (जो चांगले काम करेल त्याचे काम चांगले म्हणावे हे पटतं) पण डोक्यात जातात हे दांभिक लोक! आणि वरुन हे जागतिक एडिशनमध्ये ठळक लेखात आहे म्हणजे लेखिकेस ही कल्पना ही नसावी का की ती देशाची प्रतिमा अतिशय वाईट तर्‍हेने रंगवत आहे ? देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का यांच्या (दहशतवादास पाठबळ इ.इ.) ? यांचे डोळे उघडे असतील तर इतकी वाईट परिस्थिती आहे का ? की मलाच ती दिसत नाहीय ? याला याच भाषेत उत्तर का दिले जात नाही भारतीय पत्रकार व माध्यमांकडून ? या अशा भाषेमुळेच वातावरण असं वाटतं खरंतर.

वाचने 28237
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

"1,000 people, mostly Muslims, were killed in clashes after 60 Hindu pilgrims died in a fire on a train." पाहिलंत? मुस्लिमांसाठी "killed" शब्द वापरला. हिंदूंसाठी मात्र "died". जणू काही हिंदू आपोआप मेले.

In reply to by अगम्य

ह्यांचे बोलविते धनी नक्कीच कोणीतरी असले पाहिजेत
बीबीसीने लेखिकेकडून लेख आधीच काही महिन्यांपुर्वीच बनवून घेतला असेल, आणि बीबीसी संपादकात बसलेल्या एखाद्या भारत द्वेष्ट्याने किंवा करप्ट संपादकाने १५ ऑगस्ट जवळ येते आहे तसे भारतात अशांतता पसरावी म्हणून वेळ पाहून लेख छापला असेल का अशी शंका वाटते आहे.

भारतीय पत्रकार आणि मीडिया हरामखोर XXXXX XXX XXXXXXXXXXXX XXXXX आहे .यांना सर्वांना एका बोटीत बसवून बोट बुडवा खोल समुद्रात ...... देश जरा शांत होईल मीडिया म्हणजे उपयोग शून्य आणि उपद्रव जास्त असे झालेय आजकाल

सनातनी हिंदुंच्या वर्तवणुकिमुळे उखडलेले फेक्युलर फुरोगामी(म्हणजे सू शिक्षित टनाटनि) असले मूर्ख धंदे करतात. त्यांना मुद्देसुद प्रतिवाद करुनच उघड पाडावं लागतं. यानी देखिल ते बंद होत नाहित,लोकांचा बुद्धिभ्रम थांबतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सनातनी हिंदुंच्या वर्तवणुकिमुळे उखडलेले फेक्युलर फुरोगामी(म्हणजे सू शिक्षित टनाटनि) असले मूर्ख धंदे करतात.
>>> हे भारी आहे . काहीही झाले तरी मुळ कारण सनातनी हिंदुच ! बीसीसी मधील लोकांनी टीका केली तर सनातनी हिंदुंच्या वर्तणुकी मुळे ! चुकला घाव ऐरणीच्या माथां ! हे सारे मनुस्मृती मुळे होत असेल नै !!

साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता.
बीबीसी आणि इतर देशीय वृत्तसंस्थांना आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीला कोल्डवॉर काळात मी बर्‍यापैकी फॉलो केले आहे. संतुलित आणि विश्वासार्ह अशी इमेज बीबीसी तयार करत असले तरी प्रसंगोप्पात आणि क्रिटीकल पॉईंट्सवर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने बीबीसी वृत्ते कललेली असू शकतात असाच अनुभव आहे. मिपाकरांनी माझा एक धागा फाट्यावर मारला होता परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा. फाट्यावर मारलेल्या आपल्याच धाग्यातील परिच्छेद उधृत करणे वाचकांना किती पटेल माहित नाही. पण तरीही ते उधृत करण्याचा मोह होतोच आहे. "आपण वर्तमानातील घरगूती वातावरणाकडून आपण जेव्हा वर्तमानातील आंतरराष्ट्रीय संबंधांकडे येतो तेव्हा त्यात आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे हितसंबंध आणि पुर्वग्रह गुंतलेले असू शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे राजकारणाचे हितसंबंध आणि पुर्वग्रह गुंतलेले परकीय पाहुणे लोक जेव्हा कौतुक अथवा टिका करतात तेव्हा खरेतर लगेच खरी न मानून हुरळून न जाता अथवा नाराज न होता; त्या गोष्टी चिमूटभर मीठा सोबत घेऊन तपासून पहावयास हव्यात. पण प्रत्यक्षात वर्तमान भारतात याच भान सर्वसामान्य भारतीयांनाच नव्हे तर भारतीय विश्लेषकांना आणि नेत्यांनाही असतं का याचा प्रश्न मनात उपस्थित होतो."
देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का
खरेतर सध्या कोणतीही विशेष परिस्थीती नसताना एकांगी भडकाऊ लेखन करणे/ आणि छापणे हा पिवळ्या पत्रकारीतेचाच भाग म्हणावयास हवा. अर्थात दुसर्‍या बाजूस आपल्या वाचाळ वीरतेचे आणि वागण्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात अथवा दहशतवादी तयार करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने उपयोग आपली शत्रुराष्ट्रे करू शकतात याचे भान बर्‍याच वाचाळ वीरांना नसते. त्या संबंधीही मागे मी एक धागा काढला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाते. या संबंधाने मी मिपावर भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा या विषयावर धागा ऑक्टोबर २०१४ ला धागा काढला एक उदाहरण म्हणून पहावयाचे झाल्यास ऑक्टोबर २०१४ पासून रिलीजीयस व्हायोलन्स इन इंडिया या इंग्रजी विकिपीडियावरील लेखात जवळपास ७०-७५ संपादने झाली असतील त्याच कालावधीत रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया या लेखात २-३ संपादने झाली. आपल्या देशाची चुकीची प्रतीमा रंगवली जाते आहे याचे भान बहुसंख्य भारतीयांना नसते. ते सुद्धा रिलीजीयस व्हायोलन्स इन इंडिया या इंग्रजी विकिपीडियावरील लेखात पडीक राहतील पण रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया या लेखात लेखन करणे आम्हा भारतीयांना जड जाते. मिपावरील अशा धाग्यातून आम्ही त्रागा करू पण रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया लेखात जाऊन देशाची सकारात्मक असलेली बाजू बद्दल संदर्भासहीत दोन शब्द लिहिण्यास वेळ काढणार नाही तर अशावेळी जेवढा दोष चुकीच्या पत्रकारीतेकडे जातो तेव्ह्ढाच प्रतिमा सकारात्म्क कशी राहील या साठी तसूभरही काही न करणार्‍या तुम्हा आम्हा कडे येत नाही का ? असा एक प्रश्न पडतो. लास्ट बट नॉट लीस्ट समुहा दरम्यान मनोमीलनास संधी आणि परस्पर विश्वासा निर्मितीवर भर या बद्दल आपल्या देशातील सिस्टीम मजबूत असेल तर पिवळी पत्रकारीता असो किंवा शत्रुराष्ट्रांचे आराखडे ढासळून पडण्यास वेळ लागणार नाही, पण या साठी जरूरी इच्छाशक्ती आणि समज आम्हा भारतीयात आहे का ? माझ्या स्वतःच्याच धाग्यांची अधीकच जाहीरात झाली आहे त्यासाठी क्षमस्व

In reply to by माहितगार

बीबीसी आणि इतर देशीय वृत्तसंस्थांना आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीला कोल्डवॉर काळात मी बर्‍यापैकी फॉलो केले आहे. संतुलित आणि विश्वासार्ह अशी इमेज बीबीसी तयार करत असले तरी प्रसंगोप्पात आणि क्रिटीकल पॉईंट्सवर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने बीबीसी वृत्ते कललेली असू शकतात असाच अनुभव आहे.
म्हणजे "सकाळ"/ मटा पत्रकारिता असे तुम्हाला म्हणायचे आहे असे दिसते.. आपल्याकडे सकाळ/ मटा देखील बहुतांश वेळा असेच वागताना दिसतात.

In reply to by आनन्दा

सॉरी इथे परदेशी वृत्तसंस्था म्हणावयाचे होते. गोर्बाचेव्ह येई पर्यंतचा काळ मी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संबंधीत डिप्लोमसी बाबतची वृत्ते अनेक देशांच्या वृत्तसंस्थांची मुख्यत्वे शॉर्टवेव रेडीओवरून बर्‍यापैकी फॉलोकरत असे.

मिडियावर टिका करण्यात काय अर्थ आहे? आपण असल्या लेखावर शतकी धागे काढणं आणि मिडियाने साक्षी महाराजाच्या स्टेटमेंटवर गदारोळ करणं दोन्ही सारखंच ना. सनातनी लोक आणि फेक्युलर फुरोगामी अशा दोघांनाही अनुल्लेखाने मारणं हाच अशा प्रवॄत्तींवर उपाय आहे.

In reply to by गुलाम

अनुल्लेखाने मारणं हाच अशा प्रवॄत्तींवर उपाय आहे.
१००% अनुमोदन ! शिवाय अरुंधती रॉय ह्यांचा उल्लेख / संदर्भ असलेले काहीही वाचणे हा वेळेचा अपव्यय आहे !!

In reply to by गुलाम

सनातनी लोक आणि फेक्युलर फुरोगामी अशा दोघांनाही अनुल्लेखाने मारणं हाच अशा प्रवॄत्तींवर उपाय आहे.
गुलाम राव, इथे थोडा सहमत आणि असहमत पण.. म्हणजे असं की अनुल्लेखाने मारणं हे मान्य आणि बहुतांश केसेस मध्ये तेच करतो की. पण इथे बीबीसी ही वृत्तसंस्था आहे तिच्यावर विश्वास ठेवणारे करोडो आहेत जगभर(भारतात देखील खूप सारे आहेतच). अगदी ते म्हणतायत म्हणून "असेल कदाचित" म्हणणारे देखील खूप सारे आहेत. तुम्ही-आम्ही पाठ फिरवली म्हणून हे लपून रहात नाही ना.
असल्या लेखावर शतकी धागे काढणं आणि मिडियाने साक्षी महाराजाच्या स्टेटमेंटवर गदारोळ करणं दोन्ही सारखंच ना.
अजिबात नाही. मिडिया खूप दूरगामी परिणाम करतो, मिसळपाव (अजूनतरी) नाही. शतकी धाग्यापेक्षाही "काय करता येईल? इतर कोणते मुद्दे आहेत आणि चर्चेतून अजून काही मुद्दे समोर आले तर तेही लक्षात घ्यावेत आणि बीबीसीशी पत्रव्यवहार करावा" असा मानस आहे. काही झाले तर ठिकच पण प्रयत्न तर नक्कीच केला जाईल. (सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि काही करु इच्छित असणारा)

In reply to by हाडक्या

हाडक्याजी, बीबीसीवर विश्वास ठेवणारे करोडो आहेत हे मान्य. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की ती एक व्यावसायिक वॄत्तसंस्था आहे आणि त्यांचे कार्यक्रम व लेख हे त्याला कसा प्रतिसाद मिळतो (वाचने/ टिआरपी) यावर अवलंबून असते. इथे या लेखाची लिंक देऊन एकप्रकारे आपण त्याची जाहिरातच करतोय (तसा उद्देश नसला तरीही) आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देतोय.
मिडिया खूप दूरगामी परिणाम करतो, मिसळपाव (अजूनतरी) नाही.
जरी मिसळपावची ताकद मर्यादित असली तरीही एकंदर ब्लॉग्स व सोशल मिडियाची ताकद खुप आहे. भारतात तरी ती बिबीसीपेक्षा जास्तच असावी. अशा गोष्टींवर चर्चा करुन आपण फक्त द्वेष वाढवतो आणि ध्रुवीकरण करतो. त्यामुळे अशा चर्चा टाळलेल्याच बर्‍या. या लेखावार खाली आलेले विषारी प्रतिसाद पाहिल्यावरतर हे मत जास्तच दृढ झाले आहे.

ह्या बीबीसी बातमीची हि अडनीड वेळ का साधली गेली ते लक्षात आले नव्हते. पण या १५ ऑगस्टपर्यंत नरेंद्र मोदी सरकार कडून नागालँडचा प्रश्न धसास लागण्याचे संकेत आहेत त्यास सुरुंग लावण्याच्या दृष्टीने हितसंबंधी वेळ साधत आहेत काय असा प्रश्न पडतो आहे.

In reply to by तुडतुडी

भारत हा हिंदुंचाच देश आहे ! फाळणी झाली तेव्हाही मुस्लिम बहुल तो पाकिस्तान आणि उरलेला हिंदुबहुल प्रदेश तो झाली आहे . राज्यघटनेने बहुसंख्य हिंदुंनी एकमताने स्वतःचे वर्चस्व असुनही देश धर्मनिरपेक्ष ठेवला हे हिंदुंचे मोठ्ठे पण आहे , मुस्लिमबहुल पाकिस्तान किंव्वा बांग्लादेश सेकुलर नाहीत हे लक्षात घ्यावे . आजही भारतात हिंदु जास्त आहेत म्हणुन धर्मनिरपेक्षता टिकुन आहे हे स्पष्ट आहे , अर्थात ज्या स्पीड ने आयसीस चे वादळ आपल्या कडे सरकत आहे ते पाहुन लवकरच भारत हिंदु बहुल रहाणार नाही हे स्पष्ट आहे तेव्हा पाहु भारत धर्मनिरपेक्ष देश रहातो का ते ! घोडे मैदान लांब नाही मधे एक इराण उभा आहे बस्स , मागल्या वेळी पर्शियाला १०-२० वर्षात झोपवले होते , आता ह्यावेळी किती वर्शे लागतात ते पाहु ! त्या नंतर मग आहेच हा सुर्य आणि हा जयद्रथ ! तेव्हा पाहुयात बीबीसी काय बातमी देते ते !!

In reply to by तुडतुडी

? जैन? बौद्ध? शिख? ह्यांचा देशावर कितपत अधिकार असावा? ज्या लोकांना मध्ययुगामधल्या धर्म रुढीमुळे नाईलाजास्तव मुस्लीम/ईसाइ बनुन रहावे लागले, त्यांचे आजचे वंशज स्वतःला कट्टर धर्मानुयायी समजतात त्यांना किती % द्यावेत? एखादा नग हिंदु द्वेष्टा असेल पन स्वतःच्या भारतीयत्वाबद्दल मात्र पराकोटीचा अभिमानी असेल तर या केस ला कोणत्या देशात हाकलायचं? एखादी आदिवासी जमात जर बोलली कि आम्हाला कोणत्याच धर्माच जोखड नको तर त्यांना कुठल्या वाडीच्या टेंपेत बसवायच? हं युंद्या आता

नाव आडनाव कीव वाटली प्रतिसाद वाचून . क्रुपया पटवून द्या की भारत हा हींदूंचा देश आहे.>>> अरे रे .असे लोक भारतात आहेत हेच भारताचं दुर्दैव . भारत तर आहेच . पण पाकिस्तान सुधा हिंदूंचाच देश आहे . मुसलमानांना दिलेला . ..संपादित..

In reply to by तुडतुडी

अरे रे .असे लोक भारतात आहेत हेच भारताचं दुर्दैव
असेल भारताचं दुर्दैव. ते आमचा भारत आणि आम्ही बघून घेउ. आधी तुम्ही भारत हा हींदूचा देश आहे हे कोणत्या पुस्तकात लीहीले आहे ते सांगा. लिंक दीलीत तरी चालेल. नाही देउ शकलात तर ओवेसी आणि तुमच्यात काय फरक ते सांगा.

हाडक्या, तुमचा हा धागा योग्य वेळीच आलेला आहे, बर्याच लोकांना बीबीसी म्हणजे एक निपक्ष निरिक्षक आहे अस वाटत पण ह्या बीबीसीने भारता विरुद्ध बरेच उपद्वाप केलेले आहेत, गेल्या महीन्याच्या मागे पाकिस्तानातील बलुचीस्तानला पाकिस्तानातुन वेगळे पाडण्यासाठी भारत सरकार आपल्या गुत्पचर विभागाच्या माध्यमातुम्न बराच पैसा खर्च करत आहे असा एक लेख बीबीसीने प्रसिद्ध केला, कोणताही पुरावा नसताना अश्या प्रकारचे लेख लिहीणे व आतर-राष्ट्रीय जनमत तयार करणे हे ह्या बीबीसीच काम आहे. ह्या बीबीसीच्या लेखिका "दिव्या आर्या" ला ईमेल पाठवुन तिच्या कडून देशातील शांतता भंग होईल ह्या द्रृष्टीने लिहीले ल्या हा लेखाच कारण विचारायलाच पाहीजे आहे.

In reply to by डँबिस००७

बलुचिस्तानात भारतीय हितसंबम्ध गुंतलेले आहेत हे उघडे गुपित आहे. मात्र ते प्रसिद्ध करावे की नाही आणि कोणी करावे हा वेगळा प्रश्न.

खटपट्या . पुस्तकात कशाला लिहायला पाहिजे ?ज्यांना भारताचा इतिहास , वर्तमान माहित आहे त्या प्रत्येक हिंदूला हे पण चांगलंच माहित आहे .तुम्हाला माहित नाही ह्याचा अर्थ तुम्ही हिंदू नाहीत हे स्पष्ट झालं . ओवेसी भिकारडा हिंदूंचा खात्मा करायची भाषा करतो . तरीही तो अजून जिवंत आहे . बिगर हिंदू हिंदूंना मारायला भारतात येतात . तसं करण्यात त्यांना मजा वाटते . तरीही इथं सर्वधर्म समभावाचा आग्रह धरला जातो . इथले लोकल मुसलमान अतिरेक्यांना मदत करतात .तरीही इथले हिंदू त्यांच्याशी गोडी गुलाबीने वागतात . मदरश्यांमध्ये ह्यांना इतर धर्मियांना मारण्याचं शिक्षण दिलं जातं . तरीही इथला सरकार मदरश्यांना अनुदान देतं . हा सगळा हिंदूंचा मोठेपणा आहे (कि लेचेपेचेपणा ?). इतर मुस्लिम राष्ट्रांत इतर धर्मियांच्या बाबतीत ह्यातली १ तरी गोष्ट घडते का ? प्रगो १ नंबर प्रतिसाद . (संपादित) आधी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे इथले ७०% मुस्लिम हे मुळचे धर्मांतर घडवून आणलेले हिंदूच आहेत . पण त्यांना हे समजत नाही किवा ते विसरून गेलेत हे बघून वाईट वाटतं .

In reply to by तुडतुडी

तुमच्या प्रतिसादातील बहुतांश भाग वादग्रस्त असल्याने संपादित होणार ह्यात शंका नाही . मात्र आयसिस च्या बाबतीत हे बी बी सी वाले किंव्वा आमच्या देशातील पुरोगामी लोक किंव्वा धर्मसुधारक ज्याप्रकारे मातीर डोके खुपसुन बसले आहेत ते पाहुन आश्चर्य वाटते . कालच बंगळुरामध्ये काही हिंदुंन्नी तणाव पसरावा म्हणुन पाकिस्तानचा झेंडा फड्कवला त्याची बातमी फेसबुकवर फिरत होती , मात्र जेव्हा काश्मीरात जाहीरपणे आयसिस चे झेंडे फडकवले जातात त्याबाबत मात्र कोणी काहीच शेयर करत नाही , आमच्या मुंबै कल्याण हईद्राबादेतील युवक जाहीरपणे आयसिस ला जाऊन मिळतात त्यावर कोणी काही बोलत नाही , आमच्या इथे झेंडे फडकवले की तो झेंडा पाकिस्तानचा नाही म्हणणारे कित्येक युक्तीवाद समोर येतात , आणि हो सरते शेवटी हे सारे हिंदुंमुळेच , त्यातही विशेषकरुन मनुस्मृतीमुळेच होते अशी बोंब ठोकतात ते पाहुन आश्चर्य वाटते ! असो ही शहामृगी वृत्ती किती टिकेल ते पाहुयात ! घोडे मैदान लांब नाही ... द स्टॉर्म इज कमिंग :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुड़तुड़ी ह्यांचा प्रतिसाद अन विचार ऐकून शिसारी आली आहे. (एमएमजी प्रार्थना स्थल चा कट्टर भक्त) बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

+१ मी त्यांची तक्रार संपादकांकडे ~२ तास आधी केली आहे. अजून कोणाला तक्रार असेल त्यांनी पण संपादकांना सांगा. बास झाला मूर्खपणा आता.

In reply to by तुडतुडी

बिगर हिंदू हिंदूंना मारायला भारतात येतात यावर उपाय म्हणून "तुम्ही" रक्षणासाठी काय करणार आहात? वर लिहिलेल्या ऑप्शन पैकी की अजून काही?

In reply to by तुडतुडी

अहो तुडतुडी ताई/भाउ, मला भारताचा इतिहास नाही माहीत. आणि इतिहास गेला तेल लावत. आता वर्तमानाचं काय ते सांगा. अहो ते सोन्याबापू सारखे लोक जीवाचं पाणी काय सांगतात ते तरी ऐका. भारत हा हिंदूचा देश आहे हे जर तुम्ही इथे सिध्द करु शकलात तर मी तुमच्या घरी येउन तुमचे पाय धरीन.
तुम्हाला माहित नाही ह्याचा अर्थ तुम्ही हिंदू नाहीत हे स्पष्ट झालं
तुमचे वय काय आहे? का तुम्हाला इथे भयाण विनोद करायचे आहेत? आणि तुम्ही एवढी विखारी भाषा का बरे वापरताय? तुमच्या सारखे भडक माथ्याच्या लोकांना भडकावणे हेच बीबीसीवरील कार्यक्रम सादर करणार्‍या लोकांचे ध्येय आहे. (अख्खा बीबीसी चॅनेल खराब नक्कीच नाही.) मिपावर मुस्लीम वाचकही आहेत. तुम्ही अशी विखारी भाषा वापरल्याबद्द्ल तुमच्या विरुध्द संपादकांनी कारवाई का करु नये.

In reply to by तुडतुडी

सहमत
इथं सर्वधर्म समभावाचा आग्रह धरला जातो . इथले लोकल मुसलमान अतिरेक्यांना मदत करतात .तरीही इथले हिंदू त्यांच्याशी गोडी गुलाबीने वागतात . मदरश्यांमध्ये ह्यांना इतर धर्मियांना मारण्याचं शिक्षण दिलं जातं . तरीही इथला सरकार मदरश्यांना अनुदान देतं
कारण आपण आपलं "हिंदुत्व" जरा जरी जाणवून द्यायचा प्रयत्न केला तर यापूर्वीची सर्व सरकारं सरळ "जातीयवादी" ठरवायचीत. तशी भीतीच घालून ठेवली होती (अघोषित भीती). बघू यावेळचं सरकार काय करतंय? मला स्वतःला सार्वजनिक गणेशोत्सवातला (किंवा इतर सणांमधला) धांगडधिंगा पसंत नाही. पण म्हणून गणेशोत्सव मंडळं आणि कार्यकर्त्यांवर केसेस घालून त्यांचं आयुष्य बरबाद करणं हे नक्की कशाचं द्योतक आहे? मशिदींवरच्या अवेळी भोंग्यांमुळं ध्वनी प्रदूषण झाल्याच्या किती केसेस आहेत? सगळ्या तथाकथित फेक्युलर लोकांपैकी किती लोकांच्या XXX त दम आहे एकातरी मशीदीवरच्या भोंग्याबद्दल तक्रार करून तो बंद करण्याची? ह्यानंच तर आपला देश आज या अवस्थेत आहे.

In reply to by मास्टरमाईन्ड

चुकून भलत्याच प्रतिसादाला पोस्ट झाली. क्षमा असावी तो प्रतिसाद काढून इतरत्र पोस्ट करण्यासाठी काय करावं? मा. संपादक मदत करतील काय?

ते कोणचे दादा होते ज्यांना फार अपमानस्पद वाटत होते ब्लडी सिविलियन्स वगैरे म्हणालेले, ह्या तुड़तुडिंचा रिप्लाई दाखवा त्यांना अन काय मत आहे अजुन विचारा!! कोपरापासुन नमस्कार असल्या विषारी विचारसरणी ला मग तो दाढ़ीवाला ओवैसी असो का अजुन कोणी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

+१ बापू.. धाग्यावर असलं अवांतर होईल असं वाटलं होतं पण इतकं विखारी रुप समोर येईल असं नव्हतं. :( आता त्या बीबीसीच्या पत्रकाराला फक्त काय दोष द्यायचा असं वाटायला लागलंय.. दुर्दैव हेच की असा विचार करणार्‍यांना त्यात काही गैर आहे हेच पटत नाही. मग ह्या असल्या पत्रकारांचं फावतं.

गेली निदान 10 वर्षे तरी bbc.co.uk/hindi ही वेबसाइट फॉलो करीत आहे. टोटली हिंदू विरोधी मानसिकता दिसून आलेली आहे. आणि उत्तम प्रतिचा मुस्लिम कैवार सुद्धा.. 2/3 महिन्यांखाली त्यांच्या एडिटर ला मेल लिहिला होता. काही मुद्दे त्यांच्या नजरेश आणून देण्यासाठी....नो रेस्पॉन्स. मला तर अशी दाट शंका आहे की त्यांचा इंडियातला संपादक नक्कीच कोणी हिंदू द्वेषी असावा. जेव्हा पासून मोदी सरकार आलेले आहे तेंव्हा पासून तर कळसच झालाय....NDTV.com देखील अजिबात वेगळे नाही....माझ्या दृष्टीने त्यांचा संध्यानंद व्हायला फार वेळ नाही लागणार.

साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. हा फार मोठा गैरसमज आहे... आणि ते तसे आहे हे उघड गुपित आहे ! सद्या इतकेच पुरे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा फार मोठा गैरसमज आहे... आणि ते तसे आहे हे उघड गुपित आहे !
असं वाटतं नै हो काका.. बीबीसी स्वतःच्या देशाच्या धोरणास पूरक अशीच भुमिका घेते हे पाहिलय पण इथे त्यांचा अशा प्रकारची दुही पेरणारी भुमिका ते ही एक वस्तुस्थिती म्हणून, एक खरी प्रतिमा म्हणून रंगवत असतील तर आपल्या देशासाठी धोकेदायक वाटतय. कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे) आणि इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात तितकं इतर कोणाला नाही असंही निरिक्षण आहे. after all , बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हे आणि ते अप्रत्यक्ष सरकारी माध्यम देखील आहे.

In reply to by हाडक्या

बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हे ही फारच अतिशयोक्त आणि अयोग्य तुलना झाली. संध्यानंद वगैरे अतिशयोक्ती सोडून, बीबीसी चा अधिकृत इतिहास वाचलात तरी मत बदलेल ! "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" हे ब्रिटनमधल्या माध्यमतज्ञांना आणि खुद्द बीबीसीमधल्या अनेकांना मान्य आहे. मात्र, खास ब्रिटीश परंपरेप्रमाणे "आपला अजेंडा त्या अजेंड्यामुळे पिडीत झालेल्यांच्याच कसा फायद्याचा आहे" हे पटवून देण्याचे तंत्र बीबीसी इतके इतर कोणत्याच माध्यमाने क्वचितच विकसित केलेले आहे ! ====== ते अप्रत्यक्ष सरकारी माध्यम देखील आहे. याने तसा काहीच फरक पडत नाही. प्रत्येक सरकारी / गैरसरकारी माध्यमाचा काही ना काही उघड / छुपा उद्येश (अजेंडा) असतोच... आणि त्यापैकी प्रत्येकजण सगळेच उद्येश उघडपणे राबवतात असे नाही... किंबहुना "गोडगोजिरे बाह्यदर्शन (good / politically correct appearance)" ठेवण्यासाठी त्यांना तसे करणे सोईचे नसते. तसेही, बीबीसी अप्रत्यक्ष सरकारी माध्यम नसून "स्वायत्त संस्था" असल्याचा बीबीसी आणि ब्रिटिश सरकार दोघांचाही "अधिकृत" दावा आहेच ;) ======

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे) आणि इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात तितकं इतर कोणाला नाही असंही निरिक्षण आहे. यावरून काहीच स्पष्ट होत नाही का ? आपल्या बाजूने / फायद्याचे बोलणारे माध्यम (त्याकरिता सत्य फाट्यावर मारले असले तरी हरकत नाही) आवडीचे असण्याचा मक्ता फक्त भारतियांचाच नाही ! :) ...फक्त असे करताना ते पोलिटिकली करेक्ट दिसावे इतका इंग्रजांचा आग्रह असतो आणि भारतीयांना त्याची फिकीर नसते, इतकाच काय तो फरक आहे ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक राहीलंच की... इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात हे नक्कीच परत तपासून पहाण्याजोगे आहे ! माझा अनुभव वेगळा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बीबीसी च्या खर्‍या रूपाबद्दल अधिक माहिती खालील "स्कॉलर्ली रिसर्च आर्टीकल" मध्ये मिळेल... A NEW KIND OF IMPERIALISM? THE BBC,COLD WAR BROADCASTING AND THECONTESTED GEOPOLITICS OF SOUTH ASIA : Alasdair Pinkerton * हा त्याचा अतीत्रोटक गोशवारा. पण संपूर्ण लेख मूळातून वाचण्याने बर्‍या गोष्टी पुराव्यांसकट समजतील... The relationship between the BBC and Indian listeners has been one of love and hate. Love for the professional competence and hate as it represented the voice of a colonial empire. Even during the post-freedom period, more often than not a bias against India was discernible in BBC broadcasts in our conflicts with Pakistan, particularly on the Kashmir issue. The BBC also did not miss an opportunity to project the seamy side of our people and polity. The fact that so many foreign governments complain about BBC broadcasts show they have an impact, there would be little point complaining if nobody took any notice of them. ======= * : Alasdair Pinkerton, Department of Geography, Royal Holloway, University of London, Egham, Surrey TW20 0EX, UK. E-mail: a.d.pinkerton@rhul.ac.uk लेख : ISSN 0143-9685 (print)/ISSN 1465-3451 (online)/08/040537–20 (c)2008 IAMHIST & Taylor & FrancisDOI: 10.1080/01439680802310324 =======

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद काका.. माहितीपूर्ण अर्टिकल.. :) खरं तर बर्‍याचशा गोष्टी आपल्याला आता इतर माहिती स्त्रोत उपलब्ध असल्याने दिसू लागल्या आहेत आणि बीबीसी सारखे "अजेंडा" घेऊन काम करणारे जर बदलले नाहीत तर त्यांची विश्वासार्हता राखू शकणार नाहीत असं वाटतं. (तसेही त्यांनी अजून तरी इ-पत्राचं उत्तर दिलेलं नाही. आता जास्त आशा पण नाहीय.) [अवांतर : कालच भारताचा विकासदर ७% च्या खाली आला याची ठळक बातमी होती आणि फोटो म्हणून "तीन फाटक्या-मळक्या साडीतल्या गवत आणि बोचकी घेऊन चाललेल्या बायका". तसं तर या बातमीचा आणि फोटोचा काहीही संबंध नसताना पण एक प्रतिमा निर्मिती म्हणून केलेली गोष्ट वाटली पण आता काही वैताग वगैरे झाला नाही. असो.]

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का काका, तुमच्या सगळ्या प्रतिसादांबद्दल एकत्रच लिहितोय.
बीबीसी चा अधिकृत इतिहास वाचलात तरी मत बदलेल ! "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" हे ब्रिटनमधल्या माध्यमतज्ञांना आणि खुद्द बीबीसीमधल्या अनेकांना मान्य आहे.
याबद्दल दुमत नाहीच. "संध्यानंद" ही अतिशयोक्तीच होती पण ती मुद्दा समजावण्यासाठी होती की बीबीसी अगदीच हलक्याने घ्यायचं माध्यम कोणीही समजत नाही. अनेक अभ्यास पूर्ण लेख, मालिका या येत असतात आणि त्यामुळेच परकिय देशाबद्दलची बातमी अथवा लेख हा बायस्ड आहे की नाही हे सामान्य वाचकाला कळायची शक्यता खूपच कमी असते हे म्हणायचे होते. आणि त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच चांगले नव्हेत. "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" मान्य. पण हे सामान्यपणे प्रत्येक बाबतीत (खासकरुन देशाबाहेरच्या बाबतीत) बहुसंख्यांना याबद्दल तितकी कल्पना असतेच असे नाही. मग अशी बातमी वाचून जे जनमत तयार होते ते चुकीचेच आणि कलुषित असेच होते. मला हे समजत नाही की भारतात हिंदू-इतर धर्मीय तेढ वाढवणे हे बीबीसीच्या अजेंडाचा भाग आहे का ? असेल तर का? आणि मग आपल्या देशातील माध्यमे व सरकारद्वारे त्यास विरोध/ निषेध होणे अपेक्षित नाही का ?
आपल्या बाजूने / फायद्याचे बोलणारे माध्यम (त्याकरिता सत्य फाट्यावर मारले असले तरी हरकत नाही) आवडीचे असण्याचा मक्ता फक्त भारतियांचाच नाही ! :)
मान्य पण भारतात अंतर्गत तेढ वाढवणे (आणि त्याची झळ इथे युकेत असलेल्यांनाही बसण्याची शक्यता असणे) हे सामान्य इंग्रजाच्या कसे फायद्याचे अथवा त्याच्या बाजूचे?
हे नक्कीच परत तपासून पहाण्याजोगे आहे ! माझा अनुभव वेगळा आहे.
हे शक्य आहे कारण मी बहुतेक युरोपिय लोकांना भेटलोय ते एकतर इंग्रजांच्या देशात खूप वर्षे वास्तव्य करत असलेले असेच आहे त्यामुळे मी तितका ठामपणे दावा करु शकत नाही. फक्त एक निरिक्षण.

ह्या सगळ्यात गोची अशी झालीय की चांगले वृत्तांकन करणार्‍या वेबसाइट्स नाहीच राहिल्या....newsonair सारखी क्वचितच एखादी आहे. अनॅलिसिस तर दूरचीच गोष्ट

बीबीसी ला बॅन करू नयेत म्हणजे मिळवले नाही तर ह्या चिंधीचोर लोकांचे अजुन दुप्पट उदात्तीकरण व्हायला अजुन एक कारण!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी तुमचं मिपा वरचं बरंचसं लिखाण वाचलंय. अ‍ॅकॅडमी ची लेखमाला मस्तच होती. वरचे तुमचे प्रतिसाद पण पाहिलेत. फक्त एक समजत नाही तुम्ही तथाकथित "चिंधीचोरांवर" वार करताना कळत नकळत बीबीसी ची पाठराखण करताय.

In reply to by मास्टरमाईन्ड

भाऊ मी पाठराखण करतोय का त्यांना अकारण मोठे न होऊ देण्यासंबंधी बोलतोय ते एकदा नीट वाचाल का प्लीज?? ;) अवांतर :- आपण दिलेल्या मानासाठी शतशः ऋणी आहेच मी!

हाडक्या, बीबीसीने असाच खोडसाळपणा याअगोदरही केलाय. तेव्हा लक्ष्य मोदी होते. त्यावेळची माझी प्रतिक्रिया : https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=312915468879916&id=17… आ.न., -गा.पै.

धाग्याचा विषय आहे " हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ? " हे तुम्हाला पटतय का ? जर पटत नसेल तर मग असा लेख लिहुन हे सर्व बीबीसीच्या वाचकांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत हे तुम च्या लक्षात येत आहे का ?

@खटपट्या तुम्हाला भारताचा इतिहास माहित नाही (माहित करून घ्यायचा असेल तर तो हि सांगते ) म्हणून तुमच्यासाठी तो तेल लावत गेला . आमच्यासाठी नाही . मागच्या अनुभवावरून पुढे शहाणं व्हायचं असतं . पण तुम्हाला वर्तमान हि माहित नाही हे हि समजलं . तुम्ही पेपर वाचत नाही , बातम्या बघत नाही हे हि दाखवून दिलंत .किवा सगळं माहित असूनही डोळेझाक करताय असं दिसतंय . चला तुमच्या माहितीसाठी काही वर्तमानातल्या गोष्टी सांगते . फार लांबच्या नाही. गेल्या काही वर्षात घडलेल्या . १. याकुब ला फाशी देण्याचा निर्णय झाला तेव्हा मुसलमानांनी त्याला विरोध करून त्यांचा खरा चेहरा दाखवला . २. उस्मान खान उर्फ मोहम्मद नवीद हसत हसत सांगतोय मी इथं हिंदूंना मारायला आलो होतो . आणि तसं करण्यात मला मजा वाटते ३. ओवेसी(हा इथल्या मुसलमानांचा प्रतिनिधी ) ने हैद्राबाद मध्ये केलेल्या भाषणात 'मुस्लिमांना फक्त १५ मिनटे द्या . १०० करोड हिंदूंना ते दाखवून देतील आम्ही कोण आहोत ते . फक्त काही तासांचा अवधी द्या इथल्या हिंदूंचा खात्मा करायला .' विखार उधळला होता ४. यासीन भटकळ (जर्मन बेकरी बॉम्बस्फोट) ने पोलिसांना सांगितलं , बेंगलोर मधल्या मदरशा मध्ये त्याला धार्मिक अतिरेकाचं शिक्षण देण्यात आलं . तिथे अश्या किती मुलांचं ब्रेन वॉंशिंग करण्याचं काम चालू आहे . ५. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात पर्वती भागात दंगल झाली . कारण काय तर मशिदीत चाललेल्या मुस्लिम टोळक्याच्या चेहऱ्यावर गाडी पार्क करताना प्रकाश पडला म्हणून ६. रमजान ची ४००० ची खरेदी केल्यावर पैसे मागितले म्हणून दुकानदाराला मारहाण . ७. २-३ वर्षांपूर्वी दंगल झाली होती . कारण काय तर देवीच्या मिरवणुकी वेळी ह्यांच्या मशीदीवर गुलाल पडला म्हणून हा सगळा विखर तुम्हाला दिसत नाही का ?मुस्लिमांकडून कुठली वाईट गोष्ट झाली तर इतर मुसलमान त्याचा विरोध करताना आजपर्यंत तुम्ही कधी बघितलेत का ? मुस्लिम लोकांच्या पुढे आमचा भडकपणा काहीच नाही . विनाकारण हिंदू कसे वाईट आणि मुस्लिम कसे चांगले हा चुकीचा प्रचार करत असण्याबद्दल तुमच्यावर का कारवाई करू नये ? मिपावर मुस्लीम वाचकही आहेत आम्हालाही माहित आहे . म्हणून आम्ही घाबरून जावं , हाताची घडी तोंडावर बोट धरून बसावं अशी अपेक्षा करू नका .

In reply to by तुडतुडी

तुम्हाला भारताचा इतिहास माहित नाही (माहित करून घ्यायचा असेल तर तो हि सांगते ) म्हणून तुमच्यासाठी तो तेल लावत गेला . आमच्यासाठी नाही . मागच्या अनुभवावरून पुढे शहाणं व्हायचं असतं . पण तुम्हाला वर्तमान हि माहित नाही हे हि समजलं . तुम्ही पेपर वाचत नाही , बातम्या बघत नाही हे हि दाखवून दिलंत .किवा सगळं माहित असूनही डोळेझाक करताय असं दिसतंय . चला तुमच्या माहितीसाठी काही वर्तमानातल्या गोष्टी सांगते . फार लांबच्या नाही. गेल्या काही वर्षात घडलेल्या . १. याकुब ला फाशी देण्याचा निर्णय झाला तेव्हा मुसलमानांनी त्याला विरोध करून त्यांचा खरा चेहरा दाखवला . २. उस्मान खान उर्फ मोहम्मद नवीद हसत हसत सांगतोय मी इथं हिंदूंना मारायला आलो होतो . आणि तसं करण्यात मला मजा वाटते ३. ओवेसी(हा इथल्या मुसलमानांचा प्रतिनिधी ) ने हैद्राबाद मध्ये केलेल्या भाषणात 'मुस्लिमांना फक्त १५ मिनटे द्या . १०० करोड हिंदूंना ते दाखवून देतील आम्ही कोण आहोत ते . फक्त काही तासांचा अवधी द्या इथल्या हिंदूंचा खात्मा करायला .' विखार उधळला होता ४. यासीन भटकळ (जर्मन बेकरी बॉम्बस्फोट) ने पोलिसांना सांगितलं , बेंगलोर मधल्या मदरशा मध्ये त्याला धार्मिक अतिरेकाचं शिक्षण देण्यात आलं . तिथे अश्या किती मुलांचं ब्रेन वॉंशिंग करण्याचं काम चालू आहे . ५. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात पर्वती भागात दंगल झाली . कारण काय तर मशिदीत चाललेल्या मुस्लिम टोळक्याच्या चेहऱ्यावर गाडी पार्क करताना प्रकाश पडला म्हणून ६. रमजान ची ४००० ची खरेदी केल्यावर पैसे मागितले म्हणून दुकानदाराला मारहाण . ७. २-३ वर्षांपूर्वी दंगल झाली होती . कारण काय तर देवीच्या मिरवणुकी वेळी ह्यांच्या मशीदीवर गुलाल पडला म्हणून
या सगळ्याचा आणि "भारत हा हींदूचा देश आहे" या वाक्याचा काय संबंध? वरील सर्व गोष्टींमुळे भारत हा हींदूंचा देश आहे हे कुठे सिध्द होतंय?
पण तुम्हाला वर्तमान हि माहित नाही हे हि समजलं . तुम्ही पेपर वाचत नाही , बातम्या बघत नाही हे हि दाखवून दिलंत
तुम्ही हे सर्व करतना ना, मग मला पामराला पटवून द्या ना की "भारत हा हींदूंचा देश आहे"
विनाकारण हिंदू कसे वाईट आणि मुस्लिम कसे चांगले हा चुकीचा प्रचार करत असण्याबद्दल तुमच्यावर का कारवाई करू नये ?
कुठे केला प्रचार दाखवा. का उगीच माझी नसलेली वाक्य माझ्या तोंडी कोंबताय? मी वरील वाक्ये कुठेही टंकलेली दाखवा, कारवाई करायच्या आधी मी मिपा सोडून जाईन.
मिपावर मुस्लीम वाचकही आहेत आम्हालाही माहित आहे . म्हणून आम्ही घाबरून जावं , हाताची घडी तोंडावर बोट धरून बसावं अशी अपेक्षा करू नका .
कधी केली अपेक्षा ? माझा आक्षेप तुम्ही टंकलेल्या "भारत हा हींदूंचा देश आहे" या निखालस खोट्या वाक्याला आहे.

In reply to by खटपट्या

या सगळ्याचा आणि "भारत हा हींदूचा देश आहे" या वाक्याचा काय संबंध? वरील सर्व गोष्टींमुळे भारत हा हींदूंचा देश आहे हे कुठे सिध्द होतंय?
सारखं काय सिद्ध करून दाखवा, सिद्ध करून दाखवा लावलंय? तुम्हाला जर पटत नसेल तर राहू दे. भारत हा हिंदू, बौद्ध, जैन, शिख, आदिवासी आणि ज्या संस्कृती इथे जन्मल्या त्यांचा देश आहेच. तो ज्याची भारतीयत्वावर श्रद्धा आहे त्यांचासुद्धा देश आहे. तो कलामांचा देश आहे आणि सॅम माणेकशाँचासुद्धा देश आहे. सिद्ध करून वगैरे दाखवणार नाही. फुटा.

In reply to by काळा पहाड

तुम्हाला कोणी विचारलंय का? कशाला मधे पचकताय? का तुडतुडी हा तुमचा डू आयडी आहे? परत एकदा - भारत हा सर्वधर्मियांचा देश आहे. बाकी तुमचे जहाल प्रतिसाद चालूदेत...

In reply to by खटपट्या

तुम्हाला कोणी विचारलंय का? कशाला मधे पचकताय?
उगीच पुरावा द्या, पुरावा द्या केलं की लोकं डोक्यात जातात. हा देश हिंदूंचा आहे म्हणायला पुरावा कशाला हवाय? हा हिंदूंचा नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का? कारण 'हिंदूंचा नाही' म्हणजेच 'हिंदूंचा आहे' चं नकारात्मक वाक्य आहे. मग तसा पुरावा शोधून बघा फारच वाटत असेल तर.
का तुडतुडी हा तुमचा डू आयडी आहे?
इथं एका आयडी नं लिहायला टाईम मिळत नाही. दोन दोन केव्हा बनवू? आणि माझा आयडी 'तुडतुडी' वगैरे असण्याची शक्यताच नाही.
परत एकदा - भारत हा सर्वधर्मियांचा देश आहे.
बाकी तुमचे जहाल प्रतिसाद चालूदेत...
माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून बघा.

नाव आडनाव मी काय करेन हे मला तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नहि. वेळ आल्यावर करून दाखवेन . सध्या काय करत आहे हे लिहिलं आहे . पण ते संपादित केलं गेलं आहे . आम्ही नुसते बोललो तर काही लोकांना शिसारी येतेय . मग हे लोक तर प्रत्यक्षात करतात . आम्हाला किती शिसारी येत असेल विचार करा .

मित्रांनो, मी काल लिहिलेल्या प्रतिक्रियेसाठी माफ करा. दुसर्‍याची चूक दाखवून देण्यासाठी सारकॅस्टिकली लिहिलेली माझी प्रतिक्रिया नंतर मलाच चूक वाटली, कारण त्याचा वेगळा अर्थ निघत होता.ईतक्या चांगल्या चाललेल्या चर्चेत माझी प्रतिक्रिया अजिबात नको होती. माझी ती प्रतिक्रिया काढून टाकण्यासाठी संपादकांना व्यनी करण्यासाठी आलो होतो तर ती प्रतिक्रिया संपादकांनी आधीच काढून टाकली आहे.

एक्का काकांशी सहमत ! बाकी बीबीसीवाल्यांशीच संबंधीत एक प्रतिसाद हल्लीच मी इथे दिला होता. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Vande Mataram feat Ustad Amjad Ali Khan :- The Song Of Freedom

सर्वच "ते" "ते" नसतात पण जवळपास सगळेच "ते" "ते" असतात ......च्या मायला " जवळपास " शब्दाने घात केला ... ह्या "जवळपास" च्या इंधनावर सगळे आपापल्या रोट्या भाजत आहेत ...आणि जे "ते" नाही आहेत ..त्यांचा तूप म्हणून वापर करत आहेत ......

हिंदू-राष्ट्रवादी हे हिंदूंचे प्रतिनिधी नाहीत

वरील लेखाला प्रतिवाद करण्यासाठी are islamists becoming a threat to all other muslims असा लेख कुणीतरी लिहिण्याची गरज आहे असे वाटते आहे. :) ब्रिटीश मुस्लिम समाजाचे ब्रिटनच्या राजकारणातले/समाजकारणातले वाढते वर्चस्व हे ही ह्या लेखाचे कारण असू शकते.

मुस्लिम परदेशातून आले होते . इंग्रजांसारखेच . अफगाणिस्तानच्या पलीकडून. ते इथले नाहीत . मुस्लिमांनी इथल्या सगळ्या सुंदर गोष्टी उध्वस्त केल्या . त्यांच्या सडक्या विचारसरणीने इथे घाण पसरवून ठेवलीये . फाळणी झाली तेव्हा त्यांनी स्वतःसाठी वेगळा देश मागून घेतला . तेव्हा त्यांचं इथं भारतात काही काम नाही . तेव्हा भारत हा हिंदूंचाच देश आहे . ज्या पाकिस्तानात , बांगलादेश मध्ये ते राहतात तो सुधा हिन्दुस्थानच होता . तेव्हा ती जमीन सुधा त्यांची नाही. बौद्ध , जैन मूळ हिंदू धर्मापासूनच निर्माण झाले आहेत . त्यांनी देशाच्या विकासात योगदान दिलंय . हिंदूंचा द्वेष करून ते हिंदूंना मारत सुटत नाहीत .केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमापोटी बौद्ध धर्म स्वीकारणारे पण बौद्ध धर्माचं नॉलेज नसणारे , पूर्ण हिंदू असणारे , हिंदू संस्कृती जपणारे , हिंदू देवांचीच पूजा करणारे बौद्ध स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत .जैन सुधा हिंदू परंपरा पाळतात . किवा हिंदू देवांची उपासना करतात . शीख सुधा कट्टर देशप्रेमी असतात . आज भारतीय लष्करात सगळ्यात जास्त संख्या शिखांची आहे .उठ सुठ हिंदूंचा द्वेष नाही करत ते .मुस्लिम मात्र हिंदू , जैन , बौद्ध , शीख सगळ्यांशी भांडण करतात . मुस्लिमांनी ह्या देशात मुस्लिम लोकसंख्या वाढवण्यापलीकडे , मागासलेपणा वाढवण्यापलीकडे दुसरं काहीही केलं नाहीये . अब्दुल कलाम सारखा क्वचित अपवाद गेल्याच आठवड्यातली बातमी .धर्मनिरपेक्ष ब्लॉग लिहिणारा निलोय चौधरीचा बांगलादेश मध्ये खून . ह्या आधी कित्येक धर्मनिरपेक्ष ब्लोग्गर ची इस्लामी देशांमध्ये हत्या झालीये .धर्मनिरपेक्ष लिखाण करणाऱ्या तस्लिमा नसरीनला जीवाच्या भीतीनं देश सोडून पळून जाव लागतं . कालचीच बातमी . पाकिस्तानी समाजाच्या छळाला कंटाळून ४०० हिंदू कुटुंबाचं भारतात स्थलांतर . धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांचे फार लाड झालेत ह्या देशात. पण ह्यापुढे होतील असं वाटत नाही .

In reply to by तुडतुडी

तुडतुडीताई/दादा. पूर्वीचे जे प्रकार 'लाड' म्हणून गणले जात आहेत, तेच 'लाड' आताही होतीलच. कारण लोकशाहीमार्गाने आलेल्या कोणत्याही सरकारला लोकसंख्येच्या एका मोठ्या हिश्श्याला समोरासमोर दुखवता येत नसते. 'हज'ची सब्सिडी तर मुस्लिमांनीही नाकारली आहे कारण ती सब्सिडी सरकारकडून 'एअर-इंडिया'ला मिळते आणि त्यासाठी एअर-इंडियानेच प्रवास करणे भाग असते. शिवाय मुस्लिमांनी हज यात्रेसाठी इतरांचा पैसा घेणे हे त्यांच्या धर्माविरुद्ध आहे त्यामुळे तसेही सब्सिडाइज़्ड तिकिटावर यात्रा करण्याचे प्रमाण कमी होत आहे. भारतातल्या सर्वच धर्माच्या उत्सवांसाठी भारत सरकार सुविधा देत असते. उदा. वेलंकनी यात्रेसाठी खास गाड्या सोडणे, नांदेडच्या गुरुद्वारात वार्षिक उत्सवाच्यावेळी पाणी, विजेचा पुरवठा सांभाळणे, कुंभमेळ्यात किंवा पंढरपुरवारीदरम्यान सोयीसुविधा पुरवणे, चैत्यभूमीवर सोयी निर्माण करणे वगैरे. हे सरकारही तेच करील. पाकिस्तानवर हल्ला करणे आणि पाकिस्तानची भूमी त्यावरच्या मुसलमानांसकट ताब्यात घेणे वगैरे गोष्टी कोणतेही शहाणे सरकार करणार नाही. हे सरकारही शहाणे असल्यास तसे करणार नाही. बाकी 'पाकड्यां'ना धडा शिकवणे वगैरे या आधीच्या युद्धात करून झालेले आहे, निर्णायक रीत्या. फक्त १९६५ युद्धाचा अपवाद. पण तो इतिहासही नव्याने लिहिला जात असून त्यानुसार भारतच निर्विवादपणे ते युद्ध जिंकला असे स्थापित होत आहे. मग काय नवे घडणार आहे? कश्मीर प्रश्न सरळ सुटणार्‍यातला नाही. सध्याची ताबा रेषा मान्य करणे हाच व्यवहारी पर्याय आहे. आणि त्यामुळे वाटाघाटींचे गुर्‍हाळ चालूच ठेवावे लागणार आहे. पाकिस्तानला(त्यांच्या लष्कराला) वाटाघाटी नकोच असतात. त्यांना युक्तीप्रयुक्तीने वाटाघाटीच्या टेबलावर आणणे ह्यात मुत्सद्दीपणा असतो. पण ते फेटाळणे यात कोणा बापड्याला असमंजस पोरकटपणाऐवजी वीरश्री दिसल्यास तो त्याचा प्रश्न. हे सरकार मागील सरकारसारखीच बहुतांशी धोरणे ठेवेल कारण तोच बेस्ट अ‍ॅवेलेबल ऑप्शन होता. त्यामुळे काही किरकोळ बदल सोडता (जे कदाचित काही जणांना फार मोठे वाटू शकतील) फारसे वेगळे काही घडण्याची शक्यता आताही नाही. फक्त स्वच्छ प्रशासनाबाबत आशा आहेत, त्या कितपत खर्‍या ठरतात ते पाहायचे.

In reply to by राही

गळा काढून रडणाऱ्या पोराला (कसं ते swapsच्या पहिलं प्रेम धाग्यावर) समजावणाऱ्या शाळेतल्या बाई डोळ्यासमोर आल्या आणि ड्वाले पानावले. बाई, केस ऐकनारातली न्हाइ. प्रेत्न करून उपेग न्हाइ.

In reply to by प्यारे१

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by प्यारे१

खरेच. पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याने पाणीच वाया जाते. म्हणूनच धागा सुरू होऊन इतके दिवस झाले तरी प्रतिसाद लिहिला नव्हता. पण शेवटी तुडतुडीताई/दादा मला उकसवण्यात यशस्वी झाले खरे. आता पुसा पाहू ड्वाले ! (हलक्याने घेणे)

In reply to by राही

प्रतिसाद समर्पक आहे (अपवाद खालील वाक्यांचा) >>> भारतातल्या सर्वच धर्माच्या उत्सवांसाठी भारत सरकार सुविधा देत असते. उदा. वेलंकनी यात्रेसाठी खास गाड्या सोडणे, नांदेडच्या गुरुद्वारात वार्षिक उत्सवाच्यावेळी पाणी, विजेचा पुरवठा सांभाळणे, कुंभमेळ्यात किंवा पंढरपुरवारीदरम्यान सोयीसुविधा पुरवणे, चैत्यभूमीवर सोयी निर्माण करणे वगैरे. हे सरकारही तेच करील. असहमत. वीज, पाणी इ. सुविधा देणे आणि थेट कमी किंमतीत प्रवास करून देणे यात खूप फरक आहे. यात्रेसाठी ज्या गाड्या सोडल्या जातात त्या फक्त अधिकाधिक यात्रेकरूंना यात्रा करता यावी यासाठी. त्या गाड्यांच्या तिकिटात भरपूर सवलत दिलेली नसते. तसेच यात्रेला न जाणार्‍यांना सुद्धा त्या गाड्यांचा लाभ घेता येतो. उत्सवाच्या वेळी केलेला वीजपुरवठा किंवा पाणीपुरवठा फुकटात किंवा स्वस्तात केलेला नसतो. त्याची किंमत भरावीच लागते. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या निमित्ताने घाट दुरूस्त करणे, रस्ते दुरूस्त करणे इ. गोष्टींचा यात्रेकरूंना फायदा होतोच, परंतु शहरातील नागरिकांना देखील फायदा होतो. या तुलनेत जर हाज सवलत पाहिली तर हाज यात्रेकरूंना अल्प दरात विमान तिकीट दिले जाते (प्रतिमाणशी रू. १२ हजार). पुणे-दिल्ली या प्रवासाचेच परतीचे तिकिट कमीतकमी १६ हजार रूपयांना आहे. त्या तुलनेत हाजचे सौदी अरेबियाचे तिकीट अत्यंत कमी किंमतीत दिले जाते. भारतातील इतर उत्सवाच्या यात्रेकरूंना अशी घसघशीत रोख सवलत मिळत नाही. दुसरे म्हणजे या सवलतीचा उपयोग फक्त हाजला जाणार्‍यांनाच आहे. इतर प्रवाशांना याचा उपयोग नाही. याऊलट भारतातील इतर उत्सवांना दिल्या जाणार्‍या सोयीसुविधा इतरांना सुद्धा वापरता येतात. त्यामुळे हाजला मिळणारी सवलत आणि भारतातील इतर उत्सवांना दिलेल्या सोयीसुविधा यांंची तुलना होऊ शकत नाही.