हरिद्वारची कावड यात्रा - एक उन्माद
आज घडीला आपल्या भारताची लोकसंख्या अंदाजे १२० कोटी आहे आणि त्यापैकी अंदाजे तीन कोटी हिंदू शिव भक्त १ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या बारा दिवस चालणाऱ्या कावड यात्रेसाठी देवभूमी उत्तराखंड मधील हरिद्वार मध्ये येवून गेले . एकूण लोकसंख्येच्या ३ टक्के लोक्स .
आपल्या सगळ्यांना आपल्या आषाढी वारी आणि त्या गर्दीचे भारी कौतिक . यावर्षी बहुधा ५ ते ६ लाख लोक विठू माउलीच्या दर्शनासाठी आले असतील . हि तुलना फ़क़्त या यात्रेची भव्यता समजावी म्हणून
पण मला एक फरक जाणवला. वारीमध्ये एक प्रकारचे पावित्र्य, शिस्त आणि भक्तिभाव सहज जाणवतो .
या उलट कावड यात्रा म्हणजे एक गुर्मी , उन्माद , आक्रस्ताळेपणा. कोणीही, कसलीही शिस्त पाळत नाही. एकेका दुचाकीवर तीन-चार जण सोबत दनदणती डॉल्बी. उडत्या चालीच्या हिंदी चित्रपट गीतांवर बेतलेली शिव गाणी . भक्तांच्या हातात त्रिशूल व लाठ्या . आणि त्यांचा थोड्याही कारणासाठी वापर करायला उत्सुक असलेले भक्तगण . जवळपास सर्वत्र एक आठवडा सर्व शाळांना सुट्टी असते . कारण गर्दी . नवी दिल्ली , पंजाब , हरियाणा , उत्तर प्रदेश , हिमाचल प्रदेश, राजस्थान व संपूर्ण उत्तराखंड मधून हे लोक्स येतात .
स्थानिक लोकांशी चर्चा करताना असे जाणवले कि बरीच जनता दुसरे काही काम धाम नाही आणि शिवाय सार्वजनिक खर्चाने म्हणजे जवळपास बऱ्याचदा फुकट सहल म्हणून सध्या एवढी गर्दी असते .
पण मला तर हे सर्व बघताना आणि सहन करताना वारी सारखी पवित्र भावना काही वाटत नाही .
ही कावड यात्रा साधारण तीन प्रकारची असते . पहिली आपल्या वारी प्रमाणे हर की पौडी हरिद्वार मधून गंगाजल घेवून बऱ्यापैकी शांतपणे चालत आपापल्या गावी जाऊन तेथील शंकराला अभिषेक करणारे.
दुसरा प्रकार म्हणजे आपापल्या वाहनावरून हि यात्रा करणारे .
आणि तिसरा सर्वात रुद्र भीषण भीतीदायक प्रकार म्हणजे "डाक कावड यात्रा" यातला महत्वाचा नियम म्हणजे हे गंगाजल सतत हलते राहिले पाहिजे , (झोपले नाही पाहिजे ). यात एक तर ५० ते ६० जणांचा संघ असतो . गाड्यावर किवा टेम्पो ट्रक मध्ये, आणि बहुधा चिलीम, सिगारेट किंवा बिड्या ओढत बसलेले . धावण्याच्या रिले शर्यतीप्रमाणे यात गंगाजल घेवून लोक्स आळीपाळीने धावतात . वाटेत जर कुठली दुचाकी किंवा पादचारी आले तर सरळ धक्का देवून किंवा काठीने मारून बाजूला करतात . आणि यांची संख्या शेवटच्या दोन दिवसात (काल आणि आज ) जवळपास एक कोटी आहे. या दोन दिवसामध्ये डीझेल व पेट्रोलचा अतिप्रचंड अपव्यय तीस चाळीस अपघाती मृत्यू, शेकड्यांनी माणसे मुले हरवणे घडते. भुरटे चोर , मोबाईल चोर इत्यादी पण त्याच बरोबर प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल सुद्धा होते.
आजच्या दिवशी एखादा रुग्ण किंवा आपण आपले महत्वाचे काम आहे म्हणून उलट दिशेने म्हणजे दिल्लीकडून हरिद्वारला गाडी रस्त्याने येणार असू तर केवळ केवळ अशक्य .
मला विचाराल तर निव्वळ मनुष्य बलाचा केवळ गैरवापर . सोबत थोडे विडीवो देण्याचा प्रयत्न करतो
https://www.youtube.com/watch?v=TDVvPZE95ao
याद्या
3735
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
उन्माद ही भारतीय समाजजीवनाची
सहमत! खरंच ही भक्ती आहे का?
In reply to उन्माद ही भारतीय समाजजीवनाची by एस
१०० % खरं आहे..
In reply to सहमत! खरंच ही भक्ती आहे का? by जडभरत
एक नंबर बोललात! हे हे आणि हेच
In reply to उन्माद ही भारतीय समाजजीवनाची by एस
सहमत . हे UP , MP वाले खरंच
जाहीरात
जडभरतजी, गेले सव्वा वर्ष
तुमच्यावर अविश्वास नाही पण
In reply to जडभरतजी, गेले सव्वा वर्ष by दा विन्ची
अगदी..
अरेरे काय घाणेरडे प्रकार!
In reply to अगदी.. by लाल टोपी
अरेरे काय घाणेरडे प्रकार!
In reply to अगदी.. by लाल टोपी
या असल्या लोकांच्यात भक्तीचा
आम्ही पण सध्या मंदिरांच्या भोंगळ कारभाराने त्रस्त असल्याने,
हम्म्म ?
In reply to आम्ही पण सध्या मंदिरांच्या भोंगळ कारभाराने त्रस्त असल्याने, by मुक्त विहारि
आपल्याकडे जसं अनंत
In reply to हम्म्म ? by द-बाहुबली
अजून काही व्हिडिओ...
आशयाशी सहमत
कावड यात्रा बालपणीच्या काही