[शतशब्दकथा स्पर्धा] येक रुपाया!
नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी!
बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२."
शाळा सुटल्यावर तीन ढांगात घरी! तायला म्हन्लो, "ताये मला येक रुपाया दी, शाळत चित्रकला पर्धा हाय." धुनं वाळू घालीत म्हन्ली, "त्यान्ला न्हाय काम आन तुला नाय धंदा!"
धा रोज तायच्या म्हाग लाग्लो. रडलोबी. एक दिवस शाळला जाताना तायनी रुपाया दिला.
पुना तीनच ढांगा! हाजरी झाल्याझाल्या बाईन्ला म्हन्लो, "बाई, फी!" बाई म्हन्ल्या, "संदीप, मुलांची यादी कालच जिल्हा परिषदेला दिली."
म्हाग फिरल्यावर बस्करपट्टीबी दिसाना!
वाचने
15713
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
च्यामारी... माझाच डुआयडी आहे
मिपावरच्या माझ्या पहिल्याच....
In reply to मिपावरच्या माझ्या पहिल्याच.... by चांदणे संदीप
आणि कथानायकाचे...
In reply to आणि कथानायकाचे... by चांदणे संदीप
माझा प्रतिसाद तुम्हाला कळला
In reply to माझा प्रतिसाद तुम्हाला कळला by संदीप डांगे
तुम्ही कुठले? अस मला…
In reply to तुम्ही कुठले? अस मला… by चांदणे संदीप
हाय्ला.. जबरीच. आता फकस्त
+१
+1