Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] नक्षत्राच देणं

लेखक जेपी
Published on रवीवार, 09/08/2015
विठ्या भकास नजरेने आभाळाकड पहात बसला होता. सकाळी आभाळात दिसणारी ढगाची गर्दी, दुपारी जोरदार कुंभारी वार्‍या सोबत गायब व्हायची. शेजारी बसलेल्या तात्याकड पहात बोलला,"तात्या,अंऊदा बी काय खर दिसत नाय.संमदी नक्षत्र लागोपाठ कोरडी जाऊ लागल. जगायच कस माणसान.धुळपेरणी बि वाया गेली.पुना पेरणी करायची वेळ आली बग.काय डोस्क काम करना बग" कोरड्या भुईवर काडीन रेघा मारत बसलेला तात्या थरथरता हात डोळ्यावर धरत आभाळाकड पाहु लागला. अभाळात ढगाची गर्दी जमा होती,दुर कुठतरी विज पडल्याचा कडकडाट झाला. त्याच्या थरथरत्या हातावर आभाळातुन तुटणारी थेंब पडु लागली. तात्या हरकुन म्हणाला,"आरं पोरा,हे नक्षत्राच देणं हाय त्याच्या मर्जीनच बरसणार." (समाप्त)

वाचन संख्या 10252
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

+१ मस्स्स्त!

+१. शेवट खूप मस्त अगदी व्हिज्युअल की काय ते झालाय. पण पहिल्या भागाचा दुवा दिलात तर बरे कारण कथा पुन्हा कंटिन्यू वाचता येईल. पहिला भाग कदाचित विसरला ही जातो. हा नियम सर्वांनीच पाळला तर बरे.

In reply to by जडभरत

स्पर्धेच्या नियमाप्रमाणे कथा संपली पाहिजे.मी संपवली. पुढच्या भागात शिर्षक आणी पात्र सोडली तर संपुर्ण संकल्पना नव्याने मांडली गेली पाहिजे.

+१

+१

+१ नक्षत्राची मर्जी. ह्म्म्म. काही मदत लागली तर कळव बॉ!!

+१

+१

+११११

आवडली

+१

+१

दाहक वास्तव !

सुन्दर

+१

+1

+१

+1

+१

+१

+१

मस्तच.. विदर्भी कास्तकार.. बजरू

+१

+१

+१

+११

..

सार्थ आणि यथार्थ दुबार पेरणी पाहण्यास उत्सुक ! पांपे नाखु

+१

+१मस्त

+१ मस्तच

जेप्या +१ देतोय बग. माझ्या कथेला दे नायतर, औसारोड पकडून तिथे येऊन वसूल करीन.

बाकी सर्व 'देणी' ही खफवर पाहिली :)

+१

+१

In reply to by स्पंदना

बरसला?>>> आमी असच बोलतो. आता नक्षत्रात पाऊस पडला अस सहसा बोलत नाहीत.

+१

+१

+1

+१

+1