Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] !! व्दिधाता !!

लेखक माझीही शॅम्पेन यांनी शुक्रवार, 07/08/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
कित्ती दिवासाने भेटूया म्हणाली .. "बाहुबली दाखवशील?" रात्री वॉट'स अप वर मेसेज आला , कशीतरी धडपड करून तिकीट मिळवल .. अगदी लाल चुटूक ड्रेस आणि तशीच मस्त लिपस्टिक, सतत डोळ्यावर येणार्‍या रेशमी बटा , नुसता जीव वरखाली होत होता .. .. मध्यंतरात मानसने अगदीच न राहवून आश्लेषाला विचारल काय ठरवूया आपण आता ? .. थोडस कृत्रिम हसून म्हणाली थांबरे नक्की काय सांगू तुला माहीत आहेना मी कोण आहेते मग पुन्हा पुन्हा असा प्रश्न का करतोस? अश्या कोरड्या उत्तरा नंतर पॉप कोर्न घश्या खाली उतरले नाहीत चित्रपट संपल्यावर आश्लेषाशी फार काही न बोलता मानस घरी परतला.. .. घरी अंधार होता पण मानस खूप खुश होता तेवढ्यात फोनची कर्कश्य बेल वाजली..

वाचने 2040
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

हे मात्र थेट to be continued... वाटतंय. शेवटाचा थोडा पुन्हा विचार करा असं सुचवेन.

दोन कथा सेप्रेट पाहिजेत. ही अर्धी वाटते.

कथेचे नाव बदलून दिल्याबद्दल सर्व प्रथम संपादक मंडळाला धन्यवाद !! कुठल्याही सूचना न वाचता उत्तर प्रत्रिका लिहिण्याला सुरुवात करण्य्याची घातक सवय इथेही नडली :) पहिली गोष्ट ही संपूर्ण वाटली पाहिजे हे अगोदर लक्ष्यातच आल नाही असो मानस नावाच्या व्दिभंग माणसाची हि कथा आहे आश्लेषा नावाची मुलगी त्याला बरेच दिवसांनी भेटते एकंदरीत दिवस मजेत जातो काही प्रश्नाची उत्तरे ती देत नाही पुढे देईल का ते नाही हे पुढील भागात बघू या असो प्रतिक्रिया आणि मार्गदर्शनाबद्दल सर्व मित्रांचे आभार (७७ शब्द संपले :) )