Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] लोकमान्य

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 04/08/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
आम्च्या बाई मस्स कड्डक मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली. मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार. मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत. कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर. साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?" म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली. मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन. चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली. बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता." म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे. मी कचरा केला नाय मी उचलनार नाय." बाईनी काहून वर्गाबाह्यर काढला?

वाचने 17777
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

+1

+१

मस्त... +१

+१

छान कथा. आवडली.

+१

+१ मस्त आहे!!

+१

+१

+१

+१

+१ कथा आवडली! आतिवासताईंप्रमाणे तू सुध्दा आन्जीचे निरागस भावविश्व व्यवस्थित दाखवलेस.

+१ मस्त

+१

+१

असाच प्रसंग माझ्याबाबही खराखुरा घडला होता. तिसरीत सरांनी प्रश्न विचारल्यावर "मला उत्तर येतय पन मी देणार नाही" असे टिळकांचा आदर्श समोर ठेऊन ठणकावुन सांगितले मग आमच्या तिर्थरुपांना बोलावण्यात आले. पुढचा प्रसंगाची तुम्ही कल्पना करु शकालच..

+१

+१