Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] सोलमेट

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 06/08/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
लेक्चरला निघालेल्या अर्णवला थांबवून नेहाने विचारले, "आज संध्याकाळी पिक्चरला जाऊयात ? " "सॉरी आज मी देव सरांकडे नोट्स घेण्यासाठी जाणार आहे, चल बाय." हिरमुसल्या नेहाकडे न बघता तो पुढे निघाला. अतिशय हुशार आणि देखण्या अर्णवच्या मागे अनेक मुली होत्या पण तो सगळयांपासून लांबच रहायचा. मात्र गेल्या काही दिवसांपासून काहीतरी अनपेक्षितसं त्याच्यासोबत घडत होतं.. तुकडया- तुकडयांतील त्याचं आयुष्य, एका व्यक्तीने एखाद्या जिग्सॉ पझल प्रमाणे एकसंध जोडून त्याला परिपूर्ण केलं होतं. अर्णव प्रेमात पडला होता. पहिल्यांदाच. सोलमेट वगैरे काही नसतं, ती प्रेमिकांनी तयार केलेली केवळ एक रोमँटिक संकल्पना आहे असे मानणाऱ्या त्याचीही आता खात्री पटली होती, प्रो.देवाशिष मध्ये अर्णवला त्याचा सोलमेट मिळाला होता...

वाचने 6650
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

रोचक विषय !!

+१

एक वेगळा विषय योग्य रीतीने हाताळल्याबद्दल.

+१

+१

वा वा! +१

+1

+१

+१

छान !

+१

+१

+१

+१

+१

एक वेगळा विषय योग्य रीतीने हाताळल्याबद्दल>> +१११

+१.. वेगळाच विषय..

+१

एक वेगळी नील (मोहोर) उमटवलीत की या कथा प्रकारात !

+१ वेगळा विषय...

+१

+१

+१

विषयाची उत्तम हाताळणी

+१

+१

मनातलं लिहील्याशिवाय अगदीच रहावलं नाही म्हणून... कथेचा विषय तसा risky आणि forbidden असल्यामुळे इथे द्यावी की नको हा विचार करत होते, विषयाच्या वादग्रस्तपणामुळे त्यामागील भावना दुर्लक्षित होऊ नये एवढीच इच्छा होती. कथा कितपत स्विकारली जाईल याबद्दल शंका होती मात्र मिपाकरांच्या प्रगल्भतेवर विश्वासही होता त्यामुळेच ती स्पर्धेत प्रकाशित करण्याचं धाडस केलं आणि छान प्रोत्साहानात्मक प्रतिक्रिया देऊन सर्वांनी तो विश्वास सार्थच केला. काही लोकांना कथेतील प्रो-स्टुडंट या नात्याचं वेगळं रूप खटकलं असेल याची कल्पना आहे, परंतु एखादी गोष्ट चुकीची वाटते म्हणून ती अस्तित्वातच नसते असं नाही. अशी अनेक forbidden नाती आहेत्, असतील, फक्त ती उघडपणे समोर येत नाहीत कारण त्यामध्ये बर्‍याच compexities येऊ शकतात, शिवाय अजूनही आपलाच काय पाश्चात्य देशांतील समाजही ते मान्य करण्याएवढा प्रगल्भ आणि सुधारलेला नाही. काही नाती खूप वेगळी पण सुंदर, शब्दांत मांडण्यापलीकडची असतात, ते सौंदर्य बघण्याची आणि समजून घेण्याची दृष्टी हवी फक्त...

+१ ठिक.

+१

+१