Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] देऊळ

लेखक लॉर्ड फॉकलन्ड यांनी गुरुवार, 06/08/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
क्लबहाऊसमध्ये सोसायटीच्या आवारात कोणते देऊळ उभारायचे यासाठी सदस्यांची मीटिंग सुरू होती. "मारूतीचे देऊळ बांधूया" बिराजदार म्हणाले. "नको. मारूतीमंदीर म्हणजे खेड्यात असल्यासारखं वाटतं" जोशी म्हणाले. "दत्तमंदीरच पाहिजे" पराडकरांची सूचना. "दत्त, विठोबा असल्या देवांची देवळे म्हणजे एखाद्या जुन्या पेठेत राहिल्यासारखं वाटेल" इति गोखले. "रामाचे देऊळ बांधू." संघात जाणार्‍या देशपांंड्यांनी प्रस्ताव मांडला. "अजिबात नको. रामाच्या देवळामुळे देशात प्रॉब्लेम झालेत." त्वेषाने लिमये उद्गारले. "महालक्ष्मीचे देऊळ सगळ्यांना आवडेल" ही सौ. भोसल्यांची सूचना लगेच फेटाळली गेली. "दत्त, मारूती, विठ्ठल, राम, देवी असे जुनेपुराणे देव नको. आपल्याला इंटेलिजंट, सुशिक्षित, पॉलिश्ड असा देव पाहिजे. बाकीचे देव आपल्या पॉश सोसायटीला शोभणार नाहीत." अध्यक्ष म्हणाले. सर्वसंमतीने गणपतीचे देऊळ बांधायचे ठरले.

वाचने 5352
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

+१

मला वाटले Lotus Temple सारखे काहितरी.

मस्त.

+१ गणपती बहुतेक लाडका असल्यानं मंदीर त्याचंच असतं सोसायटीमध्ये. (जेव्हा मालक/ बिल्डर त्या सोसायटीमध्ये नसतात तेव्हा) बाकी जैनांच्या सोसायटीबाबत बोलणं नाही.

अरेरे ! मशीद हा ऑप्शन न ठेवल्याबद्दल निषेध !

In reply to by dadadarekar

सोसायटीतल्या लोकांची नावं वाचलीत का? भारीच बुवा विनोदी तुम्ही!

+१

तसे साईबाबा पण प्रत्येक गल्लीचे तारणहार आहेत सध्या....... होते तेव्हा कोणी पाणीही विचारलं नाही...आता घालतायत सोन्याचे मुकुट.... मूर्ख शिरोमणी लेकाचे सगळे !!

माझ्यामते सगळ्यात आधी गणपतीचंच नाव येतं सहसा. बाकी काही आडनावं फारच फेवरेट असतात लेखकांची.

+१

+1 मस्त! देवांमध्ये खरोखर हा भेदभाव केला जातो. मुळात मंदिर (किंवा मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, जैन मंदिर, अग्यारी, वगैरे) बांधणे हा वेळेचा, पैशाचा, ऊर्जेचा, आणि अपव्यय आहे असे माझे ठाम मत आहे.

+१

+१

आता देऊळ बंद पण येणार का स्पर्धेत? :D +१

+१

होते तेव्हा कोणी पाणीही विचारलं नाही...आता घालतायत सोन्याचे मुकुट....>>>+१११११११११ दत्त, मारूती, विठ्ठल, राम, देवी असे जुनेपुराणे देव >>> माज आलाय सगळ्यांना . कथेसाठी +१

+१

मला वाटल होत की आता दक्षिणेकडच्या तिरुपती मंदिराची प्रतिकृती उभारतील.

छान शशक ! देवळाच्या अनुषंगाने 'सोसायटी" बदलाचा वेध घेतलेला आवडला. आता जागतिक स्पर्धेत जुने भोळे-भावडे देव मागे पडणार ! ग्लोबल एलेफण्ट गॉड बाजी मारणार ! मारुती राया, तुच लक्ष घाल बाबा आता ! अन आम्हा सर्वांचे कल्याण तुच करी रामराया !

+१

+१

+१

+१

+१ मस्तय!

+१