Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] दैवी शक्ती

लेखक दिनु गवळी यांनी गुरुवार, 06/08/2015 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
आजुबाजुला मिट्ट काळोख होता. पक्या अजुनही पळतच होता शेताच्या बांधावरुन पळायला नीट जमतही नव्हते , पण जीव वाचवायचा होता , म्हणुन पळावे तर लागणारच होते. पायातील चप्पल अचानक तुटली पण चपलेची पर्वा न करता तो अनवाणी पायानी पळत होता ,गावातील दिवे अजुनही दुरवर दिसत होते , कधी एकदा गाव येते असे पक्याला झाले होते. पण मागुन येत असलेली ती काळी शक्ती आज त्याचा रस्ता संपुन देत नव्हती एकदाची ती काळी शक्ती पक्याजवळ येऊन पोहोचली...पक्याने रानदेवाचे स्मरण केले आणी काय झाले अचानक पक्याच्या अंगात दैवी शक्ती आली आणी तो मागे फिरला ताकदीनीशी त्याने त्या काळ्या शक्तीला दुरवर फेकुन दिले आणि पुन्हा घरी निघाला.

वाचने 2775
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

आवरा -१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by प्रचेतस

:)

सिक्वेल लिहा पटकन... वाचून एकदाच काय ते होऊन जाऊ द्या ..

आपण हात्त करु हा त्या काळी ला.

मागे काळी शक्ति येत नसून पिवळि शक्ति तरल स्वरूपात सोडत सोडत तो पाणिक्य शक्तीचे डबडे ( =)) ) घेऊन पळत पळत चाललाय. असं वाटत होतं वाचताना! :-D फुरुक फुरुक कापाली वाट , कित्ती दूर माझा दगडी घाट बुळुक बुळुक बुळुक! :-D