मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यजमान

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
बंडु:- यजमान म्हणजे काय रे? गणु:- ज्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळतात ...तो! बंडु:- अस्सं! मग ग्राहक मंजे? गणु:- तेच! बंडु:- हो का? मग दुकानदार म्हणजे काय? गणु:- जो विकतो तो! बंडु:- हम्म्म! आणि धर्मपुरोहित मंजे? गणु:- जो विक्रयास बसतो तो! बंडु:- कशाच्या? गणु:- ............ बंडु:- सांग ना कशाच्या? गणु:- धर्माच्या बंडु:- अरे बाप रे! धर्महि विकतात? काय रेट असतो रे? गणु:- दर विक्रीस १ मन ..या दरानि! बंडु:- अच्छा! मग किती होतात ? विक्रय? मनाचे? एका पुरोहिताचे? गणु:- विकत जाण्याची शक्ति असेपर्यंत .. कितीही! बंडु:- हम्म्म! म्हणुन म्हणतात होय ,धर्माचं स्थान - मन...! गणु:- होय! मनच! मेंदु नव्हे...! बंडु:- मग दुकानदाराला काय म्हणायचं आपण? ....... आजपासून?

वाचने 7620 वाचनखूण प्रतिक्रिया 44

In reply to by प्रचेतस

नाखु 30/07/2015 - 08:38
काळजाला भिडण्याची वारंवारीता वाढली आहे हे नम्र निरिक्षण !!! मूळ अवांतर : कथा मार्मीक पण मेंदू तर "दु"कानात असतो तेव्हा समस्त मनुश्यगण "दु"कानदार असावा असा कयास आहे.बॅट्याच्या ताशीव आणि सूडपंताच्या सोलीव प्रतीक्रियेच्या प्रतीक्षेत. होयबा यजमान नाखु.

In reply to by टवाळ कार्टा

दोन्ही दारे दोन्ही कानाच्या जवळ आणुन ठेवणार.. क्रिप्या...पुढील बाकि हित'गुजा साठी ख.व.त भेटणेचे करावे! धण्यवाद!!!

पगला गजोधर 30/07/2015 - 09:22
धार्मिक कार्यची भीती (पिंडाला कावळा न शिवणे, साडेसाती, पत्रिकेतील मंगळ, नागबळी … टू इन्फिनिटी ) ही मार्केटिंग कॅम्पेन …

सस्नेह 30/07/2015 - 16:32
बुवा, यू टू..!! अखिलमिपा-शतशब्दजिल्बीपाडूमहासंघाचा ....

आपल्या व्यवसायाचं वास्तव मांडायचं धैर्य दाखवल्याबद्दल गुर्जींचे हाबिनंदण ! ही परिस्थिती बदलायला हवी....

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 06/08/2015 - 01:54
चुकीचा समज आहे. विकणारा चुकीच्या नावाखाली विकत असला तरी घेणाराला नेमकं काय घ्यायचं आहे ते माहीत असलं की झालं. अर्थात हे रुपक आपलं असल्यानं ग्राहक दुकानदार या रुपात आहे. दगड फ़ोडणं पासून सुन्दर मूर्ती बनवण्याच्या विचारशैलीत फरक पडल्यास जास्त उपयुक्तता येईल. डॉक्टर त्यांच्या पॅथी मध्ये विश्वास ठेवत नसला तरी त्यानं दिलेलं औषध काम करतंच की.पण विश्वास ठेवून औषध दिल्यास कदाचित स्वत: कडून आणखी काही इनपुट देऊन मात्रा अधिक गतीनं काम करण्याची शक्यता आहे. आपले याबाबत असलेले दिव्य विचार ठाऊक असल्यानं इथेच थांबतो.

पगला गजोधर 06/08/2015 - 09:39
ये बात नोट कि जाय की शशक २९ तारीख को अदालत के सामने पेश हुई थी, एक्झीबीट A
प्रेषक, अत्रुप्त, Wed, 29/07/2015 - 22:17
ताजी रात ए हिंद २९ जुलाई की शशक अगर आपको कुबूल है तो, मेरे मुवाक्कील पगला जी की 'बेच दे' का भी शुमार यहां होना चाहिये, ये मेरी आपसे दर्खवांस्त है.

शब्दबम्बाळ 06/08/2015 - 09:42
कथा चांगली असली तरीही १ ऑगस्ट पूर्वी प्रकाशित आहे. नियम सर्वांनाच सारखे असावेत! :) "स्पर्धेचा हेतू मिपावर नवे साहित्य येणे हा आहे. त्यामुळे पूर्वप्रकाशित शतशब्दकथा (म्हणजे ता० १ ऑगस्ट २०१५ आधी कुठेही प्रकाशित झालेली कथा) स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही."

कथा आवडली ! पुरोहित लोकं सुधारणेच्या नावाखाली धर्माचं स्थान - मन...! सारखे जड जड डायलॉग मारुन धर्माचे दुकान मांडुन स्वतःची तुंबडी भरतात हे कबुल करायला मनाचा फार मोठ्ठेपणा हवा ! प्रांजळपणास +१