Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] मोलाची माया

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 03/08/2015 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
“अग आटोप!” “झालंच! दीपच्या आवडीचा शिरा भाजतेय.” दीप यायच्या आधीच उरकले पाहिजे. तान्हा असतांना मुलाच्या विनंतीमुळे सपोर्टसाठी त्यांच्या घरीच रहायचो. सासूसासऱ्यांचे रहाणे आवडत नसल्याचे सुनेने आडवळणांने सुचविले. आधी- “तुम्हाला त्रास होतो, सगळ्यांचे करावे लागते”, मग- “आजकाल प्रत्येकाला स्पेस पाहिजे असते!” स्वत:च्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. कामावर जाण्याआधी मुलगा दीपला पोहचवतो, संध्याकाळी घेवून जातो! बरेच आहे! आपण स्वतंत्र, नातवाचा सहवास देखील! दिप तर आपल्या लोभासाठी आसुसलेला असतो!. येणाऱ्या चैतन्याच्या झुळुकीने ती मोहरली. एवढ्यात फोन.... “मित्र त्याच्या मोलकरणीला आमच्याकडे ठेवून भारतात गेलाय, त्यामुळे तीन आठवडे तुझ्याकडे दीपला पाठवावे लागणार नाही.” चैतन्याची झुळूक शेगडीच्या उष्णतेत होरपळली. करपलेला शिरा ती विमनस्कपणे ढवळीतच राहिली.

वाचने 5724
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

+१ मस्त, याचा सिक्वल कसा करुन ठेवला असेल बरे अरुणरावानी?

In reply to by उगा काहितरीच

स्टे - इन मोलकरणी असतात. भारतातल्या सारख्या दोन तीन तासा साठी येत नाहीत. घरीच एखाद्या सदस्या सारख्या रहातात. भारतात सुट्टीवर गेल्यास त्यांना घरी एकटे ठेवणे काही लोकाना आवडत नाही, तेव्हा ते मित्रांकडे ठेवतात.

+१ खुपच छान कथा ! उत्तरार्धाच्या प्रतिक्षेत !!

+१

+१

+१

मस्तं !

+१ मस्त अरूणराव. पण तेवढं ते शिरा भाजतेय च्या ऐवजी शिरा करतेय किंवा रवा भाजतेय असं करा.

+1

+१

+१

+१

+1

काय वो?? एवड्या आदीपासून शिरा कायले भाजून रायली? अम्चेत तर रवा भाजून राहिलेत भो...

+१

+१

+१ आवडली

+१

+१

+१

+१

+१

+१.

+१.

+१

+1

+१

+१ अप्रतिम लिहिली आहे! शंभर शब्दात अख्खी कथा बसवणे सोपे नाही. पण कथेत लिहिलेले आणि न लिहिलेले खूप व्यवस्थित पोचते आहे!

+१