Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] "सृजनचौर्य"

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 03/08/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७०. पाक्षिक कार्यालय. “तुझी कथा एकदम भंगार आहे. तू दहा वेळा बदल केलास तरी त्यात जीव येत नाही!” संतापलेले संपादक माधव अनुबंधला म्हणाले. त्याच्या डोळ्यातून मागच्या वेळेपेक्षाही जास्त दु:खाने जडावलेला अश्रू तरळला. “पुन्हा येऊ नकोस. तू लेखन बंदच केलेले बरे!” त्यांनी कथा न फाडता कचरापेटीत भिरकावली. “माझे ऐका. ही कथा वाचकांना नक्की आवडेल!” अनुबंध रडत म्हणाला. “मी दहा वेळा तुला येऊ दिले. दुसऱ्या कुणी तुला तिसऱ्या वेळाच हाकलून लावले असते. निघा आता!” भोळ्या अनुबंधने लेखनविचार सोडला. कायमचा! एका वर्षानंतर चणे खातांना कागदावर त्याने प्रथम पुरस्कार विजेती कथा वाचली - त्याचीच कथा, संकल्पना! पात्र, स्थळ बदल! लेखक माधव. चणे घशाखाली जाईनात!

वाचने 19510
प्रतिक्रिया 61

प्रतिक्रिया

आवडली !!

+१

+१

आवडली..

+१

+१

+१

सुंदर !

छान आहे

+१

चणे आवडले फुटाण्या नाखु

वास्तव....

+१

+१

+१

+१

+१ हेच! फोटोग्राफी स्पर्धेवेळी मी सुचवले होते, की स्पर्धेसाठी फोटो देताना ते संमंला व्यनि करावेत आणि संमं ने ते निनावी स्पर्धेच्या धाग्यात प्रकाशित करावेत. म्हणजे मते देताना 'बायस्ड' मतदान होणार नाही. (माझा मित्र, अमुकचं लिखाण चांगलं असतं, इ). नक्की कोणी ते आठवत नाही, पण कडाडून वगैरे विरोध केला होता.

In reply to by तुषार काळभोर

म्हणजे मते देताना 'बायस्ड' मतदान होणार नाही.
तुमच्या भावनांशी सहमत. पण उघडपणे नावानिशी कथा प्रसिद्ध होऊन मतदान झालेले कधीही चांगले. त्यामुळे उघडपणे कंपूबाजी झालेली लक्षात येते (निनावी नावामुळे फक्त ती पद्यामागाची कंपूबाजी होईल, शेवटी संपादक हा सुद्धा हाडामासाचा माणूसच, त्यालाही भावना असतातच की, उदाहरणार्थ (कल्पना करा) की मी एखाद्या संपादक किंवा कंपूच्या आदरणीय राष्ट्रीय नेत्याविरोधात मत प्रदर्शित केलं, आणि निनावी कथास्पर्धेत कथा दिली, तर शक्यता आहे की बंद दारामागे स्कोर सेटल केले जातील का ? आणि वर साळसूदपणे वेगळा आव आणला जाईल का ? अशे प्रश्न उभे राहतील , 'पूर्वग्रह ठेवला जात नाही' हे तर सगळेच बोलतात, पण कृतीत आणणे जर्रा कठीणच असते … ) अर्थात ही थियरी आहे. मिपावर मात्र तसे होणार नाही असा मला विश्वास आहेच.

In reply to by पगला गजोधर

इथे मला पार्टीसिपेटीव लोकशाहीबद्दल बोलायाचे आहे, वरील उलेखालेले काल्पनिक उदाहरण म्हणून सादर केलेलं माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by तुषार काळभोर

स्पर्धेचे फोटो, कथा, शशक संपादकांना पाथनून त्या निनावी प्रकाशित करण्यात याव्या, तरच खरी गुणवत्ता कळेल. अवांतर - ही कथापण तर संपादकांवरच केंद्रीत आहे :-) कृपया हलकेच घ्यावे.

In reply to by अमृत

स्पर्धेचे फोटो, कथा, शशक संपादकांना पाथनून त्या निनावी प्रकाशित करण्यात याव्या, तरच खरी गुणवत्ता कळेल.
तरीपण कंपूबाज व्यनितून कुजबुज करून आपापसात "आपल्यातले कोण" हे जरूर कळवण्याची शक्यता ..... ;)

In reply to by तुषार काळभोर

पैलवान आमचा प्रतिसाद ढापला का काय? ;) आदूबाळ यांच्या शतशब्दकथा च्या धाग्यावर अगदी हाच प्रतिसाद रात्री दिलाय.

संपादक माधव अनुबंधला म्हणाले, मला तर माधव हे नाव आणि अनुबंध हे आडनाव वाटलेलं.

In reply to by आगाऊ म्हादया......

मलाही हेच वाटले होते :) बाकी कथेला माझ्या कडून +१

+१

+१

+१

+१

आवडली

छान !

+१.

+१

+१११

छान कथा

+१

चान चान

+१

+१

+१

+१ सुंदर

अवांतर - न फाडता हे नमूद केले नसते तरी चालले असते, शिर्षकावरून आलेला अंदाज तिथे पक्का होतो

"चणे घशात जाईना " या वाक्याने कथेचा पंच कमी झाला. "लेखक…. माधव " एवढा शेवट अजून प्रभावी झाला असता. तरी +१

+१ आवडली.

+१

+1

कटू सत्य...

+१

+१

छान

छान

+१

+१

मस्त, खुप आवडली ११११

+१

आवडली