अत्यंत माननीय व्यक्तींच्या तेव्हढ्याच महान कृत्यंबद्दल तसलीच शिक्षा; आणि त्यावर वरताण असा महानतम काथ्याकूट मिपावर चालला आहे. नेहमीप्रमाणे डोळे पाणावलेच. वॉल्टर व्हाईट साहेबांनी फाशिची शिक्षा जगातुन हद्दपार होवो म्हणुन सद्भावना प्रकट केली. तिथेच विषय कंटुन्यु करावा असा विचार होता. पण म्हटलं शेपरेट काथ्याकूट करुया.
कायद्याचा धाक असावा, गुन्हे करताना माणसाने परिणामाचा चारदा विचार करावा... कडक शिक्षेचा असा जर हेतु असेल तर मानसशास्त्रदृष्ट्या ते एकवेळ तार्कीक वाटेल(कि त्याला पर्याय नाहि). अन्यायग्रस्त व्यक्तीला जर न्याय झाला असं वाटलं नाहि तर तो प्रतिशोध भावनेने स्वतः गुन्हेगार बनु शकतो, किंवा वैफल्यग्रस्त होऊ शकतो हे देखील शिक्षेचं कारण असावं. पण अल्टीमेटली हा समतोल साधण्याचा मार्ग नाहि. जे नुकसान झालय, ते पूर्णपणे किंवा शक्य तेव्हढं भरुन निघणं आणि परत तसं व्हायची शक्यता समाप्त करणं हे राहुनच जातं. गुन्हेगाराला जोपर्यंत आपल्या कृत्याकरता खरा पश्चात्ताप होत नाहि तोपर्यंत न्यायप्रक्रीया पूर्ण होऊ शकत नाहि... व त्या बाबतीत शिक्षा काहि कामाची नाहि.
न्यायदान प्रक्रिया मानवी सभ्यतेच्या अगदी सुरुवातीपासुन अस्तीत्वात आहे. राजसंस्था, धर्मसंस्था, समाजव्यवस्था, इ. व इतर अनेक मार्गांने न्यायदान होत आलय. पण थोडाफार प्रायश्चित्त प्रकार आणि काहि मनुष्यविवेक या पलिकडे गुन्हेगाराच्या मानसीक परिवर्तनाकडे सर्वत्र दुर्लक्ष्य झालं. साहित्य, कला क्षेत्रात हा विषय तसा बर्यापैकी चर्चेला आला. किंबहुना चर्चेच्या पातळीवर सर्वच क्षेत्रांनी "गुन्हेगाराची मानसीकता बदललायला हवी" असा रम्य घोषा लावला. पण मेनस्ट्रीम न्यायव्यवस्थेत पॉलीसी लेव्हलला याला म्हणावं तितकं महत्व आलेलं दिसत नाहि. संतचरित्रात वाल्या डाकु, अंगुलीमाल वगैरे उदाहरणं शेकडो असतील पण ति आध्यात्माची किंवा महानुभावांची महती झाली. न्यायव्यवस्थेला तिथुन काहिच रेफ्रन्स मिळत नाहि. सलमान खान व तत्सम केसमधे गुन्हेगाराकडुन समाजसेवा करुन घेणे वगैरे गोष्टी ठळक बातम्या म्हणुन प्रसिद्ध झाल्या. तशी काहि उदाहरणं पण वाचायला मिळाली. पण ते तेव्हढच.
गुन्हेगाराचं मानसशास्त्र फार मोठा विषय आहे. त्याचा अगदी सखोल अभ्यास होतो. गुन्हा तपासणी आणि प्रतिबंध म्हणुन तर त्याचा फार उपयोग होतो. पण एकदा गुन्हा घडला, गुन्हेगार सापडला, गुन्हा सिद्ध झाला... आता क्लायमेक्स...इथे विवेकी डेव्हीड, अशोककुमार, उत्पल दत्त ऐवजी धरमपाजी, शोटगन सिन्हा आणि अँग्रीमॅन बच्चन साहेब अवतरात. प्रश्न असा, कि न्यायदानासारख्या अत्यंत धरमकाटेवाल्या व्यवस्थेत हि एंट्री मानवी तर्कशास्त्र, तटस्थता, मुल्यविवेक इ. मुळे होते कि अश्रुंचा हिशोब चुकवावा इतक्या स्वच्छ भावनेतुन होते? अश्रुंचा हिशोब चुकवतो म्हटलं तर गुन्हेगाराने आपल्या कृत्याच्या पश्चात्तापातुन ढाळलेले अश्रु सर्वात मौल्यवान म्हणावे लागतील. व्हिक्टीम कदाचीत त्याने समाधानी होणार देखील नाहि. शक्य तेव्हढं मटेरीअल नुकसान भरुन निघणं, गुन्हेगाराला इक्वल शारीरीक पीडा भोगताना बघण्याची इच्छा होणं वगैरे देखील स्वाभावीक आहे. पण हे सगळं गुन्हेगाराने स्वतःहुन केलं तर व्हिक्टीमला जास्त बरं वाटेल. आणि भविष्यात गुन्हा घडण्याची शक्यता थोडीतरी कमी होईल.
इतकं दळण कांडण करण्या मागचा प्रश्न इतकाच, कि गुन्हेगाराची मानसीकता बदलणं प्रॅक्टीकली अशक्य वाटत असल्यामुळे तशी तजवीज न्यायव्यवस्थेत नाहि, कि न्यायव्यवस्थेच्या मूळ सिद्धांतातच ते बसत नाहि ?? प्रॅक्टीकली अशक्य वाटत असल्यास त्या बाबतीत काहि ठोस प्रयत्नच झाले नाहि म्हणावं लागेल. आणि सिद्धांतातच बसत नसेल तर न्यायव्यवस्था मुळातच अधु म्हणावी लागेल.
झाला टैमपास आता थोडं काम करतो :) माझ्याकडुन मायबाप कंपनीलासुद्धा काहि न्याय द्यावाच लागेल ना.
वाचने
4714
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
कायद्याचे काम नक्की काय आहे?
कायद्याचे काम...
In reply to कायद्याचे काम नक्की काय आहे? by विद्यार्थी
पण न्ययव्यस्था वेगळा प्रकार आहे.
In reply to कायद्याचे काम... by अर्धवटराव
विचारात पाडणारा लेख
मात्र आपल्याकडची गंभीर समस्या
In reply to विचारात पाडणारा लेख by श्रीरंग_जोशी
मृत्यूदंड हवाच
हो ना . दुचाकी जाळल्या . हात
भावना पोचल्या.. एकच गोष्ट
ते तर आहेच
In reply to भावना पोचल्या.. एकच गोष्ट by आनन्दा
माहितीपूर्ण
In reply to ते तर आहेच by अर्धवटराव
मुद्दा तुमचा रास्त आहे पण
In reply to ते तर आहेच by अर्धवटराव
गुन्ह्याची गंभीरता ठरवायला मानसशास्त्र उपयोगात आणतात
In reply to मुद्दा तुमचा रास्त आहे पण by प्यारे१
शिक्षा देताना कोर्ट वकीलांनी
In reply to गुन्ह्याची गंभीरता ठरवायला मानसशास्त्र उपयोगात आणतात by अर्धवटराव
तुमचा हा प्रतिसाद गुन्हेगार
In reply to शिक्षा देताना कोर्ट वकीलांनी by प्यारे१
चर्चा कुठल्या केसेस ची होते ?
In reply to तुमचा हा प्रतिसाद गुन्हेगार by संदीप डांगे
मला वाटतं धागा आणि चर्चा
In reply to चर्चा कुठल्या केसेस ची होते ? by प्यारे१
>>>> कोर्टाला मानसशास्त्र
In reply to मला वाटतं धागा आणि चर्चा by संदीप डांगे
ते वाक्य वाचले होते. :-)
In reply to >>>> कोर्टाला मानसशास्त्र by प्यारे१
मानसीक स्थिती
शिक्षा झाल्याने मुळ
वरिल प्रतिसाद संपादित झाला
In reply to शिक्षा झाल्याने मुळ by द-बाहुबली
दुबई / गल्फ मध्ये रस्त्यावर
हेच जपानमधे सुद्धा पहायला मिळेल
In reply to दुबई / गल्फ मध्ये रस्त्यावर by अभिजित - १