Skip to main content

आजच्या घडीला तुम्हाला कुठली समस्या सगळ्यात जास्त महत्त्वाची/ज्वलंत वाटते ?

Published on शुक्रवार, 05/12/2008

वाचन संख्या 1240
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

पर्यायाला दिले आहे. तेच सगळ्याचे मूळ आहे. हे माझे मत झाले पण सरकारला वरील सर्व गोष्टींसाठी एकसाथ प्रयत्न करायला लागतील, तेही नागरीकांना विश्वासात घेऊन. रेवती

In reply to by रेवती

मिपावर गांधीवाच्या आणि आतंकवादाच्या लेखांची समस्या मला जास्त गंभीर वाटते... काय सुळसुळाट झाला त्या लेखांचा नै ? हुश्श ... बरेच दिवस झाले वाचायला म्हणून काही नैच ... सगळा भेजा पुलाव झाला होता - टारझन

मत नं.३ ला आहे.

हा कौल मिपा वर घेण्यात आल्यामुळे माझ्या मते इथल्या ऒडियन्स ला वीज- पाणी- रस्ते हा प्रश्न महत्त्वाचा वाटणार. कारण मिपा वर सदस्य असणारया जनतेपुढे सध्या हाच मोठा प्रश्न आहे. मी सुद्धा ह्याच पर्यायाला मत दिलं आहे. सध्याच्या परिस्थिती पर्यावरणाचा र्‍हास , पाणी आणि त्याच्यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन तुटवडा>> ह्यावर बोलणे म्हणजे विश्वसुंदरी स्पर्धेतील प्रश्नाचे उत्तर ( मी विश्वसुंदरी झाले तर कुपोषित मुलांसाठी तसेच ओझोनच्या थराला पडलेले भोक बुजवण्यासाठी काम करेन) देण्यासारखे आहे. भारताच्या खेळातील पिछेहाटीसाठी काम करेन असे खरे उत्तर देणारी मधू सप्रे विश्वसुंदरी झाली नाही. चौथा पर्याय मला असा विश्वसुंदरी स्पर्धेतील एखादया प्रश्नासारखाच वाटला !! पहिले दोन पर्याय हे एकमेकाला विळखे घातलेले आहेत. वीज- पाणी- रस्ते ह्यांची सुविधा वाढली की औद्योगिकीकरण वाढून आपोआपच बेकारीचा, दारिद्र्या प्रश्न सुटेल. अगदी अशिक्षितांनाही पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामात रोजगार प्राप्त होतो. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा सुटेल, जर वीज- रस्ते पाणी हा प्रश्न सुटला तर. त्यामुळे चौथा पर्याय अगदीच गुळमुळीत आणी अस्थानी वाटतो. ह्याची जाण असणे ठीक आहे. पण कौलात म्हटल्याप्रमाणे " देशापुढचा ज्वलंत" होउ नये. http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

काळे ज्या पर्यायाचा चौथा असा उल्लेख करतात तो पाचवा पर्याय आहे.

मुक्तसुनीतजी, सारेच पर्याय महत्वाचे वाटताहेत. सारेच एकमेकांत गुंतलेले...

In reply to by यशोधरा

माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com) होय, मलाही असेच वाटते की, सगळेच पर्याय एकमेकांशी संबधित आहेत. एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांच्याशी लढायला हवे. राजकारण्यांकडून तर काही अपेक्षा करायलाच नको. एकमेकांचे काटे काढ्याण्यापासून त्यांचा वेळ असेल तर ते जनतेकडे लक्ष देतील. तेव्हा आता प्रत्येकानेच सक्षम व्हायला हवे.

मत पर्याय क्र. ३ ला. ही दाढदुखी बरी झाली की सुटलो एकदाचा ! -- लिखाळ.

माझ्या लेखी सर्व पर्याय महत्वाचे आहेत तरी देखील मी आत्ताच्या घडीस #१ ला - दहशतवादालाच महत्व दिले आहे. बाकी रेवतींच्या मुद्द्याशी सहमत. डार्फर मधे चालू असलेला हिंसाचार हा "जगातील पहीले पर्यावरणीय बदलाचे युद्ध आहे असे म्हणले जाते".

In reply to by विकास

वास्तविक मी वरच्या प्रतिसादात दाढदुखीचा उल्लेख केला आहे तो याचसाठी.. मला वाटते की दहशतवादावर कारवाई त्वरेने केली पाहिजेच.. ती आजची गरज आहे. पण पर्याय तीन ही सध्याची काल्-आज-उद्याची गरज आहे. अर्थात सध्या-ज्वलंत हे शब्द नक्की कोणता काळ दर्शवतात ते समजणे सापेक्ष असल्याने उत्तर निवडले जाईल. पण वास्तविक सापेक्षता 'गरज काय वाटते' याबद्दलची असणे अभिप्रेत आहे. मला वाटते कौलाची सुरुवातीची काही वाक्ये अजून स्पष्ट केली तर उत्तर द्यायला अजून सोपे होईल. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

पर्यायांची पार्श्वभूमी नीट न समजल्याने १ का ३ असा माझाही घोळ चालू आहे. एखाद्या नंग्या व भुकेल्या माणसाला "थालेपीठ, भजे, बर्फी, खिचडी व धोतर यापैकी काय हवे" आहे असा प्रश्न विचारला असता या प्रश्नात धोतराचा पर्याय जसा असलग्न होतो तसेच आपल्या शेवटच्या पर्यायात झाले आहे असे वाटले. पण सगळेच प्रश्न ज्वलंत व खूप महत्वाचे आहेत हे नक्की. आपला, (प्रश्नांकित) भास्कर आम्ही येथे वसतो.

नं. ३ ला मत दिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पण पर्याय ५ हा अधिक व्यापक आणि वरवर चटकन न जाणवू शकणारा आहे त्यामुळे मत ५ ला. (ह्यात अवाढव्य लोकसंख्येचा प्रश्नही नक्कीच हवा - इतर सर्व प्रश्न जसे, मूलभूत गरजा, शिक्षण, साधनसंपत्ती, , वीज, पाणि, रस्ते, पर्यावरण हे सर्व मातीमोल करण्याची शक्ती वाढत्या लोकसंख्येत आहे. कोणताही पक्ष हा मुद्दा कळीचा म्हणून सोडवायला पुढे येत नाही ही दिग्मूढ करणारी बाब वाटते! :( ) चतुरंग

मला वाटते की पर्याय ३, ४, आणि ५ हे मॉस्लोच्या हायरारकीप्रमाणे (उतरंड?) आहेत... जर एखाद्याकडे अन्न, वस्त्र निवाराही नसेल तर त्याला तोच पर्याय योग्य वाटेल... अन्न, वस्त्र निवार्‍याची सोय झाली की मग वीज, सडक इत्यादि... ते मिळाल्यावर मग पर्यावरण.... भुकेल्या पोटी पर्यावरणाची चिंता कशी करणार? हे आपले माझे विचार हो! मला यातलं जास्त काही कळत नाही याची मला नम्र जाणीव आहे.

In reply to by पिवळा डांबिस

पिडाकाकाशी सहमत (पिडाकाका आज भरपुर खुश होणार. चक्क सहमत) मला यातलं काहीच कळत नाही याची मला विनम्र जाणीव आहे. -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

मी दोघांशी सहमत. मला पण ह्या तले काहीही कळत नाही. अवलियला कळत नाही के ते मला माहित नाही.

तिसर्‍या पर्यायाला मत दिले आहे. माझ्या मते जोपर्यंत अन्न्-वस्र-निवारा यासाऱख्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी झगडावे लागते तो पर्यंत बाकी सारे प्रश्न तसेच राहतील. याच मुलभुत गरजा भगवण्यासाठी मग लोक काहीही करायला तयार होतात अन त्यातुनच मग दहशतवाद / भ्रष्टाचार वगेरे जन्माला येतात. सुक्या (बोंबील)

.... कोंबडी आधी की अंडा.... खरे तर कुठलीच समस्या सोडवु न शकल्याने आज सगळीच आणीबाणीची परिस्थीती वाटते. म्हणुन इतका गोंधळ वाटतो पर्याय निवडताना. :-( पर्याय ३ ला मत दिले आहे कारण एकदा का मुलभुत गरजा, शिवाय जोडीला टीव्ही, फार तर लाड म्हणून कॉम्प्युटर- इंटरनेट काय बिशाद माणुस दंगा करायला रस्त्यावर उतरतो. फक्त ट्रॅफीकवरुन दंगा घालेल. ओसामा किंवा उच्चशिक्षीत दहशतवादी पाहुन वाटु शकते हे लोक गरीब नव्हते पण बर्‍याचवेळा त्यांनी निरपराध गरीब मुस्लीम जनतेवरचा अन्याय पाहून असे करावेसे वाटले असे त्यांनी सांगीतले आहे. हे नक्की की जोवर "नथिंग टु लुज"वाटणारे गरीब युवक त्यांना मिळत रहातील तोवर त्यांना "मनुष्यबळ" मिळत रहातील. फक्त दहशतवादीच कशाला असेच युवक कधी नक्षलवादी, कधी गुंड, दरोडेखोर, राजकीय पक्षांच्या दावणीस बांधले जाणे, रस्त्यावर दंगली करणे व बाकी राहीलेले दुर्बल या आगीत जळणार्‍या समीधा व वाचलेले उरलेले भीक मागणारे होतात.

अजूनही वेगळा काही पर्याय हवा का असा प्रश्न हवा होता. मी ५ हा पर्याय निवडला. जगातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश हीच खरी समस्या आहे.

माझे मत पर्याय क्रमांक ५ ला दिले आहे. बाकी सगळ्य समस्या गंभीर / ज्वलंत आहेतच. पण पर्यावरणाचा र्‍हास हा कायमस्वरूपी आहे. तो भरून आलाच तरी त्याला कोट्यावधी वर्षे लागतील. आणि नैसर्गिक संतुलन गेले तर सगळ्याच सृष्टीचा नाश संभवतो आणि सृष्टीच नसेल तर पुढे काहीच नसेल!!!!!! बिपिन कार्यकर्ते

ला मत वेताळ

महत्वाच्या (important) समस्या आणि ज्वलंत (urgent - तातडीने उपाययोजना करायच्या) समस्या ह्या वेगवेगळ्या असू शकतात. म्हणूनच महत्वाच्या / ज्वलंत हा शब्दप्रयोग गोंधळ उडविणारा वाटतो. दारिद्र्य, निरक्षरता, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत घटकांकरता झगडणार्‍या कोट्यावधी जनतेची स्थिती हा पर्याय महत्वाच्या समस्यांच्या उतरंडीत सर्वात वरती परंतु ज्वलंत समस्यांच्या उतरंडीत फार वरती नाही. देशावर पडलेला दहशतवादाचा विळखा (त्यात झालेली हिंसा, लोकांमधे पसरलेली दहशत) हा पर्याय ज्वलंत समस्यांच्या उतरंडीत सर्वात वरती परंतु महत्वाच्या समस्यांच्या उतरंडीत फार वरती नाही (फार खालीही नाही). अर्थात, इतर हा पर्याय उपलब्ध नसल्याकारणाने मतदानात भाग घेतला नाही! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दारिद्र्य, निरक्षरता, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत घटकांकरता झगडणार्‍या कोट्यावधी जनतेची स्थिती सुधारल्या वरच बाकिच्या गोष्टी सुचु शकतात...असे मला वाटते... स्वप्निल

क्र. ३ ला मत. प्रकाश घाटपांडे

सगळे मुद्दे अगदी वादविवादस्पर्धेच्या विषयासारखे आहेत ... कुठलाही धरून बराच वेळ बॅटिंग करता ये ईल... पाचवा आणि चौथा महत्त्वाचे वाटतात... पाचव्याला मत दिले आहे. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/