(मिपा वर पहिल्यांदाच लिहिले आहे. अगदी राहवत नाही म्हणून मन मोकळे करावे वाटले. चुकलं-माकलं क्षमा असावी.)
माझ्या आजोबांच्या तोंडी एक वाक्य सतत येऊ लागल होत, "भारत आचारटांचा देश झालाय." हल्ली हे पदोपदी पटायला लागल आहे.
आज 'अब्दुल कलाम' यांचा दफनविधी, त्या महामानवाच स्मरण करायचं तर आपण भारतीय याकुबचा दफनविधी कसा होईल याची अपडेटस पाहतोय.
याकुबला फाशी झाली. मानवतावादी दृष्टीकोनातून बरोबर कि चूक हे मला कळत नाही. पण एवढ मात्र कळतंय कि आपण न्यायालयाचा आदर केला पाहिजे आणि त्या निष्पाप जीवांचा आणि त्यांच्या मागे राहिलेल्या जीवालागांचा विचार करायला हवा.
याकुबच्या फाशीकडे हिंदू विरोधी मुस्लिम असे बघितले जातेय. किती चूक आहे हे. मिडिया आणि काही नेते मंडळी सतत त्यावर चर्चा करून त्याच उदात्तीकरण करत आहेत. उद्या 'शूट अट लोखंडवाला किंवा वडाला' असे गुंडांचे पिक्चर आले तसा यावरही तयार होईल. आणि आपण डोळे पुसत पुसत त्याच्या बायकोला दुवा देत तो पिक्चरहि पाहू.
याकुबला फाशी देणार अस जाहीर झाल्याबरोबर सगळ्या मिडीयाला उत आला. नेतेमंडळी राजकारण करू लागले. मानवतावादी आसवे गाळू लागले. आणि आपण सगळे निमूट पाहत होतो, किंव्हा आपल्याला ते पाहावेच लागत होते. क्रिकेट आणि सासू-सून मालिकेतून बाहेर पडून काहींनी रुचीपालटहि केला असेल.
याकुबला फाशी देण्याचा चौथरा बांधण्यासाठी २२ लाख रुपये खर्च झाला. (आमच्या भागात एवढ्यात एक छोटा flat येईल.) त्याचा दोर म्हणे खास बिहारहून मागवला. फाशी कशी द्यावी याची रंगीत तालीम करण्यात आली. अस नि तस. काल खरतर कलाम यांच्या आठवणी ऐकण्यासाठी टीवी लावला होता पण अश्या फालतू बातम्या ऐकून बंद करून टाकला. या फाशीला सरकारने व्ही.आय.पी. फाशी बनवलं, मिडीयाने जगासमोर ठेवून भारताचा आचरटपणा जगासमोर आणला.
आणखी एक खटकलेली गोष्ट, याकुब दोषी होता मान्य, त्याला शिक्षा होणे गरजेच होत. पण म्हणून निर्ढावलेल्या मिडीयाने याकुबच्या भावाला त्याच्या फाशी आधी 'तुम्हाला कस वाटतंय?' हे विचारणे योग्य आहे का?
याकुबच्या फाशीची सगळी प्रक्रिया गुप्त का झाली नाही? का हा विषय चघळून चघळून बोथट केला? का विषयाचं गांभीर्य कमी केल? का याकुबला हिरो बनवलं? का या घटनेला हिंदू-मुसलीम रंग दिला जातोय? का?
वाचने
3909
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी ह्याच अनुषंगाने एक धागा
.
खरे हिरो मात्र उपेक्षित
In reply to . by dadadarekar
तुम नहि सुधरोगे.. साला सुअर आखिर * खाकर हि रहेगा :- ओमपुरी (कुरु
एखाद्या च्यानेलावर बहिष्कार टाकावा
In reply to तुम नहि सुधरोगे.. साला सुअर आखिर * खाकर हि रहेगा :- ओमपुरी (कुरु by होबासराव
अगदि बरोबर ! मनातल
In reply to एखाद्या च्यानेलावर बहिष्कार टाकावा by सामान्यनागरिक
नवा धागा काढून आपण देखील
आरारारारा! जौद्ये की आता ..
त्ये एकदा ग्येलं की फासावर
आँ !
In reply to त्ये एकदा ग्येलं की फासावर by होबासराव
झालं ... संपलं ... गेला याकुब
माझा रोख व्यक्तिद्वेषी नाही
In reply to झालं ... संपलं ... गेला याकुब by प्रसाद गोडबोले
एकंदरीत भारतिय जनता
+११११११११११११११११
In reply to एकंदरीत भारतिय जनता by gogglya
हिंदू-मुसलीम रंग दिला जातोय? का?
सरकारने याकुब ला फाशी
असे धागे वाचले की ,मला माज्या
हे माझे जी.के. नाही. मी हे
In reply to असे धागे वाचले की ,मला माज्या by जेपी
कासीम बद्दल वाचलं का काल ?