Skip to main content

कोकोनट नानकटाई

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 29/07/2015 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २५० ग्राम मैदा २०० ग्राम अनसॉल्टेड बटर किंवा तूप १७५ ग्राम साखर ५० ग्राम रवा ५० ग्राम बेसन ५० ग्राम डेसीकेटेड कोकोनट दीड टीस्पून वेलचीपूड २ टेस्पून पिस्तापूड . पाकृ: ओव्हन २०० डीग्री सेल्शियसवर प्री-हीट करायला ठेवा. मिक्सिंग बाऊलमध्ये साखर व तुप एकत्र करुन फेटून घ्या. त्यात बेसन, रवा व डेसीकेटेड कोकोनट घालून लो स्पीडवर फेटून घ्या. आता त्यात थोडा-थोडा करुन, चाळलेला मैदा घालून मिक्स करुन घ्या. वेलचीपूड व पिस्तापूड घालून एकत्र मिक्स करा. . बेकिंग ट्रेवर बेकिंग पेपर लावून घ्या. तयार मिश्रणाचे छोटे, पेढ्याएवढे गोळे घेऊन, वळून हलके चपटे करा. बेकिंग ट्रेवर सर्व गोळे रचून ठेवा. त्यावर मधो-मध पिस्त्याचे काप किंवा पुड लावून घ्या. ओव्हनमध्ये २०० डीग्री सेल्शियसवर १० ते १२ मिनिटे बेक करुन घ्या. . बेक झाल्यावर १० मिनिटांनी ट्रेमधून कुलिंग रॅकवर काढून ठेवा. नानकटाई पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवा. मस्तं पावसाळी वातावरणात गरमा-गरम चहासोबत ह्याचा आस्वाद घ्या :) . नोटः खोबर्‍याचा स्वाद अजून येण्यासाठी ह्यात कोकोनट एसेन्सचा वापर ही करता येऊ शकतो. २०० ग्राम तुपाऐवजी तुम्ही कोकोनट बटरचा वापर ही करु शकता. खोबरे नको असल्यास ते वगळून वरील साहित्यात ही नानकटाई बनवता येते.

वाचने 15656
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

आहा..... काय दिसताहेत नानकटाया......तोंडात टाकताक्षणी विरघळतील अशा. सनिका, एक विचारायचं आहे, मैद्या ऐवजी सेल्फ राइज़िंग फ्लोर आत्ता घरी आहे ती वापरली तर चालेल का की मैदाच पाहिजे?

In reply to by पद्मावति

सेल्फ रेझिंग फ्लोरमध्ये बेकिंग पावडर असते त्यामुळे मैद्याऐवजी वापरायचे असल्यास ४-५ वेळा चाळून घ्या. धन्यवाद :)

मी पैला. खाऊन पाहिल्या. छानंयत!!!

ये बात! जबरदस्त आहे. करून बघतो. फेटून घेण्याला काही लो-टेक आयड्या आहे का? १/ हाताने भरपूर वेळ मळणे २/ पाणी घालून घुसळणे आणि रोवळी/गाळणं वापरून पाणी काढून टाकणे यापैकी कोणती क्रिया फेटून घेण्याच्या जवळ जाईल?

In reply to by आदूबाळ

फेटून घेणे म्हणजे बीटरने बीट करुन घेणे. बीटर नसेल तर वायर व्हिस्क / बलून विस्क वापरु शकता किंवा लाकडी चमचा किंवा खाण्याचा काटा (फोर्क) ह्याचा वापर करता येईल. अंडे कसे फेटतो तसे मिश्रण फेटावे.

In reply to by आदूबाळ

मिश्रण सरळ परातीत घ्या, अन हाताने आडवे फटकारे मारत फेटा. मस्त फेटल जात अस हे नानकटाईच. आम्ही पूर्वी असच फेटायचो नानकटाई मिश्रण. फेटत फेटत त्यात सगळे इंग्रेडीयंटस मिसळले अन पिठ मिसळल की हाताला फक्त तुपकट्पणा सोडून काहीही रहात नाही. बघा करुन. आडवे फटकारे म्हणजे तळहात पुरा परातीला आडवा टेकवुन तसाच या कडेपासून त्या कडेपर्यंत वेगात फिअरवायचा.

करुन बघण्यात येईल रविवारी! बाकी छान छानला नवे शब्द सुचवा या ताईंसाठी!

In reply to by आदूबाळ

काहीही =)) बाकी सूडचा प्रतिसाद आला तसे लगेच पुन्हा फोटो बघितले काय आहे ना तो कधी शालजोडीतून हाणेल सांगता येत नाही ;) धन्यवाद.

करून बघायचा मोह होतो आहे.

मस्तच. मी साधी बनवते, पण बेसन असलेली पहिल्यांदा पाहिली.

नेहमीप्रमाणेच. एक शंका आहे...बेकिंग मधे सगळं प्रमाण व्यवस्थीत असुनहि पदार्थाला विशेषत कुकिज/नानकटईला चिरा का पडतात?

In reply to by दिपक.कुवेत

काही बेक केलेले पदार्थ चिरा पडल्यामुळेच खुसखुशीत आणि खमंग लागतात. बेक करातांना फुगून, फुटल्यावरच्या चिरा नसल्यास पदार्थ फसला समजावा! बाकी नानकटाईचे फोटो खासच. हे पदार्थ खायला मिळत नसल्याने मी (सानिकाच्या) पाकृंच्या धाग्यावर कमेंटी टाकणं टाळते ;)

मस्त प्रकार!

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gifhttp://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif

कसल्या कातिल दिसत आहेत.. व्वा! आता नानकटाई शोधणे, करणे आले.. द्या आणखी आमच्या वाढत्या वजनाला हातभार.. (शतकिलोस्पर्धक) चिगो.

मला नानकाटाई फार फार आवडते... अशीच एक नानकाटाईची टोकरी पार्सल करायची व्यवस्था करा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जीवन से भरी तेरी आँखें... :- Safar { किशोर कुमार }

नानकटाई फारशी आवडत नाही. (बेकरीचे पदार्थ). पाककृती मात्र नेहमीप्रमाणेच देखणी आणि नेटकी.

मस्तच.. ह्यात कोकोनट ऐवजी आले घालून जिंजर नानकटाइ करता येते आणि ती पण सह्ही लागते. स्वाती