Skip to main content

( रेशनकार्ड )......शतशब्द-सम्मुच्चय

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 29/07/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
३ वर्षे खच्चून पर्फोर्मंस दिल्यावर शेखरअण्णाने तीला सोलो पाठवायचं ठरवलं. घरवालीशी बोलून झालं, नगरसेवक काचीचं नाव निघालं. घरवालीला केवढा आनंद झाला, काचीबरोबरची रात्रीची "बैठक" छान झाली. "१८ वर्षांपेक्षा मोठी दिसायला लागली आता तु" असं काचीकडून उत्तर मिळाल्यावर खुश झाली. टोपाझची रात्र जवळ येवू लागली, खरेदी वैगेरे झाली. शेखरअण्णाने पारदर्शक डीपकट घालायला लावलं तीला. "कष्टमरको खुश रखेगी…. इदर जैसे डान्स किया, उससे अच्छा उदर करेगी" असं ऐकल्यावर त्याचं टेन्शन कमी झालं. आवश्यक सोपस्कार पार पडले. टोपाझमधे धंदेके टाइमवाला डान्सफ्लोर मिळाला. कपडे उतरवून डान्स करताना, विचार करू लागली, "अजून बीएमसी इलेक्शन… २०१७ पर्यंत, म्हणजे तोपर्यंत वाट बघितली तर नक्की मिळेल भारताचं रेशनकार्ड."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3425
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by माम्लेदारचा पन्खा

बिएमसी वर ज्याचं इतकी वर्षे राज्य आहे (कथेतील काल्पनिक नगरसेवक काची ) त्यांनीच दिलीये रेशनकार्ड ……

In reply to by तुडतुडी

बिएमसी वर ज्याचं इतकी वर्षे राज्य करताना, भूमिपुत्रांना रेशनकार्ड द्यायची, तर खंडणीखोरिकरून, बांगड्यांना झोपड्या द्यायच्या वर रेशनकार्ड वाटायची