Skip to main content

शंभर

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 29/07/2015 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालीय संस्थळावर अहमहमिका लागली होती शतशब्दकथा लिहायची ….सगळेजण शब्दांवर तुटून पडत होते.… तो मात्र येणारी प्रत्येक कथा वाचण्याआधी अधाशासारखे शब्द मोजत होता सोनारासारखा तोलूनमापून… ह्या प्रकारात कधी नव्हे ते शब्दांना किती मोल असते आणि शिवाय अर्थही …. त्याच्या मनात विचार चमकला अचानक …. बायकोला सुद्धा हीच अट घालायला हवी रोज… दिवसाला फक्त शंभरच शब्द …. बास …ह्या वाफेच्या किटलीमुळे त्याचे कान किटले होते…तिच्या तोंडातून निघणाऱ्या वाफेने रोज भाजून निघायचा हा खरपूस कोंबडीसारखा…. येता जाता फक्त आणि फक्त अवहेलना… मनाचा हिय्या करून उभा राहिला बायकोसमोर…. पण तोंडातून शब्दच फुटेना काही केल्या…. पुन्हा एकदा वाफ आली आणि तो सुन्न मानाने आंतरजालावर शतशब्दकथा लिहायला बसला !!

वाचने 5224
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

सुन्न मानाने आंतरजालावर शतशब्दकथा लिहायला बसला !!
(सिक्वल ) आणि त्याने शतशब्दकथेला नाव दिलं 'शंभर' …। (हळू घेणे, हे वे सां न ल)

बरं झाला तुम्ही भेटलात ते. समदु:खी लोक भेटले की दु:ख वाटुन घेता येते असे म्हणतात. पैजारबुवा,

=)) आज घरी दे वाचायला....मटन नैतर खिमा बनेल

तरुणपणी तिचं ऐकाल तर म्हातारपणी तिचं तुम्हाला ऐकावं लागणार नाही. ---------------------------------- दशशब्दकथा T10 /W10. -------------------------- तिचे चुकीचे निर्णयच गप्प करतील. -पंचशब्दकथासार.

In reply to by कंजूस

तरुणपणी तिचं ऐकाल तर म्हातारपणी तिचं तुम्हाला ऐकावं लागणार नाही. ह्याला 'उम्मीद पे दुनिया कायम है' म्हणतात -------------------------- तिचे चुकीचे निर्णयच गप्प करतील. आणि ह्याला निरागस, भाबडा आशावाद :)

In reply to by टवाळ कार्टा

उ.न.क. चे पुनरुज्जिवन करावे. मला पण सदस्यत्व हवे आहे ;) (बायको मिपाकर नसल्याने बिनधास्त) मी-सौरभ

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वैमानिक विमान उडवतो पण त्याला उडता आलंच पाहिजे असं नसतं ना....!!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पेर्णास्त्रोत जवळचा असल्याखेरीज असले जब्राट लेखन होउ शकत नै. काय टक्या बरोबर आहे का नाही?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यो तिकडं असल्याच एखाद्या हिरीत उडी मारायची प्ल्यानिंग करून र्‍हायलाय !!

In reply to by टवाळ कार्टा

कशावरून??? घरात तुझंच म्हणणं चालेल याची तुला काय गॅरंटी. मलाही तसंच वाटत होतं. पण ४-५ वर्षांतच परिस्थती फार बदलती रे. आपल्याला कळत पण नै.

In reply to by जडभरत

"जो बादल गरजते है वो बरसते नही" हा संदर्भासाठी. आणि आचरणासाठी "संसारातील कुरबुरींना समर्थ "तोंंड" देण्याची चतुर कला ज्याला जमते तो खरा संसारदक्ष पुरूष बाकी सगळे निरर्थक आत्मरंजन !" रिटायर्ड पोपशास्त्री लिखीत " विना फटका ! संसार करा नेट"का ! " या प्रवचनातून साभार. प्रवचन वाचक नाखु

हा हा हा, बायकोला शंभर शब्दांची अट घालणारा जन्माला यायचाय अजून. इतकी युगे गेली पण असा महाभाग कुठे असल्याचे वाचनात नाही आले बाबा.

#"संसारातील कुरबुरींना समर्थ "तोंंड" देण्याची चतुर कला # समर्थ पळाले सावधान ऐकल्यावर तिथे कंजूस , तलाठी ,मामलेदार तोंडावर वारा घालून पंख्याने काय होणार? वटवटसावित्री नवय्रास जिवंत ठेवते ऐकवण्यासाठी "तुम्ही कसे चुकलात ते."

In reply to by नाखु

मजा घेतो .अर्थकारण चुकते आणि तोंड वाजते. बाकी परदेस धरलेले यातून तीनतीन महिने सुटतात का?मोबल्यावरून ऐकावे लागते का आल्यावर खरडपट्टी?

पारु ए पारु हिकरं ये, हे वाच गं कं लिवलंय कं लिवलंय , जल्ला सगल्यांच्या पदरात तुमचं माप टाकतांव काय? एऽऽ दादुस गारी कार आपली , फिराला जावु चल. मना आत्ताच 1 अशी स्वप्न परायला लागलीत.

हम्म्म. या प्रकारातून एक सिद्ध झाले की एक आतिवासताई ह्यांचा अपवाद वगळता 'शतशब्दकथा' लिहिण्यात बव्हंशी पुरुष आयडीच पुढे असतात. हा प्रकार स्त्रीलेखिकांनीही हाताळायला हवा असे वाटते.

In reply to by एस

१०० शब्दांचे बंधन स्त्री आयडींना नको असणार ( डु आयडी विचारात घेतलेले नाहीत )