सर्वांग सुंदरी सनी लिओनी आणि नाडी भविष्य!
'आत्ता युट्यूब वर नजर गेली. 'तुमच्या नाडीला पहायला' ती' गेली होती म्हणे'! फोन वरून आवाज आला. एक नाडी प्रेमी दुसर्याला सांगत असावा.
'नाही हो, हे काय भलतेच' असे तो म्हणत होता. मनात अशी मदनिका माझ्यापर्यंत पोचली तर? ह्या कल्पनेने त्याच्या सर्वांग वर रोमांच उभे राहिले.
चोरून पहायच्या ललनांचे अतरंगी सौष्ठव आणि नाडी? काय संबंध? अन् अशा गोष्टींचा बोभाटा का करतात?
अहो त्यात नाडीग्रंथवाल्यांची भेट घेताना म्हणे दिग्दर्शक सिनेमात 5 ठिकाणी चुकलाय.
असेल मग मी काय करू शकतो?
'नाही, तुमच्या कानावर घातली बातमी! काही फाजील नाडी पहायला निघालो म्हणतात पण जाता जात नाहीत. म्हणून म्हटलं.'
'अहो आधी त्या तात्याला कळवले का? त्याला असतो असा शौक.'
'हो का मग ही लिंक द्या पाठवून त्यांना.'
हो हो पाठवीन ना. तो मनात म्हणाला, 'आधी मी पाहून घेऊनच पाठवावी! .'
मिसळपावकऱ्यांना लागतात अशा उचापती करायला.
कोणी केला असावा दुरभाष? अंतर आत्म्यास प्रश्न पडलाय!
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाडी ग्रंथाचे अॅप्लिकेशन
नाडी ग्रंथाचे अॅप्लिकेशन लावून सनी लिओनच्या सौंदर्याचे रहस्य उलगडण्यात यशस्वी होणार का?
नाडी अॅप्लिकेशन गूगलवर
In reply to नाडी ग्रंथाचे अॅप्लिकेशन by कंजूस
कंजुसांनी नाडीवरील ही अॅप्स पाहिलेली दिसतात. चला, मिपाकरांपैकी कोणी तरी ती पाहिली याचे समाधान आहे.
नव्या नव्या उन्मेषांची नोंद नाडी ग्रंथातून केली जाते याचे एक उदाहरण म्हणजे ही अॅप्स आहेत. महर्षींच्या आशीर्वादातून हे बनवायची प्रेरणा मिळाली. नवीन शोधातून मिळालेल्या हत्यारामधून लोकांपर्यंत सुगमपणे पोहोचायची सोय होईल, त्याची मदत घेऊन हळू विविध भाषातून ते बनवले जाईल असे कथन आहे. अधून मधून गूगल प्ले स्टोअरवर दौड केली तर मिळेल काही काही नवे अॅप्स.
काय होतंय काका?
काय होतंय काका?
खिक्क !!
In reply to काय होतंय काका? by आदूबाळ
खिक्क !!
+१११११११११११११
In reply to काय होतंय काका? by आदूबाळ
अगदी अस्सेच.
सलौनीच्या लीला
In reply to काय होतंय काका? by आदूबाळ
आत्म्याने मानव योनीत प्रवेश केला की त्याला अनेक पुर्व जन्मातील कर्मामुळे विविधतेने नटायला होते. चि. कु. सलौनीच्या शृंगाराचे ते गुपित असेल. नाडी महर्षींच्या आशिर्वादाशिवाय तिला गती कशी मिळणार? म्हणून सिनेमातील चुकांमुळे वाट लागलेली पाहून ती म्हणाली असेल, 'ये क्या हो रहा है?'
नाडीचा गु्ंता वाढ़तोय?
नाडीचा गु्ंता वाढ़तोय?
असो, नाडी रिडरची काय अवस्था
असो, नाडी रिडरची काय अवस्था झाली होती यावर काही माहिती उपलब्ध्द आहे का ? म्हणजे त्याला तर तिचे सगळेच पट्टीवर दिसले असेल नाही का ?
नाडी वाचायच्या खोलीत
In reply to असो, नाडी रिडरची काय अवस्था by द-बाहुबली
नाडी पट्टीवरून वाचकाची नजर सारखी घसरत असल्याचे नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार कळते. म्हणून तर सिनेमात सुद्धा तिची पट्टी न पहाता नुसते बोट लावून कळले हीच मिश्टेक झाली ना....
अश्यावेळी नाडी वगैरे सगळे
अश्यावेळी नाडी वगैरे सगळे सोडून द्यावे
अश्यावेळी नाडी वगैरे सगळे
अश्यावेळी नाडी वगैरे सगळे सोडून द्यावे
आणि कुंडली बघावी....कोणत्या योगामुळे असा भाग्योदय झाला ;)
नाडी वगैरे सगळे सोडून दिल्यावर
In reply to अश्यावेळी नाडी वगैरे सगळे by टवाळ कार्टा
आपलीच कुंडली उघडी पडावी सामोर्च्यांसमोर
मेरे सैया सुपरस्टार... ;)
In reply to अश्यावेळी नाडी वगैरे सगळे by टवाळ कार्टा
आणि कुंडली बघावी....कोणत्या योगामुळे असा भाग्योदय झाला ;)
हॅहॅहॅ... बाकी, बाईंने बर्याच जणांचा भाग्योदय केला हे मात्र निश्चित ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
५ तासांत ~७५० वाचनं (?). सही
५ तासांत ~७५० वाचनं (?). सही ! "नाडी" एकदम हिट्ट :)
५ तासांत ~७५० वाचनं (?). सही
In reply to ५ तासांत ~७५० वाचनं (?). सही by नाव आडनाव
हेच आहे आजच्या नाडित!
मूळ पट्टिका अशीच आहे मुळी! ;-)
सनी कोमात
मिपावर आपल्याबद्दल धागा आलेला बघून सनी कोमात गेलीय म्हणे.

सनी कोमात, कमांडर जोमात.
चला जरा हवा येऊ द्या...
In reply to सनी कोमात by चित्रगुप्त
बाईंना आली चक्कर, पाहून मिपाकरांची घाई ।
पाच तासातील चकरा , पाहून थक्क झाली हो बाई ।।
येन केन प्रकारेण नाडी चा
येन केन प्रकारेण नाडी चा प्रसार झालाच पाहिजे.
पॉर्नस्टार असो की https://misalpav.com/comment/722485#comment-722485 (त्या धाग्याचा इस्कोट नको म्हणून बोललो नाही)
आपलं कवतुक वाटतंय फार
कवतूक करायचेच तर
In reply to येन केन प्रकारेण नाडी चा by प्यारे१
त्या महर्षींचे करा ज्यांनी सनी असो का मुन्नी, सितारे असोत की प्यारे सर्वासाठी एकच मापदंड लावून नाडी ग्रंथ लिहिले आहेत.
त्यांचे कौतुक, तुमचे कवतुक!
In reply to कवतूक करायचेच तर by शशिकांत ओक
त्यांचे कौतुक, तुमचे कवतुक!
hmm interesting choice of words
In reply to कवतूक करायचेच तर by शशिकांत ओक
शशी थरूर आणि नाडी
शशी थरूर यांना 'ते' भाषण करण्याची प्रेरणासुद्धा नाडी महर्षींनी दिली असल्याबद्दलचे वृत्त एका नाडीवाल्याने दुसर्या नाडीवाल्याला दूरभाष करून दिले असल्याची बातमी आली आहे म्हणे.
म्हणे म्हणजे कोण म्हणे ??? बोला तो बोला, बोला तो बोला.
शशी बोलले
आणि ब्रिटिश थरारले...
तुम्ही आमच्या देशातील संपत्ती आणि ज्ञान पळवून इतके नाडलेत. अरे कुठे फेडाल ही पाप... असे सभ्य, संयत भाषेत पण अशा कानपिचक्या दिल्या आहेत... पूछो मत.
माझ्या धाग्यांची उजळणी...
कालांतराने मिपाकरांच्या संपर्कात आल्यावर आधी काय काय सादर केले होते ते पाहताना नव्या सदस्यांसाठी धागे उपसून वर काढतोय. राग नसावा.
नाडीत नाडी एकच नाडी
In reply to माझ्या धाग्यांची उजळणी... by शशिकांत ओक
एकच नाडी सोडली तरी पुरेल. सगळीकडे तेच तर गुर्हाळ आहे. आणि सगळ्या नाड्या सोडल्या तर आणीबाणी उद्भवेल ते वेगळच.
काय म्हणणे आहे
५००/१००० च्या नोटांबद्दल सनी आणि महर्षी यांचे काय म्हणणे आहे म्हणे ???