मी थेट-घरात ( आंग्ल भाषेत – डीटीएच) दूरदर्शन सेवेचा एक ग्राहक आहे. साधारण सातेक वर्षांपूर्वी मी ही सेवा घेतली. त्यावेळी खासगी च्यानेले अगदी भरात आलेली होती. मलाही त्यावळी ही सेवा घेतल्याचा आनंद झाला. अर्थात खासगी च्यानेले म्हणजे जाहिराती असणारच. आणि त्यावेळी तीस मिनीटांच्या कार्यक्रमात किंवा मालिकेच्या भागात आठे ते दहा मिनीटांच्या जाहिराती असायच्या. बरेच वेळा त्या नको तेंव्हा चालु व्हायच्या पण मालिकेचा भाग कोणता आणि जाहिराती कोणत्या हे नक्की ओळखु यायचे. संध्याकाळ्चे कार्यक्रम बघतांना आमची सौ. बरोबर त्या वेळेस उठुन खिचडी टाकायची आणि पुढच्या जाहिरातीच्या ब्रेक मधे कुकरच्या खालचा ग्यास बंद करायची. मालिकेचा तो भाग संपता संपता कुकर थंड झालेला असायचा आणि पुढची मालिका सुरु व्हायच्या आधी आमच्या खिचडी, पापडाचे ताट असायचे. असे आमचे जीवन सुखेनैव चालु होते.
हळू हळू या जाहिरातींचे कार्यक्रमाच्या वेळेवर होणारे आक्रमण वाढु लागले. हल्ली तर असे लक्षात आले आहे की काही काही मालिकेच्या भागांमधे सतरा मिनीटांच्या जाहिराती आणि केवळ तेरा मिनीटांचा मालिकेचा भाग असतो ज्यात पात्रे एकदम हळु हळु संवाद बोलुन कसेतरी तेरा मिनीटे भरण्याचा प्रयत्नं करत असतात.
त्यात भर म्हणुन की काय हल्ली खालील प्रकारच्या जाहिराती पण चालु झाल्या आहेत.
१. दूरदर्शन संचाच्या पडद्याच्या खाली असलेली एक सरकती पट्टी. यात वंध्यत्व निवारणापासून तर दिव्य औषधींपर्यंत सगळ्या जाहिराती असतात.
२. त्यात भर म्हणुन काहीतरी ब्रेकींग न्युज किंवा खास घोषणा केल्यासारखे ( वर वर्णन केलेल्या) जाहिरात पट्टीच्यावरचा काही भाग व्यापुन काही जाहिराती येतात.
३. कधी कधी पडदा छोटा करुन डाव्या बाजुची उभी पट्टी आणि खालच्या बाजुची आडवी पट्टी या जागेत जाहिराती येतात
४. भरीस भर म्हणुन पडद्याच्या उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यामधे एखादी छोटीशी लुकलुकती प्रतिमा असते जी अचानक खाली किंवा मध्यभागी येउन मोठी होते आणी जाहिरात झळकु लागते.
अर्थात खासगी चित्रवाणी म्हंटले की जाहिराती असणारच हे मान्य. त्यातुनच त्यांना उत्पन्न मिळते आणि त्यातुनच मालिका बनतात हेही मान्य. पण गेल्या काही वर्षांत त्यांचेही उत्पन्न काही पटींनी वाढले आहे. प्रेक्षक-ग्राहक म्हणुन आपल्याला काही हक्क आहेत की नाही ? जेंव्हा मी ही सेवा घेतली तेंव्हा काही मिनीटे तरी अखंड कार्यक्रम पाहाण्याचा निखळ आनंद मिळत होता. आज पडद्याच्या सगळ्या भागांवर जाहिरातींची आक्रमण होऊ लागलेले आहे. कधी कधी तर पडद्याच्या कोणत्या भागात आपल्याला हवा असलेला कार्यक्रम चालु आहे हे बारकाईने पहावे लागते.
आपण पैसे देऊन या सेवा घेत असतो. तेंव्हा मला कार्यक्रमाच्या इतके टक्के भाग जाहिरातींविना शांतपणे पहाता आला पाहिजे अशी मागणी आपण करु शकतो का ? हे च्यानेलांना बंधन कारक ठरु शकत नाही का? आज सरकारी सेवांना सुद्धा सेवा-हमी कायदा लागु होत आहे तेंव्हा या बद्दल आपण प्रेक्षकांनी जागरुक व्हायला नको का ? च्यानेलांनी या बद्दल काही हमी द्यायला हवी की नको ? की सगला मामला ’ हा आमचा धंदा आहे, आम्ही काही आमची सेवा घेण्य़ासाठी जबरदस्ती केलेली नव्हती. बघायचं असेल तर बघा नाहीतर आपला संच बंद करुन हरी पाठ म्हणत बसा ’ असा आहे ?
या संदर्भातील कायदेशीर जाणकार या बद्दल काही प्रकाश टाकु शकतील का ?
वर्गीकरण
वाचने
6855
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे. एकतर जाहिराती
इंटरनेट हाच यावर सर्वोत्तम
रोडीज??/ इतका भिकार कार्यक्रम
In reply to इंटरनेट हाच यावर सर्वोत्तम by द-बाहुबली
मला रोडीज आवडतो. पण रघु
In reply to रोडीज??/ इतका भिकार कार्यक्रम by टवाळ कार्टा
जेव्हा जाहिरातींचा परिणाम
टीव्हीच कशाला?
यावर बेस्ट उपाय म्हणजे आपले
+१११ सहमत
In reply to यावर बेस्ट उपाय म्हणजे आपले by पद्मावति
आमच्या घरात टी.व्ही.चा उपयोग हा फक्त
मला लई आवडतेत झैराती बघायला.
जाहिराती बघायला आवडतात पण
+१
In reply to जाहिराती बघायला आवडतात पण by शि बि आय
हे तर काहीचं नाही. मी आधी
In reply to जाहिराती बघायला आवडतात पण by शि बि आय
ये तो बडा टाईट है !! आठवतंय
In reply to हे तर काहीचं नाही. मी आधी by कॅप्टन जॅक स्पॅरो
ये तो बडा टॉइङ्ग है !!
In reply to ये तो बडा टाईट है !! आठवतंय by खटपट्या
टॉइंग टॉईंग
In reply to ये तो बडा टाईट है !! आठवतंय by खटपट्या
रोफलले मी प्रतिसाद वाचुन.
In reply to हे तर काहीचं नाही. मी आधी by कॅप्टन जॅक स्पॅरो
मुददा तो नाही---- 'प्रश्न तत्वाचा आहे'
मराठी जाहिराती
बाकी जाऊ देत, पण दररोज खिचडी?
तुंम्हास नाही कळणार
In reply to बाकी जाऊ देत, पण दररोज खिचडी? by अनामिक
मग आता
In reply to तुंम्हास नाही कळणार by सामान्यनागरिक
मुविंसारखेच म्हणते. आमच्याकडे
हम्म...
चालू कार्यक्रमात कोणत्याही