तत्वज्ञान हा माझा अभ्यासाचा विषय नाही पण ते आपल्या पर्यंत या ना त्या मार्गाने येऊन पोहोचते, जी काही अल्प माहिती मिळते आणि स्वल्प समजते त्याच्या धाग्यावर पतंग कितीही उडवला तरी उडेल का नाही आणि उडाला तर त्याची दिशा चुकलेली नसेल याची कोणतीच ग्यारंटी नाही :) तरी सुद्धा मिपाकरांच्या धर्मास जागून पतंग उडवण्याची ही हौस भागवून घेत आहे (चुभूदेघे).
भारतीय दर्शनशास्त्रात अद्वैत दर्शन हे सर्वात सुपरिचीत आहे. ते मला जिथ पर्यंत समजले त्यात हवेत उडणारे पतंग कितीही (अनेक) दिसले तरी त्यांचा सूत्रधार एकच आहे. (याला मिथ्यावादात जरा अजून ताणले जाते तुम्हाला वेगवेगळे पंतग उडताना दिसतात तो केवळ एक आभास आहे.) पण मुख्य म्हणजे दोन अथवा अनेक असे काही नसतेच सगळे एकच आहे (मग परमतत्व आणि परमेश्वर जो तो आपापल्या पद्धतीने सांगतो).
मानवी इंद्रीयांना बहुतांश गोष्टी अनेक दिसत असताना, निसर्गतः दिसणारी विवीधता नाकारणे आणि जे दिसत नाही (परमतत्व) तेच सत्य आहे म्हणून सांगणे म्हणजे अद्वैत. 'अनेक नाही' हे म्हणताना अनेक हा शब्द आधी येतो तसा 'अद्वैत' शब्दोच्चार द्वैताच्या उच्चारा शिवाय जमतच नाही, त्यामुळे अद्वैत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळी द्वैताचा आधार घ्यावाच लागतो. त्यामुळे अद्वैती पंडितांच्या टिकेच सगळ्यात मोठ लक्ष म्हणजे द्वैत तत्वज्ञान. त्यामुळे द्वैत तत्वज्ञानाची माहिती द्वैत तत्वज्ञानाच्या समर्थकापेक्षा टिकाकारांकडूनच अधिक मिळते. कदाचित त्याच्या काळाच्या ओघात अद्वैत दर्शनाच्या पुरस्कर्त्यांची संख्या अधिक राहिली असावी.
अद्वैत तत्वज्ञानाच्या उलट द्वैत तत्वज्ञान मानवी इंद्रीयांना दिसणारी निसर्गातील विवीधता सहज पणे स्विकारेल आणि जे सहजपणे दिसत नाही त्या बद्दल प्रश्नचिन्ह उभे करेल म्हणजे निसर्गातील विवीधता ही परमेश्वरावर पुर्णतया अवलंबून असणार नाही. मग हि निसर्गातील विवीधता येते कुठून तर द्वैत तत्वज्ञानात याचा उल्लेख पुरुष आणि प्रकृती असा येतो. (द्वैत तवज्ञानात प्रकृती एकच असते/असावी असे का ते मला ठाउक नाही, दुसरे द्वैतातील प्रकृती आणि पुरुष या संकल्पना मानव अथवा सजीवांपर्यंत मर्यादीत नसाव्यात चुभूदेघे) पण पुरुष अनेक म्हणजे अनेक (वेगवेगळ्या) गुणांनी बनलेले असतात आणि पुढच्या पिढीकडे आपले गुण सुपूर्त करत जातात. प्रकृती हे गूण पुढच्या पिढीकडे जातानाचे केवळ माध्यम आहे. या द्वैत तत्वज्ञानाचे अधिक वाचन केले तर ते आध्यात्माची बरीचची क्लिष्ट वळणे घेत असावे अथवा द्वैत तत्वज्ञानावर येन केन प्रकारेण खोडून काढण्यात रस असलेल्या अद्वैतींकडून त्याचे क्लिष्टता विरहीत सादरीकरण व्हावे हि आपली अपेक्षाही कदाचित चुकत असेल.
हे द्वैत तत्वज्ञान आपल्या परीने सोपेकरून घेण्याचा मार्ग म्हणजे निसर्गातील घटकांना, सजीवांच्या प्रजातींना, मानवांतील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे गूण आणि स्वभाव वैशीष्ट्ये (बाय-बर्थ) आहेत जी पुढील पिढीकडे जात राहतात. एखादे मुल अगदी लहाणपणापासून धडपडा स्वभाव दर्शवते कारण त्याचे वडील धडपडे असतात, एखादे मुल लहानपणा पासून शांतस्वभावी निघेल कारण त्यांचे वडील शांतस्वभावी असतात. आजच्या काळात आपण जाणतो की गुणसूत्रांवर जीन्सवर काही गोष्टी अवलंबून असू शकतात ज्या पुढील पिढीकडे जातात, आताच्या काळात गुणसुत्रे वडील आणि आई दोघांकडूनही येत असतात (आणि एकापेक्षा अधिक पिढ्यांकडून येत असणार) म्हणजे केवळ वडीलांवर अवलंबून नसतात हे आपण जाणतो पण द्वैत तत्वज्ञान मांडताना तत्वज्ञान मांडणार्याची पुरुष प्रधानता असेल का, की जी पुरुषांनाच (इमिडीएट बायलॉजीकल फादर) फक्त गुणांची वाहक समजत होती (आणि प्रत्यक्षात गुणसुत्रे आईकडूनपण येत असणार पण यातून द्वैतींपुढे तत्वज्ञान मांडण्यात वेगळीच अडचण येत असणार), द्वैती तत्वज्ञाना समोरची दुसरी अडचण मानवी स्वभाव आणि गूण अंशतः त्याच्या सभोवतालच्या सांस्कृतीच्या अनुभवांच्या परिणामातूनही येत असणार आणि एखाद्या मुलाचे वैशीष्ट्य जन्मजातपणे पित्याकडून आले आहे अथवा नाही आहे हे वास्तवात सांगणे कठीण आणि मुलाचे गुण पित्यावर गेले आहेत असे दाखवता नाही आले तर द्वैत तत्वज्ञानाची गफलत होऊ लागते.
जेव्हा गफलत होते सिद्ध करता येत नाही तेव्हा कपोलकल्पित आधार शोधावा लागतो. पौराणिक कथांमध्ये एक कथा येते ती विश्वामित्र, जमदग्नी आणि परशुरामाच्या जन्माशी निगडीत आहे. एक 'गाधी' नावाचा क्षत्रिय राजा आणि त्याचा ब्राह्मण जावई ऋषि 'ऋचिका' यांना जेव्हा मुले व्हावयास हवीत ती गाधी राजाचा मुलगा क्षत्रीय स्वभावाचाच झाला पाहीजे आणि ऋचिकांच्या वंशातले पुढचे सर्वजण ऋषि स्वभावाचे क्षत्रियत्वाचे गुण नसलेलेच व्हावयास हवेत पण प्रत्यक्षात उलटे घडते की गाधींचा मुलगा विश्वामित्र ऋषि स्वभावी होतो आणि ऋचिकांच्या वंशात त्यांचा नातू परशुराम क्षत्रिय स्वभावी होतो.
जसे गौतम बुद्धांच्या बाबतीत वडील राजा असून गौतम बुद्धांनी विरक्ती घेतली हा गौतम बुद्ध या व्यक्ती विशेषास मिळालेल्या निव्वळ बाह्य वातावरणाचा अथवा अनुभवाचा संबंध असू शकतो, क्षत्रिय पित्याचा मुलगा म्हणजे तो योद्धाच झाला पाहीजे असे नाही. तसेच विश्वामित्रानेही योद्धाच राहीले पाहिजे असे नाही. पण इथे (आधूनिक विज्ञान विश्लेषणासाठी पाठीशी नसलेल्या) द्वैतींची अडचण होते मग विश्वामित्र, जमदग्नी आणि परशुरामाच्या जन्माशी निगडीत पौराणिक कथेची रचना कशी होते पहा की गाधींना मुलगा नव्हता, त्यामुळे आपल्या सासूला क्षत्रिय स्वभावाचा मुलगा व्हावा आणि आपल्या बायकोला तपस्वी स्वभावाचा मुलगा व्हावा म्हणून ऋचिकांनी क्षत्रिय स्वभाव देणारे एक पेय आणि तपस्वी स्वभाव देणारे पेय अशी दोन पेये बनवली. पण त्यांच्या बायकोच्या अनवधानाने या पेयांची अदलाबदली झाली बायकोसाठी बनवलेले तपस्वी स्वभाववाले पेय सासूच्या वाटेला गेले आणि म्हणून विश्वामित्र तपस्वी स्वभावाचे झाले. आणि क्षत्रिय स्वभावाचे पेय ऋचिकांच्या पत्नीने पिले म्हणुन त्यांच्या घराण्यातील नंतरच्या पिढीतील परशुराम हा क्षत्रिय स्वभावाचा झाला. वस्तुतः विश्वामित्रांचे तपस्वी होणे असो अथवा परशुरामाचे युद्धकरणे असो हे परिस्थितीवशात आलेले गुण असू शकतात अथवा मागच्या पिढीकडून अगदी आईकडून आलेले ही गूण असू शकतात या दोन शक्यता मुलगा हा वडीलांसारखाच झाला पाहीजे हि अट पूर्ण करण्यास पुरे ठरत नाहीत मग अशा कथांची रचना होत असावी का ? (अर्थात उपरोक्त कथेत द्वैत तवज्ञानाचा कुठे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष उल्लेख होताना दिसत नाही.)
मात्र पौराणिक कथांनुसार द्वैत (सांख्य) तत्वज्ञानाची प्रथम मांडणी कर्दमपूत्र कपिल मुनींनी केली योगायोग असा की अत्री ऋषिंची पत्नी देवी अनसुया ही कर्दमांची मुलगी म्हणजे कपिल मुनींची बहीण जिला विष्णू , ब्रह्मा महेशांच्या आशिर्वादाने तीन अवतारी पुत्र होतात त्यातील विष्णूचा अवतार असलेले दत्त हे विरक्त स्वभावी बनतात, ब्रह्माचा अवतार असलेले सोम तर महेशाचा अवतार असलेले महर्षि दुर्वास उग्र स्वभावी होतात. सांख्य तत्वज्ञ कपिल मुनी मामा असलेले दुर्वास कुंतीस जाऊन पुत्रप्राप्तीच्या संबंधाने वर देतात त्या त्या वर दात्या इश्वराच्या स्वभावाची उपलब्धता असलेली पुत्रप्राप्ती कुंतीस होते. कुंतीकडून तीच्या मुलांना द्रौपदीस पत्नी करून घेण्याच्या संबंधाने आज्ञा होते. आणि गीतेच्या 10.26 श्लोकात मीच कपिल मुनी आहे हे वेगळ्या संदर्भाने असेल पण श्रीकृष्ण सांगताना दिसतात. हा सर्व योगा योग या कथा मध्ये योगा योगानेच आला असू शकतो.
(मी व्यक्तीशः पौराणिक कथांना वास्तव इतिहास मानत नाही आणि तसा इतिहास शोधणे या धाग्याचा उद्देश नाही. सांख्य तत्वज्ञानही कथांच्या माध्यमातून पोहोचवले गेले असण्याची शक्यता अभ्यासणे अजून काही पौराणिक कथा आहेत का की ज्यात सांख्य तत्वज्ञान आसपास असण्याची शक्यता असू शकेल ? हा धाग्याचा उद्देश आहे. तपशिलात कुठे चूक झाल्यास जाणकारांनी निदर्शनास आणावे मी दुरुस्त करेन. चुभू देघे)
वाचने
9614
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या माहितीनुसार अनेक पुरुष
नाही भाऊ, पुरूष असंख्य तर
In reply to माझ्या माहितीनुसार अनेक पुरुष by आनन्दा
बरोबर, पुरुष ह्या शब्दाच्या
In reply to नाही भाऊ, पुरूष असंख्य तर by जडभरत
या लेखात अद्वैतवादाला
या दोन विभूतींवर तरी कुणी
In reply to या लेखात अद्वैतवादाला by जडभरत
या लेखात अद्वैतवादाला
In reply to या लेखात अद्वैतवादाला by जडभरत
काही शंका
In reply to या लेखात अद्वैतवादाला by जडभरत
हा तुमचा मुद्दा बरोबर आहे.
In reply to काही शंका by माहितगार
सांख्य तत्वज्ञान कधीच कालबाह्य होणार नाही. :-)
In reply to या लेखात अद्वैतवादाला by जडभरत
मानवी इंद्रीयांना बहुतांश
करा भरतभाऊ. तुम्ही एकटेच १००
In reply to मानवी इंद्रीयांना बहुतांश by जडभरत
अद्वैतींच असंच असत :) (ह.
In reply to करा भरतभाऊ. तुम्ही एकटेच १०० by सदस्यनाम
जड म्हणत म्हणत तुम्ही लैच वर
In reply to करा भरतभाऊ. तुम्ही एकटेच १०० by सदस्यनाम
:)
In reply to जड म्हणत म्हणत तुम्ही लैच वर by आनन्दा
पाडस वगैरे नाव घ्यायला हरकत
In reply to जड म्हणत म्हणत तुम्ही लैच वर by आनन्दा
निसर्गतः दिसणारी विवीधता
पुरुष म्हणजे ब्रम्ह हे
In reply to निसर्गतः दिसणारी विवीधता by तुडतुडी
'पुरुष = गुणरहित ब्रह्म'
आपण मांडता आहात ती अद्वैती
In reply to 'पुरुष = गुणरहित ब्रह्म' by तुडतुडी
पुरात राहणारा तो पुरूष
थोडी माहिती
प्रथम कोणतेच तत्वज्ञान माणुस
In reply to थोडी माहिती by शरद
आमचा पतंग उडेल का याची शंका
In reply to थोडी माहिती by शरद
सांख्य तत्वज्ञान आणि पौराणीक
:):)
In reply to सांख्य तत्वज्ञान आणि पौराणीक by प्रसाद गोडबोले
सोपा अर्थ
करेक्ट !!
In reply to सोपा अर्थ by शरद
त्यामुळे पुरुष = गुणरहित