✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाऊस आणि 'ती'

श — शब्दानुज, Tue, 07/21/2015 - 22:58
रिमझिमणार्या पावसाने मला कुशीत घ्यावे माझे अस्तित्वही त्या क्षणी हरपावे अोघळणार्या थेंबाच्या प्रतिबिंबात तुला पहावे पाहुन मला तू खुदकद गालात हसावे हरपलेले अस्तित्व मला पुन्हा गवसावे तुझ्या हातांनी पावसाचे थेंब अडवावे वेगवान वारयाने पार्श्वसंगित द्यावे अचानक तुझा हातांना लकवे भरावे हातातुन निसटून तू उडुन जावे हाती फक्त तुझे हॅंडल रहावे गाडीने चिखलाचे चित्र कपड्यांवर काढावे रिमझिमणार्या पावसाने मला कुशीत घ्यावे..

प्रतिक्रिया द्या
2454 वाचन

💬 प्रतिसाद (13)

हायला!

पैसा
Wed, 07/22/2015 - 12:23 नवीन
मला वाटलं रोम्यांटिक लिहिताय काय! जल्लां, छत्री दुरुस्त करून घ्या लौकर.
  • Log in or register to post comments

सेम टू सेम...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/24/2015 - 09:54 नवीन
>>>> मला वाटलं रोम्यांटिक लिहिताय काय! मलाही तसंच वाटलं. शीर्षक पाऊस आणि ती म्हटल्यावर काय काय चित्र रेखाटून टाकलं होतं आम्ही मनोमन. आणि इथं तर साचलेल्या पाण्यातून गाडी गेल्यावर स्वच्छ कपड्यावर गढुळ पाण्याचे शिंतोडे उडाल्यासारखं वाटलं. असो, वाचकांच्या भावनेशी कवीला काय घेणं देणं नसतं म्हणुन सोडून देऊ. लिहित राहा. कविता बरी वाटली. :) चाँद चेहरा, जुल्फ दरया, बात खुशबु, दिल चमन इक तुम्हे दे कर खुदा ने दे दिया क्या क्या मुझे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

इथं लय कच्चा माल हय.

रातराणी
गुरुवार, 07/23/2015 - 19:34 नवीन
इथं लय कच्चा माल हय. टकोजीराव इथे तुमची गरज आहे.
  • Log in or register to post comments

खिक्क...म्हैतै...वाखू

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/23/2015 - 19:43 नवीन
खिक्क...म्हैतै...वाखू साठवलेली आहे ;) बाकी तुम्ची नजरसुध्धा "तयार" झाली म्हणायची =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

हॅ हॅ हॅ

रातराणी
गुरुवार, 07/23/2015 - 19:59 नवीन
हॅ हॅ हॅ धवल्याशेजारी बांधला पवला : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

रातराणी हा डुआयडी असावा असा

दमामि
Fri, 07/24/2015 - 12:36 नवीन
रातराणी हा डुआयडी असावा असा माझा दाट्ट संशय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

कुणाचा हो?

रातराणी
Sat, 07/25/2015 - 11:51 नवीन
कुणाचा हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

वळणांवळणांवरती

दमामि
Sun, 07/26/2015 - 14:42 नवीन
वळणांवळणांवरती तव आठवणींची भरती .....:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

एक्सप्लेन. असलं काही समजत

रातराणी
Mon, 07/27/2015 - 12:23 नवीन
एक्सप्लेन. असलं काही समजत नाही. ( आता तरी पटल का मी दु आय डी नाही.) : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

??

शब्दानुज
गुरुवार, 07/23/2015 - 22:48 नवीन
यातुन आम्ही कच्चे आहोत ( जे आम्हासही ठाऊक आहे ) असे सांगायचे आहे की हे रॉ मटेरीयल आहे हे सांगायचे आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

@हातातुन निसटून तू उडुन जावे>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/23/2015 - 22:29 नवीन
@हातातुन निसटून तू उडुन जावे>> खिक्क! :-D
  • Log in or register to post comments

खूप छान. रोमँटीक वाटणार्या

जडभरत
Fri, 07/24/2015 - 08:22 नवीन
खूप छान. रोमँटीक वाटणार्या कवितेला चांगलंच विनोदी वळण दिलंय.
  • Log in or register to post comments

झक्कास

एक एकटा एकटाच
Sun, 07/26/2015 - 00:52 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा