काही दिवसापूर्वी सागरिका घोष नामक पत्रकार महिलेने असे ट्वीट केले होते की, “पत्रकारांनी देशभक्त असावेच, असा काही नियम नाही “. या बाई व अन्य अनेक तथाकथित “ धर्मनिरपेक्ष सेक्युलर इत्यादि इत्यादि “ पत्रकार व मीडिया मुघल्स यांचीदेखील विचारसरणी व वर्तन पाहता ह्या मंडळींना भारतीय म्हणावे का? व ही मंडळी नक्की भारताच्या भल्यासाठी काम करत असावेत की परकीय अथवा देशविघातक शक्तींच्या अजेंड्याचे समर्थन करण्यासाठी? असा प्रश्न पडतो!
भाजपाप्रणीत केंद्र सरकार अन विविध राज्यातील भाजप सरकारे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पराकोटीचा द्वेष करत सतत कुठलीतरी खुसपटे काढून त्रास देण्याचा प्रयत्न करणे , संघपरिवार आणि अन्य उजव्या विचारांच्या संस्थांना बदनाम करण्याची कारस्थाने करणे , मीडियातून सरकार भ्रष्ट आणि निष्क्रिय असल्याचे खोटे चित्र सतत उभे करणे असे अनेक उद्योग ही मंडळी करत असतातच ,पण भारतीय सैन्यदल आणि प्रशासनातील प्रामाणिक अधिकारी यांच्यावरही यां मंडळींचा डोळा असतो . यांना पैशाचा पुरवठा नक्की कुठून होतो? देशविघातक शक्ती तर अशा मीडिया हाऊसेस ना अप्रत्यक्ष रीत्या कंट्रोल करत नाहीत ना? असा दाट संशय येतो.
असा प्रकार यापूर्वी कथित “पर्यावरणारक्षक” एनजीओज बद्दल झालेला आहे . जगातील भारतद्वेष्ट्या संस्था आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीस खीळ घालू पाहणार्यान मंडळींनी अशा “पर्यावरणारक्षक” एनजीओज ना छुपे फंडिंग करत पर्यावरणाचे बाहुले उभे करून उद्योगधंद्याना व विशेषत: पॉवर प्रोजेक्टस ना अडचणी आणल्या होत्या . तसाच प्रकार मीडिया च्या बाबतीत होत आहे का ? दुसर्या एका धाग्यात उल्लेख केल्यानुसार आज किंवा उद्या प्रत्यक्ष युद्ध झाले ,तर मीडिया ची भूमिका नक्की काय असेल ? व त्याचे काय भीषण परिणाम होऊ शकतात ? अशा अनेक शन्का मनात दाटून आल्या .कारण आजकाल “मीडिया म्हणजे उपाय कमी अन अपाय जास्त” अशी स्थिती सध्या दिसत आहे . म्हणून हा लेखनप्रपंच!
जाणकारांनी आपली मते अवश्य मांडावीत !
वाचने
4276
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरा मुद्दा
धाग्याबद्दल बोलायचे झाल्यास,
सागरिका घोष
फाट्यावर मारायचं
पटलं ! गुगल न्युज वाचत जायचं
In reply to फाट्यावर मारायचं by पुण्याचे वटवाघूळ
चोप्य पस्ते
मीडियाची जागरूकता" आणि \
In reply to चोप्य पस्ते by नितिन थत्ते
मिडिया
मिडिया चे कामच असं आहे
तीन वास्तव तत्वे
बोका-ए-आझम,
In reply to तीन वास्तव तत्वे by बोका-ए-आझम
Bias by Bernard Goldberg
किती हे वैचारिक साधर्म्य
मग काय ठरले तुमचे?