हो हे चांगले आहे. एकदा मी बराच भांडूनही बूथ वरचा अधिकारी मला फॉर्म देइना. शेवटी मला एक अपक्षाला मत द्यावे लागले.
त्यामुळे असे थेट बटण असावे. नाहीतर फॉर्म मागितला की आपले "नो वोट" हे वोट उघड होते.
http://kalekapil.blogspot.com/
हर्षद, तुमची तळमळ खरी आहे आणि इच्छा चांगलीच आहे. पण ही माहिती खरी नाही.
इलेक्शन कमिशन च्या वेबसाइटवर पहा - http://www.eci.gov.in/PROPOSED_ELECTORAL_REFORMS.pdf
त्यांनी ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्यात निगेटिव्ह / न्युट्रल वोटिंग यात ४९ -ओ आहे.
अजून हा कायदा अस्तित्वात नाही आणि पुन्हा मतदानाचे कलम अजिबात नाही.
सध्याच्या परिस्थिती मुळे आणि राजकारणाबद्दल जो उद्द्वेग आला आहे लोकांच्या मनात त्यामुळे हा इ मेल तुफान लोकप्रिय आहे.
गेल्या ८-१० दिवसात किमान ७-८ वेळा आला आहे. पण याची सत्यासत्यता पडताळून पाहिली पाहिजे.
कपिल यांनी मांडलेलं मतच आयोगाने सुधारणा सुचवताना मांडलं आहे की फॉर्म मागितल्याने मतदानाची गुप्तता राखली जात नाही. त्यासाठी निगेटिव्ह / न्युट्रल वोटिंग चा एक पर्याय आणि तसं बटण असायला हवं.
प्रतिक्रिया
थेट बटण असावे
बरं झालं
ही माहिती बरोबर नाही.