Skip to main content

IIT आणि USA

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 14/07/2015 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आयआयटी मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच 100 ते 250 कोटी प्रतिवर्ष पगार देणार्‍या अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 10 ते 20 कोटी प्रतिवर्ष पगाराचे जॉब अमेरिकेत ऑफर होतात . किंबहुना आयआयटी करनारांचे उद्दीष्ट अमेरिकेत सेटल होणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला? मला वाटते आयआयटी मध्ये प्रवेश देतानाच अमेरिकेत जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 कोटी रुपये आयआयटी ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\ आपले काय म्हणणे ? मंडळी ?

वाचने 24597
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

अगदी १ ते १.५ कोटी 'प्रति वर्ष' तेही फ्रेशरसाठी असलं तर पुन्हा अभ्यासाचा विचार करायला काय हरकत आहे? ;)

ITI आणि UAE आजकाल आयटीआय मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच 20 ते 25 लाख प्रतिवर्ष पगार देणार्‍या आखातातील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 8 ते 10 लाख प्रतिवर्ष पगाराचे जॉब आखातात ऑफर होतात . किंबहुना आयटीआय करनारांचे उद्दीष्ट आखातात जाणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला? मला वाटते आयटीआय मध्ये प्रवेश देतानाच आखातात जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 लाख रुपये आयटीआय ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\ आपले काय म्हणणे ? मंडळी ? ह. घ्या हो धागाकर्ते! :)

योग्य मुद्दा आहे रे मंदारा. जोडीला एफ.टी.टी.आयला ही घे.ह्यांच्यावरही खूप खर्च होतो असे नुकतेच वाचले.त्या मुन्नाभाईवाल्या राजकुमार हिरानीकडून(तो एफ टी टी आय वाला आहे) ३/४ कोटी वसूल करावेत असे ह्यांचे म्हणणे.

योग्य मुद्दा आहे रे मंदारा. जोडीला एफ.टी.आय.आयला ही घे.ह्यांच्यावरही खूप खर्च होतो असे नुकतेच वाचले.त्या मुन्नाभाईवाल्या राजकुमार हिरानीकडून(तो एफ टी टी आय वाला आहे) ३/४ कोटी वसूल करावेत असे ह्यांचे म्हणणे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सगळ्या सदस्यांना एक प्रश्न आहे - मिसळपावचे किती सदस्य आहेत? जर तुमचं उत्तर - "मिसळपाव च्या डेटाबेस मधे आहेत तितके" असे असेल तर ते चूक आहे. . . . एक सदस्य तुम्ही कमी मोजताय ... . . . 'हे' :) माईंनी आयडी बदलून "माईसाहेब हे कुरसूंदीकर" केला तर नव्या सदस्यांना "हे" म्हणजे कोण अशी शंका येणार नाही.

सध्या जे परदेशी आहेत त्यांचा काय म्हणणे आहे ते वाचू या . कारण माध्यमिक शाळा या अनुदानित असतात आणि त्यावर सरकारने पैसे खर्च केले आहेत . आय आय टी प्रमाणेच परदेशस्थांकडून खर्च वसूल करवा काय ?

हं... मुद्दा बरोबर आहे.. म्हणजे नक्की सरकारने का गुणवंत विद्यार्थ्यांवर पैसा खर्च करावा जर पुढे जाउन ते इथे काम करणारच नसतील? ह्यात सरकारचा काय फायदा? ह्यापेक्षा सरकारी शाळांसाठी हा पैसा वापरता येईल ना?

करदात्यांचा जेवढा पैसा एक विद्यार्थी वापरतो त्याच्या कितीतरी पट पैसा तोच विद्यार्थी जर बाहेर स्थिरस्थावर झाला तर भारतात (प्रत्यक्षपक्ष) पाठवतो..

करदात्याचा जेवढा पैसा एक विद्यार्थी वापरतो त्याच्या शंभर, हजार पटीने करदात्याचा पैसा एक राजकारणी वापरतो, त्याच्याकडून वसूल करण्याची हिंमत आहे का तुमची ?

परदेशात नोकरी करणारे लोक आपला पैसा भारतातच परत आणत असतील तर त्यावर नाममात्र कर आकारला जातो कारण हे पैसे परकीय चलणच्य स्वरूपात आपल्याच गंगाजळी मधे जमा होत असतात. त्यामुळे सरकारने त्यांना ही सवलत दीली आहे.

आय आय टी चे सगळेच विद्यार्थी अमेरिकेत अथवा परदेशात गलेलठ्ठ पगारावर जातात काय? हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या डिस्टींशन वाल्यांना अशी संधी मिळते. फी मधुन पैसे वसुल करणे हे अन्यायकारक होईल. पण सरकारचा पहीली ते अगदी पदवी पर्यंत एका विद्यार्थ्यावरचा खर्च लक्षात घेता माझ्या मते पदवी मिळवल्यानंतर पहिली काही, निदान कमितकमी दोन वर्षे तरी भारतातच काम करणे बंधनकारक करावे. म्हणजे त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा थोडा तरी उपयोग देशाला होईल. जसे मेडीकलच्या विद्यार्थ्यांना काही काळ ग्रामीण भागात अॅपरंट्सशीप करणे बंधनकारक असते.

अतिशय बिनडोक धागा आहे. इन्सेण्टिव्ह आणि अ‍ॅसेट क्रिएशन कशाशी खातात हे माहिती नसलेला.

In reply to by बॅटमॅन

:)))
इन्सेण्टिव्ह आणि अ‍ॅसेट क्रिएशन कशाशी खातात
संबंध आहे हे मान्य, पण हे कशाशी खातात याचा धागा काढण्यासंदर्भात इथे तितकासा संबंध वाटत नै.. धागाकर्त्याच्या बाजूने डेविल्स अ‍ॅडवोकसी करायची झाली तर हेच म्हणणे असेही मांडता येईल की, भारतीय अनुदानित संस्थांमधून पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या भारतीय नागरिकास शिक्षण पूर्ण झाल्यावर "भारतात किमान २ वर्षे योगदान अथवा २ वर्षात अनुदानित शिक्षणाची फी परत करावी" असा पर्याय असावा. . (पदवी-पूर्व शिक्षण सरकारची जबाबदारी म्हणून इथे गृहित आहे. त्यास तूर्तास बाजूस ठेवू हवेतर)

In reply to by अस्वस्थामा

हा मुद्दा "नॉट ईव्हन राँग" अशा क्याटेगरीत असल्याने तूर्त तरी दुर्लक्ष करण्यात येत आहे.

In reply to by बॅटमॅन

तूर्त तरी दुर्लक्ष करण्यात येत आहे
हे का हो ? म्हणजे कळले नाही. "नॉट ईव्हन राँग" म्हणून दुर्लक्ष म्हणजे मुद्दा गृहित धरण्यालायक नाही असा अर्थ आहे काय?

निम्मे सोफ्टवेयर वाले आयआयटी मध्ये होते का हो? त्यातले कुठून कुठून शिकून बाहेर जाता आहेत मग तुमचा आयआयटी वाल्यांवर का हो राग?माझ्या माहितीत २ मायक्रोबायलोजी आणि १ फार्मसीवाला पण बाहेर गेलाय. आता लोकांना इथे चांगले कॉलेज मिळत नाही म्हणून लोक १२वि नंतर बाहेर जायला लागले आहे. ह्यावर काय एक धागा काढा बघू

१२ पास बाहेर गेलेले घरी पैसा पाठवितात. परीकीय चलनात यांचा वाट सर्वात मोठा आहे. उच्च शिक्षित त्यांच्या घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे ते पैसा पाठवीत नाही. बाहेर जाणार्या उच्च शिक्षित लोकांकडून १२% व्याजसकट पैसा वसूल करण्यात काही ही वागवे नाही.

शासकीय अभियांत्रिकी किंवा फ्रिसिटवर पास झालेले पण अमेरीका किवा इतर देशात जातात तेंव्हा नियम त्यांनाही लागू करायला हवा. बरेच आयआयटीवाले नंतर भारतात परत येतात. काही आयआयटीच्या लोकांनी अमेरीकेत जाउन स्वतःचे उद्योग काढले मग त्याची शाखा भारतात काढली. कन्वल रेखी, विनोद खोसला या लोकांनी भारतात बरीच गुंतवुणुक केली. कदाचित सरसकटीकरण होइल पण आयआयटीचे जी मुले बाहेर जातात ती काही दिवसात बऱ्याचदा उच्च पदावर पोहचतात त्यामुळे ते मोठ्या निर्णायांवर प्रभाव पाडू शकतात. ही गोष्ट इतर कॉलेजातल्या विद्यार्थांबाबत घडत नाही. अवांतर आयआयटीवाले भारतात राहीले तर मिडीयाला रोज एक बातमी देउ शकतात हे दिल्लीत दिसले.

लष्करात वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यावर त्यात सेवा करणे सक्तीचे असते अधिकार माहिती डॉ खरे सांगतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ग्रामीण भारत सेवा देणे सक्तीचे आहे तर आय आय टी वाल्यांचे लाड का नेहरूंनी ज्या उद्देशाने आय आय टी स्थापन केली त्या उद्देशाला हरताळ फासला जातो , लोकशाहीत विद्यार्थ्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे पण आय आय टी च्य प्रवेश परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात त्यात काही मोजके मर्यादित जाग असल्याने आय आय टी मध्ये प्रवेश घेतात उरलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक गुणी हुशार मुले असतात त्यांना जागेअभावी प्रवेश मिळत नाही. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना भारतात राहून देशासाठी आहे त्या परिस्थितीत काही करण्याची इच्छा आहे अश्या उमेदवारांना प्राधान्य देण्यास काय हरकत आहे म्हणजे यु पी एस सी सारखी तोंडी परीक्षा घेऊन उमेदवाराच्या हुशारी सोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुद्धा कस लागेल अनेक गुणी मुलांना डावलून एक गुणी मुलगा आय आय टी मध्ये प्रवेश घेतो व परदेशी उडून जातो तेव्हा उरलेल्या गुणी मुलांच्या मधून एखादा देशात राहून देशासाठी काहीतरी करण्यासाठी प्रेरित मुलांना आय आय टी मध्ये प्राधान्य का मिळू नये त्याने गुणवत्तेत तडजोड होणार नाही किंवा आय आय टी अ सरकारी अनुदाने बंद करा हा ही एक उपाय आहे

In reply to by निनाद मुक्काम …

फक्त IIT का ? मग असा नियम करूया ना कि कोणताही विद्यार्थी जो सरकारी संस्थेत शिकला तो बाहेर कधीच नोकरी करायला जाऊ शकणार नाही. होईल तुमचे समाधान ? आणि IIT मध्ये तोंडी परीक्षा, व्यक्तिमत्व चाचणी घेण्याची कल्पना तर अफलातून . हे पोचतील का हो तिकडे मग ? रोजगार मजुराची मुले ? ज्ञानी लोकांनी एकदम MBA style चकचकीत असलेच पाहिजे IIT मध्ये जायचे असेल तर असा नियमच करून टाकू. नाहीतर तुमच्या ज्ञाना ला इकडे काही किंमत मिळणार नाही हे ठाम पाने आपण सांगून टाकू.

In reply to by अभिजित - १

हे पोचतील का हो तिकडे मग ? रोजगार मजुराची मुले ? धोनीच्या एका मुलाखतीची आठवण झाली त्यात तो म्हणाला की छोट्या शहरातील लोकांना आपले लक्ष्य गाठण्यासाठी बालपणापासून संघर्ष करतात म्हणूनच ते शहरी मुलांच्या पेक्ष्या मानसिक दृष्ट्या सक्षम असतात.. श्रीरंग ची कल्पना आवडली

अंदाजे १०,००० सीट्स IIT मध्ये असतात. त्यातले किती मुले नोकरी करता बाहेर जातात ? २० टक्के / २५ टक्के ? किती ? चला २० टक्के पकडू. म्हणजे २००० लोकांनी भारत मातेला आपली सेवा देण्या पेक्षा Sam Uncle आपला मानला. अरे काय वाईट आहे याच्यात ? असे समजा ना कि इथल्या मुलांना ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांच्या करता २००० जास्त नोकर्या निर्माण झाल्या. मी असे म्हणत नाहीये कि IIT च्या मुलाच्या जागी स है जोंधळे, तासगावकर कोलेज चा मुलगा लागेल. IIT च्या त्या जागेवर VJTI COEP ची मुले. या VJTI वाल्यांच्या जागेवर , भारती , DY पाटील ची मुले. थोडक्यात नोकर्या झिरपत खालच्या स्तर पर्यंत पोचतील ना. आत्ताच किती मुले नोकरी नाही म्हणून रडतात. त्यांचे भले होईल. मी असे म्हणतच नाही कि कंपनी ला नालायक ( शैक्षणिक दृष्ट्या ) मुले नोकरीवर ठेवावी लागतील. आपण बघतो कितीतरी हुशार मुले पण नशीब खराब म्हणून नोकरी नाही. त्यांचे भले होईल. he vacha

In reply to by अभिजित - १

त्यातले किती मुले नोकरी करता बाहेर जातात ? >> त्यातले किती मुले नोकरी लगेच बाहेर जातात ? असे वाचावे. ३/४ वर्षात तर भारती वाला पण जातोच. त्यात काय नवल नाही.

In reply to by निनाद मुक्काम …

याच्यात IIT च्या विद्यर्थी चा काय दोष आहे ? अमेरिका - जिथे सगळे ( शब्दात पकडू नका ) मोट्ठे शोध लागले, लागत आहेत. तिथे उद्योग जगत आणि त्यांचे मालक मोठ्या प्रमाणावर शिक्षणात गुंतवणूक करतात. फायद्या करता नाही. आणि आयुष्याच्या शेवटी समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रचंड दान हि करतात. जे पी मोर्गन , रॉकफेलर , कार्नेजी . शोधा , वाचा . इथे बिर्ला , गोएंका , अंबानी , अदानी , मारवाडी पंजाबी उद्योगपती . कोणी असे काही केले आहे का ? इथले उद्योगपती एक नवीन धंदा म्हणून काही कॉलेज काढतात. अमेरिकेत तसे नसते. खूप मोठा फरक आहे. आणि नवीन शोध - INFOSYS ने काय लावले हो नवीन शोध ? काय product , OS ? वेब server , गेला बाजार एखादा browser ? काय शोध लावले ? आपले IT मजूर US मध्ये ठराविक बिलिंग रेट वर लावले. त्यांच्या डोक्यावर MBA supervisor बसवला. ( जो स्वत काही करू शकत नाही. पण मजूर लोकांना दम भरण्याचे काम जोरात करतो ) थोडक्यात रो ह यो ( रोजगार हमी योजना ) ची एकदम चकचकित आवृत्ती !! थोडक्यात मूर्ती म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान , आपण कोरडे पाषाण .

In reply to by अभिजित - १

आणि नवीन शोध - INFOSYS ने काय लावले हो नवीन शोध ?
इंफोसिसने नवे शोध लावले नाहीत कारण त्यांचे ते बिझनेस मॉडेल नाहीच्चे. पण इंफोसिस आणि तत्सम भारतीय आय्टी कंपन्या या जगातल्या अवाढव्य कंपन्यांना त्यांचं काम स्वस्तात करून देतात आणि त्यांना अधिक एफिशिअंट बनवतात. दुसर्‍याला एफिशिअंट बनवून त्याची हजारो कोटींची कंपनी बनवणं ही नक्कीच अचिवमेंट आहे. दुसरीकडे आयाआयटी \आयायेस्सी यांच्या कडून कटिंग नव्या तंत्रज्ञानाची अपेक्षा ठेवली जाते कारण त्यांची स्थापना त्यासाठी झालेली आहे. सरकार त्यावर अमाप पैसे खर्च करत असते. आणि मूर्ती यांच विधान चूक आहे हे सिद्ध करा की. सांगा आयाय्टी/आयायेस्सी ने लावलेले शोध/तंत्रज्ञान जे आज घराघरात वापरलं जातय. लोकांना आनंदच वाटेल असं काही असेल तर. बाकी आयाय्टीमधून शोध लागले नाहीत अस म्हणल्यावर इन्फीने कुठे लावलेत शोध अस विचारणं म्हणजे दोघे समान पातळीवरचे आहेत हे म्हणणं नव्हे काय?

In reply to by अनुप ढेरे

अर्धे वाचून उत्तर देऊ नका हो ढेरे. US आणि इंडिया, उद्योगपती लोकांची विचारसरणी वेगळी आहे. इकडे मारवाडी बनियागिरी आहे. तिथे उद्योग आणि विद्यापीठ हातात हात घालून काम करतात. इथे काय होतेय ? खरे सांगायचे नसेल, कबूल करायचे नसेल तर फेका. Efficiency च्या गोष्टी काय सांगता ? उद्या आमच्या घरची भांडीवाली पण अगदी हाच दावा करू शकतेच ना. वेगळा स्तर पण तीच गोष्ट . पिंडी ते ब्रह्मांडी. ऐकलीय का हि म्हण कधी ? इथे भारतात INFY कशाला , सगळ्यांचे तेच business मोडेल असते. मग धंदा काय पण असो. नवीन काही शोध लावायचा नाही. सगळे बाहेरून आणायचे . जास्त रिस्क न घेता , कायम उत्पन्न कसे चालू राहील हे business मोडेल. ठीक आहे . करा तसे. पण मग लोकांना अक्कल शिकवू नका. अशा ठिकाणी IIT वाले काही नवीन करायला बाहेर जाऊ लागले कि त्यांना अडव काहीतरी तात्विक मुद्दा काढून. खेकडा / jealous मनोवृत्ती आहे.

In reply to by अभिजित - १

आणि मूर्ती यांच विधान चूक आहे हे सिद्ध करा की. सांगा आयाय्टी/आयायेस्सी ने लावलेले शोध/तंत्रज्ञान जे आज घराघरात वापरलं जातय. लोकांना आनंदच वाटेल असं काही असेल तर.
या प्रश्नाचं उत्तर द्याल असं वाटलं होतं. शेपूट घालायची तर सरळ घाला. गाठी का मारता?

In reply to by अनुप ढेरे

सिद्ध काय करायचे आहे, खरच आहे ते. दुर्दैवाने आपल्याकडे सध्या बेसिक गोष्टी सुधाराव्यात किंवा सुरळीत कराव्यात अशी मानसिकताच नैह्ये. मग कसले शोध लागतायत. काय होतंय कि आहे त्या परिस्थिती कसे पुढे जाता येईल इतकेच बघायची सवय म्हणा किंवा अजून काहीही म्हणा अशी विचित्र गोष्टी होवून बसली आहे. सगळीकडे फक्त जुगाड आणि त्यालाच आपण मान्यता देतो. चलता है कारभार सगळा.

In reply to by अनुप ढेरे

IIT ला industry ची साथ नाही . जशी US मध्ये कार्नेजी , MIT , princeton ला मिळते तशी. साधे उत्तर आहे. समजायची अक्कल नसेल तर माफ करा, मी याच्या हून जास्त समजावून देऊ शकत नाही. आणि म्हणून काही IIT वाले बाहेर जातात तर त्यांचे पैसे बघून लोक जळतात.

In reply to by अभिजित - १

हा मुद्दा बाहेर जाण्याबद्दल नाही. नारायण मूर्तींच्या विधानाबद्द्ल आहे. मूर्तींचं विधान बरोबर आहे हे तुम्हाला मान्य आहे तर.

In reply to by अभिजित - १

आययटीला सरकार प्रचण्ड पैसा देतं आहे. तिकडे कंपन्या देत आहेत. मग अडचण कुठे आहे? कंपनीची साथ म्हणजे नक्की काय हवं आहे तुम्हाला?

In reply to by अनुप ढेरे

ते विधान बरोबरच आहे, चूक काहीच नाही त्यात. पण कोण म्हणतंय त्यालाही काही महत्त्व आहे की नाही? पैसा, तंत्रज्ञान, वेळ, क्षमता, परिस्थिती हाताशी असतांना मूर्थींनी काय केले हे महत्त्वाचे आहे की नाही? आधी केले मग सांगितले असा थोरामोठ्यांचा शिरस्ता असतो असं लहानपणापासून ऐकत आलोय. त्याप्रमाणे मूर्तींनी काय उत्पादने काढली जी जगाला बदलवून टाकणारी ठरली हाही प्रश्न विचारणे आलंच की. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून मूर्तींनी जे विधान केलंय त्याचं अर्थाची विधानं ऐकत आलोय आपण. ते लहान असतांना मूर्तींनीही ऐकले असेल. मग स्वतः त्याप्रमाणे संधी असतांना जे करू शकले नाहीत त्यांना इतरांना डोस पाजायचा अधिकार काय? उलट त्यांनी असे म्हटले असते की 'ठिकाय, नाही झालं ना ६० वर्षात, आपण सगळे मिळून आता करुया. आता काळ/परिस्थिती योग्य आहे. मी माझ्यातर्फे संशोधनासाठी अमूक इतके करोड देतो दरवर्षी. चांगली संशोधनं/आयडीयाज आणा आणि ग्रँट मिळवा. इन्फोसिस तुमच्यासोबत पार्टनर्शीप करून तुमचे उत्पादन जगात आणेल.' तर कुणीही विरोधी स्वर काढला नसता. किंवा गेले दहा-पंधरा वर्ष ते हेच करतायत पण ग्राउंडब्रेकिंग काही तयार झालं नाही म्हणून वरिल विधान केलं तर उद्विग्नता म्हणून समजून घेऊ शकतो. इन्फोसिस तर्फे स्टार्ट-अप फंड यावर्षी सुरु झाला. परदेशात वाय काँबीनेटर ही सीडफंड कंपनी २००५ मधे सुरु झाली. आजवर त्यांनी ८४० कंपन्या जन्माला घातल्यात. त्यांची एकूण मार्केट वॅल्यू तीस बीलियन डॉलर आहे. हेच भारतात सुरू करायला इन्फोसिसकडे सर्वप्रकारची सुविधा असतांना २०१५ उजाडले तेही मॉडेल परिपूर्ण नाही. एक व्यावसायिक म्हणून त्यांनी प्रचंड संपत्ती/नाव कमावले म्हणून महत्त्वाच्या विषयांवर फक्त पिंकटाकू पवित्रा घेणे त्यांच्यासारख्या कॅलिबरच्या माणसाला शोभत नाही.

हे प्रचंड मोठे बांडगूळ आहे.

In reply to by dadadarekar

अगदी खरंय. एकजात बंद करुन टाकल्या पाहिजेत सगळ्या आयायटीज. तरंच नेहरुंच्या कल्पनेतला तंत्रकुशल भारत निर्माण होईल. नलिनीरंजन सरकार मुर्दाबाद!! बिधानचंद्र रॉय मुर्दाबाद!! iitkgp जाता जाता - देशातील पहिल्या आयायटीच्या मुख्य इमारतीवरचे बोधवाक्य

दुसरा एक पर्याय म्हणजे फक्त परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या सोयीसाठी अलग व पूर्णपणे विना-अनुदानित पण सरकारी आयआयटी / आय आय एम स्थापन करावेत. आपले काय म्हणणे ? मंडळी ?

In reply to by मंदार कात्रे

याच ठिकाणी कशाला ज्यांची आर्थिक परिस्थिती जेवढी सक्षम असेल तेवढ्या ठिकाणी सरकारी अनुदानांच्या लाभार्थींमधून त्या मंडळीना काढावे. अर्थात असे काही केल्यास बहुतेक लोक स्वतःची आर्थिक क्षमता प्रत्यक्षापेक्षा जमेल तेवढी करून दाखवण्याचा जोरदार प्रयत्न करतील. डिझेलवर चालणार्‍या लक्झरी कार्सचा खप भरपूर असणे ही भारतीय व्यवस्थेचा क्रूर विनोद आहे.

अतिशय बिनडोक धागा आहे. इन्सेण्टिव्ह आणि अ‍ॅसेट क्रिएशन कशाशी खातात हे माहिती नसलेला.
ब्याटोबा, गेली कित्येक वर्षे, (फक्त मेरिटने शासकीय कॉलेजात शिकलेल्या, रिझर्वेशन व ओपन दोन्ही) वैद्यकीय विद्यार्थ्यांना बंधपत्र सादर करणे अनिवार्य का आहे? (किमान गेल्या ३० वर्षांपासुन. मी स्वतः शासनाचा बंधपत्रित उमेदवार होतो. शासकीय सेवा करून बाँड फेडला आहे) आजही खेड्यात नोकरी केल्याशिवाय या मुलांना पीजी एन्ट्रन्सला बसूही दिले जात नाही. एमबीबीएस केल्यानंतर देश सोडला तर २० एक लाखांचा दंड भरावा लागेल असे अ‍ॅडमिशन घेतानाच बाँडपेपरवर लिहून द्यावे लागते. बरे, या मुलांना फी माफ असते काय? तर ते ही नाही. सरकारी फी देखिल तगडी आहे. सुमारे ३००० रुपये प्रति महिना, मिनिमम. होस्टेल, मेस, पुस्तके, लॅब, लायब्ररी इ.इ. वेगळे. लाख रुपये किमान वार्षिक खर्च आहे. शासकीय विद्यालयांतील प्राध्यापकही मुख्यत्वे करून रुग्ण तपासणी, त्यांच्यावरील शस्त्रक्रिया, उपचार इ. मध्येच जास्त व्यस्त असतात. रात्री बेरात्री येऊन सेवाही देतात. अर्थात, त्यांच्यावर खर्च केलेला पगार विद्यार्थ्यांना शिकवणे सोडून समाजोपयोगी कामांवर खर्च होतो. पीजी स्टुडंट्स हे रजिस्टर्ड एमबीबीएस असून सरकारी अवाढव्य रुग्णालये मुख्यत्वे करून यांच्याच जिवावर चालतात. यांना स्टायपेंड मिळत असला तरी २४-३६-७२ तासा पर्यंतची सलग ड्यूटी करणे नॉर्मल समजले जाते. इतके करूनही बाँड 'खारिज' होत नाही. मिलिटरी कॉन्स्क्रिप्शन सारखे (जे आपल्या देशात नाही) या विद्यार्थ्यांना राबवून घेतले जाते. आता, या तुलनेत, इंजिनियरिंग वा आयायटीवाल्यांना अशी कोणती एक्स्ट्रा शिंगे असतात, ज्यामुळे यांना मेडिकल विद्यार्थ्यांसारखा बाँड लावू नये? हे बाँड्स प्रायव्हेट कॉलेजेसमधल्या डोनेशनवाल्यांना लागू नाहीत. तिथल्याही मेरिटवाल्यांना आहेत. (माझ्या माहितीप्रमाणे.)

In reply to by आनंदी गोपाळ

आता, या तुलनेत, इंजिनियरिंग वा आयायटीवाल्यांना अशी कोणती एक्स्ट्रा शिंगे असतात, ज्यामुळे यांना मेडिकल विद्यार्थ्यांसारखा बाँड लावू नये? असतात हो शिंगे लिखाणातून दिसतात की

In reply to by आनंदी गोपाळ

सेवेच्या टँजिबिलिटीचा मुद्दा सोडल्यास फार काही हाती लागत नाही. वैद्यकीय सेवेची ग्रामीण भागात असलेली पोकळी बाँडपद्धतीने भरुन काढण्याचा विचार शासनाने केला असावा. इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांवर इमिजिएट जोखमीची / जिवाची जबाबदारी विद्यार्थीदशेत तरी थेट नसल्याने मेडीकलच्या तुलनेत त्यांना काही शिंगे जास्त फुटल्याचे दिसूही शकेल. मला एक मुद्दा अजिबात कळला नाही, तो असा की बाँड लादून नक्की साध्य काय होणार? भारतातील सर्व आयायटी मिळून जी काही विद्यार्थीसंख्या होईल त्यातील नक्की किती विद्यार्थ्यांना लगच्यालगेच बाहेर नोकरी मिळते? १% पण नसेल हो होत. मग बाकीचे जे ९९% विद्यार्थ्यांवर बाँड लादला काय किंवा लादला नाही काय? आज कितीतरी स्टार्ट-अप्स हे आयायटी व आयायएमच्या विद्यार्थ्यांनी चालू केलेले दिसून येतील. त्यातून नोकरीच्या संधी विविध शाखांच्या पदवीधरांना मिळतात. विविध कंपन्यांमध्ये काम करणारे इंजिनीअर्स कंपनीचा पैसा वाचवण्यासाठी प्रोजेक्ट्स करतात. त्यामुळे कंपन्यांचा खर्च कमी होऊन फायदा वाढतो. या फायद्यावर कंपन्या मिनिमम आल्टरनेट टॅक्स भरतात. हे अ‍ॅसेट क्रियेशन भारत सरकारला व पर्यायाने आयायटीला काहीच उपयोगाचे नाही? आयायटीत कँपस रिक्रूटमेंट करायची असेल तर कंपन्यांना आयायटीला पैसे द्यावे लागतात. त्यातूनही त्यांचा खर्च निघतोच काही प्रमाणात.

In reply to by अन्या दातार

आज कितीतरी स्टार्ट-अप्स हे आयायटी व आयायएमच्या विद्यार्थ्यांनी चालू केलेले दिसून येतील.
आयाय्टी चा शिक्का असेल तर फंडिंग मिळ्वणे सोपे असेल तुलनेने असं वाटतं.

In reply to by अनुप ढेरे

हे खरं आहे. तुमच्याकडे आयआयटीची डीग्री असेल तर तुम्ही कितीही बिन्डोक आयडीया बँकर्स आणि इन्वेस्टर्स समोर ठेवली तरी ती झटक्यात पास होते. पण आयआयटीयन नसाल तर जेनुइन व वर्केबल आयडीयाज ना कुत्रंही विचारत नाही. स्वानुभवाने सांगतो.

In reply to by अनुप ढेरे

आयाय्टी चा शिक्का असेल तर फंडिंग मिळ्वणे सोपे असेल तुलनेने असं वाटतं.
हे तितकेसे खरे नाही.कुणी यावे काहीतरी आयडीया सांगावी, आयआयटीचे सर्टीफिकेट दाखवावे फंडींग मिळवावे असे होत नाही. कुणाला जवळून ओळखत असल्याशिवाय कुणी पैसा गूंतवत नाही. आयआयटाचे Alimni Network तुलनेत मजबूत असते हे खरे. भारतात जे सीड फंड आहेत Indian Angel Network, Mumbai Angel Network Seed Fund या साऱ्यांवर आयआयटीचा प्रभाव आहे असे वाटत नाही. वर कुणीतरी इन्फोसिस आणि नारायण मूर्तीने काय केले वगेर म्हटले आहे. त्याकाळात त्या परिस्थितीत मूर्तीने जे केले ते कौतुकास्पद आहे फार मोठे काम आहे. राजीव गांधींनी नुसते संगणकाचे नांव काढले तर किती नावे ठेवली गेली होती. सॅम पिट्रोडा कडे एक विलेन म्हणून बघण्यात येत होते. कुठे मिळाले तर त्याकाळातले अग्रलेख वाचावे. आयात निर्यात यावर बंधने हाती. भारताचे स्वतःचे संगणकीय धोरण असे काहीच नव्हते. तेंव्हा आयटी सर्व्हीस हे मोठे क्षेत्र निर्मीण केले. जे आजही तितकेच मोठे आहे. प्रॉडक्टसाठी आपल्याकडे अनुभव कमी आहे. आपल्याला अमेरीकेतून भारतात आलेली अनुभवी माणसे लागतील. मूर्ती, प्रेमजी, राघवन, टाटा यांनी व्हेंचर फंड स्थापन केला आणि गुंतवणुकीसुद्धा केल्या.

In reply to by मित्रहो

>>> वर कुणीतरी इन्फोसिस आणि नारायण मूर्तीने काय केले वगेर म्हटले आहे. त्याकाळात त्या परिस्थितीत मूर्तीने जे केले ते कौतुकास्पद आहे फार मोठे काम आहे. सहमत. इन्फोसिस सुरवातीपासूनच सर्व्हिसेस या क्षेत्रात काम करीत होती. तरीसुधा इन्फोसिसने 'फिनॅकल' ही कोअर बॅन्किन्ग प्रणालीची एक आन्तरराष्ट्रीय दर्जाची सिस्टिम तयार केली आहे. अनेक देशातील अनेक बॅकान्मध्ये फिनॅकल वापरले जाते. हा प्रॉड्क्ट जगातील एकूण उपलब्ध बॅन्किन्ग प्रॉडक्ट्समध्ये कायम पहिल्या ५ क्रमान्कात राहिला आहे. फ्लेक्सक्यूब, टेमेनॉस इ. तोडीस तोड हा प्रॉडक्ट आहे. इन्फोसिसने सुरवातीच्या काळात वेअरहाऊस मॅनेजमेन्ट सिस्टिमसाठी 'ड्ब्ल्यूएमएस यन्त्रा' या नावाने एक चान्गला प्रॉडक्ट बनविला होता. सुरवातीच्या काही इन्स्टॉलेशननन्तर त्यान्नी तो प्रॉडक्ट एका अमेरिकन कम्पनीला विकल्याने त्यान्च्याकडे त्याचे हक्क नाहीत. इन्फोसिसचे अजून काही प्रॉडक्ट्स आहेत, परन्तु मला त्याबद्दल फारशी माहिती नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इन्फोसिसने प्रतिकूल वातावरणात सुरूवात करून आज जवळपास ८ अब्ज डॉलर्स वार्षिक महसूल असलेली एक मोठी कम्पनी बनविली, जागतिक दर्जाच्या सन्गणकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी आपल्या किमान लाखभर कर्मचार्‍यान्ना कायदेशीर मार्गाने कोट्याधीश बनविले (यातले बहुसन्ख्य कर्मचारी मध्यमवर्गातील होते). इन्फोसिस करत असलेल्या कामाला रोजगार हमी योजना अशी उपमा देणे अजिबात पटत नाही. त्यान्नी ज्या काळात कम्पनी सुरू करून आज जेथे पोहोचविली आहे ते अत्यन्त कौतुकास्पद आहे.

In reply to by श्रीगुरुजी

माझे पोस्टस परत एकदा वाचा. मुद्दा निट समजावून घ्या . मग बोला . Infosys revenue - $ ८ बिलिअन . finacle revenue - अंदाजे ३०० मिलिअन . infosys चा मुख्य धंदा काय आहे ? bodyshopping चा ना ? मग राग यायचे कारण काय मि तसे सांगितले तर ?

In reply to by अभिजित - १

मी कशाला रागावतोय? राग यायला काही तरी कारण असावे लागते. फिनॅकलचा रेव्हेन्यू आणि कम्पनीचा रेव्हेन्यू यान्ची तुलना करण्याची गरजच नाही, कारण मुळात इन्फोसिस ही कम्पनी प्रॉड्क्ट तयार करण्यासाठी स्थापन केलेलीच नव्हती. भारतात काम करून परदेशातील ग्राहकान्ना कमी खर्चात, दर्जेदार सन्गणकीय व सन्गणकाधारीत सेवा देणे हेच मूळ उद्दीष्ट होते व ते अजूनही कायम आहे. फिनॅकल व इतर काही प्रॉड्क्ट्स, हाय एन्ड कन्सल्टिन्ग, बीपीओ इ. कालौघात सुरू झाले, परन्तु मूळ उद्देश परदेशातील ग्राहकान्ना दर्जेदार सन्गणकीय व सन्गणकाधारीत सेवा देणे हाच होता. स्थानिक ग्राहकान्ना सेवा देणे हा मूळ उद्देश नव्हता आणि नाही. फिनॅकलच्या निमित्ताने युनियन बॅन्क, आयसीआयसीआय बॅन्क, कॉसमॉस बॅन्क इ. स्थानिक ग्राहकान्ना सेवा दिली हा तेवढ्यापुरता अपवाद. इतर सर्व ग्राहक परदेशातीलच आहेत. इन्फोसिसचा मूळ धन्दा बॉडीशॉपिन्ग नाही व नव्हता. बॉडीशॉपिन्गमध्ये ग्राहकान्ना फक्त हवी ती माणसे कन्त्राट पद्धतीने पुरविली जातात. बॉडीशॉपर स्वतः सन्गगणकाशी सम्बन्धित कोणतेही काम करीत नाहीत, ते फक्त माणसे पुरवितात. इन्फोसिसला पूर्वी काही ग्राहकान्नी डॉटनेटचा अनुभव असलेले ४० कर्मचारी ६ महिन्यान्साठी द्या किन्वा कोअर जावाचा अनुभव असलेले ५० कर्माचारी १ वर्षाकरीता आमच्या प्रोजेक्टसाठी द्या अश्या मागण्या आल्या होत्या. परन्तु इन्फोसिसने या सन्धी स्वीकारल्या नाहीत. ऑफशोअर डेव्हलपमेन्ट हाच इन्फोसिसचा मुख्य व्यवसाय होता व आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही कितीही समर्थन केलेत तरी Infosys bodyshopper आहेच. गुगल सर्च करा - infosys body shopping company त्यात काही चुकीचे आहे असे मी अजिबात म्हणत नाही. किती तरी भारतीय लोकांना खूप फायदा झाला आहे INFY मुळे. पण त्यामुळे सत्य बदलत नाही.

In reply to by अभिजित - १

बॉडी शॉपिन्गची विकीपीडीआची व्याख्या अशी आहे. Body shopping is the practice of consultancy firms recruiting information technology workers in order to contract their services out on a short-term basis. इन्फोसिस या व्याख्येत कोठेच बसत नाही. इन्फोसिसचे अनेक ग्राहक १५ वर्षाहून जुने आहेत. वरील व्याख्येत दिल्याप्रमाणे इन्फोसिसचे शॉर्ट टर्म ग्राहक एकही नाही. बॉडीशॉपिन्ग कम्पन्या स्वतः कोणतेही काम न करता ग्राहकान्ना बॉडीज म्हणजे आवश्यकतेनुसार कन्त्राटी माणसे पुरवितात. इन्फोसिस अश्या पद्धतीने कधीच माणसे पुरवित नाही. आपल्या ग्राहकान्साठी निव्वळ बॉडीज पुरविण्याऐवजी इन्फोसिस ग्राहकान्ना पाहिजे असलेले सॉफ्टवेअर बनवून देते. खालील परिच्छेदातून हे जास्त स्पष्ट होईल. During Q310, Infosys launched Flypp, an application platform that enables mobile service providers to improve the customer experience with a host of ready-to-use experiential applications across several devices. A major health insurance firm bought the iTransform product suite, which helps clients to comply with the U.S. federal government’s mandates efficiently and cost effectively. A major consumer packaged goods (CPG) firm bought the Procurement module of the Supply Chain Visibility product suite to cut sourcing cycle times and plug leaks in procurement spend through better monitoring, compliance, and governance mechanisms. A major retailer selected Infosys as a partner in its Future Store Initiative to advance cutting-edge technologies and innovative shopping concepts. Infosys has been chosen for its ShoppingTrip360 solution, an innovative managed service that offers retailers and CPG companies insights into real-time shopper and shelf activity. A grocery retailer in the UK partnered with Infosys to develop a new multi-channel Web platform to bring about an integrated online experience. A leading provider of security testing software solutions engaged Infosys to engineer leading-edge penetrative testing products. The company is building a patient appointment scheduling system for a provider of medical laboratory tests and services. The system will allow a patient to schedule an appointment at any of the company’s more than 1,000 patient service centers. Infosys is helping a leading provider of virtualization, networking and Software-as-a-Service (SaaS) technologies to design its architecture for master data management. Infosys is also working with a major communications company in wireless 4G development. A specialty retailer engaged Infosys to develop a SaaS solution. On December, 24, Infosys was selected to implement an 3.87 billion rupee ($83 million) IT project for the state of Karnataka’s power distribution utilities. The project is part of a central government-funded program to use information technology to cap electricity losses in the country. There is significant opportunity for IT companies within India since many government projects are expected to be awarded in the coming years, and Infosys, with its strong brand name and an ambassador, former CEO Nandan Nilakani, inside the government, is the forefront to win a large number of these projects. The company is building on its capabilities and even in a downturn market. अजूनही इन्फोसिस ही बॉडी शॉपिन्ग कम्पनी आहे असेच वाटत असेल, तर माझा नाईलाज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दा काय आहे आणि चर्चा कशा वर चालली आहे... जरा आठवण करून देतो. मुद्दा १: भारतात गेल्या साठ वर्षात जग बदलणारे शोध लागले नाहीत. (हे एक साधारण विधान आहे जे कोणीही येता-जाता म्हणत असतो.) मुद्दा २: वरील वाक्य श्रीयुत मूर्ती यांनी म्हटले आहे जे स्वतः एक आयआयटीयन आहेत. मुद्दा ३: १९८०-२००० चे सुरवातीचे दिवस जाऊ द्या. परिस्थिती संपूर्णपणे सकारात्मक असतांना गेल्या पंधरा वर्षात मूर्ती यांनी जग बदलणारे शोध लावण्याचा कसलाही विचार स्वतः केला नाही. मुद्दा ४: अशा व्यक्तीस वरील मुद्दा क्र. १ चे वाक्य पिंकटाकू पद्धतीने उच्चारायचा काय अधिकार आहे? इन्फोसिस आणि मूर्ती यांचे कार्य उपलब्ध परिस्थितीत उत्कृष्टच आहे. त्याला कोणीही नावे ठेवत नाहीये. मुळात मूर्ती आपल्या व्यवसायिक जगात काय करतायत हा प्रश्नच नाहीये. प्रश्न स्वतः त्यांनी उपस्थित केलाय तेव्हा त्यांच्याकडेच या प्रश्नावर काय उत्तर आहे हे विचारल्या जाणारच. एक उदाहरण म्हणून मी टाटा नॅनो चे देतो. रतन टाटांनी एक अशक्य स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवले. असंख्य अडचणींचे पर्वत असतांना नॅनो ठरल्याप्रमाणे, ठरल्या किंमतीत बाजारात आली. त्या तारखेला एक लाख रुपयात इतकी उत्कृष्ट कार जगात कुणीच बनवली नव्हती. आजही ते शक्य नाही. टाटांनी ते करून दाखवले. आपल्यापरीने टाटांनी जग बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नाचे जगभरच्या वाहनक्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले आहेत. आणि हे भारताचे स्वतःचे (भारतातच आर अँड डी झालेले) उत्पादन आहे. वरील वाक्य टाटांनी स्वतः उच्चारले असते तर मला ते योग्यच वाटले असते कारण काय म्हटलंय यापेक्षा कोणी म्हटलंय हेही बरेचदा महत्त्वाचं असतंच. बाकी इन्फोसिस जे करतंय ते जर जगात एकुलती एक (युनिकली) फक्त इन्फोसिसच करत असेल तशा (इनोव्हेटीव कंपनी) प्रकारचा सन्मान इन्फोसिसला मिळायला काहीच हरकत नाही. पण एक तुलना करावीशी वाटतेच. अ‍ॅपल कंपनीच्या एकूण रेवेन्यूच्या फक्त पाच टक्के इन्फोसिसचा रेवेन्यू आहे. ज्यांना आयटीतला 'बिलींग' प्रकार समजत असेल त्यांना हा फरक भयंकर आहे आणी याचे कारण काय आहे हेही कळेल. इन्फोसिस ने फार तीर मारलेत असं काहीच नाहीये. देअर इज अ डीफरंस बीटवीन 'अल्सो रन' अँड 'ओन्ली वन'.

In reply to by संदीप डांगे

इन्फोसिसने फार तीर मारलेत, इन्फोसिस जे काही करीत आहे ते जगात युनिक आहे असे मी म्हटलेच नाही. वर कोणीतरी लिहिले की इन्फोसिस ही बॉडी शॉपिन्ग कम्पनी आहे. परन्तु इन्फोसिस ही बॉडी शॉपिन्ग कम्पनी नाही आणि नव्हती. याचे अनेक दाखले मी वर दिलेले आहेत. इतकेच. आयटीतला बिलिन्ग हा प्रकार मला चान्गलाच माहिती आहे. मी बिलिन्गशी जवळून सम्बन्धित होतो. अ‍ॅपल इन्फोसिस किन्वा इतर भारतीय कम्पन्यान्च्या तुलनेत खूपच ग्रेट आहे यात वादच नाही. ज्या काळात कम्पनीला स्वतःचे फोन कनेक्शन मिळण्यात १ वर्षाहून अधिक काळ लागत होता आणि ज्या काळात स्वतःचा पहिला सन्गणक बाहेरून मागविण्यास १ वर्षाहून अधिक काळ लागला त्या काळात अत्यल्प भान्डवलावर कम्पनी स्थापन करून आज इतकी पुढे आणली आहे हे नक्की कौतुकास्पद आहे. मुख्य म्हणजे आपल्याबरोबर कर्मचार्‍यान्ची उन्नती सुद्धा कम्पनीने साधलेली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देऊन समोरच्या नामोहरम ( कि नमो हरम !! ) करायचे तुमचे स्किल वादातीत आहे. Flypp आज कुठे आहे ? बहुतेक flop झाले आहे. बाकी ची सगळी उदाहरणे हि शेवटी client ला त्याच्या " बिल्डिग उभारणीत " मदत याच स्वरुपाची आहेत. Infosys चे top product फ़िनकल. कंपनीच्या revenue मध्ये त्याचा हिस्सा फक्त ४ टक्के आहे. मला वाटते हि माहिती पुरेशी आहे. कंपनी चे खरे उत्पन्न कुठून येते हे सांगायला. बाकी संघाने पण आता IIT आणि IIM ना हिंदू विरोधी ठरवले आहेच. तुम्ही इथे एकदम infosys च्या मुद्या वर उडी मारलीत. तर आता infosys राहू दे बाजूला. मुख्य मुद्द्यावर तुमचे मत प्रदर्शित करून टाकाच.

In reply to by अभिजित - १

>>> वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देऊन समोरच्या नामोहरम ( कि नमो हरम !! ) करायचे तुमचे स्किल वादातीत आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आहे हे मान्य केल्याबद्दल व त्यामुळे समोरचा नामोहरम होतो हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद! >>> Flypp आज कुठे आहे ? बहुतेक flop झाले आहे. बहुतेक? नक्की काय ते सान्गा. >>> बाकी ची सगळी उदाहरणे हि शेवटी client ला त्याच्या " बिल्डिग उभारणीत " मदत याच स्वरुपाची आहेत. असली म्हणून? >>> Infosys चे top product फ़िनकल. कंपनीच्या revenue मध्ये त्याचा हिस्सा फक्त ४ टक्के आहे. मला वाटते हि माहिती पुरेशी आहे. कंपनी चे खरे उत्पन्न कुठून येते हे सांगायला. आपले उत्पन्न कोठून येते हे इन्फोसिसने कधीच लपविलेले नाही. ग्राहकान्ना त्यान्च्या व्यवसायासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर भारतातून (व काही भाग ग्राहकाच्या कार्यालयात काम करून) कमी खर्चात बनवून देणे, त्यान्च्या असलेल्या व बनवून दिलेल्या सॉफ्टवेअरची देखभाल इ. कामातून इन्फोसिसचा बहुसन्ख्य महसूल येतो. फिनॅकलसारखे प्रॉड्क्ट्स, हाय एन्ड कन्सल्टिन्ग, बीपीओ इ. मधून काही प्रमाणात महसूल येतो. इन्फोसिसने हे कधीच लपविलेले नाही. असे असताना इन्फोसिस ही बॉडीशॉपिन्ग कम्पनी कशी? बॉडी शॉपिन्गची व्याख्या माहित नसल्यास माझ्या आधीच्या प्रतिसादात दिलेली व्याख्या वाचावी. >>> बाकी संघाने पण आता IIT आणि IIM ना हिंदू विरोधी ठरवले आहेच. तुम्ही इथे एकदम infosys च्या मुद्या वर उडी मारलीत. तर आता infosys राहू दे बाजूला. मुख्य मुद्द्यावर तुमचे मत प्रदर्शित करून टाकाच. आता या धाग्यात सन्घ कोठून आला? विषय कोणताही असला, म्हणजे नायजेरियात बाजरीच्या पिकावर झालेला मावा आणि तुडतुडे यान्चा प्रादुर्भाव किन्वा ब्राझिलम्धील ऑलिम्पिक असा कोणताही विषय असला तरी काही जण बादरायण सम्बन्ध नसताना सुद्धा सन्घ, भाजप इ. मधे आणतात. आता सन्घाला आणलेच आहे तर गेलाबाजार मोदी, गोध्रा, बाबरी मशीद, गान्धी घराण्याचा त्याग, नथुराम इ. पण आणा. बादवे, इन्फोसिसचा मुद्दा तुम्ही काढलात, मी नाही. इन्फोसिस ही बॉडीशॉपिन्ग कम्पनी हा तुमचाच दावा. मी फक्त योग्य ती माहिती देऊन तो दावा खोटा आहे हे दाखवून दिले. आणि आता तर तुम्ही थेट सन्घाला मध्ये आणायला निघालात. हरकत नाही. सन्घाबद्दल तुमचे काही आक्षेप असतील तर तेही इथे मान्डा. जमल्यास प्रतिवाद करेन.