Skip to main content

IIT आणि USA

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 14/07/2015 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आयआयटी मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच 100 ते 250 कोटी प्रतिवर्ष पगार देणार्‍या अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 10 ते 20 कोटी प्रतिवर्ष पगाराचे जॉब अमेरिकेत ऑफर होतात . किंबहुना आयआयटी करनारांचे उद्दीष्ट अमेरिकेत सेटल होणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला? मला वाटते आयआयटी मध्ये प्रवेश देतानाच अमेरिकेत जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 कोटी रुपये आयआयटी ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\ आपले काय म्हणणे ? मंडळी ?

वाचने 24597
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

संघा बद्दल माझे काहीही वाईट मत नाहीये. त्या मुळे इथे काहीही मांडण्याचा प्रश्न नाही. दुसर्या कोणी तरी मूर्ती न इथे आणले त्या मुले मला Infosys चा विषय काढावा लागला. मुख्य मुद्द्यावर तुमचे काय मत आहे ?

In reply to by अभिजित - १

लेखातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. >>> किंबहुना आयआयटी करनारांचे उद्दीष्ट अमेरिकेत सेटल होणे हेच असते , कशावरून? >>> मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला? भारतीय करदात्यांच्या पैशातून अनेक वायफळ खर्च केले जातात. (उदा. नेत्यांची सुरक्षा व्यवस्था, कर्जमाफी, मदरशातील मुल्लांना पेन्शन, हाजयात्रेला अनुदान इ.). हे खर्च तरी कशाला करायचे? परदेशात गेलेल्यांपैकी बहुतेक मंडळी रेमिटन्सच्या स्वरूपात पैसे भारतात पाठवून देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी हातभार लावतात. वर उदाहरणात दिलेले खर्च मात्र पूर्ण वायफळ आणि अनुत्पादक आहेत. त्यामुळे वरील खर्चांवर आक्षेप असावा, आयआयटीवाल्यांवर नसावा. >>> मला वाटते आयआयटी मध्ये प्रवेश देतानाच अमेरिकेत जॉब करायचा असेल तर नोकरी लागल्यानंतर 3 ते 5 वर्षात 5 ते 10 कोटी रुपये आयआयटी ला भारतीय चलनात भरण्याचे बंधपत्र करून घ्यावे व ते वसूल करून घ्यावेत ...\ वर उत्तर दिलेले आहे.

In reply to by अन्या दातार

अहो पण ते १ टक्के लोक बाहेर गेले. त्यांना दीड कोटी / २ कोटी रु पगार मिळाला तर, US $ मध्ये तो नॉर्मल च आहे. किती तरी लोक तसा पगार आत्ता पण घेत आहेतच. पण काय होते, पेपर मध्ये IIT ची बातमी छापून आली कि काही लोकांच्या पोटात लगेच दुखायला लागते. मग ते वेडेपिसे होऊन इकडे तिकडे बोंबाबोंब करत फिरू लागतात. काय करणार ? :) राहिली गोष्ट जनतेच्या पैशाची. बबनराव घोलप, नाशिक मध्ये एक दिवा लावून राहिले आहेत कुंभात. पहिल्या दिवशी २५ हजार लिटर तेल प्यायला तो, तिळाचे. ३० ते ३५ कोटी चा दिवा आहे तो. इतर सगळे खर्च ( मंडप , AC , शाही जेवणावळी ) खूप वेगळे. कुठून आला हा इतका पैसा ?

In reply to by आनंदी गोपाळ

मी तर म्हणेन मेडिकलवाल्यांनाही लावू नका बाँड. इंजिनिअरिंग व मेडिकलमध्ये फरक असेल-नाही, आहेच फरक- पण म्हणून डॉक्टरांना असे राबवण्यात कै अर्थ दिसत नाही. असो. आय मीन राबवण्यात चूक आहे असे नाय पण डोंट पे देम पीनट्स अ‍ॅटलीस्ट.

सरसकट सर्वाना बॉन्ड लावण्याची गरज नाही जे लोक येथे शिक्षण घेऊन परदेशी जातात त्यांना पाच वर्षात त्यांच्या शिक्षणाचा खर्च परत करण्याचा बॉन्ड असण्यास काय हरकत आहे?पाच वर्षात परत आले तर हे पैसे भरायची गरज नाही. मग तो आय आय टी असो किंवा झाडबुके बुद्रुक येथील इंजिनियरिंग कोलेज असो. यात वैद्यकीय विद्यार्थी सुद्धा अंतर्भूत करायला हरकत नाही. कारण जे बाहेर जातात त्यांना पुढच्या पाच वर्षात हा खर्च परत करणे फार अवघड नाही.

In reply to by सुबोध खरे

मी खालील एका प्रतिसादात म्हटले तसे प्रश्न केवळ पैसे वापस करण्याचा नाही. हजार जणांना जनतेच्या पैशातून संधी दिली जाताना दुसर्‍या हजारोंची संधी हिरावली जात असते. या संधी न मिळालेले हजारो एखाद मार्कानेच मागे असतात.

वाचतेय. भारतात राहून भारत्मातेची सेवा करणार म्हणजे नक्की काय? मोठ्या प्रमाणावर कर चुकवून स्वतःचे उखळ पांढरे करणार्या एखाद्या मारवाड्याकडे आय.आय.टी./भारतीचा अभियंता कामाला लागला तर ती भारतमातेची सेवा होते का ?भारताबाहेर राहून प्रामाणीक्पणे काम करणारा व भारतात राहून घरभाड्याच्या खोट्या पावत्या देणारा... नक्की कोणता चालेल रे मंदार? ज्याला जेथे जायचेच तेथे जाऊदे. फारतर अधिक फी आकारावी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत. मी स्वतः शासकीय अभियांत्रिकी मधून अमेरिकन कंपनी त निवडलो गेलो. काही वर्षांनी ब्रेन ड्रेन,देशसेवा आदी गोष्टींना भुलून भारतीय कंपनीत कामाला सुरुवात केली. यातील पोकळपणा लगेच लक्षात आला. तत्व, मुल्य यांना इथे काहीही महत्त्व नाही. येनकेन प्रकारे मालक आपली पोतडी भरत आहे.

In reply to by वगिश

ज्यांना आर्थीक असामाधानामुळे भारतात मन लागत नाही त्यांनी परदेशात जाणे केव्हाही उत्तम. पण आर्थिक समस्या नसेल तर ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो आहे/होतो आहे हे समाधान हवेच. पण मालक भारतातला नसेल आणि आमेरीकेतला मालक असेल तर पोतडी भरणार नाही असे होत नसावे. तत्व, मुल्य आमेरीकन व्यावसायीक त्यांच्या वेगळ्या पद्धतीने बासनात गुंडाळत असणार उडदा माजी काळे गोरे सारीकडेच असावे. भारतातील परंपरागत कंपन्यातील मालकांची नवी पिढीही बर्‍यापैकी उच्चशिक्षीत असते. भारतात अभियांत्रिकी शिकलेल्या नव उद्योजकांना भांडवलाची सुलभ उपलब्धता आणि लालफित शाहीतून सोडवणूक हे खरेतर महत्वाचे प्रश्न असावेत.

In reply to by माहितगार

भारतात अभियांत्रिकी शिकलेल्या नव उद्योजकांना भांडवलाची सुलभ उपलब्धता आणि लालफित शाहीतून सोडवणूक हे खरेतर महत्वाचे प्रश्न असावेत. आयआयटीयन्स ना हे प्रश्न इतके भेडसावत नाहीत हे दुसर्‍या एका प्रतिसादात लिहिले आहेच. पण उद्योग उभा करणे आणि कालांतराने त्यातून (परदेशातल्या नोकरीत आजच मिळेल) तेवढाच पैसा उद्या कधीतरी मिळवणे अशी परिस्थिती असल्याने कदाचित सोयिस्कर पर्याय निवडणे होत असावे. उद्योग उभारणे प्रत्येकाला शक्य होत नाही. किंवा कोअर कंपिटंसी सोडून उद्योगाची इतर महत्त्वाची न टाळता येण्यासारखी कामे जमत नाहीत. जिथे संधी उपलब्ध होते तिकडे लोक जातीलच. पासआउट विद्यार्थ्यांना काय समस्या आहेत त्यापेक्षा प्रस्तुत संस्थेचं उद्देशविहिन जे कार्य चाललंय त्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे असं मला वाटतं.

In reply to by माहितगार

सहमत. पोतडी भरण्यात तसे वाईट काहीच नाही . पण आपल्या बहुतेक उद्योजागांची मानसिकता अशी आहे : १ . दुसर्याला फासावाल्याशिवाय आपला फायदा होणार नाही. २. नवीन काही ज्या कल्पना असतील त्या पास्च्यात्यांना राबवू दे ,आपण फक्त उचलेगिरी करू . ३. टेक सपोर्ट वैगेरे कामे स्वीकारणे ज्यामुळे पैसा मिळतो पण संशोधन आणि विकास क्षेत्रात भर पडत नाही . ४. Intellectual Property निर्माण व जतन करण्याविषयीचे अज्ञान . ५. Corporate Social Responsibility चा अभाव.
ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो आहे/होतो आहे हे समाधान हवेच
नेमकी हीच बोंब आहे. आपल्या ज्ञानाचा वापराच इथे होत नाही( किंवा खूप कमी होतो). एक ढोबळ उदाहरण देतो: Semiconductor Chip Design and Manufacturing ह्या क्षेत्रात २-३ भारतीय कंपन्या आहेत त्याही फक्त minor sections design करतात. ह्या क्षेत्रात IIT मध्ये कुशलता मिळवलेला तंत्रज्ञ कशाला भारतात थांबेल? अवांतर : १. औद्योगिक क्षेत्र आणि तंत्रशिक्षण संस्था ह्यांची सांगड आपल्या देशात नाही हे कटू सत्य आहे आणि ह्याला जबाबदार सरकार आणि पर्यायाने आपणच आहोत फक्त तेथील विद्यार्थीच नाहीत. आता हि सांगड नेमकी कशी असते ह्यासाठी आपण पाश्चिमात्य तंत्रशिखन पद्धतीचा दाखला घेऊ शकता. आज १२वि (माहिती तंत्रज्ञान ) शिकलेले लोक जे काम सहजतेने करू शकतील अशी कामे अभियंते करत आहेत हे आपल्या शैक्षणिक धोर्न्नांचे अपयश आहे. २. बर्याचदा असा युक्तिवाद केला जातो कि भारत सरकारच्या कंपन्यांमध्ये (नवरत्न , पंचरत्न )IIT मधून बाहेर पडलेले अभियंते नगण्य असतात . आपल्या ज्ञानाची खुमखुमी असलेल्या अभियंत्यास ग्यास सिलिंडर चे किती truck बाहेर गेले ह्याच्या रोजच्या नोंदी तपासण्याचे काम दिले तर ह्यात कंपनीचा ,देशाचा,समाजाचा,त्या अभियंत्याचा नेमकी कुणाचा फायदा आहे? ३. शासकीय संशोधन संस्थामध्ये IITians का नाहीत ह्याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. ४. अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे. वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे. भारतातील ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांविषयी आपल्याला नेमकी परिस्थिती काय आहे हे माहित आहे आणि सरकारने सर्व डॉक्टर लोकांना आपली सेवा तेथे देण्याची सक्ती केली आहे. परंतु एका अभियंत्याकडून देशाला काय अपेक्षित आहे तेच आपल्याला माहित नाही. नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल. ५. देशात राहून काम केले कि देशाचा फायदा होतो हा समाज चुकीचा आहे. ह्यात एक तर बुद्धिमत्तेचा योग्य वापर होत नाही(वरील करणान्मुळे ) शिवाय परकीय गंगाजालीस हि आपण मुकतो .

In reply to by वगिश

बाकीच प्रतिसाद बरा आहे, सहमतही होत होतो, पण मधेच हे पचकलात →
४. अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे. वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे. परंतु एका अभियंत्याकडून देशाला काय अपेक्षित आहे तेच आपल्याला माहित नाही. नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल.
आता याचे विच्छेदन करू. अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे. अ‍ॅबसोल्यूटली. For the sole reason, that you don't have ANY idea, what medical field is. कृपया थांबवा. वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे. अभियांत्रिकी नक्की कसले क्षेत्र आहे? संपूर्णपणे मूलभूत संशोधन, मूल्य/संपत्तीची निर्मिती की अजून काही? आपण आपल्या रोजच्या कामात नक्की काय करीत असता? भारतातील ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांविषयी आपल्याला नेमकी परिस्थिती काय आहे हे माहित आहे काय प्रॉब्लेम्स आहेत नक्की ग्रामीण वैद्यकीय सेवांमध्ये? नेमकी परिस्थिती काय आहे, हे तुम्हास माहित आहे??? वॉव! जरा सांगा पाहू प्रॉब्लेम्स? आणि सरकारने सर्व डॉक्टर लोकांना आपली सेवा तेथे देण्याची सक्ती केली आहे. किस खुशी मे? यांच्या तीर्थरूपांचे वेठबिगार नोकर म्हणून परमेश्वराने डॉक्टर जमात उत्पन्न केली आहे काय? मला हवा तो व्यवसाय मला हवा तिथे करण्याच्या स्वातंत्र्याचे काय झाले? की डॉक्टरकी ही शार्पशूटर्स, वेश्याव्यवसाय वा दारू दुकानांसारखी समाजविघातक अ‍ॅक्टिव्हिटी आहे, जिला सरकारी कंट्रोल हवाच? नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल. अन नेमक्या समस्या मांडून त्यावर जर डॉक्टरांकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र काय काळे निळे पडेल की काय? उचल्ला कीबोर्ड..

In reply to by वगिश

बाकीच प्रतिसाद बरा आहे, सहमतही होत होतो, पण मधेच हे पचकलात →
४. अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे. वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे. भारतातील ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांविषयी आपल्याला नेमकी परिस्थिती काय आहे हे माहित आहे आणि सरकारने सर्व डॉक्टर लोकांना आपली सेवा तेथे देण्याची सक्ती केली आहे. परंतु एका अभियंत्याकडून देशाला काय अपेक्षित आहे तेच आपल्याला माहित नाही. नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल.
आता याचे विच्छेदन करू. अभियांत्रिकी ची तुलना वैद्यकीय क्षेत्राशी करणे कृपया थांबवावे. ← अ‍ॅबसोल्यूटली. For the sole reason, that you don't have ANY idea, what medical field is. कृपया थांबवा. वैद्यकीय हे सेवा क्षेत्र आहे. ← अभियांत्रिकी नक्की कसले क्षेत्र आहे? संपूर्णपणे मूलभूत संशोधन, मूल्य/संपत्तीची निर्मिती की अजून काही? आपण आपल्या रोजच्या कामात नक्की काय करीत असता? भारतातील ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांविषयी आपल्याला नेमकी परिस्थिती काय आहे हे माहित आहे ← काय प्रॉब्लेम्स आहेत नक्की ग्रामीण वैद्यकीय सेवांमध्ये? नेमकी परिस्थिती काय आहे, हे तुम्हास माहित आहे??? वॉव! जरा सांगा पाहू प्रॉब्लेम्स? आणि सरकारने सर्व डॉक्टर लोकांना आपली सेवा तेथे देण्याची सक्ती केली आहे. ← किस खुशी मे? यांच्या तीर्थरूपांचे वेठबिगार नोकर म्हणून परमेश्वराने डॉक्टर जमात उत्पन्न केली आहे काय? मला हवा तो व्यवसाय मला हवा तिथे करण्याच्या स्वातंत्र्याचे काय झाले? की डॉक्टरकी ही शार्पशूटर्स, वेश्याव्यवसाय वा दारू दुकानांसारखी समाजविघातक अ‍ॅक्टिव्हिटी आहे, जिला सरकारी कंट्रोल हवाच? परंतु एका अभियंत्याकडून देशाला काय अपेक्षित आहे तेच आपल्याला माहित नाही. नेमक्या समस्या मांडून त्यावर जर अभियंत्याकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र नक्कीच वेगळे दिसेल. ← अन नेमक्या समस्या मांडून त्यावर जर डॉक्टरांकडून मदतीची सरकारने अपेक्षा केली तर चित्र काय काळे निळे पडेल की काय? डॉक्टरांकडून काय अपेक्षा आहेत? फुकट ट्रीटमेंट अन वेठबिगारी?? उचल्ला कीबोर्ड.. पहिला प्रतिसाद माझ्या कावळा कंस वापरायच्या सवयीमुळे सगळा नीट उमटला नाही. संम याम्नी मदत केली तर आभारी राहीन.

- बऱ्याचदा या पगाराच्या रकमेत दोन भाग असतात परफऑर्मन्स बोनस आणि पगार. त्यातून मिळनारा पगार न्यूयॉर्क सारख्या शहरात फार मोठी रक्कम नसते. - या कंपन्या ९ CGPA च्या खालील मुलांना परिक्षेला बसू सुद्धा देत नाही. तेंव्हा अशा कंपन्यात जाणारी मुले 2-3 प्रतिशत फक्त. बहुतेक मुले ही नंतर GRE करुन परदेशात जातात पण तसे NIT किंवा BITS Pilani ची मुले पण करतात. - आपण बहुतेक सारेच अगदी प्राथमिक शाळेपासून सरकारी अनुदानित शाळेत शिकलो. त्यापैकी 90 प्रतिशत सरकारी कामात किंवा किंवा डॉक्टरांसारखे कुठे गावात जाउन काही काम करीत नाही. - भारतात राहून काय करनार. उदाहरण द्यायचे झाले तर डॉ. सुहास पाटील, आयआयटी खरगपूर मधे बीटेक केल्यावर MIT ला गेले. मग भारतात नोकरीला आले इथली कामाची पद्धत, इथे चालनारे कामाला कंटाळून अमेरीकेत गेले. तिथे गेल्यावर फॅबलेस सेमीकंडक्टरचा शोध लावला. पीसी असो की मोबाइल की कंझुमर इलेक्ट्रॉनिक्स या साऱ्याची वाढ होण्यात त्या शोधाने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली. भारतातलाच काय जगातला आयटीचा विस्तार त्यामुळे झाला. अशी बरेच उदाहरणे आहेत. रश्मी बंसलचे पुस्तक वाचा. - चीनने NRC (Non Resident Chinese) या लोकांना आव्हान करुन त्या देशातली गुंतवणुक वाढवली. आज मोीदीही ते करीत आहेत. यात अमेरीकेत स्वतःच्या कंपन्या असनाऱ्यांमधे आयआयटीतले बरेच आहे. - बरेच आयआयटीवाले भारतात परत आले. माझ्या एका बॉसने भारतात आल्यावर शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर यावर काम करनारी कंपनी काढली. - भारतात सरकारी नोकऱ्यात आजही बरेच आयआयटीवाले आहेत. पेट्रोलियमची भेसळ आणि हायवेतला भ्रष्टाचार यात मारल्या गेलेले दोघेही आयआयटीतलेच होते. राजकारणात तीन वेगवेगळ्या पार्टीत आयआयटीवाले आहेत. जयराम रमेश, केजरीवाल आणि मनोहर परीकर. - डॉ झुनझुनवाला सारख्यांनी RTBI च्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. उच्च शिक्षणाचा खर्च सरकारने उचलावा की नाही हा वेगळा प्रश्न आहे. तो फक्त आयआयटीवाल्यांसाठीच नाही तर सर्वांना लागू होतो. त्याकडे त्या दृष्टीने बघायला हवे आयआयटीवाले अमेरीकेत जाउन भरपूर पगार मिळवतात त्याचा आकस म्हणून नव्हे.

In reply to by मित्रहो

उच्च शिक्षणाचा खर्च सरकारने उचलावा की नाही हा वेगळा प्रश्न आहे. तो फक्त आयआयटीवाल्यांसाठीच नाही तर सर्वांना लागू होतो. त्याकडे त्या दृष्टीने बघायला हवे आयआयटीवाले अमेरीकेत जाउन भरपूर पगार मिळवतात त्याचा आकस म्हणून नव्हे.
शासनाचा शिक्षणावरच्या खर्चाचे मुख्य दोन उद्देश असतात पहिला कपॅसिटी बिल्डींग थ्रू नॉलेज कॅपिटल. दुसरा उद्देश जो जात्याच हुशार आहे त्याला पैसा कमी पडू नये. यासाठी जनतेच्या पैशांची (किमान काही प्रमाणात तरी) गुंतवणूक अटळच असते. प्रश्न केवळ आकसाचा नाही १००० आयआयआयटीयन्स पैकी ९०० केवळ पाठांतर आणि प्रायव्हेट क्लासेसच्या भरवशावर आयआयटीत पोहोचत असतील तर ते भारतात राहीले काय परदेशात गेले काय भारतातील नॉलेज कॅपीटल ला डायरेक्ट फरक पडत नाही. पण जे खरेच जात्याच हुशार असतात त्या १००च्या ब्रेन ड्रेनचा फरक पडतोच मग त्यांनी परदेशात डोक लावण्याच्या एवजी भारतात लावल असत तर फुल न फुलाची पाकळी फरक पडला असता असे मानावयास जागा शिल्लक राहतेच. जे ९०० परदेशात गेले त्यांनी देशात पैसे वापस पाठवले का नाही सरकारी खर्च वापस केला का नाही एवढाच प्रश्न नाही. भारत सरकारच्या (जनतेच्या पैशाने) शैक्षणिक गुंतवणूकीचे उद्देश कपॅसिटी बिल्डींग थ्रू नॉलेज कॅपिटल. दुसरा उद्देश जो जात्याच हुशार आहे त्याला पैसा कमी पडू नये हे असतील तर त्या उद्देशांना हरताळ फासला जातो याचा आकस असण्या नसण्याशी संबंध नाही. एखादा आय आयआयटियन परदेशात जाऊन तेथील ज्ञान येन केन प्रकारेण भारतात पाठव असेल त्याने केलेल्या संशोधनाने भारतात गुंतवणूक घडून उत्पादन भारतात घडत असेल तर तो भारतात नसून परदेशात असेल तरीही फरक पडत नाही. मी माझ्या पालकांना भारतात माझ्या पालकांना पैसे पाठवले एका घरात गुंतवणूक केली मी माझी आर्थीक परत फेड केली हे एखाद्या सर्वसामान्य अभियांत्रिकी विद्यार्थ्याचे विचार असतील तर ठिक पण तुम्ही राष्ट्रीय संस्थेतून बाहेर पडता तेव्हा खरेतर तुमचा पैसा नव्हे भारताच्या नॉलेज कॅपिटल आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीस तुमचा हातभार काय ? हे महत्वाचे प्रश्न आहेत असे वाटते.

In reply to by माहितगार

ते तुमचं सगळं बरोबर आहे. पण इकडे वातावरण नाही, संधी नाही, किंमत नाही म्हणून जे गळे काढतात त्याच्यावर काय उत्तर आहे?

In reply to by संदीप डांगे

मी तर म्हटल आहे की परदेशात राहूनही भारतात सबस्टँशियली काम करता येईल की, एका आय आय आयटीयनच्या दहा पेटंटांपैकी एक पेटंटच भारताती उद्योजकां देता येइल त्याला इथे कस निपटायच ते इथले उद्योजक बघून घेतील ना पण घेतलेल्या ज्ञानाची आणि वापरलेल्या संधींची परतफेड पैशात नव्हे सबस्टँशियल ज्ञानाच्या परतफेडीने होणे महत्वाचे.

In reply to by माहितगार

अनुभव व ज्ञानाच्या स्वरूपात परतफेड ही संकल्पना उत्तम आहे. फक्त जे इथून कायम बाहेर पडण्याचीच स्वप्ने बघत असतात त्यांच्यात इतका देशभक्तीभाव असला पाहिजे. इंडिया इज थर्ड वर्ल्ड टॉयलेट म्हणून आम्ही पळून आलो असे आभिमानाने सांगणारे बघितले आहेतच.

In reply to by संदीप डांगे

फक्त जे इथून कायम बाहेर पडण्याचीच स्वप्ने बघत असतात त्यांच्यात इतका देशभक्तीभाव असला पाहिजे. इंडिया इज थर्ड वर्ल्ड टॉयलेट म्हणून आम्ही पळून आलो असे आभिमानाने सांगणारे बघितले आहेतच.
जे मनानी भारतीय नव्हतेच ते भारता बाहेर जात असतील तर उत्तमच, त्यांना भारताबाहेर हाकलण्यावरही सरकारने खर्च करावयास हरकत नाही पण परदेशात हाकलण्यासाठी भारतीय संस्थांमध्ये खर्च करून चांगले आंबे नासवण्या पेक्षा देशप्रेम नसलेल्या थर्ड वर्ल्ड टॉयलेट म्हणण्या पर्यंत हिम्मत जाणार्‍यांना मालवाहू नौकांच्या टॉयलेट मध्ये बसवून परदेशात गच्छंती करावी हेच उत्तम.

In reply to by माहितगार

एखादा आय आयआयटियन परदेशात जाऊन तेथील ज्ञान येन केन प्रकारेण भारतात पाठव असेल
हे असे होतचे असते, भारत उगाचच तंत्रज्ञानात पुढे नाही गेला. हे रोजचेच असते. फक्त त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येत नाही.
मी माझ्या पालकांना भारतात माझ्या पालकांना पैसे पाठवले एका घरात गुंतवणूक केली मी माझी आर्थीक परत फेड केली हे एखाद्या सर्वसामान्य अभियांत्रिकी विद्यार्थ्याचे विचार असतील तर ठिक पण तुम्ही राष्ट्रीय संस्थेतून बाहेर पडता तेव्हा खरेतर तुमचा पैसा नव्हे भारताच्या नॉलेज कॅपिटल आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीस तुमचा हातभार काय ?
हा विचार म्हणून ठीक आहे मुळात साऱ्यांना आयुष्यात पैसे कमावायचे असतात, सुखासीन जीवन जगायचे असते. काही अपवाद असतात. आयआयटी मुंबई आणि खरगपूर दोन्ही ठीकाणची स्टार्ट अप इको सिस्टिम चांगली आहे. बरीच मुले भारतात राहत आहेत, अशा कंपन्यात काम करीत आहेत. त्यांच्या बातम्या व्हायला काही वर्षे लागतील.

इकडे वातावरण नाही, संधी नाही, किंमत नाही साहेब हि वस्तुस्थिती आहे. माझा भाऊ एके काळी आय आय टी मध्ये नाव आलेले असताना आवडीचा विषय मिळत नाही म्हणून व्ही जे टी आय मधून इंजिनियर झाला तेन्व्हा त्याला बर्याच लोकांनी सल्ला दिला होता कि अमेरिकेत गेलास तर तुझ्या बुद्धीचे चीज होईल. (त्याला मुळात तेथे जाण्यात रस नव्हताच) परंतु आज हि तो तीन कंपन्या चालवितो त्यात त्याच्या बुद्धीचे काम १० टक्के आहे आणी ९० % वेळ सरकारी कामात आणी कागदी घोडे नाचविण्यात जातो हि वस्तुस्थिती आहे. (पैसे खाऊ घालणे किंवा पटवा पटवी करणे हे रक्तात नसल्यामुळे). आज त्याचे अमेरिकेतील मित्र त्याला हेच सांगत असतात कि तू या फालतू गोष्टीत वेळ घालवतोस जो तुला जास्त चांगल्या कामात लावता आला असता. आज आपण आय आय टी तील इंजिनियरनि काही केले नाही याला शिव्या घालतो त्याचे मूळ कारण वर म्हटल्याप्रमाणे सरकारी यंत्रणेशी कायम झगडण्यात आपला वेळ जातो हे हि आहे. सगळेच आय आय टी यन काही "पैलतीरी" नेत्र लावून बसलेले नाहीत. परंतु जर ते तिथे पैसे कमावत असतील तर निदान त्यांच्यावर झालेला खर्च त्यांनी देशाला परत केला तर त्यात वावगं काही नाही असे "मला वाटते".

In reply to by सुबोध खरे

खरेसाहेब, मुळात त्यांच्यावर होणारा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा ही कल्पनाच अनाठायी आणि आकसपूर्ण वाटते. संस्थेचे जे मूळ कर्तव्य व उद्देश आहे तो पूर्ण होण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मला वाटते. जर लाखो विद्यार्थ्यांमधून काही हजारच निवडले जात असतील तर ते सर्वोत्तम आहेत म्हणून त्या सर्वांकडून एक भारतीय म्हणून माझ्या अपेक्षा असणारच. त्या सर्व हजार विद्यार्थ्यामधून किमान ८०% तरी विद्यार्थी भारताच्या कामी येऊ शकतात. त्यांच्यासाठी योग्य वातावरण निर्माण करायचे सोडून अमेरिकेत जाऊन पैसे छापणार्‍या मुलांवर डोळे वटारणे चूक आहे. तसेही त्यांच्यापेक्षाही हुशार मुले आयआयटीशिवाय अमेरिकेत जात असतीलच. मुळात बाँड वैगेरे सरकारी-बाबू छाप कल्पना आपण सोडून देऊन जे इथे राहतात त्यांच्यासाठी काही विधायक होऊ शकतं का याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आयआयटीच्या मुलांना लाखो-करोडोंची पॅकेजेस मिळतायत अशा बातम्या पेपरमधून येतात पण आयआयटीने काही संशोधन केले, शोध लावले, ब्रेक-थ्रू मिळवला अशा बातम्या वरचेवर येणे आवश्यक आहे. त्या कधीच आलेल्या मी तरी बघितल्या नाहीत. किंवा इतक्या कमी आहेत की आठवतही नाहीत. खुद्द आयआयटी ही संस्था स्वतःला उत्कृष्ट कॅम्पस प्लेसमेंट देणारी (थेट भाषेत प्लेसमेंट एजंसी) अशी म्हणवून घेते, जिथे उत्तम शैक्षणिक वातावरण व संशोधनासाठीचे उत्कृष्ट वातावरण अशी प्रतिमा असायला पाहिजे. सरकारी संस्था असून तद्दन लवली युनिवर्सिटी छाप प्रचार करतात. यावर काय करता येईल हा प्रमुख प्रश्न आहे. कोण किती कमावतं ह्यावर डोळा ठेवणे पोटात दुखण्याचे लक्षण आहे असे वाटते.

In reply to by संदीप डांगे

साहेब हि योजना कमीत कमी २५ वर्षांची आहे. मी ए एफ एम सी तून एम बी बी एस झालो तेथे आपण लष्करात भरती झालात तर आपल्याला शिक्षण शुल्क द्यायला लागत नाही. पण जर सोडून जायचे असेल तर माझ्या वेळेस ७५ ०००/- भरून सोडता येत असे.( तेवढे पैसे माझ्या आईबापांकडे सहज होते) मी ठरवून लष्करात भरती झालो. यात डोळा ठेवणे किंवा पोटात दुखणे हा भाग नाहीच. आता ए एफ एम सी सोडायचे असेल तर ३५ लाख रुपये आहेत. तेंव्हा शिक्षण शुल्क परत घेण्यात गैर काही नाही असे मला वाटते. कारण डोक्यावर बसून कुणाला देशभक्त किंवा समाजसेवक करता येत नाही. तो संस्काराचा भाग आहे. आणी हे संस्कार बालपणापासून हवेत. पाच लाख रुपये आय आय टी च्या क्लाससाठी देणाऱ्या पालकांचीच वृत्ती तशी नसेल तर पाल्याची कुठून होणार. मी मुलावर पाच लाख रुपये गुंतवतोय तर त्याचा परतावा मला पाच कोटी पाहिजे हि वृत्ती असेल तर आपण म्हणताय ते कसे साध्य होणार? मग निदान सरकार जेवढे पैसे गुंतवत आहे ते तरी परत घेण्यात काय गैर आहे? मारून मुटकून वैद्यबुवा बनवण्यात काय हशील आहे?

In reply to by सुबोध खरे

जरी प्रतिसाद तुम्हाला असला तरी तुम्ही तो वैयक्तिक घेऊ नका. तुम्ही जे उदाहरण दिलंय ती व्यवस्था आणि आयआयटी या दोन्ही संस्था, त्यांची कार्ये व उद्देश्य वेगवेगळे आहेत. आपण फक्त सरकार करत असलेला खर्च एवढाच निकष लावत आहात. तुम्ही ज्या संस्थेतून शिकला आहात त्या संस्थेने अत्यावश्यक सेवांसाठी तुम्हाला तयार केलेले असते. सगळं शिकून तुम्ही सहज सोडून गेलात तर तेवढीच मेहनत, पैसा आणि वेळ परत दुसर्‍यावर घालवायला ती संस्था तयार असणे शक्यच नाही. कारण त्या संस्थेचा उद्देश वेगळा आहे म्हणून. आयआयटीचा उद्देश वेगळा आहे. त्याची तुलना इतर अभ्यासक्रम व संस्थांशी करून उपयोग नाही एवढेच मत आहे.

In reply to by संदीप डांगे

:) तुम्ही अमी चर्चा किंवा भांडत बसलोय पण वातावरण आणि संधी निर्माण करण्यासाठी लागणारी पोषक व्यवस्था करणारे अतिहुशार आयएस कारभारी उर्फ सरकारारी बाबू आणि त्यांच्या संगनमताने काम करणारे राजकारणी ह्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही बघा. जोपर्यंत गळ्याशी येत नाही तोपर्यंत भारतात पॉलिसि बदल होत नाहीत. १९९२ साली भिकेले लागलो तेंव्हा सुधाराणा झाल्या. नंतर ठप्प. पुन्हा आता जेंव्हा कंगाल होवून अनेक भीषण प्रश्न तयार होतील तेंव्हा काहीतरी होईल. सध्याचे सरकार युपीए३ आहे असे माझे मत बनत चालले आहे. थोडा फार काय १९-२०चा फरक. मोदिबाबा ह्या बिनडोक सरकारी बाबू लोकांवरच अवलंबून आहे. आणि ते स्वतःचे नुकसान अजिबात करणार नाहीत. ह्या सगळ्या १०००० लायसनसाठी ह्यांच्या हातापाया पडावे लागते हे त्यांना लई भारी वाटते. जोपर्यंत तिथे काम न करण्याला हाकलून दिले जात नाही तोपर्यंत विशेष काही फरक पडणार नाही. म्हणजे आपले जुगाड करत बसायचे. आणि इथे वादावादी करून आपल्या आपल्यातच किल्मिषे तयार करायची.

In reply to by चैतन्य ईन्या

ह्या सगळ्या १०००० लायसनसाठी ह्यांच्या हातापाया पडावे लागते हे त्यांना लई भारी वाटते.
रात्री दारूच्या पार्ट्या कुण्या लायसन मागणार्‍याच्या खर्चाने करीत, नवी लायसन तयार करण्याच्याच चर्चा हे महान लोक करीत असतात. फायर ऑडिट नामक एक नवा आयटम सुरू आहे. ज्या दिवशी तुमच्या आस्थापनेत बांबू येईल, त्या दिवशी कळेल, हे नक्की काय प्रकरण आहे व याचा जनतेच्या सुरक्षिततेशी नक्की काय संबंध आहे.

In reply to by चैतन्य ईन्या

जोपर्यंत तिथे काम न करण्याला हाकलून दिले जात नाही तोपर्यंत विशेष काही फरक पडणार नाही.
कंप्लीटली सहमत. सरकारी नोकरीत घुसल्यावर पहिली गोष्ट शिकावी लागते तिचे २ भाग असतात. १. स्वतःच्या पार्श्वभागास आयर्न प्लेटिंग. २. झाकू एकमेकांची, अवघे धरू सुपंथ. सरकारी नोकरांनी, सरकारी लोकांचे, सरकारी लोकांसाठी बनविलेले काही नियमः सरकारी नोकरांना फक्त सस्पेंड करता येईल, नोकरीतून काढता येणार नाही. ← कुणी ठरवलं? अगदी लाच घेताना पकडून सस्पेंड केलं तरी निम्म्या पगारावर मज्जा मारायला मोकळे ← कुणी ठरवलं? पेन्शन मिळेल ← कुणी ठरवलं? फॅमिली पेन्शन मिळेल. पेन्शर नोकर मेला तरी बायकोच नव्हे, 'धाकटा' डिपेंडंट नोकरीस लागेल तोवर पेन्शन मिळेल ← कुणी ठरवलं? शक्यतो कुणा फ्यामिली मेंब्रास 'कंप्याशनेट बेसिसवर' नोकरीत घ्यावेच लागेल. ← कुणी ठरवलं? पेन्शलाही वेतन आयोग, महागाई भत्ते लागू. ← कुणी ठरवलं? प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी मिळेल. ← कुणी ठरवलं? सरकारी नोकरांनी सरकारी हॉस्पिटलात ट्रीटमेंट न घेता खासगीत गेल्यास 'रिइंबर्समेंट मिळेल' ← कुणी ठरवलं? नुसत्याच सिनिऑरिटीने प्रमोशन मिळेल. काम करा की नका करू. ← कुणी ठरवलं? सही करायचा पगार, अन काम करायची लाच! हे भारतीय शासकीय सेवांचे ब्रीदवाक्य ठरवून टाकण्यास हरकत नसावी. जय हो!

In reply to by संदीप डांगे

खूप मोठ्या प्रमाणात नसल्या तरी आयआयटीत झालेल्या उपयोगी संशोधनांच्या बातम्या पूर्वीपासून वाचत आलेलो आहे. ९० च्या दशकाच्या शेवटीत जहाजवाहतूकीत अन्नपदार्थांसाठी वापरल्या जाणार्‍या इंडस्ट्रियल रेफ्रीजरेशन सिस्टिम्समध्ये लिक्विड नायट्रोजन वापरून व्यावसायिक दॄष्ट्या उपयुक्त बदल करण्याचे यशस्वी संशोधन आयआयटी मुंबईत झाल्याचे वाचले होते.

नारबा मूर्ती कैतरी बोलणार आणि लोकं डोळे झाकून माना डोलावणार. जग बदलणारं संशोधन म्हणजे डैरेक्ट हिग्स बोसॉन, कंप्यूटर वगैरेच अपेक्षित आहे काय? अनेक शोध आपल्याकडेही लागलेले आहेत आणि त्यांचा उपयोगही कमीअधिक प्रमाणात झालेला आहे. इतकी जर पडली असेल तर इन्फोसिस वगैरे कंपन्यांऐवजी एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटला का नाय पैशे देत म्हणावं? मूर्ती क्लासिकल लायब्ररीला पैशे देता येतात तर याला काय झालं? तस्मात असोच.