चुक लक्षात येणे..... (शतशब्दकथा)
"क्रुरसिंहराजा, माझ्याकडून झालेल्या गेल्या दहा वर्षांची सेवा स्मरुण, कृपया माझा मृत्युदंड दहा दिवसांनंतर अमलात यावा, जी शिकारी कुत्र्यांची टोळी माझी लचकेतोड करणार आहे, त्यांच्या सेवेत माझे शेवटचे दिवस जावे" निष्ठारामाने विनवले.
"ठीक…" क्रुरसिंह फुत्कारला
ते दहा दिवस निष्ठारामाने, गजांआडून कुत्र्यांना स्वतः जेवायला वाढले….
मृत्युदंडाच्या दिवशी निष्ठारामाला जेव्हा गजांपलीकडे कुत्र्यांच्या बाजूला ढकलण्यात आले, तेव्हा सर्व कुत्रे त्याला चाटू लागले,
"पाहिलंस क्रुरसिंहराजा, केवळ दहा दिवसांच्या सेवेनंतर जनावरेसुद्धा उपकार स्मरतात, मी तर आपली दहा वर्ष सेवा केलीय" निष्ठाराम म्हणाला
त्याचंक्षणी क्रुरसिंहाला आपली चुक लक्षात आली, मग त्याने आज्ञा फर्माविली, निष्ठारामाला शिकारी कुत्र्यांकडून लाचाकेतोडीने मृत्युदंड देऊ नका …
त्याला आपल्याकडच्या जंगली लांडग्यांसमोर लचकेतोडीसाठी पिंजर्यात ढकला.
वर्गीकरण
आवडली
In reply to आवडली by अमृत
अजून काहीबाही लिहिलंय ते पण चेक करा …
In reply to आवडली by अमृत
@कथेचं शिर्षक वेगळं हवं होतं.
कथा आवडली.
कथा आवडली !!
वा !
मस्त कथा आवडली
मस्त आहे
तुम्ही ही कथा अगोदर कुठे
मस्त!!!
मीसुद्धा दोन महिन्यांपूर्वी