मंडळी,
सध्या आम्ही इंटरनेट वरून कोथरूड परिसरात भाड्याने फ्लॅट शोधतो आहे. 99acres.com किंवा magicbricks.com वर मालक किंवा ब्रोकर असा पर्याय निवडता येतो. पण बर्याच वेळा मालकाला फोन केला तरी तो एक महिन्याचे भाडे ब्रोकरेज म्हणून मागत आहे. हे फार चुकीचे नाही का? स्वत: मालक असताना देखील अशा प्रकारे ब्रोकरेज मागणे हे कोणत्या नैतिकतेत बसते?
दुसरी गोष्ट म्हणजे उठसूट कोणीही येतो आणी ब्रोकर बनतो. २०११ च्या जानेवारी मधली गोष्ट. माझे नुकतेच लग्न झाले होते आणी मी असाच कोथरूड मध्ये फ्लॅट शोधत होतो. माझ्या एका मैत्रिणीला एका भाजीवालीने एका बिल्डिंग मध्ये मोकळा फ्लॅट असल्याचे सांगितले होते. (ती भाजीवाली त्याच बिल्डिंगच्या बाहेर भाजी विकायला बसायची). मैत्रीणीने फ्लॅटच्या मालकाचा नंबर, जो त्यानेच दरवाजावर लिहून ठेवला होता तो मला दिला. नंतर मालकाने स्वत: येउन फ्लॅट दाखवल्यावर, फ्लॅट घेतलात तर मला एक महिन्याचे भाडे (ब्रोकरेज म्हणून) द्यावे लागेल हा अशी काडी भाजीवालीने सोडली. कशाबद्दल? असे मी विचारले तर 'मी सांगितले ना तुमच्या मैत्रिणीला इथे मोकळा फ्लॅट आहे.'
बर मग तुम्हाला जर ब्रोकरेज दिले तर सर्व अग्रीमेंटचे सोपस्कार तुम्हीच करणार का? नंतर काही लफडी, समस्या निर्माण झाली तर आम्ही तुमच्याकडेच यायचे का? तर उत्तर 'नाही. तुमचे तुम्हाला बघून घ्यावे लागेल'. म्हणजे फक्त फ्लॅट आहे म्हणून सांगितले ह्यासाठी ब्रोकरेज हवे होते तिला.
कुणाला एक महिन्याचे, कुणाला दीड महिन्याचे तर कुणाला दोन महिन्याचे भाडे ब्रोकरेज म्हणून हवे. प्रत्येक ब्रोकरची मनाची मर्जी. कसलाच नियम नाही. ब्रोकर चा धंधा करण्याबद्दल काही आक्षेप नाही पण एकंदरीत ह्याबद्दल काही तरी नियम केले गेले पाहिजेत.
वाचने
6137
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं मुद्दा बरोबरंय! पैसे
या बद्दल नियम आहेत पण
सगळा सप्लाय डिमांडचा खेळ आहे.
In reply to या बद्दल नियम आहेत पण by द-बाहुबली
मुंबै मधे जागेचा सप्लाय कमी
In reply to सगळा सप्लाय डिमांडचा खेळ आहे. by अस्वस्थामा
मलाही न पटणारा प्रकार
उत्तम निरीक्षण
In reply to मलाही न पटणारा प्रकार by श्रीरंग_जोशी
एजंट हा उपाय कसा
In reply to उत्तम निरीक्षण by चैतन्य ईन्या
उपायापेक्षा सोय आहे
In reply to एजंट हा उपाय कसा by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to उपायापेक्षा सोय आहे by चैतन्य ईन्या
अगदि अगदि
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
खरंय - अमेरीकेतील रेंटल
In reply to मलाही न पटणारा प्रकार by श्रीरंग_जोशी
नविन साईट
ब्रोकर ही भिकारडी जमात म्हणजे
अपवाद
ऑनलाईन करा