लहान मुलांना जेवणात विविधता दिली कि ते खाण्यासाठी जे त्रास देतात तो देत नाहीत (स्वानुभव आहे) .
कच्ची पपई सलाड साठी आणली होती पण काही न काही कारणाने सलाड बनवायचे राहून जात होते.
मग वीकेंडला वेगळ काही तरी कराव म्हणून फ्रीज उघडला तर पपई समोर दिसली मग ठरवलं काहीतरी नवीन करून पहाव आणि मग सुचल कि थालीपीठ करून पहाव .
खूप सोपी आणि पटकन होणारी पाककृती आहे आणि तितकीच खमंग व खुसखुशीत.
साहित्य :
प्रथम कच्ची पपई व लसूण खिसुन घेणे .
त्यात वरील सर्व साहित्य घालून चांगले मळून घेणे .
अगदी थोडसच पाणी लागत मळताना .
नंतर तव्यावर थालीपीठ थापून घेणे .
वरतून थोडस तेल सोडणे .
खमंग भाजून घेणे .
टोमाटो सौस किंवा दही किंवा हिरवी चटनी सोबत गरमा गरम सर्व करणे .
लहान मुलच नाही तर मोठे सुद्धा आवडीने गट्टम करतील .
- कच्ची पपई लहान आकाराची १
- लसुन पाकळ्या २-३
- हळद १ चमचा
- हिंग १/२ चमचा
- ओवा १ चमचा
- जीरे १ चमचा
- हिरवी मिरची किंवा लाल तिखट ऐच्छिक आहे . (माझ्या लहान मुलासाठी म्हणून मी तिखट वापरले नाही .)
- मीठ चवीनुसार
- बाजरीचे पीठ १ bowl (ज्वारीचे घेतले तरी चालेल )
- बेसन पीठ १/२ bowl
- गव्हाचे पीठ १/४ bowl
वाचने
11710
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
पपई सालासकट किसलीत ना?
टेस्टी दिसतय
पपई सालासकट खिसली का?
आयडिया छान आहे.
In reply to पपई सालासकट खिसली का? by सुघोषा
मस्त पदार्थ. पपईचे धिरडे
आवडल्या गेले आहे,
मस्तच दिसतय
नक्की करुन बघणार.
पाकृ आणि फोटो दोन्ही मस्त!
मस्त
करुन बघते. छान पाकक्रूती.
शुंदल!
पाककृती आवडली आहे
पाकृ आणि फोटो आवडले.
मस्त पाकृ. आणि चटणीची
सुंदर!
छान पदार्थ ...करून पाहण्यात
कच्ची पपई खिसुन साबूदाणा
पाकृ छानच आहे