Skip to main content

कोलंबीची नारळाच्या रसातील कढी

लेखक नूतन सावंत यांनी रविवार, 12/07/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
कोलंबी पुराणाचा दुसरा अध्याय. पहिला कोलंबीची मॉली.ही कढी कधीही करा. फन्ना उडणारच.माझ्याकडे अतिथींचे प्रमाण जरा जास्तच आहे. आम्ही दोघे असल्याने आता स्वयंपाक अजून दोन पाहुणे आले तरी सरतील असा नसतो त्यामुळे चटकन् होणाऱ्या पदार्थांना विशेष पसंती असते माझी. या काधीबद्दल बोलायचं तर विशेष फर्माईश असते आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची. अतिशय कमी साहित्यात होणारी कढीची ही कृती. सगळं घरातच असल्याने फक्त कोलंबी आणली की झालं. कधी कधी तीही फ्रीजरमध्ये असतेच. तर कधी पाहुणे येतानाच तीही घेऊन येतात.तर आता जमवा साहित्य. १.१५ ते २० कोलंबी. . २. दीड चहाचा चमचा आले+लसूण पेस्ट.(हे वाटण माझ्याकडे तयार असते.जितके आले त्याच्या निम्मे लसूण घ्यायचा आणि मिक्सरमधून काढायचे.) ३. १ मध्यम कांदा बारीक चिरून. ४. एका नारळाचे दूध किंवा १ पॅकेट तयार नारळाचे दूध.(मी डाबर होममेड वापरले आहे.) ५. दीड चमचा संडे स्पेशल मसाला.(मी बेडेकरचा वापरला आहे.) त्याऐवजी दीड चहाचा चमचा मिरचीपूड+एक चहाचा चमचा धणेपूड+अर्धा चहाचा गरम मसाला पूड वापरू शकता. ६. अर्धा चहाचा चमचा हळदपूड. ७. २ ते ३ पळ्या तेल. ८. चवीनुसार मीठ. १०. २ ते ३ लसूणपाकळ्या. कृती:- १.नारळ खवून दूध काढून घ्या,१ वाटी आणि ३ वाट्या पातळ.तयार वापरले तर अर्धी वाटी घट्ट बाजूला काढून बाकीच्यात तीन वाट्या पाणी घालून पातळ करा. २. गॅसवर पातेले ठेवून त्यात तेल घालून लसूण ठेचून घालवा.त्यात कोलंबी टाकून मिनिटभर परतून काढून घ्यावी. ३. त्याच तेलात चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा.थोडा लालसर करावा. ४. त्यात हळद पूड ,संडे मसाला टाकून परतावे. ५. पातळ दूध घालून दोन उकळ्या घ्याव्या.. ६. त्यात परतलेली कोलंबी घालावी.त्यामुळे ती लवकर शिजतेच.पण वातडही होत नाही. ७. आता घट्ट दूध घालून मीठ घालून एक उकळी घ्यावी. परत परत गरम करू नये.केल्यास उकळी फुटू न देता करावी नाहीतर नारळाचे दूध फाटून चोथा पाणी होईल. . गरम भात आणि कोलंबीची कढी म्हणजे क्या कहने. सोबतीला पाहुण्यांच्या पोटातली भूक पुरेशी असते. खूप घाईत असताना केल्यामुळे प्रत्येक पायरीचे फोटो नाहीत.

वाचने 9173
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

सुरंगी ताई काय अगं अफाट पाककृती तुझ्या संग्रही आहेत ! तुझ्या सगळ्या मसाल्यांना आणि करीज ना न्याय देणार्‍या भाज्या पण सांगत जा ना जमेल तिथे प्लीज. म्हणजे आम्ही मुळ पाककृती तशीच ठेवुन त्यात भाज्या घालुन आस्वाद घेउ शकु.

मस्तं पाककृती ताई, कोळंबीचे सगळे प्रकार आवडतातच, कोळंबी जीवकीप्राण आहे :) आमच्याकडे कालवणात खवलेला ओला नारळ, लसुण, हळद, चिंचेचे बुटुक, कोथींबीरीचे वाटण लावतात व फोडणीत कांदा परतला जातो. बदल म्हणून कालवणात नारळाचे दूध ही कधी वापरले जाते, तसलाच प्रकार वाटत आहे ही कढी.

दु दु तायडे. आता पुण्यात येताना घेवून ये.

ही कोलम्बीची नारळा च्या रसतलि कढी मी काल करून बघितली. अक्षरश: १० ते १५ मिनिटात झाली, अगदी झटपट. ही आमच्या घरात अगदी हिट झाली. मुलांनी आणि त्यांच्या बाबांनी मिटक्या मारत सगळी कढी सफाचट केली. या मस्तं आणि सोप्या रेसिपी बदद्ल खूप खूप आभार. हा फीडबॅक खरंतर याच पाककृतीच्या खाली द्यायला पाहिजे होता पण तो मी घाईघाईने तुझ्या दुसर्या रेसिपी वरील प्रतिसादामधे दिला.

ताई दंडवत आपणास ........... जमल्यास पाठून द्यावी