✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुणेरी व्यंगशोधक नजर (शतशब्दकथा)

प
पगला गजोधर यांनी
Tue, 07/14/2015 - 12:25  ·  लेख
लेख
'अरे चीलकी नजर होती है हम पुनाइट्सकी', गोल्फकोर्सवर गोल्फ खेळताना पहिला शॉट मारण्याच्या वेळेस तोल सावरता सावरता म्हणालो, 'अरे सिच्युऐशनमधलं व्यंग लगेच पकडतो मी',…… सुपरलक्झरी लाइफस्टाइलचा परीघतूनच त्याला पुढे सांगतच राहिलो,...'आता आज सकाळचंच बघ, ड्रायविंग करताना दुकानाचा बोर्ड पहिला, "मृत्युंजय - सिजनल्स "…. ' 'खिक्क …. ' समोरचा रीस्पॉन्स…. 'आई वडिलांचा आर्शिवाद…… "आ.र.शी.वा.द" बरका, 'रेहमतअली- दुर्वेश' … आशीर्वाद, दरवेश असं पावलांपावलांवर व्यंग सापडतं' हिरव्यागार गालीच्यासारखे आऊटफिल्ट, डोंगरदऱ्या, उंचउंच झाडे, ओढे, वाळूंचे पॅचेस, नीरव शांतता आणि मध्येच पक्ष्यांची किलबिल अशा आल्हाददायक वातावरणात आमच्या चाळीशीच्या गर्भश्रीमंताच्या खेळाचे शॉट होलमध्ये जात होते, तर बाजूला आठ दहा वर्षांची मुले गोल्फबॉल कलेक्ट करण्याची पोटापाण्याची ड्युटी मान खाली घालून करत होती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शब्दक्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5671 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

तुम्ही कधी गोल्फकोर्सवर गेलाय

एस
Tue, 07/14/2015 - 12:38 नवीन
तुम्ही कधी गोल्फकोर्सवर गेलाय का? या तथाकथित पुणेरी नजरेची माणसे आणि 'खिक्क' असा प्रतिसाद देणारे त्यांचे सवंगडी तिथे कधीतरी सापडतील का? आणि अजून एक. गोल्फ बॉल गोळा करायला तिथे अशी आठ-दहा वर्षांची मुले नसतात. तिथे कॅडी म्हणून काम करणारे तरूण हे बॉम्बे सॅपर्सच्या आजूबाजूच्या वस्त्यांमधील, येरवडा इथले असतात. कथा वास्तवाशी जुळत नाहीच, ते सोडूनही शतशब्दकथा हा फॉरमॅट ही ती पुरेशी पाळत नाही. नाही आवडली. तुमच्या इतर कथा, लेख इत्यादींच्या दर्जापेक्षा बरीच कमी अशी वाटली. पुलेशु.
  • Log in or register to post comments

दिलपे मत लो सर

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 13:04 नवीन
काल्पनिक आहे कथा. पुढच्या वेळी मी आणखी जास्त प्रयत्न करेन कथा लिहिताना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ह्या:... नाय जमलं.

आदूबाळ
Tue, 07/14/2015 - 12:43 नवीन
ह्या:... नाय जमलं.
  • Log in or register to post comments

स्वतःला पुनाइट्स म्हणणारा

मृत्युन्जय
Tue, 07/14/2015 - 12:56 नवीन
स्वतःला पुनाइट्स म्हणणारा पुणेकर असुच शकत नाही. शतशब्दकथा वास्तववादी नाही ;)
  • Log in or register to post comments

अजिबात नाही आवडलं. तुम्ही

अनुप ढेरे
Tue, 07/14/2015 - 13:43 नवीन
अजिबात नाही आवडलं. तुम्ही सिनेमा नाटक बघताना असा विचार करता का?
  • Log in or register to post comments

?

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 14:00 नवीन
लेख आवडला नाही हे कळलं, पण तुमचा पुढचा प्रश्न कळाला नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

मला पण नै कळला दुसरा प्रश्न.

जडभरत
Tue, 07/14/2015 - 14:38 नवीन
मला पण नै कळला दुसरा प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

पुणेरी

कपिलमुनी
Tue, 07/14/2015 - 13:45 नवीन
सदर शब्द कॉपीराईटेड असून केवळ नदीच्या अलिकडल्या लोकांच्या संदर्भात वापरावा
  • Log in or register to post comments

गोल्फ मुळे त्या तरुणाना

विजुभाऊ
Tue, 07/14/2015 - 14:11 नवीन
गोल्फ मुळे त्या तरुणाना रोजगार मिळाला हे वास्तव का दुर्लक्षीत करताय. अर्थात कथा जमलेलीच नाही त्यामुळे इतर सर्व मुद्दे डीबार ठरतात
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 14:17 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, पण मी या काल्पनिक कथेत ८-१० वर्षांची 'मुले'(पक्षी: बालकामगार) योजले आहे, आपण उल्लेखल्या प्रमाणे 'तरुण' नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आहे-रे वाल्यांना गिल्ट

बॅटमॅन
Tue, 07/14/2015 - 14:18 नवीन
आहे-रे वाल्यांना गिल्ट काँप्लेक्स देऊन वाहवा मिळवणे इतकाच हेतू असलेले लेखन आता जुने अन शिळे झाले.
  • Log in or register to post comments

वाहवा

कपिलमुनी
Tue, 07/14/2015 - 14:26 नवीन
१.गिल्ट काँप्लेक्स २. शाळा , कॉलेजचा नॉस्टेल्जिया ३. थोर थोर संगीतकार, तीच ती जुनी गाणी यांचे कौतुक ४. उगीचच दर २-३ वाक्याला शाब्दिक कोट्यांचा अट्टाहास असलेले विनोदी (?) लेखन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मुनिवर्य

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 14:35 नवीन
आपल्या या प्रतिक्रियेनंतर, आपला फ्यानच झालो आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

दवणिय र्हैले ;)

टवाळ कार्टा
Tue, 07/14/2015 - 14:49 नवीन
दवणिय र्हैले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धन्यवाद

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 14:28 नवीन
लेखामागच्या विषयाशी सुसंगत असलेल्या (जरी प्रतिकूल असली तरी) प्रतिक्रियांमधलि आपली प्रतिक्रिया आहे. नशीब माझे की मिपावर आपल्यासारखे विचारपूर्वक प्रतिक्रिया देणारे आहेत, नाहीतर मुपीसारख्या ठिकाणी लगेचच एखाद्याने जातीवाचक वळण लावलं असते इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे चीलकी नजर होती है हम

तुडतुडी
Tue, 07/14/2015 - 14:55 नवीन
अरे चीलकी नजर होती है हम पुनाइट्सकी>> पक्का पुणेकर असलं वाक्य उच्चारणं शक्य नाही
  • Log in or register to post comments

नै ते ठीकाय

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 15:00 नवीन
पक्का पुणेकर कुठे कधी कसा काय बोलेल, याची काही नियमावली आहे का ? कोणी मास्टरी केली आहे त्यावर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

एखाद्या कट्ट्याला भेटा, मग

सूड
Tue, 07/14/2015 - 15:56 नवीन
एखाद्या कट्ट्याला भेटा, मग सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

ऑके

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 16:03 नवीन
जरूर … वल्ला क सुक्का कट्टा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खिक्क...मला पण बोलवा रे..

टवाळ कार्टा
Tue, 07/14/2015 - 16:13 नवीन
खिक्क...मला पण बोलवा रे...व्हिडो शुटिंग करेन म्हणतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कट्टा

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 16:23 नवीन
वल्ला कट्टा असल्यास, व्हिडो शुटिंगवाल्यांना सुक्क राहावं लागतंय बगा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चालेल की...सूड समजावतोय आणि

टवाळ कार्टा
Tue, 07/14/2015 - 16:25 नवीन
चालेल की...सूड समजावतोय आणि तुम्ही ऐकताय असा व्हिडो काडायचा हाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

;)

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 16:35 नवीन
पहिली गोष्ट, पुण्यात ऐक पुणेकर सांगतोय व दुसरा ते निमुटपणे ऐकतोय, असं तुम्ही फारच वैयक्तिक श्रद्धा ठेवून बोलताय अस मी मानतो. दुसरी गोष्ट, दोन पुणेकरांमधले संभाषणाचे व्हिडो शुटिंगसाठी केवढा मोठ्ठा कँन्वास कवर करावा लागेल टकाभौ तुम्हाला …. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा
Tue, 07/14/2015 - 16:38 नवीन
खिक्क रच्याकने सूडला पुणेकर पुणेकर मानतात? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

;)

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 16:55 नवीन
आता मला काय माहित ते पुणेकर आहेत की नाही ते ! १. त्यांचे नाव एकदम जाज्वल्य वाटलं (पुणेकरपणाची ऐक अट ) २. मी काही पुणेविषयक शंका विचारल्यावर, त्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे ('जा घाश्या केला तुला कोतवाल' च्या चालीवर) मला कट्ट्याचे आमंत्रण दिले (पुणेकरपणाची अजून ऐक अट ) त्यावरून तर माझा असा ग्रह झाला बुवा …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अशे एकदा मैदानात या हां, मग

सूड
Tue, 07/14/2015 - 17:01 नवीन
अशे एकदा मैदानात या हां, मग बोलू आपण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

:)

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 17:09 नवीन
अहो सूडपंत असे टकाभौंनी टाकलेल्या काडीने पेटू नका हो. बाकी तुम्हाला जे सांगायचे आहे ते आपण बेडेकरांची मिसळ खाताना चर्चेला घेऊच की…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@त्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे (

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/14/2015 - 17:05 नवीन
@त्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे ('जा घाश्या केला तुला कोतवाल' च्या चालीवर) मला कट्ट्याचे आमंत्रण दिले (पुणेकरपणाची अजून ऐक अट ) त्यावरून तर माझा असा ग्रह झाला बुवा …>>> वार'करी आळंदीत आला,की त्याची पावर वाढती! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

वार'करी आळंदीत आला,की त्याची

सूड
Tue, 07/14/2015 - 17:11 नवीन
वार'करी आळंदीत आला,की त्याची पावर वाढती!
बरोब्बर!! तुम्हाला नाय एखादी चांगली कविता दिसली की परसाकडली विडंबनं सुचतात, तसंच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

;)

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 17:32 नवीन
वार'करी आळंदीत आला,की त्याची पावर वाढती! ;)
मिन्त्रो मै यहां आया नही हुं, मुझे मुळा-मुठा-इंद्रायणी मैय्यांओने बुलाया है…।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कधी कर्ताय?

विजुभाऊ
Tue, 07/14/2015 - 16:13 नवीन
कधी कर्ताय?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा