मुखी नाम विठ्ठल, गळा तुळशीमाळा,
वाहतो प्रवाह ओलांडून काळा,
चाले रीघ आता, सुखाच्या शोधात ,
रूढीचे आवर्तन की भाव भोळा ,
उसळती अंतरी, कैक सलतात व्यथा ,
मनातून पाहती पंढरीच्या नाथा
असे रान तान्हे परी फुटे जीवा पान्हा,
समूहाची धुंदी नादावते माथा,
लाख शंका मनी, परी पाहता या जना
पेशीतून वाजे मृदुंग नी वीणा
मन माझे डोले, पडती तालात पाउले
रक्तातून वाहे द्वारकेचा राणा
- शैलेंद्र
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5404
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
धन्यवाद
In reply to छान by तुडतुडी
अगदी वेळेवर आणि छान !
धन्यवाद राम कृष्ण व विट्ठल या
In reply to अगदी वेळेवर आणि छान ! by कंजूस
वाहतो प्रवाह ओलांडून काळा,
सामुहीक उपासनेचे जसे फायदे
In reply to वाहतो प्रवाह ओलांडून काळा, by जडभरत
राम कृष्ण व विट्ठल या
छान माहिती
In reply to राम कृष्ण व विट्ठल या by तुडतुडी
अवांतर आहे पब विचारतो
हा रंगाचा गोंधळ ह्याच
In reply to अवांतर आहे पब विचारतो by द-बाहुबली
होय रंगाचा गोंधळ आहेच पुन्हा
In reply to हा रंगाचा गोंधळ ह्याच by जडभरत
ओहो
पडतो रे अधुनमधुन )
In reply to ओहो by स्पा
छान कविता , द्वारकेचा राणा
ते गीत मीही ऐकलय , सुंदर
In reply to छान कविता , द्वारकेचा राणा by कविता१९७८
विट्ठल आणि श्रीकृष्ण ही
कविता आणि मनोगत आवडलं.
In reply to विट्ठल आणि श्रीकृष्ण ही by शैलेन्द्र
सुंदर!
धन्यवाद पैसाताई
In reply to सुंदर! by पैसा
छान आहे कविता.आवडली.
अतिशय सुंदर आणि लयबद्ध .
धन्यवाद अजया आणि मनीषा..