आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला
लेखनविषय:
काव्यरस
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला
तेव्हां
चर्चिल घासलेटच्या साठ्यावर
फणा काढून उभा होता
मी मार्क्सला म्हटलं
पेटवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी माओचीही राख झाली
आता इंद्रायणीतून
भिजलेली गारगोटी काढून त्यावर
अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय
मात्र उजवीकडून येणारा
मुसळधार भगवा पाऊस म्हणाला
रांडेच्या, बघतोच तुला
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना
पुरूष कानात कुजबुजला
माणसं पेटवतोस का ?
गॅस सिलिंडर्स देईन, फुकटात
लागतील तेव्हढे !
फक्त त्या आगीत घाल
सगळे ज्वलनशील ग्रंथ
आणि माझं सूक्तही
माझा नाईलाज झालेला
सांगायला पाहीजे का ?
वाचने
12614
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
___/\____
.
कविता पोचली. नव्वदच्या दशकास
कं लिवलयं
अफाट!
__/|\__
लोल. तुम्हाला "छटाक शरदिनी"
In reply to लोल. तुम्हाला "छटाक शरदिनी" by आदूबाळ
हा हा हा, इंडीड.
In reply to हा हा हा, इंडीड. by बॅटमॅन
खरयं
In reply to लोल. तुम्हाला "छटाक शरदिनी" by आदूबाळ
खिक्क. ....
In reply to लोल. तुम्हाला "छटाक शरदिनी" by आदूबाळ
हा हा हा
चूल पेटवा की
स्टोव्ह पळवला म्हणता... हायला
वाह!!!!
ऊंsssssउंब,उंब, भुब्बुक!
अावडली कविता!
स्टोव्ह पळवला?
In reply to स्टोव्ह पळवला? by पैसा
लग्नाळलेला संसारी गृहस्थ काय
In reply to लग्नाळलेला संसारी गृहस्थ काय by खटासि खट
लग्नात लाजा होम काय स्टोव्ह
In reply to लग्नात लाजा होम काय स्टोव्ह by विजुभाऊ
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
जवळपास सगळंच बिंग फोडलं की.
बूर्झ्वा.............
जबराट ! आजच्या काळालासुद्धा
बुद्धीला न पेलवल्या जाणारे
मस्त , पोचलेली कविता
सहीच आहे !!!
चटका लागेल असं वास्तव !
आवो दादा...
कविता मरो, हे बूर्झ्वा काय
In reply to कविता मरो, हे बूर्झ्वा काय by सूड
अरे?...
In reply to अरे?... by ज्ञानोबाचे पैजार
बघा ना. अगदीच
In reply to बघा ना. अगदीच by आदूबाळ
बास का राव, सांगा की आता!!
In reply to बास का राव, सांगा की आता!! by सूड
कम्युनिश्टांच्या म्यानिफेस्टोप्रमाणे
In reply to कम्युनिश्टांच्या म्यानिफेस्टोप्रमाणे by पैसा
स्पेलिन्ग लिवा पाहु बूर्झ्वा
In reply to स्पेलिन्ग लिवा पाहु बूर्झ्वा by आनंदी गोपाळ
हेहेहे!
In reply to हेहेहे! by पैसा
मला ऑल्रेडी येतंय :P
वाह. कॉंग्रेस सरकारवरची ही
दाहक..
In reply to दाहक.. by चिगो
एक दृश्य डोळ्यासमोर आलं.
In reply to एक दृश्य डोळ्यासमोर आलं. by प्यारे१
ही ही ही..
In reply to ही ही ही.. by चिगो
अस्लं असतंय व्हय कलेक्टर
In reply to अस्लं असतंय व्हय कलेक्टर by अस्वस्थामा
असं म्हणतात ब्वॉ..
In reply to असं म्हणतात ब्वॉ.. by चिगो
आमी सूर्यवंशम् मधे बघलो होतो.
In reply to आमी सूर्यवंशम् मधे बघलो होतो. by प्यारे१
आमी सूर्यवंशम् मधे बघलो होतो.
In reply to आमी सूर्यवंशम् मधे बघलो होतो. by अस्वस्थामा
आता घ्या मग...अजूनही सुरु
कविता शांतपणे वाचल्याबद्दल
अगगागागा!!
In reply to अगगागागा!! by शब्दबम्बाळ
एक नंबरचा नालायक माणूस !
जबराट कविता.
..
खट खट खट