Skip to main content

मतदान करताना मतदाराने नेता बघुन मत द्याव की पक्ष बघुन?

Published on मंगळवार, 02/12/2008

वाचन संख्या 776
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

तज्ञ सल्ला देतीलच.. बाकी माझ्या मते
मतदाराने नेता बघुन मत द्याव
चांगल्या पक्षातील फालतु नेता तुमचा प्रतिनीधी म्हणून तुम्हाला चालेल का? तो तुमच्या क्षेत्रातील प्रश्न सोडवू शकेल का? आणि जर असे अनेक चांगले लोक निवडून गेले तर सरकार आपोआप चांगल्या लोकांच बनेलच (निदान आता आहे त्यापेक्षा चांगलं) :) -(गोंधळलेला) ऋषिकेश

ऋषिकेशला अनुमोदन. समजा, मला एक पक्ष आवडतो आणि त्याची धोरणं चांगली आहेत (थोडा (??) कल्पनाविलास आहे खरा पण समजा अस म्हणलच आहे की) पण त्यानी माझ्या मतदारसंघात उभा केलेला उमेदवार हा प्रचंड भ्रष्टाचारी किंवा आणि खुनी किंवा आणि सामजिक जाण नसलेला किंवा आणि विकासकाम करण्यासाठी कुचकामी असलेला असेल तर मी त्याला का मत द्याव?? जर त्याच्यापेक्षा दुसरा चांगला उमेदवार असेल तर त्याला का देउ नये???? माझ्या माहितीतील एक उदाहरण सांगतो. पन्हाळा तालुक्यात काहि गाव आहेत. तशी फारशी दुर्गम भागात नाहीत. (कोल्हापुरपासुन जास्तीत जास्त तीस किमी) पण कधीच रस्ते तिकडे बनवलेच नाहीत. खडीचा कच्चा रस्ता होता फक्त. त्यामुळे त्या गावात दुचाकीच काय सायकल देखील कोणी विकत घेत नसे. एकच यष्टी जात असे वस्तीची. ती देखील फक्त उन्हाळा आणि हिवाळा. पावसाळ्यात त्या रोड वर ४ व्हील ड्राइव्ह जिप्सी तरी चालेल का अशी शंका येइल अशी अवस्था असायची. तर त्या आणि त्याच्या आजुबाजुच्या अनेक गावातील मतदान अगदि डोळे झाकुन केल्यासारख हाताच्या पंज्यावर. आमदार होते यशवंत एकनाथ पाटिल. सलग पाचवेळी निवडुन गेलेला हा माणुस एकदाहि प्रचार करण्यासाठी ह्यातील एकाहि गावात गेला नसेल. रस्ते करणं तर लांबची बात. प्रत्येक निवडणुकीच्या आधी गावकरी रस्त्याची अवस्था सांगायला गेले कि करु हे आश्वासन. झाल. हीच चुक त्याना भोवली. आताशा नवीन पिढी शहाणी झाली होतीच. त्यानी अंदाज घेतला आणि त्या गावात जीपने नाहीतर तर चालत प्रचारासाठी आलेले विनय कोरे निवडुन आले. त्यानी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतगत त्या गावात रस्त्याची व्यवस्था लावली. आता तेच निवडुन येत आहेत नेहमी. अवांतर : मी केलेल पहिलच मतदान. लोकसभा आणि विधानसभा दोन्हीच्या एकत्रीत निवडणुका. विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे (की राष्ट्रवादी हे नक्की आठवत नाहिये. कारण तेव्हा साहेबांचा राष्ट्रवाद जागा झाला होता की नाही हेच आठवत नाही) दिग्वीजय खानविलकर याना मत दिल होत. कारण त्यानी त्यावेळेपावतो केलेली विकासकाम. त्यावेळी पक्ष कोणता हा मुद्दा गौण ठेवला मी. आणि लोकसभेसाठी मात्र सदाशिवराव मंडलिक याना मत न देता त्यावेळी एक रिटायर्ड मेजर उभे होते शिवसेनेतर्फे त्याना दिल होत. खानविलकर आले होते निवडुन. पण लोकसभेसाठी मी मत दिलेली व्यक्ती नाही आली निवडुन. असो. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

मला वाटते नेता आणि पक्ष ह्यांच्यात समतोल साधता आला तर उत्तम . कारण नेत्याचे व्यक्तिगत समाजकारण, स्वच्छ चारित्र्य, आपल्या प्रभावक्षेत्रातील मतदारांच्या गरजांचे पक्के ज्ञान हे कळीचे मुद्दे असतात तसेच पक्षाची ध्येयधोरणे, ज्यांच्या चाकोरीत नेत्याला निर्णय घ्यावे लागतात, तीही तितकीच महत्त्वाची असतात. जसे महाराष्ट्रातील राजकिय पक्षांनी मराठी माणसावर अन्याय होईल अशी धोरणे राबवू नयेत. राष्ट्रीय स्तरावर आपले राजकिय नुकसान होईल ह्या विचारांनी जर पक्षाची धोरणे परप्रांतिय धार्जिणी असतील तर नेता कितीही 'लायक' असला तरी तो पक्षाच्या धोरणांविपरित निर्णय घेऊ शकणार नाही. तसेच, पक्ष कितीही समाजकारणावर, राष्ट्रीय एकात्मतेवर भर देणारा असला तरी एखाद्या लाटेवर आरूढ होऊन निवडून येणार्‍या निष्क्रिय नेत्यामुळे मतदारांचे/देशाचे नुकसानच अधिक होऊ शकते. विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी मतदान करताना वेगवेगळे निकष वापरावे लागतात, असे मला वाटते. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!