पहिला पाऊस पडला की,एखाद्या आठवड्याभरात बाजारात शेवळं दिसू लागतात.त्यासोबत काकडंही. मातकट,किरमिजी रंगांच्या साधारण सात ते आठ इंची जणू एखाद्या फुलाच्या कळ्याच जणू.एखादीतून तिचा पिवळसर कोंब,एखादीतून चक्क जांभळा कोंब दिसतोय. साधारण आठवडाभरच निसर्गाचे हे नवल पाहायला मिळते आणि पुढची आठ/दहा दिवसात अंतर्धानही पावते. एरवी भाजीच्या तजेलदार रंगरुपाबाद्द्ल चोखंदळ असणारी मी या मातकट,किरमिजी भाजीच्या दर्शनाने खूष होते.भाजीवालीला दर विचारते. नेहमीपेक्षा चढाच दर असतो या भाजीचा.एका जुडीत पाच किंवा सहा नग. आणि एका जुडीची किंमत ती कधीच सांगत नाही.”पन्नासला तीन”,तिचा आवाजही आज बदललेला.भावासारखाच चढा.
“अग, काय काहीही.”मी गुळमुळीतपणे.
“मग,मीच चार घेतल्यात पन्नासला,आता एवढ्या पावसात बसायचं तर मला तेवढे नकोत का ?”
भाजीवालीचा आवाज अजून चढाच.
“हो ग,पण नेहमीच्या गिर्हाईकाला समजून द्यायला हवं की नाही?”अजूनही माझा आवाज खालीच.”बोल काय भावाने देणार नक्की बोल.”
इतक्यात दुसरं कोणी गिर्हाईक तिथे येतं,आता मी हातात घेऊन निरखत असलेल्या जुडीला पाहून विचारतं,”कसली आहे हो भाजी?”मी आता माझ्याच नादात भूतकाळात पोचलेली असते.पाहिलांदा ही भाजी कधी पहिली आणि कधी खाल्ली ते आठवत असते.माझ्या माहेरी एकूण २८ बिऱ्हाडांची बिल्डींग.माझ्या जन्माच्या आधीपासून सगळे एकत्र राहणारे.कोणाचेही पोर कोणाच्याही घरात शिरून जेवायचे ते दिवस. काही घरांमध्ये तिसऱ्या पिढीची लागणे झालीयत.अजूनही तिथे हेच वातावरण आहे.
मी लहान होते तेव्हा पासून शेजारच्या पाटील काकांची - त्यांना सगळे बंधू म्हणत - बहीण मढहून ही भाजी आणून करीत असे.आत्या सुगरण तर होत्याच पण आम्हीही त्याची भाचरुंडे असल्यासारख्याच ही नवलाईची भाजी खायला आम्हालाही बोलवत असत.या आठवणीत बुडालेली मी, त्या जुडीकडे बघत उत्तर देते.”शेवळाची.”प्रतिप्रश्न येतो. ‘’कशी करतात?”. आता मी त्यांना ती भाजी कशी करायची हे सांगताना साफ करायची हे सांगू लागते ते ऐकून, “अरे बापरे, मग हा बाकीचा कचराच का?यातून किती भाजी निघणार?”असं म्हणत,’वेडीच दिसतेय’,असा कटाक्ष टाकत त्याला हवी असलेली भाजी घेऊन निघून गेलेलं असतं.
भानावर येत मी पुन्हा जरा मोठ्याने विचारते,”अग,बोल ना?”
“किती घेणार?”आता भाजीवालीचा आवाज थोडा कमी झालेला.
“ऐकलंस ना आता,किती कचरा निघणार ते? म्हणजे १०-१२ जुड्या तर हव्यातच.नीट समजून सांग बरं भाव.” आता मी अजून मोठ्याने बोलते.
“घ्या तर पन्न्साच्या चार.” भाजीवाली उदारतेचा आव आणून.
पण मी कसली खट.”नाही हं पन्नासच्या पाच दे,नाहीतर नको बाई.एकत्र या भाजीचा टाटोप मोठा.न् इतकी महाग नेऊन परवडली तर पाहिजे.”माझा आविर्भाव पाहून भाजीवाली मला,’घ्या तर ’असे सांगून पिशवीत दहा जुड्या भरते वर दोन जुड्या टाकते नि म्हणते.”वैनी मलापण थोडी भाजी द्याल का चाखायला?ठराविक लोकच ही भाजी नेतात.पण त्यांना सांगायची लाज वाटते.”मी हसून कबूल करते.”पण आज काही ही भाजी व्हायची नाही,उद्या करीन आणि पाठवीन हं” म्हणत मी निघते.
ती पुन्हा काकडांची आठवण करते. ही काकडं म्हणजे पण निसर्गाची एक कामालच.या खाजरया भाजीच्या वेळी ही फळं तयार झालेली असतात. डोंगरी आवळ्याची लहान आवृत्ती जशी देसेल तशीच हिरवट पोपटी दिसतात.पण बिया मात्र गोल असतात.आवळ्यारख्या कंगोरेदार नसतात.पण चवही तशीच लागते.ज्या आद्य रांपिणीने त्याचा उपयोग सर्वप्रथम केला असेल तिला आणि तिच्या कल्पनाशक्तीला साष्टांग नमस्कार. ती दुसऱ्यापिशवीत काकडं घालून देताना मी सांगते.”अग नकोत,मी चिंच वापरते.”कारण ही काकडं ठेचा,त्याच्या बिया काढा.मग वाटून त्यांचा रस काढा.ही पायरी गाळायला मला माझ्या एका वहिनीच्या आईने शिकवलीय.तेवढाच कमी खटाटोप.
घरी आल्यावर इतर स्वयंपाक उरकून जेऊन निवांत मी आणलेली शेवळं घेऊन बसते.ही भाजी अशी दिसते.
वरच्या फोटोत दिसणारा मधला कोंब काढून त्याच्या खालच्या भागावर दिसणारा जर्द पिवळा किंवा कधी केसरी,कधी लालसर
भाग आणि त्यावर असणारा क्वचित् खसाखशीसारखे दाणे असणारा भाग कडून उरलेला भाग घेते.आणि पाण्यात घालून स्वच्छ धुऊन घेते.
आता चिरण्याचे काम,अतिशय बारीक चिरून भाजी पुन्हा चाळणीत घालून धुवून घेते. एव्हाना संध्याकाळ होत आलेली असते.आता ही भाजी बुडेल इतके पाणी पातेल्यात घेऊन त्यात घालते.त्यात एक चमचा कोकम आगळ घालते.झाकण ठेऊन रात्रभर तशीच ठेवते.याचे कारण म्हणजे या भाजीला भयंकर खाज असते.तिचा सर्वात सुंदर दिसणारा भाग टाकून द्यावा लागते ते तेवढ्यासाठीच.
दुसऱ्या दिवशी सकाळी निथळून घेऊन कढईत.दोन तीन पाळ्या तेल घालून त्यात भाजी टाकून इतर कामाला सुरवात करते.मध्ये मध्ये भाजी ढवळत रहाते.चर्र.....चर्र आवाज येतच असतो,हा आवाज बंद होत नाही तोपर्यंत भाजी ढवळणे सोडत नाही.जेव्हा हा आवाज बंद होईल तेव्हा परतणे थांबवते.आता कुठे ही भाजी पुढच्या संस्कारासाठी तयार झालेली असते.अशी परतण्याची क्रिया करण्याची टिप जाईवहिनींच्या आईची. ही पायरी खूप काळजीपूर्वक करते कारण त्यामुळे भाजी अजिबात म्हणजे अजिबात खाजत नाही.
एव्हाना नवरा मटणखिमा घेऊन आलेला असतोच. या भाजीची पण गम्मतच.शाकाहारी जितकी छान लागते तितकीच मांसाहारीही.खिमा घालून करा;कोलंबी घालून करा;सोडे घालून करा;करंदी घालून करा’किंवा हरभरा डाळीचा भरडा घालून करा;वालाचे किंवा मुगाचे बिरडे घालून करा, ती मस्तच लागणार.तुम्ही ती कशीही करा पण आता मात्र मी मटणखिमा घालून ही भाजी करायला घेते.तुमच्यासाठी पुढे कृती देते आधी.
साहित्य:-
१. एक वाटी परतलेली शेवळाची भाजी.
२, एक वाटी मटणखिमा. (कोलंबी वापरल्यास लहान आकाराचीच वापरावी.सोडे वापरल्या तासभर भिजवून लहान तुकडे करून वापरावेत.भरडा किंवा वाल वापरल्यास अर्धी वाटी भरडा भिजवून वापरा.तो भिजून दुप्पट होतो.वालाचे किंवा मुगाचे बिरडे मात्र जेवढयास तेवढे घ्यावे.)
३. दीड चहाचा चमचा आले +लसूण+मिरची +कोथिंबिरीचे वाटण. हे माझ्याकडे तयार असते.त्यासाठीचे प्रमाण,अर्धी वाटी आले सोलून त्याची चाकत्या+१ वाटी सोललेला लसूण+दोन मिरच्या+वाटीभर कोथिंबीर.
४. दोन मध्यम कांदे. बारीक चिरून आणि एका कांदा जाड उभा चिरून
५. अर्धी वाटी खवलेलं खोबरं
६. खडा मसाला-५/६ काळी मिरी,अर्धा इंच इंचदालचिनी तुकडा,दोन लवंगा,हरभरा डाळीएवढा जायफळ तुकडा.छोटा तुकडा हळकुंड,एक चमचा धणे,चवीनुसा र८-१० सुक्या लाल मिरच्या.मी ७ ते ८ वापरते.एक तमालपत्र(हकुंड आणि जायफळतुकडा यांच्याऐवजी मी दोन्हीची पावडर वापरली आहे.)
७. तेल.
८. मीठ.
९.. आले+लसूण पेस्ट १ चहचा चमचा
१०. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर.
११. चिंचेचा कोळ दोन चहाचेचमचे.(एच्छिक) (घालायचं असेल तर शेवठ्च्या उकलीआधी घालावा.)फोटो नाही.)
कृती:-
१. खिमा धुऊन त्याला आले+ लसूण+ मिरची +कोथिंबिरीचे वाटण चोळावे आणि तासभर ठेवावे.
२. जाड कापलेला कांदा थोड्या तेलावर भाजून घ्यावा.त्यातच खोबरे टाकून भाजावे.हेधोन्ही भाजले की मध्ये थोडी जागा करून थोडे तेल टाकून तमालपत्र वगळतासगळा खडामसाला मसाला मिर्च्यांसह घालून वर अर्धी कोथिंबीर घालून त्यावर कांदा खोबऱ्याचे आच्छादन करून गॅस बंद करावा.थंड झाले की मिक्सरमधून बारीक वाटावे.
३. आता ज्यात भाजी परतलेली ती कढई गॅसवर ठेवावी.कढईत तेल असतेच. हवे असल्यासच थोडे तेल घालून चिरलेला कांदा घालून परतावे.
४. खिमा घालून परतावे.खिम्याचा रंग बदलला की दोन वाट्या गरम पाणी घालून शिजू द्यावे.
५. खिमा शिजला की परतलेली भाजी घालावी.वाटण घाल मिक्सर धुऊन मसाल्याचे पाणी घालावे.लागल्यास अजून थोडे गरम पाणी घालावे.
६. दोन चार उकळी घेऊन उतरावी.अंगासरसा रस ठेवावा.वर काथिंबीर पेरून सादर करावी.
७.वडे किंवा पुरी, चपाती,भाकरी(तांदूळ किंवा ज्वारी)सोबत वाढावी.
या भाजीची नाजुकता पाहिली तर वडे किंवा पुरीच हवी,पण माझी आवड भाकरी.
भाजीवालीचा वाटा दोन भाकरींसोबत पोचवून मी जेवायला बसते आणि केलेल्या खटाटोपाला न्याय देते.जोडीला आत्यांची आठवण असतेच.
वाचने
28897
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ....
चांगलीच घाटा वाटायची भाजी
जबरदस्त दिसतीये भाजी.
@ पंचेंद्रियांच्या आस्वादाचे
In reply to जबरदस्त दिसतीये भाजी. by आदूबाळ
शेवळांची अगदी साग्रसंगीत
अहाहा!
पावसाळा..
काय बात हैं सुरंगीताई! खूप
सुरन्गीजी खुपच छान माहिती
कं लिवलंय!कं लिवलंय!मस्त मस्त
मस्त लिहिलय ताई!
या भाजीविषयी थोडसं:
कांद्याच्या पातीसारखी पाती
In reply to या भाजीविषयी थोडसं: by सतिश गावडे
टाकळा अफलातून असते राव. आधी
In reply to कांद्याच्या पातीसारखी पाती by सूड
टाकळा आणि फोडशी आवडती. कधी
In reply to टाकळा अफलातून असते राव. आधी by सतिश गावडे
"स्वयंपाक घरातील विज्ञान"
In reply to या भाजीविषयी थोडसं: by सतिश गावडे
करून बघण्याची शक्यताच नाही.
मस्त लिहिलय तै.
मस्तं पाकक्रुती, मस्तं भाजी.
वेगळीच् भाजी..छान ओळख करुन
मस्त अनवट पाकृ !
याच सुमारास कांद्याच्या पातीसारखी पाती असणारी भाजी उगवते. कोकणात तिला "पेवाची भाजी" म्हणतात.ही आवडती होती. अजून एक फताड्या रूंद पानांची भाजी यायची त्याची अळूच्या पानांसारख्या वड्या बनविल्या जायच्या, त्या तर खासच आवडायच्या. नाव अर्थातच विसरून गेलोय.अजून एक फताड्या रूंद पानांची
In reply to मस्त अनवट पाकृ ! by डॉ सुहास म्हात्रे
तेरी नाही. तेरी जवळ जवळ
In reply to अजून एक फताड्या रूंद पानांची by सतिश गावडे
ओके...
In reply to तेरी नाही. तेरी जवळ जवळ by डॉ सुहास म्हात्रे
बहुतेक तीच ही पाने असावीत.
In reply to ओके... by सतिश गावडे
मायाळू?
In reply to अजून एक फताड्या रूंद पानांची by सतिश गावडे
बाप रे, मला या भाज्या माहिती
मुवि, उगा काहीतरीच,त्रिवेणी
मस्त तोंपासू......
नवीनच भाजी !
नवीन??
In reply to नवीनच भाजी ! by मितान
शेवळं मंडईत नाय सापडायची.
In reply to नवीनच भाजी ! by मितान
आमच्याकडील म्हणजे मुरबाड
मस्त!
कोणाचातरी/कस्लातरी खिमा
आज एक वेगळीच भाजी बघायला
तु कुठे राहतेस?? पुण्यात??
In reply to आज एक वेगळीच भाजी बघायला by Mrunalini
शेवळाची भाजी फार आवडते पण
क्या बात है!
भाजी तर छान दिसतेच आहे पण
अरे वा! शेवळाची भाजी ..जीव कि प्राण
इथे चर्चा झालेल्या भाज्यांपकी
+१ टु पिरा
In reply to इथे चर्चा झालेल्या भाज्यांपकी by पिलीयन रायडर
शेवळं, केनी, कुर्डू, फोडशी,
लेख छान.
तेलावर परतायची नसल्यास ....
In reply to लेख छान. by राही