✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाववर आता मराठीत लिहण्यासाठी अधिक पर्याय

नमस्कार मंडळी! सदस्यांकडून आलेल्या अभिप्रायांनुसार सध्याची गमभन प्रणाली काही जणांना गैरसोयीची वाटते. विशेषतः गूगल क्रोम आणि गूगल Input Method वापरणार्‍या आणि विशेषतः मोबाईलवरून लॉग इन करणार्‍या मंडळींना गमभनशी जुळवून घेणे जरा त्रासाचे वाटते. याव्यतिरिक्त गूगल क्रोम वापरताना अक्षरे सरमिसळ होणे अशाही काही अडचणी अनेकांना येतात. काही जणांना inscript कीबोर्ड वापरणे सोयीचे वाटते. अशा सर्व लोकांच्या सोयीसाठी आम्ही आता आपल्याला या तीनही लिहिण्याच्या पद्धतीतून आपल्याला सोयीस्कर वाटेल ती पद्धत निवडण्याची सोय आता देत आहोत. ही Input Method कशा प्रकारे निवडता येईल? अगदी सोपे आहे. १) मिपावर लॉग इन केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला "
आवागमन
" विभाग दिसतो. यामध्ये सर्वात वर आपले सदस्यनाम दिसते. या सदस्य नामावर क्लिक केल्यानंतर आपल्या खात्याचे संपादन करता येते. यासाठी सर्वप्रथम आपले सदस्यनाम क्लिक करा. २) यानंतर आपल्या खात्यातील द्रश्य, वाचनखुणा, संपादन, यांचे सर्व लेखन असे ऑप्शन्स दिसतील. यापैकी "संपादन" वर क्लिक करा. ३) यानंतर खात्यात प्रवेश केल्यानंतर User "Input Method Settings" हे शीर्षक दिसेल. त्याखाली "Select your choice for Input Method Editor" हे उपशीर्षक आणि त्याखाली एक छोटा चौकोन दिसेल. या चौकोनात Gamabhana आणि त्याच्या उजव्या बाजूला निवडीसाठी एक बाण दिसेल. हा बाण क्लिक केल्यानंतर त्या चौकोनात ३ ऑप्शन्स दिसतील. Gamabhana, Google Input, Inscript. 4 ४) या तीनपैकी तुम्हाला पाहिजे ती लिहिण्याची पद्धत निवडा. ५) सर्वात शेवट खात्याच्या तळाच्या भागात "प्रकाशित करा" या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्ही मिपावर Gamabhana, Google Input, Inscript यापैकी तुम्हाला जी सोयीची वाटत असेल अशा पाहिजे त्या पद्धतीने लिहू शकता. हि सुविधा केवळ मिपावर लॉग इन झाल्यावरच वापरता येईल. उत्तमोत्तम लेखनासाठी शुभेच्छा!

नव्या पर्यायांचे स्वागत आहे

श्रीरंग_जोशी
Mon, 07/06/2015 - 23:57 नवीन
मिपावर टंकताना अनेक सदस्यांना गमभनं वापरणे अवघड जात होते. विशेष करून टचस्क्रीन किबोर्ड वापरणार्‍यांना तर अधिकच. हे दोन नवे पर्याय उपयुक्त वाटत आहेत. मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

नवीन पर्यायांबद्दल धन्यवाद!!

सूड
Tue, 07/07/2015 - 00:00 नवीन
नवीन पर्यायांबद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मालक!

संदीप डांगे
Tue, 07/07/2015 - 00:08 नवीन
धन्यवाद मालक!
  • Log in or register to post comments

मस्तच . धन्यवाद :)

अद्द्या
Tue, 07/07/2015 - 00:08 नवीन
मस्तच . धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

हि सुविधा केवळ मिपावर लॉग इन

उगा काहितरीच
Tue, 07/07/2015 - 00:13 नवीन
हि सुविधा केवळ मिपावर लॉग इन झाल्यावरच वापरता येईल.
यापेक्षा होमपेजवरच नाही का देता येणार ? जसं मराठी किंवा इंग्रजी आहे तसाच अजून एक रेडिओ बटन कॉम्बो . असा असेल तर लॉगइन करतांनाही सोयीची पद्धत वापरता येईल शिवाय बदल करताना ही सोपं पडेल .
  • Log in or register to post comments

+१

अनन्त अवधुत
Tue, 07/07/2015 - 00:45 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

अनुमोदन.

एस
Tue, 07/07/2015 - 07:09 नवीन
मिपावर जिथेजिथे लिहिण्यासाठीचा चौकोन आहे, त्याच ठिकाणी हे टंकन पर्याय आणि मराठी/इंग्रजी भाषेचा पर्याय जवळच त्या टेक्स्ट बॉक्स च्या वर किंवा खाली द्यावा. याचा सर्वात मोठा फायदा हा मोबाइलवरून टंकन करणार्‍यांना होईल. (मोबाइलची स्क्रीन लहान असते, त्यामुळे सुचवलं.) बाय डिफॉल्ट गमभन असावं. पण प्रत्येक प्रतिसादासाठी आणि प्रतिसादातही लिहीत असताना तिन्ही पर्यायांची अदलूनबदलून निवड करता आली पाहिजे. यात अजून एक आव्हान असेल ते मध्येच इनपुट पर्याय बदलल्यास आधी जेवढे टंकून झाले आहे त्यात काही गडबड नको व्हायला. यावर लोकांचे काय म्हणणे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

सहमत

dadadarekar
Tue, 07/07/2015 - 08:18 नवीन
मायबोलीवर असा ऑप्शन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

धन्यवाद

अनन्त अवधुत
Tue, 07/07/2015 - 00:45 नवीन
.
  • Log in or register to post comments

मस्त! धन्यवाद!

रातराणी
Tue, 07/07/2015 - 00:49 नवीन
मस्त! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

Jack_Bauer
Tue, 07/07/2015 - 00:53 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

अतिशय आभारी आहोत ..... गुगल

मेघनाद
Tue, 07/07/2015 - 00:57 नवीन
अतिशय आभारी आहोत ..... गुगल आयमई साठी.
  • Log in or register to post comments

होय खरेच

वॉल्टर व्हाईट
Tue, 07/07/2015 - 01:19 नवीन
होय गुगल आयमईमुळे टंकणे आता फार सोपे झाले आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद नीलकांत... गुगल इनपुट

मदनबाण
Tue, 07/07/2015 - 06:55 नवीन
धन्यवाद नीलकांत... गुगल इनपुट हा पर्याय निवडला आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका
  • Log in or register to post comments

परत गमभन हा पर्याय निवडला !

मदनबाण
Tue, 07/07/2015 - 08:49 नवीन
परत गमभन हा पर्याय निवडला ! मला "स्टॉक" हा शब्द गुगल इनपुट वापरुन टंकणे जमला नाही, बहुधा गमभनची सवय हे कारण असावे. कोणाला हा शब्द गुगल इनपुटवर कसा टंकावा ते ठावूक आहे का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

साधारण असाच अनुभव येतो मला.

लई भारी
Tue, 07/07/2015 - 10:27 नवीन
साधारण असाच अनुभव येतो मला. अशी जोडाक्षरे विशेषतः अ‍ॅ/ऑ स्वर वापरताना येतो. त्यामुळे मी बहुतांश टंकलेखन गुगल वरुन आणि असे विशिष्ट शब्द 'गमभन' वापरुन करायचो. टंकतानाच पर्याय बदलण्याची सोय दिल्यास खूप बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हेच झाल्याने गाडी परत 'गमभन

आतिवास
Tue, 07/07/2015 - 14:08 नवीन
हेच झाल्याने गाडी परत 'गमभन'वर आणली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धन्यवाद !

ब़जरबट्टू
Tue, 07/07/2015 - 08:57 नवीन
हे बेस्ट झाले बघा..
  • Log in or register to post comments

स्वागतार्ह बदल

टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 09:36 नवीन
स्वागतार्ह बदल
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

सतिश गावडे
Tue, 07/07/2015 - 09:43 नवीन
अतिशय उत्तम सुविधा आहे ही. काही तांत्रिक कारणास्तव माझ्या इथे गमभनने मराठी अक्षरे उमटत नसत. मला इतरत्र कुठेतरी मराठी टंकून ते इथे चिकटवावे लागत असे. मी माझा कळफलक गुगल आयएमई केल्याने ही समस्या दूर झाली आहे. इन्स्क्रिप्ट हा कळफलक टंतैउ (टंके तैसा उमटे) नाही असे दिसते. हा कळफलक कसा वापरावा हे कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

भारी!!!

प्रभो
Tue, 07/07/2015 - 10:23 नवीन
भारी!!!
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
Tue, 07/07/2015 - 10:25 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

चांगली सुविधा... धन्स रे

सुहास झेले
Tue, 07/07/2015 - 10:35 नवीन
चांगली सुविधा... धन्स रे नीलकांत :)
  • Log in or register to post comments

उत्तम सुविधा

स्पा
Tue, 07/07/2015 - 11:17 नवीन
उत्तम सुविधा अजून एक विनंती :- आपले लेखन अप्रकाशित ठेवायची सोय व्हायला हवी, म्हणे एखादा लेख लिहिताना , मध्येच काही इतर काम निघाले तर लेख आहे त्या स्थितीत "सेव्ह" करायची सोय असेल तर बराच उपयोग होईल
  • Log in or register to post comments

वर्क अराउन्ड

सुनील
Tue, 07/07/2015 - 11:27 नवीन
सहमत. पण तोपर्यंत झालेले लेखन स्वतःलाच व्यनि करीत रहा. मी हेच करीत असे (जेव्हा लिहित असे तेव्हा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

यो

स्पा
Tue, 07/07/2015 - 12:52 नवीन
हे कर्ता येइलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

स्वत:ला व्य.नि करणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/07/2015 - 21:01 नवीन
मिपावर लेखन अप्रकाशितची सोय नाही. मी लेखन करतो आणि स्वत:लाच व्य.नि करतो, म्हणजे अर्धवट किंवा पूर्ण लेखन सुरक्षित ठेवता येते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मी इमेलच्या ड्राफ्टमध्ये ठेवतो

श्रीरंग_जोशी
Tue, 07/07/2015 - 21:14 नवीन
दर तीन चार वाक्ये टंकून झाल्यानंतर मी ड्राफ्ट इमेलमध्ये पेस्ट करत राहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यनिची आयडीया आवडली धन्यवाद.

माहितगार
Wed, 07/08/2015 - 08:00 नवीन
व्यनिची आयडीया आवडली धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी आधी दुसरीकडे लिहतो आणि

स्वामी संकेतानंद
Tue, 08/11/2015 - 00:27 नवीन
मी आधी दुसरीकडे लिहतो आणि तिकडून इकडे पेस्ट करतो. सध्या तरी संपूर्णपणे मोबाइल वरच वापर सुरु आहे तेव्हा लेख मी स्टिकी नोट मध्ये टाइप करतो जे आपोआप सेव होत असते. मग इथे पेस्ट करतो. म्हणजे लेख उडायची भीती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

धन्यवाद!

मित्रहो
Tue, 07/07/2015 - 12:04 नवीन
आभारी आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट सुविधा..!!!

गवि
Tue, 07/07/2015 - 13:38 नवीन
उत्कृष्ट सुविधा..!!!
  • Log in or register to post comments

इन्स्क्रिप्ट कळफलकाचा लेआउट

श्रीरंग_जोशी
Tue, 07/07/2015 - 20:26 नवीन
Image removed. सौजन्य - आयआयडिसी तसेच बाराहाचा ऑनलाइन कळफलक उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments

मला लै उपयोग होतोय. इतकी

अभ्या..
Wed, 08/12/2015 - 00:20 नवीन
मला लै उपयोग होतोय. इतकी वर्षे मी इन्स्क्रीप्ट मधूनच टायपतोय. गमभन गंडले तरी काही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

चांगली गोष्ट आहे

श्रीरंग_जोशी
Wed, 08/12/2015 - 00:25 नवीन
मिपावर आता उपलब्ध असलेल्या इन्स्क्रीप्ट टंकनसुविधेचा वापर कुणी करतोय हे प्रथमच कळले. मला आता गमभनची एवढी सवय झाली आहे की दुसरे पर्याय तपासावेसेही वाटत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

श्रीरंगा अरे ते खूप वर्शे

अभ्या..
Wed, 08/12/2015 - 00:32 नवीन
श्रीरंगा अरे ते खूप वर्शे आधीपासुन वापरतोय मी. गुगल इनपूट डिव्हाईस मध्ये देवनागरी इन्स्टॉल करुन उनिकोड टायपायची फॅसिलीटी बरीच वर्शे आहे. खाली स्टेटस बार वर आयकॉन येतो. त्यात भाषा बदलली की चालू इन्स्क्रीप्ट. ;) कुठल्याही सॉफ्टवेअरात चालते. एमेस ऑफीसात पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद!

पैसा
Tue, 07/07/2015 - 20:54 नवीन
धन्यवाद! गुगल कीबोर्ड ट्राय केला. ओके. inscript ची काही अक्षरे उमटत नाहीयेत. शिफ्ट + p शिफ्ट + O
  • Log in or register to post comments

गुगल कीबोर्ड वरून टाईप करणे

वगिश
Tue, 07/07/2015 - 21:32 नवीन
गुगल कीबोर्ड वरून टाईप करणे सोपे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मनुराणी
Wed, 07/08/2015 - 07:57 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!!

साधा मुलगा
Wed, 07/08/2015 - 10:29 नवीन
आता लिहायला सोपे झाले आहे.
  • Log in or register to post comments

मी पा वर स्माय्ल्या टाकायची

तुडतुडी
गुरुवार, 07/09/2015 - 15:20 नवीन
मी पा वर स्माय्ल्या टाकायची सोय करा प्लीज
  • Log in or register to post comments

मायक्रोसॉफ्ट इंडिक लॅंगवेज इनपुट

मंदार कात्रे
Mon, 08/03/2015 - 23:21 नवीन
मायक्रोसॉफ्ट इंडिक लॅंगवेज इनपुट हा सर्वाधिक योग्य पर्याय वाटतो. कोणत्याही साइटवर व हवे तेव्हा toggle करून उत्तम मराठी लिहिता येते. ऑफलाइन मोड मध्ये सुद्धा . भाषाइंडिया. कॉम साइटवर उपलब्ध आहे. डाऊनलोड करून वापरावे !
  • Log in or register to post comments

mobile var marathi lihita yet

जव्हेरगंज
Mon, 08/10/2015 - 23:52 नवीन
mobile var marathi lihita yet nahi. what exactly need to do?
  • Log in or register to post comments

using opera mini browser with

जव्हेरगंज
Mon, 08/10/2015 - 23:55 नवीन
using opera mini browser with Samsung Android. any solution?
  • Log in or register to post comments

गूगल हिंदी

पैसा
Mon, 08/10/2015 - 23:59 नवीन
गूगल हिंदी इनपुट कीबोर्ड डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी सुहास झेलेचा "तुमच्या एंड्राइडसाठी" हा धागा बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

दुवा

श्रीरंग_जोशी
Tue, 08/11/2015 - 00:01 नवीन
तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खूप धन्यवाद. याचा खूप उपयोग

जव्हेरगंज
Mon, 04/11/2016 - 19:03 नवीन
खूप धन्यवाद. याचा खूप उपयोग झाला. https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.inputmethod.hindi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

खूप धन्यवाद. याचा खूप उपयोग

जव्हेरगंज
Mon, 04/11/2016 - 19:04 नवीन
खूप धन्यवाद. याचा खूप उपयोग झाला. https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.inputmethod.hindi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

bela
गुरुवार, 11/12/2015 - 14:45 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

काही प्रोब्लेम आहे का?

विदेशी वचाळ
Mon, 04/11/2016 - 18:13 नवीन
गेले दोन दिवस एक लेख टाकायचा प्रयत्न करत आहे . दर वेळेस एर्रोर येते. काही प्रोब्लेम आहे का? का मीच चुकत आहे ? २०१६ एप्रिल ११
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा