रामायणात रुमाची ओळख सुग्रीव पत्नी असे आहे. जिथे ताराच्या प्रखर व्यक्तित्वाची जाणीव रामायणात होते, तिथे रुमाच्या अस्तित्वाची जाणीवच होत नाही. कारण स्पष्ट आहे, रुमा एक सामान्य स्त्री होती. सर्व अन्याय चुपचाप सहन करणारी. अश्या सामान्य स्त्री साठी कोण कवी आपले शब्द सामर्थ्य खर्च करेल. तरीही तिला काय सहन करावे लागले याची कल्पना आपण करू शकतो.
वानर समाजात पतीच्या मृत्यू नंतर स्त्री पुन:विवाह करू शकत होती. वालीने जर सुग्रीवचा वध केला असता तर रुमाला सुग्रीवच्या कनिष्ठ पत्नीचा दर्जा तरी मिळाला असता. पण वालीने सुग्रीवचा वध केला नाही अपितु त्याला पळवून लावले आणि त्याच्यावर सूड उगवण्यासाठी त्याची पत्नी रुमा हिला आपल्या जवळ ठेवले. वानर समाजात ही नवरा जिवंत असताना, स्त्री दुसरा पती करू शकत नव्हती. बिना विवाह न करता परपुरुषा बरोबर संबंधाना त्या काळी समाजात मान्यता नव्हती. सुग्रीव जिवंत असल्यामुळे रुमाला वालीच्या कनिष्ठ पत्नीचा दर्जा मिळणे सुद्धा अशक्य होते. दुसर्या शब्दांत म्हणायचे तर रुमा वालीची केवळ भोगदासी होती. वालीने तिच्या बरोबर जबरदस्तीचे शारीरिक संबंध निश्चितच ठेवले असतील आणि त्या संबंधातून अपत्य ही झाले असतील. त्या काळच्या परंपरेनुसार अवैध संबंधातून होणार्या अपत्यांना वानर समाजात ही दासीपुत्रांचा दर्जाच मिळाला असेल. अश्या दयनीय परिस्थितीत रुमाला जगावे लागले. त्या वेळी तिला किती मानसिक त्रास होत असेल, याची कल्पना करणे ही अशक्य.
सुग्रीव पुन्हा राजा झाला. म्हणायला रुमा किष्किंधा नगरीची पट्टराणी झाली होती पण सुग्रीवच्या हृदयाची पट्टराणी तर ताराच होती. सुग्रीव अधिकांश वेळ तारेचाच निवासी राहायचा. राजदरबारात ही तारेचीच चलती होती. कठीण प्रसंगी सुग्रीव तारेचाच सल्ला घ्यायचा. एकारितीने तारा त्याची तारणहार होती. एवढेच नव्हे, रुमाच्या जखमेवर मीठ म्हणून तारेचा पुत्र अंगद किष्किंधानगरीचा युवराज झाला होता. भविष्यात तोच राजा होणार होता. हे सर्व पाहून रुमाच्या मनात किती जळफळाट होत असेल, सध्या मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या खंडोबा या मालिकेत 'बानू' वरून खंडोबाच्या प्रथम पत्नी म्हाळसाबाईचा होणारा जळफळाट पाहून आपण कल्पना करू शकतो.
वाली पासून उत्पन्न होणार्या रुमाच्या पुत्रांचे भविष्य तर अंधकारमय होतेच. सुग्रीव पासून उत्पन्न पुत्रांवर ही एकारितीने म्हणाल तर अन्यायच झाला होता. राजाचे पुत्र असूनही ते सिंहासनाचे अधिकारी नव्हते.
पट्टराणी असूनही रुमाने सर्व अन्याय निमूटपणे सहन केला. त्या विरुद्ध आपला आवाज कधीच उठविला नाही. अत्याचार सहन करणाऱ्या दुर्बल लोकांचा इतिहास कधीच गुणगान करत नाही. कुठल्या ही कवी, चारण, भाट यांना त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा मिळत नाही. साहजिकच आहे रूमाला ही कुणी लक्षात ठेवले नाही.
वाचने
4770
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
सध्या मराठी वाहिनीवर सुरु
याची गरज नव्हती , बाकी लेख
In reply to सध्या मराठी वाहिनीवर सुरु by उगा काहितरीच
याची गरज नव्हती , बाकी लेख छान.सहमत आहे, कारण मुळात मालिकेत दाखवलेल्या कल्पनाच प्रचंड धेड़गुजरी आहेत. त्या मालिकेवरून तत्कालिन रुढीची ग्राह्यता ठरवणे हां वेडेपणा होईल. मुळात इथे मुख्य प्रश्न असा आहे की रामायण खरोखर झाले होते का? जरी होते असे गृहीत धरले तरी मागच्या 'तारा'वरील लेखावरून जाणवते की स्त्रीया स्वत:च्या मतानुसार राहू शकत होत्या, तेव्हा त्यावेळी स्त्रियांविरुद्ध जाणारीच परिस्थिति होती हे पटत नाही. अजुन एक मुद्दा म्हणजे वाली, सुग्रीव,मारुती यांना वानर म्हटले आहे. हां रामायणात उल्लेखलेला समाज खरोखर वानर होते की एखादी जंगलात राहणारी आदिवासी, अनागरी जमात होती.रामायणा नुसार हे सर्व दंडकारण्याचा म्हणजे सांप्रत नाशिकच्या आसपासपासचा भाग येतो. या भागात जव्हार, मोखाडा या भागात अजूनही आदिवासी पाडे आहेत जे मोस्टली मातृसत्ताक पद्धती जोपासणारे आहेत. अगदी स्त्रीसत्ताक पद्धती असते असे ऐकून आहे, तसे असेल वरील लेखातील बऱ्याच गोष्टी हे निव्वळ अंदाज़ ठरावेत. सांगण्याचा हेतु इतकाच की रामायण, महाभारत या मुल्ये शिकवणाऱ्या कथा आहेत, त्यातुन तेवढेच घ्यावे. त्यावरून तत्कालिन संस्कृती , परंपरा यांचे अंदाज लावण्यात काहीच अर्थ नाही.आपला मुद्दा मला ही पटतो.
In reply to याची गरज नव्हती , बाकी लेख by विशाल कुलकर्णी
रामायणात दंडकारण्य म्हणजे
In reply to याची गरज नव्हती , बाकी लेख by विशाल कुलकर्णी
सह्मत. मला असे वाटते कि
In reply to याची गरज नव्हती , बाकी लेख by विशाल कुलकर्णी
काही विशिष्ट पंथांची पुस्तके
In reply to सह्मत. मला असे वाटते कि by पाणक्या
:)
In reply to काही विशिष्ट पंथांची पुस्तके by सतिश गावडे
सगळ्या पंथात कमी अधिक अर्थाने
In reply to काही विशिष्ट पंथांची पुस्तके by सतिश गावडे
फारच वाईट!आज पर्यंत सुग्रीव
ओखय, लेट्स इस्टार्ट फ्राम बुक
In reply to फारच वाईट!आज पर्यंत सुग्रीव by जडभरत
भाऊ मी संपूर्ण बायबल २ वेळा
जेनेसिस मध्ये ते बरगडी पासून
अहो दादा थोडं समझुन घ्या ना...
In reply to जेनेसिस मध्ये ते बरगडी पासून by जडभरत
हा इंग्रजी वाक्प्रचार आहे होय
तुमाला बायबल समजते/आवडते हिच
गैरसमज झालेला दिसतोय .
कथानके