Skip to main content
लेखक दमामि यांनी बुधवार, 01/07/2015 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री बरोब्बर साडे अकराला माझा मोबल्या वाजू लागला," अरे दमाम्या, तू कुठेयस रे? गचकलास तर नाही ना? ? पोचले बरं मी कुर्डू वाडीच्या स्मशानात. इथ काळं कुत्रं सुद्धा नाही. तरी आमचे हे म्हणत होते कुठं जातेस रात्रीची कट्ट्याला, त्या दमाम्यावर विश्वास ठेवून …. " माई श्वास घ्यायला क्षणभर थांबल्या त्या संधीचा फायदा उठवत मी बोललो, " माई ,शून्य मिनटात आलोच … "असे म्हणून बायकोवर (म्हणजे बाइक वर ) ढांग टाकली आणि सुसाट सुटलो . स्मशानात पोचतो तर माईसाहेब कुणा काकूशी गप्पात गुंग झाल्या होत्या. मिपाकरांची ही खासियत! यांच्या गप्पा अशा रंगतात की शंका देखील येणार नाही हे पहिल्यांदा भेटतायत म्हणून. जरासा खाकरून मी स्वत:ची ओळख करून द्यायला पुढे झालो. तेवढ्यात कनवटीतून काहीतरी काढून हातावर ठेवत माई म्हणाल्या.," दमामीना तू? ओळखलं हो मी! खोकला झालाय वाटतं? ही घे खडीसाखर, श्रीरंगाने पाठवलीय हो खास अमेरिकेतून. म्हणाला मला नाही जमणार तर निदान ही तरी कट्ट्याला हजर राहू दे. घे घे लाजू नको. " शेजारच्या काकूंना वंडरल्यांडला कुठेस पाहिलंय म्हणून मी विचारच करत होतो तर मला आलेल्या शंकेला खरं ठरवत त्या काकू म्हणाल्या, "हो मी तीच, जिची अनाहितांना अलर्जी आहे" . ( काकुंच्या त्वचेवरून वयाचा अंदाज बिलकुल येत नाही.) त्या दोघींशी हाय हलो म्हणेस्तोवर मागून फ़फ़( फटफटी )वरून दोघं उतरले. ते मिपाकरच असणार खात्री होती कारण फफ असो वा खफ रात्रभर चालवणारे मिपाकर सोडून दुसरे कोण? एकाच्या हातात ब्याट आणि दुसऱ्याच्या हातात कमंडलू पाहून ओळख पटली. ब्याटवाले गृहस्थ आपली ब्याट सारखी इकडून तिकडून फिरवत होते. आम्ही घाबरून लांब उभे राहिलो, न जाणो माईंचा चष्मा फुटला तर? गुर्जी पुन्हा पुन्हा त्यांना समजावत होते, "घाबरू नको! मी आहे न? मग दुसऱ्या कुठच्याही आत्म्याची इथे यायची हिम्मत नाही." शेवटी त्या गुर्जींच्या पुन्हा पुन्हा चाललेल्या सूचना कम मंत्रपठणाला वैतागून ब्याटवाल्यानी तोंडातील पानाची पिंक गिळली आणि उत्तरले, "ओ गुर्जी, गप बसा हो. आत्म्याला नाय घाबरत, डास पळवतोय. " गुर्जींचा चेहरा बघण्यालायक झाला . इतक्यात मागून मंजूळ चिवचिवाट ऐकू आला." अग्ग बाईsss चिमण आला वाट्ट." माई चीव्चीवल्या. चिमणच्या मागून लगोलग पैसाताई येताना दिसल्या अन त्यामागून इतर अनाहिता म्हणजेच अजयाताई, रेवाज्जी, यशोताई, विशाखाताई (तिचं बोट धरून आणि हाती पाटी घेतलेली इयत्ता दुसरीतील मुलगी पण होती त्यात) आदी भगिनीमंडळ प्रवेश करतं झालं. रस्ता, यष्टी वगैरे न चुकता, कसलाही गोंधळ न करता अनाहिता ठरल्या वेळी व्यवस्थित पोचल्या हा विचार डोक्यात आल्यानं साऱ्यांचेच ड्वले पाणावले. रेवाज्जीच्या बकोटीस एक पोतं होतं. (आधी वाटल त्यांनी सगळ्यांसाठी खाऊ आणलाय पण नंतर कळल की त्यात लसूण आहे, गप्पा कुटताना सोलण्यासाठी.) अनाहितांच्या आगमनानंतर स्मशानभूमी फुलून गेल्यासारखी वाटू लागली (आकारमानाने नाही तर आवाजाने. गैरसमज नको हो!) आता सर्वांनी मोठ्ठा गोल करून बसायचं ठरलं. मी माईसाहेबाना हात देऊन अलगद बसवलं. त्यांनी लगेच तोंड भरून आशीर्वाद दिला. "औक्षवंत हो रे दमाम्या, आई बापानी चांगले संस्कार केलेत बर तुझ्यावर, अशी गुणी मुलं दुर्मिळ झालीत हो आजकाल. लग्न झालय का तुझ? अशी चौकशी केली." मी लाजलो. *माझ्याही* लग्नाची चौकशी करणारं कुणी आहे हे जाणवल्यावर उर कित्ती भरून आला म्हणून सांगू! (ड्वले पण पाणावले.) लांबून सनई चौघडे वाजू लागले आणि गुर्जींच्या चेहऱ्यावर आत्मानंदाचं हास्य उमटलं . मागोमाग गुर्जींचा शिष्यगण हातात जिलब्यांची खोकी घेऊन अवतीर्ण झाला. एकाच्या शर्टावर बदला "पूर" लिहिलं होतं तर दुसऱ्याकडं पाहून "अरे धन्या" असे कुणीतरी खिंकाळलं. तिसऱ्याच्या हातात इनोची डब्बी होती आणि *जे* भेटतील त्यांना तो *पी* *पी* असे सांगत होता. सगळ्यांच्या गळाभेटी झाल्या. आणि सर्व मिपाकरांनी एकमेकांची चेष्टा मस्करी करत जिलब्यावर ताव मारला. त्यात अलवानी जिलबी , गोल्या जिलबी, पावले जिलबी असे नवीन प्रकारही होते. (पावले जिलबीची स्पेशालिटी म्हणजे एक उचलली की त्याला चिकटून १० - १२ जिलब्या वर येतात.) सर्व मिपाकर एकमेकांना आग्रह करकरून जिलबी खाऊ घालत होते. यल्लाप्पाजी आग्रह करून करून जिलबीवर चारोळ्या वाढत होते. तर वेल्लाभट "व्यायाम केलात का? नाही तर जरा जपून खा हं!" अशी मागोमाग प्रेमाची सूचना देत होते. तर अजयाताई " ब्रश करा हं नंतर " अशी धमकी वजा प्रेमाची आठवण करत होत्या. तर कोणी गोंधळलेला अकौंट माझ्याकडे तीर्थाची मागणी करत होता. (मी त्याला गुर्जींच्या हातातला कमंडलू दाखवून तिथं पिटाळलं. पुढं काय झालं ते गुर्जी अन कन्फ्युजड दोघंच जाणे) हे सर्वांचं असं एकमेकांवर उतू जात असलेलं प्रेम पाहून पाहून नीलकांतांचे पण ड्वले पाणावले. काही अनहिता " अजून कसा नाही आला बाई, टक्या ?" या काळजीत होत्या. इतक्यात एका बाजूने "निषेध निषेध" असा नारा ऐकू आला. "आपले शेतकरी बांधव उपाशी असताना जिलबी पार्टी झोडणारयांनो थोडीतरी लाज बाळगा!" हे ऐकताच सगळ्यांच्या हातातल्या जिलब्या (हातात) गळाल्या. सर्व अपराधी भावनेने एकमेकांकडं पाहू लागले. त्याबरोबर चिमणराव ताडकन काही बोलायला उठले, संदीप भौ, सुबोध भौ यांनी "लक्ष देऊ नका" वगैरे सांगत त्यांना शांत केले . अशा अंमळ तापलेल्या वातावरणात अनाहितापैकी कुणालातरी (सुरंगीताई तूच का ग?) नुकत्याच गाजलेल्या होट्ट फ़ेम्मस नाचाची आठवण झाली. "ते पथिक रावांचं आयटम साँग होणार होतं त्याचं काय झालं?" झालं! सर्व पथिक भौ ना शोधू लागले, पण त्यांच्या ऐवजी बबिता हितेश दरेकर नावाची कुणी नवीनच व्यक्ती सापडली. ती नक्की कोण, इथे कशी वगैरे कुजबुज चालू असताना लांबून टेम्पोचा आवाज ऐकू लागला. त्याबरोबर सर्व अनहिता उत्साहाने फाटकाकडे पाहू लागल्या पण टेम्पो तसाच पुढे निघून गेला. जमलेल्या मिपाकारातील एक डिटेक्टीव ब्योमकेश हळूच म्हणाले, " मघापासून हा टेम्पो फिरतोय. इथे येतो आणि परत जातो . कायतरी गोंधळ दिसतोय. " " चकवा म्हणतात त्याला " मंदार कात्रेदादानी त्यांच्या ज्ञानात भर टाकली . इकडे माई साहेब आणि काकू यांचा एक कंपू, चौकडीचा एक , गुर्जी आणि शिष्य गणांचा एक, अनाहितांचा एक. महान विचारवंत, गुरुजी (दुसरे), बबिता ई महान चर्चाकारांचा एक, मुवि गवि, एक एकटा अशा गझल प्रेमींचा एक, तर एक नवमिपाकारांचा असे, सर्व कंपू जमून त्यांच्यात फर्मासपैकी गप्पा रंगल्या होत्या. कुणी आदुबाळ सर्व कंपूत जाऊन दु दु दु दु करीत फिरत होतं. अनाहितांच्या कंपूत टक्या आणि पिव्शीच्या लग्नासंबंधी अनुक्रमे वधू अन वर संशोधनावर चर्चा चालू होती. " दारू ढोसणारी हवी म्हणजे …." "अय्या हो?" अशी वाक्यं मधून मधून कानी पडत होती . तर गुर्जींच्या कंपूत सगळे नाक दाबून (कशाला ते त्यांनाच विचारा) ल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलुलुलु म्हणायची संथा घेत होते. तर चौकडी कुणाची टांग कशी खेचायची यावर चर्चा करत होती. तर पैसाताई दर दोन मिंटानी माझ्याकडं बघून " मी वळकल तुला दमामि " असं लुक देत होती. त्या सर्व आवाजाना चिरत "नाडीये, नाडीये" म्हणत कुणी फिरता विक्रेता कर्मधर्म संयोगानं तिथं पोचला. संदीप भौनी विचारलं कुठून आला कुठं चालला , तर त्यानं आकाशाकडं आणि नाडीकडं बोट दाखवलं. "नाड्या बरीक स्वस्त आहेत हो" अशी कुणा कंजुषानं पुडी सोडली आणि सर्व अनाहितानी त्याला (नाडीवाल्याला ) वेढा घातला. या सारया गमतीजमतीत वेळ कसा गेला काही कळलंच नाही. जेपीना बँकेत सक्काळी सहा वाजता हजर राहायचं होतं म्हणून ते चुळबुळ करू लागले तेव्हा पिचकुनी सुद्धा घड्याळाकडे पाहायला सुरुवात केली. स्वप्सनी घड्याळाकडे पाहत अहो एक तारीख उगवली असे विधान केलं. आणि कट्टा संपत आल्याचं सर्वांनाच जाणवलं. मग माईसाहेबांनी कट्टा संपत आल्याची ओफ़िशिअल घोषणा केली. ते ऐकताच आता पुन्हा कधी भेट व्हायची या विचारांनी अनहितांचे नाक (अनेकवचनात नाकं ) भरून आले .( ड्वले पण पाणावले. ) एक फोटो सेशन होऊन जाऊ द्या म्हणत सगळ्यांचं फोटो सेशन झालं ,(चक्क माई उत्साहाने फोटु काढत होत्या. त्यांच्या ह्यांनी त्यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त नवीन क्यामेरा गिफ्ट दिला होता म्हणे.) आणि कृष्ण धवल फोटो जयंतरावांच्या स्पर्धेला टाकायचा असं ठरलं. पण ती स्पर्धा केव्हाच संपली आता "प्रतीक्षा" विषय आहे हे चित्रगुप्तानं सर्वांच्या ध्यानी आणून दिलं. मग "टक्याची प्रतीक्षा " टायटल देऊन तो फोटो टाकायचं ठरलं. निघता निघता माई साहेबानी श्रीरंगानं आठवणी पाठवलेल्या खडीसाखरेचे दोन दोन दाणे आठवणीनं सर्वाना दिले. मी प्रत्येकाला एक एक म्यागीचा पुडा दिला. इतक्यात कुणाच्या तरी जुन्या स्मृती जाग्या झाल्या आणि अभ्याची चटणी कुठंय असं काहीसं अस्पष्ट ऐकू आलं. पण एवढ्यात सर्वजण निघालेच . बाहेर येतो तो मघाचा टेम्पो फाटकाजवळ येउन थांबलेला. कात्रेसाहेबानी घाबरत घाबरत आत डोकावून बघितलं तर चालकाच्या जागी वडाप आणि बाजूला हातात भला मोठा रसगुल्ल्याचा डब्बा घेऊन लाडोबा बसलेला! त्याला बघताच सगळ्या अनाहितांना "टक्कू टकुल्या, टक्कुमक्कूशोनू" असं म्हणत वात्सल्य, भगिनी प्रेम ई ई उचंबळून आलं. पण कट्टा संपला हे कळताच वडाप कपाळाला हात लावत म्हणाले," काय सांगू , मघापासून इथे फेऱ्या मारतोय. सगळे रसगुल्ले संपल्याशिवाय हा खाली उतरायलाच तयार नाही. म्हणाला तिथे गुर्जी आणि बदलापूरकर मला पोटभर रसगुल्ला खाऊ देणार नाहीत." "अरे पण किती ती पेट्रोलची नासाडी रे वडाप , बरं दिसत का ते? " असे माई साहेबांनी म्हणताच वडाप लग्गेच उत्तरले," माई तुम्हाला सोडू का घरी?" त्याबरोबर पुन्हा माईनी खुश होऊन तोंड भरून आशीर्वाद दिला. "औक्षवंत हो रे, आई बापानी चांगले संस्कार केलेत बर तुझ्यावर, अशी गुणी मुलं दुर्मिळ झालीत हो आजकाल. लग्न झालय का तुझ?" पण वडाप काही (माझ्यासारखे) लाजले नाही कारण एव्हाना सगळ्या अनहिता टेम्पोत चढायच्या प्रयत्नात असल्यामुळे ते लै टेन्शन मध्ये होते. त्यांनी हळूच जाऊन टेम्पोची कमाल वजन मर्यादा पाहून घेतली . सर्व अनहिता आणि माई आणि इतर काही हौशे गौशे मिपाकर मग त्या टेम्पोत स्वार झाले आणि टेम्पो भुर्र निघून गेला. आणि बाकी राहिलेल्यांनी सुद्धा एकमेकांना टाटा बायबाय केले. तर अशा प्रकारे ३२ जूनच्या कट्ट्याची साठा उताराची कहाणी सफल संपूर्ण!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14123
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

फटु नाय तर कट्टा झालाच नाय! विषय संपला. त्यातून माझ्या सोळा डुप्लिकेट आयडींचा उल्लेख न केल्याबद्दल खच्चून णिशेध!

चला सगळीकडे चरच्चा चालुये तर ;) फारच "करण्त्ट " (शब्द वाचुन तर दाखवा ) :प विषय घेतेलेत चर्चेला , १०० साठ । होतीलच आज धा ग्या चे =)))))))

आलोच उप वृ त्तांत घेऊन! ;-) द मामी ने स्मशानात्ल्या वडा वर केलेले कसरातिचे खेळ.. आणि बरेच काही ;-) ह्ही ह्ही! :-D

In reply to by दमामि

@ल्लुलुलुलुलुलु >> :-D हेच्च हेच्च ते! ;-) दोन पारंब्या धरून, ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ करत स्पायडर म्यान श्टा इल काढलेला फोटू टाकणारे मी टुमचा! ;-)

In reply to by दमामि

"मिपा" हे टवाळखोर लोकांचे असेलही...पण कुठल्याही प्रकारे जात-पात-धर्म ह्यात न-अडकता आणि हिणकस भाषा न वापरता, उत्तम विनोदी लेखन पण ह्याच संकेतस्थळावर होते.

हायला नाव वाचून यक्दम फ्यामस्स्स्स्स झाल्यासारखं वाटलंय... फोटॉ टाका ३५-३७ तारखेकडे किमान

झकास वृत्तांत. बाकी एका महिन्यात बराच अ भ्यास झालाय तुमचा. 1 पण मग ते हे बाकीचे खफ पडीक कुठे राह्यले? 0

अच्छा ते तकया रसगुल्ले खात होतं का!दमामि पावसात रात्री हिरवळ बघायला जाताना तू घसरुन पडलास ते नाही लिहिलंस =))

In reply to by अजया

हिरवळ आणि मी???? तो सूड्या असेल, मी श्री श्री श्री माईसाहेबांना काय हवे नको ते पहात होतो.

In reply to by दमामि

ह्यावर बर्‍याच प्रतिक्रिया येवू शकतात.... "नाना काय करत होते?" इति नाना नेफळे प्रेमी. "मग बबिता दरेकरला माईने कशाला आणले?" डू.आय.डी. प्रेमी मुवि "नेमके ह्या वेळी माई बरोबर आता ह्यापुढे श्रीगुरुजींना कसा त्रास द्यावा? ह्याची चएचा करणार होतो, तितक्यात दमामि, माईं बरोबर आहेत.आता काय करावे?" लेमोनेडची फुल्ल बॉटल रिचवलेला आणि तरीपण सैरभैर झालेला कुणीतरी एक. "आता नेमका मी ह्या माईला चोच मारणार होतो...तर..." "बरे झाले, ह्या माई वर लक्ष ठेवायला कुणी तरे आहे तर...बरे झाले." बरेच मिपाकर

In reply to by दमामि

कोण बदलापूरवाले? धन्यवाद!! (धाडकन तोंडावर दार बंद केल्याची स्मायली कल्पावी)

In reply to by सूड

ते पुरते बदललेत अता! पुण्यात आल्यामुळं व्यक्तित्वाला योग्य न्याय मिळाल्यासारखं वाटतय हल्ली त्यांण्णा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

ही तर भ्रामक भमवादाच्या निरर्थक आत्मरंजनाची देवलसिकर्मकांडी झाली.

In reply to by सूड

ही तर भ्रामक भमवादाच्या निरर्थक आत्मरंजनाची देवलसिकर्मकांडी झाली.
>>> अचूक बसला बाण, आणि दिसलं अधिकाचं वाण! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिसलं अधिकाचं वाण!
असं लोकांच्या वाणसामानात लक्ष घालू नये बुवा!! बरं नसतं ते.

In reply to by सूड

घातलं नाही मी लक्ष,तूच केलस अचानक दक्ष! ल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलु http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by सूड

मला वाटले, "बदला" पूर म्हणून सूड. त्या चित्रपटवाल्यानी तुमची आयडिया ढापली असे समजत होतो !!!!

अचूक. एक सेकंदात एवढं सगळ घडायला इन्सेप्शनची २०वी लेवल असावी. बाकी एवढी प्रेमाची मंडळी एकत्र आल्यावर 'वक्त कहीं थमसा गया' अशीच फीलिंग येणार...

@तर गुर्जींच्या कंपूत सगळे नाक दाबून ( कशाला ते त्यांनाच विचारा ) ल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलुलुलुल्लुलुलुलु म्हणायची संथा घेत होते. >> आम्मी प्राणायाम करत होतो ना.......! :-/ दुत्त दुत .. द मामी! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

खादाडीचे फोटु नाय तर कट्टा नाय . कालच्या कट्ट्याचा मेन्यु कार्ल्याची बिर्याणी ( भीमेच्या काठची कारली )

पाककृती नाय तर मिपावर घित न्हाइत. हे घ्या- साहित्य कार्ले ,दोन हिरवे टोमॅटो ,लसुण ,सुके खोबरे किसून भाजून 2)कारली आणि टमाटे चिरून ३)तेल गरम करून लसूण आणि खोबरे परता.टोमॅटो टाकून थोडे शिजवा.नंतर कारली टाकून शिजवा .शेवटी मीठ आणि तिखट टाकून भाजी तयार. ४)शिजवेल्या भातात ही भाजी मिसळली की कार्ल्याची बिर्याणी तयार-

In reply to by सूड

अरे हो. प्रतिसाद नीट वाचला नव्हता. स्वारी बरंका. चला एक पाकॄ आणि एक फोटू, दोन डीश झाल्या की हेतंच.

मेन्यु भारी टेस्टी होता असे ऐकलंय.आमचा तर बाबा उपास होता.बिर्याणी आणि भाजी पाहिली... आणि अाठवलं उपासाचं;)

मस्तच जिरवली इतर कट्टेकरांची. बाकी ते स्पा आणि हाडक्यांनी टांग मारून हवाई बेटावर शिक्रेट कट्टा केला की काय चाफ्याच्या माळा घालून समुद्र किनार्यावर?

त्या वंडरल्यांडवाल्या काकूंची अनाहितांना अ‍ॅलर्जी नैये. तुमचं कायतरी चुकलं ऐकताना. त्यांना किनै लैच्च राग येतो. मग त्या सग्गळं विसरतात.

क वृत्तांत, क वृत्तांत. अशा वेळी भारतात राहत नसल्याची खूप खंत वाटते. पुढल्या वेळेपासून मधल्या काळात हेवनवासी झालेल्या आयडींना श्रद्धांजली वाहून कट्ट्याची सांगता करावी असे सुचवतो. पुढच्या वेळी तोंडी लावायला जहाल मेक्सिकन मिरच्या पाठवतो :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

आमच्या कागल किंवा चेंबूरच्या मिरच्यांवर काही परिणाम होणार नाही.

In reply to by मुक्त विहारि

खडीसाखरेचा परिणाम संपेल एवढे पुरे आहे. बादवे, चेंबुरमध्ये मिरच्यांचे उत्पादन होते ही नवी माहिती या निमित्ताने मिळाली :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

या निमित्ताने मिळाली." कागलच्या जोडीला काहीतरी असावे, म्हणून चेंबूर घातले.

In reply to by श्रीरंग_जोशी

@पुढल्या वेळेपासून मधल्या काळात हेवनवासी झालेल्या आयडींना श्रद्धांजली वाहून कट्ट्याची सांगता करावी असे सुचवतो.>> जोरदार हणुमोदण! ।ॐ।।डुप्लमद: डुप्लीमिदं ट्रोलात् डुप्ल उडच्युते। डुप्लिकेटस्य जाताय पुनर्मेेवावशेष्यते।। ॐ क्रांन्ति: क्रांन्ति: क्रांन्ति: ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयडी हेवनवासि होतात पण आत्मा अमर असतो. नवीन नावाने पुन्हा अवतीर्ण होतात:)

In reply to by दमामि

किंबहूना अशा मुळेच पुनःजन्मा वरचा विश्र्वास वाढायला मदत होते. आणि स्वभावाला औषध नसते, ही म्हण देखील असे लोक सार्थकी लावतात.

१ माई २ गिरिजाकाकू ३ बॅटमॅन ४अत्रुप्त ५कॅप्टन जॅक स्पॅरो ६ सूड ७ सनईचौघडे ८ धन्या ९पैसा १० विशाखा ११ रेवती १२ अजया १३ पिव्शी १४ यशोधरा १५ जेपी १६ अलवानी १७ गोल्या १८ पावले १९ यल्लप्पा २० वेल्लाभट २१ कन्फ्युज्ड अकाऊंट २२ निलकांत २३ गंगाधर मुटे २४ संदिप डांगे २५ सुबोध खरे २६ योगविवेक २७ सुरंगी २८ पथिकराव २९ बबिता हितेश दरेकर ३० ब्योमकेश ३१ मंदार कात्रे ३२ श्री गुरुजी ३३ मुवि ३४ गवि ३५ एक एकटा ३६ विचारवंत ३७आदुबाळ ३८ कंजूष ३९ पिचकू ४० स्वॅप्स ४१ चित्रगुप्त ४२ वडाप ४३ टक्कुमक्कुशोनु ४४दमामि ४५ श्रीरंगाची खडीसाखर इतक्या मिपाकरांनी परवाच्या कट्ट्यात उपस्थिति लावली होती.

In reply to by दमामि

प्रत्येकाने कट्ट्याला उपस्थित असणारे स्वतःचे आयडी आपले आपण लिहिणे ;)

In reply to by सस्नेह

आमचा उल्लेख करायचाच नाही असा काही "बार" कावा असावा दमामीचा !!! कपील मुनी हिकडे लक्ष देणे !! नाममात्र खुर्दा झालेला

In reply to by नाखु

त्यावेळी तुम्ही नेमके रामदास काका, छोटा डॉन, गणपा इ. जुन्या-जाणत्या मिपाकरांना घेवून पान खायला गेला होतात. आणि इकडे दमामि नेमके माई बरोबर.

In reply to by नाखु

जाउद्याहो , आपणही एक सवाई कट्टा करू वरच्या यादीतल्या एकालाही प्रवेश नाही.

In reply to by उगा काहितरीच

मग कट्टा कसा होणार? कारण सगळे कट्टेबहाद्दर त्याच तर यादीत आहेत.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होनाहो तेही खरंच आहे कि ! :-( मग त्यांना काय शिक्षा करता येईल बरं ?

ह्म्म.. आमच्यासारख्या सदोदित नवोदितांना काहीच शिरकाव नाही काय ? :/ द मा मि यु टू.. ?? तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. अ.मि.स.न.वा.मा संघ [ अखिल मिपा सदोदित-नवोदित वाचन-मात्र संघ ]

ह्यो ठिकाण आमच्या गावापास्न जवळच व्हत . मी गुमान मागं बसलो व्हतो पन कोणच नाय वळखल माझा पन जाहिर निशेध हाय जिथ शहरी मानसास्नी वळख बि नाय मिळत

In reply to by शब्दानुज

. शब्दानुज - Thu, 02/07/2015 - 15:16 नवीन शहरी जागी गावठी असा वाचा प्रतिसाद द्या
या शब्दानुजाच्या प्रतिसाद शीर्षकात मला हितेसभौंची जनुके दिसत आहेत.. (ब्यॉमकेस दुर्बिण निकालो.. ;) )