"मालवून टाक दीप"
लेखनप्रकार
ती संध्याकाळ मंतरलेली…।
या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे.
१) "मालवून टाक दीप" हे गाणे तसे लहानपणापासून कधीमधी ऐकायला येत असे. परंतु त्याचा खोल अर्थ केंव्हा कळला ते असे.
आमचे लग्न ठरले होते १९९२. तेंव्हा (होणारी) बायकोचे माहेर पनवेलला. ते खरेदी साठी दागिने बनवण्यासाठी पुण्याला येत असत. असे दोन वेळेस ते ५- ५ दिवस पुण्यात आलेले होते. माझी नोकरी चालू होतीच ए एफ एम सी मध्ये आणि एम डी पण चालू होते. तेंव्हा सोलापूर रोड ला मला दीड खोलीचे क्वार्टर्स मिळालेले होते. चार वाजता मी डिपार्टमेंट मधून सुटत असे. चहा घेऊन तयार होऊन सेंट बिंट मारून तयार होत असे. संध्याकाळ झाली कि बरोबर ५ च्या ठोक्याला मी तिच्या मामांकडे पर्वती पायथ्या जवळ तिला घ्यायला जात असे. पाच ते साडे आठ अशी आमची फिरायची वेळ होती. दिवसा ते खरेदी साठी जात असत.
एक दिवस संभाजी पार्क, एक दिवस क्याम्पात, एक दिवस वैशालीत असे आम्ही जात होतो. चौथ्या दिवशी तिला मी माझी ब्रम्ह्चार्याची मठी दाखवायला ए एफ एम सी मध्ये घेऊन आलो.निघताना सासुबाई नी काहीतरी खाऊन जा सांगितले. मी त्यांना म्हणालो आम्ही बाहेरच खाऊ. खोलीत माझ्याकडे दोन महिन्याचा पूर्ण पगार टाकून आणलेली फिलिप्स ची सुंदर म्युझिक सिस्टीम आणि दोन मोठे उंच असे उच्च दर्ज्याचे लाकडी स्पीकर्स खोलीच्या दोन कोपर्यात लावलेले होते.तिला पण संगीताची आवड असल्याने तिने माझा संगीताच्या टेप्स चा संग्रह पाहिला( १००च्या आसपास कॅसेटस होत्या) पेरू गेटाजवळ असलेल्या फ्रेंड्स म्युझिक सर्कल मधून मुद्दाम टेप करून घेतलेली जुनी मराठी आणि हिंदी गाणी हे पाहून ती हरखूनच गेली.सुदैवाने आमची गाण्यांची आवड तंतोतंत जुळली.
सप्टेम्बरचे दिवस असल्याने साधारण सहा साडे सहाला अंधार पडायला सुरुवात झाली. मग मी म्युझिक सिस्टीमवर गाणी लावली आणि आम्ही माझ्या बेडवर बसलो. एकमेकांच्या जवळ आलो तेंव्हा हे गाणे लागले. आ करून लता दीदींचा पहिला आलाप ऐकला आणि अंगावर शिरशिरी आली. अशा म्युझिक सिस्टीम वर संध्याकाळची वेळ हवेत पुण्याचा सुखद गारवा आणि मिठीत तुमची नव्या नवतीची चि. सौ. कां. पुढे जवळ जवळ दोन तास आम्ही वेगवेगळी गाणीच ऐकत होतो.लता दीदींची स्वरसम्राज्ञी कि कॅसेट यात कशी काळ नागिणी, मावळत्या दिनकरा इ गाणी अशा ताईंची अष्टपैलू गायिका मधील जिवलगा, समईच्या शुभ्र कळ्या,तरुण आहे रात्र अजुनी, येरे घना, गेले द्यायचे ते राहून अशी एका पाठोपाठ गाणी लागत होती. हे एक ऐकून जाऊया असे करत करत सव्वा आठ वाजले. खायची प्यायची शुद्ध नव्हतीच. सव्वा आठला मला लक्षात आले कि तिला मामांकडे सोडायचे आहे. मग तसेच निघालो आणि साडेआठ ला त्यांच्या घरी पोहोचलो.घरी सोडले इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आणि निघालो मी तिला सोडून निघणार तो सासूबाईनि विचारले काहि खाल्लेत का? मी सरळ सांगितले काहीही खाल्लेले नाही. आता जाऊन जेवणार. त्यांनी जेवायचा आग्रह केला. नाही तरी मेस मध्ये कोणाला जेवायचे होते? पण संकोच असतो ना ? मग तेथे त्यांच्याकडेच जेवलो आणि हवेत तरंगत परत आलो. आजही मालवून टाक दीप गाणे लागले कि मला सप्टेंबरातील ती संध्याकाळ तशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहते.
२) यानंतर परत एकदा बर्याच वर्षांनी गोव्याला सरकारी घरात आम्ही (सन २००० च्या) पावसाळ्यात सरकारी घर बदलले अगोदर दोन बेड रूम चे घर होते ते आता मोठे तीन बेडरुमचे घर मिळाले. तेथे मुलांना त्यांची बेडरूम त्यांच्या मनाप्रमाणे सजवून दिली. मुलं शाळेत जाणारी होती. एका रविवारी सकाळपासून गोव्याच्या पाळोले किनार्यावर गेलो होतो. तेथे एक तंबू भाड्याने घेतला. सकाळी सामान तंबूत ठेवून समुद्रात गेलो. जेवून दुपारी आम्ही झोपलो मुले वाळूत खेळत होती. संध्याकाळी कारने घरी परत आलो. रात्री जेवणं होईस्तोवर मुलं पेंगुळलेली झाली होती दुपारी उन्हात खेळण्याचा परिणाम स्पष्ट दिसत होता. त्यांच्या बेडरूम मध्ये गादया घालून दिल्यावर पटकन झोपली. दिवसभर पाण्यात खेळून दमली होती. बाहेर हॉल मध्ये म्युझिक सिस्टीम होती तिथे गालीचा घातलेला होता. मी बायकोला म्हणालो थोडा वेळ गाणी ऐकुया . मग दोन लोड घेतले आम्ही सर्व दिवे बंद करून गालीच्यावर आडवे झालो आणि मी नवीन घेतलेल्या ४.१ ( पाच स्पीकर असलेली) म्युझिक सिस्टीम मध्ये शफल मोड वर गाणी लावली तीन सीडी मधून वेगवेगळ्या क्रमाने गाणी वाजू लागली. एक दोन गाणी होईपर्यंत मूड बनला तोच परत लता दीदींचा आलाप आणि मालवून टाक दीप हे गाणे लागले. सर्व दिवे बंद रात्री साडे दहाला गोव्यासारख्या ठिकाणी चिडीचूप शांतता आणि तुमच्या चारी बाजूला शांतपणे पाझरणारे लता दीदींचे सूर. स्वतःच्या उबदार घरट्यात. बाहेर भुरभुरणारा पाउस. दिवसभर फिरून तृप्त झालेले मन आणि मिठीत तुमची आवडती.यापेक्षा काय हवे. एक एक सूर पाझरत होता आणि मनात खोल उतरत होता.
गार गार या हवेत घेउनि मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग
राजसा किती दिसत लाभला निवांत संग.
सुख सुख म्हणतात ते अजून काय असते?
३) २०१५ एप्रिल चा महिना. मी आपल्या बायकोशी कटकट करत होतो कि तू साड्या नेसतच नाहीस. बरेच दिवस झाले रोज तेच तेच ड्रेस घालायचे मग साड्या आणून काय फायदा इ इ.
बायको अर्ध मारेथोन धावते. (२१ किमी /३ तासात) एरोबिक्स करते म्हणून सडपातळ आहे. त्यामुळे साडी अजूनही तिला खुलून दिसते.
मी आपल्या दवाखान्यात रोज सकाळी साडे आठ वाजता न्याहारी करून जातो. तिचा दवाखाना माझ्या दवाखान्याच्या बाजूच्याच खोलीत आहे. तेंव्हा पेशंट आले तर उत्तम पैसे मिळतात. नाही आले तर वेळ मिळतो गप्पा मारायला. तिची वेळ दहा वाजताची. ती एकतर थर्मास मध्ये कॉफी घेऊन येते. किंवा तिच्या दवाखान्यात कॉफी मेकर आहे त्यात आम्ही बनवतो नाहीतर धंदा मंद असेल तर हॉटेलात बसून कॉफी घेतो. एक वाजता दोघे घरी परत.
एक दिवस सोमवार सकाळ -- मी सकाळ पासून रुग्ण बघत बघत कावलो होतो. साडे दहा वाजले होते सकाळपासून दोन तास सतत रुग्ण येतच होते. एवढ्यात
तिच्या स्वागत सहायिकेने मला बोलावणे पाठवले, सर म्याडम आल्या आहेत आणि तुम्हाला बोलावत आहेत.मी रुग्ण हातावेगळा केला आणि तीच्या दवाखान्यात दार ढकलून आत गेलो. बघतो तर काय बाईसाहेब झक्क पैकी निळी आणि काळी साडी ( माझ्या चोईसची) साडी त्यावर माचींगचा ब्लाउज गळ्यात मोत्यांची माळ इ इ जामानिमा करून आलेल्या. मी छानपैकी शिटी मारली. बायको लटक्या रागाने म्हणाली अरे हा आपला दवाखाना आहे घर नाही पेशंट काय म्हणतील? . मी म्हणालो पेशंट को मारो गोली. मग काय तिच्या कडे पाहत बसलो. तिने तिच्या छोट्याशा म्युझिक सिस्टम वर गाणी लावली. तर काय गाणे लागले " मालवून टाक दीप" छान पैकी बायको कडे पाहत वातानुकुलीत खोलीत गरम गरम कॉफी चा स्वाद घेत बसलो.
आयुष्यात माणसाला आणखी काय हवं असतं?
वाचने
21801
वाचनखूण
प्रतिक्रिया
113
मस्त....
क्या बात है!
In reply to क्या बात है! by नंदन
अगदी अगदी
वाssSSsss!!! शेवटच्या
वा डॉक्टरसाहेब नेहमीप्रमाणेच
वाह
डॉक्टर साहेब
In reply to डॉक्टर साहेब by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
हा लेख मिसेस खरेनी इथे
In reply to हा लेख मिसेस खरेनी इथे by नूतन सावंत
हा लेख इथ टाकण्याच्या अगोदर
In reply to हा लेख इथ टाकण्याच्या अगोदर by सुबोध खरे
वा डॉक्टर साहेब.
असेच राहा शंभर वर्षं.
छान
In reply to छान by मितान
+१
सुंदर आठवणी
वाह...
In reply to वाह... by ब़जरबट्टू
बजरबट्टू साहेब , तुमचा रोख
In reply to बजरबट्टू साहेब , तुमचा रोख by उगा काहितरीच
नाही हो,
लोक आमच्याच काळातलं संगीत चांगलं बाकि बकवास असे म्हणतात , ते लोक डोक्यात जातात मग ते १९६० चे असो कि १९९५ चे.बस्स...एव्हडेच म्हणायचे होते,.In reply to नाही हो, by ब़जरबट्टू
आजच्या पिढीला जुन्याचे काहीही
In reply to आजच्या पिढीला जुन्याचे काहीही by सुबोध खरे
हा पिढ्यांचा संघर्ष पिढ्यानपिढ्या चालूच राहणार.....
हे
एक्दा जोर्दार टाळया होउन जाउ
In reply to एक्दा जोर्दार टाळया होउन जाउ by पियुशा
कसली वाट बघतेस ग?
In reply to कसली वाट बघतेस ग? by पैसा
नुसत्या सिस्टिम देउन काय
In reply to कसली वाट बघतेस ग? by पैसा
@राजकुमाराची का घोड्याची? >>
In reply to कसली वाट बघतेस ग? by पैसा
असं कसं? असं कसं?
In reply to असं कसं? असं कसं? by एस
ऐला!
In reply to असं कसं? असं कसं? by एस
जरा आधी सांगायचंस की पिवशे,
In reply to जरा आधी सांगायचंस की पिवशे, by सूड
@ स्वप्स कित्ती हुशार ओ
In reply to एक्दा जोर्दार टाळया होउन जाउ by पियुशा
हलकेच घेणे
In reply to हलकेच घेणे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै ओ सर फार कै नाही सहनशील
In reply to नै ओ सर फार कै नाही सहनशील by पियुशा
सदर प्रतिसादामधल्या योग्य
In reply to एक्दा जोर्दार टाळया होउन जाउ by पियुशा
नै गं, वाट नै बघत रहायची,
In reply to एक्दा जोर्दार टाळया होउन जाउ by पियुशा
मस्त लिहियल सर.
त्याला द्यायचा तुझ्या आवडीचा
झक्कास्स.....
डॉक... एकदम लयं ग्वाड लिहल
chhan
गोड, तरल लेख..
छान
सुंदर अनुभव :)
मज्जा आहे बुवा एका माणसाची! :
फर्मास लेख !
वाह !!! क्या बात है !!!!!! :)
आनंद वाटला !!
In reply to आनंद वाटला !! by अपरिचित मी
अगदी खरं आहे. माफ करा पण
हा धागा टाकायचे प्रयोजन...
म्हणजे या आठवणी खाजगी आहेत
In reply to म्हणजे या आठवणी खाजगी आहेत by नूतन सावंत
आपण म्हणता आहात ते मान्य आहे
In reply to आपण म्हणता आहात ते मान्य आहे by सुबोध खरे
आमच्या घरात पण असेच आहे....
In reply to आमच्या घरात पण असेच आहे.... by मुक्त विहारि
पुरुषांतला पण एक खास प्रकार - नवरे.
In reply to पुरुषांतला पण एक खास प्रकार - नवरे. by एस
बाबांच्या त्या प्रवचना नंतर......
खरे साहेब
मस्त लिहिलंय डॉक्टर साहेब..!
वा डॉक्टरसाब वा
In reply to वा डॉक्टरसाब वा by राजेंद्र मेहेंदळे
=))
In reply to =)) by पैसा
चालतंय की
In reply to चालतंय की by राजेंद्र मेहेंदळे
हाहा!
In reply to हाहा! by पैसा
शेवटी 'अगा वैकुंठीच्या राया'
In reply to शेवटी 'अगा वैकुंठीच्या राया' by सूड
म्हणुनच भिमसेन आणि अभिषेकी
In reply to =)) by पैसा
इथे विजोड वाटत असलं तरी ते
In reply to इथे विजोड वाटत असलं तरी ते by कॅप्टन जॅक स्पॅरो
भयानक आहे की भारी आहे? काय ते
फार छान आठवण!
साहेब खुपच छान..
लेखन आवडले व आपल्या सौंचा
In reply to लेखन आवडले व आपल्या सौंचा by रेवती
+१
सुंदर आणि मजेदार लेख आवडला.
आधी खादाडीचे लेख...मग ती
छान आहे लेख!
मस्त !!
In reply to मस्त !! by अर्धवटराव
+११११११११
In reply to मस्त !! by अर्धवटराव
+१
बादवे, डॉक, त्यांनाही
In reply to बादवे, डॉक, त्यांनाही by एस
अहो त्या मुळात गुजरात मध्ये
In reply to अहो त्या मुळात गुजरात मध्ये by सुबोध खरे
(तरी बरं मराठी धारावाहिक पाहत
In reply to (तरी बरं मराठी धारावाहिक पाहत by चिनार
काहीही हा चि(नार)
मस्त लिहिले आहे
वाह, डॉक्..क्या बात है!
अरे, वहिनींचा फोटो गायब ? का
In reply to अरे, वहिनींचा फोटो गायब ? का by द-बाहुबली
साष्टांग स्वीकारा बेंगाली
In reply to अरे, वहिनींचा फोटो गायब ? का by द-बाहुबली
फोटो सं म ला सांगून काढून
मस्त लेख डॉक्टर साहेब.
आता ही आठवण, हे गाण,
धाडसी गाणे
लिखाण आवडलं
In reply to लिखाण आवडलं by पैसा
पैसाताईशी
In reply to लिखाण आवडलं by पैसा
प्रांजळपणे फोटो काढुन
रामदासकाकांच्या मुळ लेखाची लिंक?
In reply to रामदासकाकांच्या मुळ लेखाची लिंक? by राजेंद्र मेहेंदळे
वर नंदन यांनी त्यांच्या
जबरी लेख झालाय डॉक, एकदम