साहित्य:
१ वाटी रवा
३/४ वाटी दूध
३/४ वाटी ताक (आंबट नको)
३/४ वाटी साखर
१/२ वाटी पातळ तूप
१ tbsp बेसन
१/४ tsp बेकिंग सोडा
२ थेंब vanilla essence
कृती:
१) प्रथम एका पातेल्यात तूप घेऊन त्यात रवा आणि बेसन घालावे.
२) आता यामध्ये साखर,दूध आणि ताक घालून सर्व जिन्नस छान एकत्र करावेत. हे मिश्रण कमीतकमी ४ तास झाकून ठेवावे. केक सकाळी करायचा असल्यास रात्रभर मिश्रण ठेवले तरी चालेल.
३) केक करायच्या वेळी non stick भांड्याला ला तुपाचा हात लावावा. साधारण झाकण असणारे पसरट पण खोलगट भांडे यासाठी वापरावे.
४) केक च्या मिश्रणात सोडा आणि vanilla essence घालून ते नीट फेटावे. हे मिश्रण तूप लावलेल्या pan मध्ये ओतावे व कमी आचेवर शिजण्यास ठेवावे.
५) त्यावर झाकण म्हणून तापलेला तवा उलटा ठेवावा म्हणजे केक ला वरून देखील आच मिळेल. साधारण १०-१५ मिनिटांनी तवा काढून बघावे. केक वरून शिजला असल्यास आच बंद करावी आणि फोटोत दाखवल्याप्रमाणे भांडे तव्यावर उपडे करावे. जेणेकरून केक चा खालचा भाग वर येईल. गार झाल्यावर त्याचे सुरीने तुकडे करावेत.
काही महत्वाचे:
१) आच कमी ठेवावी. तसेच भांड्याचा तळ जाड असावा.
२) हवे असल्यास मिश्रणात काजू बदाम बेदाणे घालू शकता.
३) हा केक २ दिवस सहज fridge शिवाय बाहेर राहतो.


वाचने
15625
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान दिसतोय. १ टेस्पू बेसन
फोटो दिसंना झाल्यात.
खाल्लाय असा केक...
`सहीच !
खूप छान!
मस्तच
छान..
बेसन घालुन मी पण कधी केक केला
छान वाटतोय केक
करुन
मस्त
बेसन घातल्यामुळे
सोपी पाकृ
सह्मत
In reply to सोपी पाकृ by सस्नेह
मस्त झाला होता ... फक्त एक बदल केला होता …
In reply to सह्मत by स्वीत स्वाति
रव्यावर काही पूर्व संस्कार
वाह्ह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }छान
रात्रभर जर भिजत ???
धन्यवाद
मस्त आवडली. सौ.ला करायला