कोलंबीची मॉली
मला वेगळे प्रकार करायला न् खायला भयंकर आवडतं.पाचवीत असल्यापासून आईल २-३ दिवसांसाठी कामासाठी गावी गेली की स्वयंपाक करावा लागत असे.न आई करून जात असे पण तेव्हा फ्रीज नसल्याने कधी खराब झालं तर काही भाजी, आमटी करायची वेळ येत असे. आई स्वयंपाक करताना पहत असे. वाटून कातून द्यायला मदतही करत असे.मासे भाज्यांपेक्षा करायला सोपे वाटत.एक वाटण वाटले की काम झाले. माझ्या वडिलांचा न्यूज पेपरचा धंदा असल्याने साप्ताहिके,मासिकेही भरपूर असत. वेगवेगळ्या मासिकाकांचे,साप्ताहिकांचे अन्नपूर्णा,रुचकर,स्वादिष्ट असे विशेषांक येत असत.त्यात पाहून इतर पद्धतीचा स्वयंपाक करायला शिकले.पुढे वेगवेगळ्या प्रांतातल्या मैत्रिणी कॉलेज आणि नोकरी निमित्ताने भेटल्या. तेव्हा त्यांच्याकडून, त्यांच्या आईकडून ,सासूकडून शिकले.कोलंबी अतिशय आवडता मत्स्यप्रकार.त्याचे विविध प्रकार पाहून आश्चर्यच वाटते. कोणत्याही मसाल्यात करा,ती चवदार होणारच.ओलं खोबरं वापरा की सुकं खोबरं;लाल तिखट वापरा की गरम मसाला;कच्चा मसाला वापरा की भाजून वाटण करा;हिरवा मसाला वापरा की लाल मिरच्या वापरा;चिंच वापरा की कोकम वापरा की कैरी वापरा; खोबरं वाटून वापरा किंवा त्याचं दूध कडून वापरा किंवा खोबरं न वापरता करा. तिची चव प्रत्येकाशी जमवून घेत खुलते. असाच हा एक केरळी प्रकार. खोबरं न वापरता केलेला.मला अतिशय आवडतो.तुम्हाला आवडतो का ते पहा.पाकाकृतीवरचं पाहिलं पान गोड नाही,नाही, चमचमीत करून घ्या.
साहित्य:-
१. १२ ते १५ कोलंब्या
२. दोन कांदे मध्यम.
३. दोन टोमॅटो मध्यम.
४. वाटीभर कोथिंबीर
५. १ चहाचा चमचा मिरचीपूड..
६. १ चहाचा चमचा धणेपूड.
७. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.
८. अर्धा चहाचा चमचा राई.
९. १ लवंग.
१०. १०काळेमिरी.
११. ६ लसूण पाकळ्या.
१२. २ हिरव्या मिरच्या,तुकडे करुन.
१३. तेल अर्धी वाटी.मी थोडे कमी वापरले आहे.
१४. चवीनुसार मीठ.
कृती :-
१. कोलंबी सोलून आतला काळा दोरा काढून साफ करावी.धुऊन घ्यावी.
२.. कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत.
३. टोमॅटोला सुरीने + आकारात काप देऊन उकळत्या पाण्यात मिनिटभर सोडून गॅस बंद करावा.
४. टोमॅटो लगेच थंड पाण्यात टाकवेत.त्यामुळे त्याची साल लगेच सुटते.
५. टोमॅटो सोलून अनुक्रमांक ५ ते १२ मधले पदार्थ त्यासोबत बारीक वाटावेत.
६. कढई किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदे परतावेत.
७. वाटलेला मसाला मिठासाहित त्यात घालावा
८. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतावे.
९. कोलंबी घालून परतावे आणि चार वाट्या गरम पाणी घालावे.यात टोमॅटोचे पाणी आधी मोजून घ्यावे.
१०. उकळून उतरावे.रस अंगासरसा ठेवावा.कोथिंबीर घालून सादर करावे.
आता काय वाचताय? भात ,चपाती ब्रेड,पुरी,पानपोळे,अंबोळ्या कशाहीबरोबर हाणावेत.
वाचने
19359
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
बाकीचे फोटो का दिसत नाहीत.स
बाकीचे फोटो का दिसत नाहीत.स
ह्या रविवारी करून बघतो...
१. कोलंबी सोलून आतला काळा
In reply to १. कोलंबी सोलून आतला काळा by उगा काहितरीच
इंटेस्टाइन किंवा पचन संस्था।
अतिशय टेम्प्टिंग पाकृ, नक्की
छानच आहे रेसीपी. फार
कोलंबी कधी घरी नाही केलि पण
न खाणार्यांनी काय लिहावं बरं!
मस्तं !
छान आणि सोपी रेसिपी.नक्की
मस्तं पाककृती, करुन बघेन :)
काही दया माया ठेवा हो
प्रथम तुमच्या लेखन कौशल्याला
मुवि,तुमही तिखटाचे आणि
सुरन्गी ताय अप्पुन जन्दगी मे
मसाला तोच ठेऊन बटाटे, पनीर
हीच
In reply to हीच by gogglya
पाकृ अन्डे घालुन करता येइल का
In reply to पाकृ अन्डे घालुन करता येइल का by सूड
हा हा हा..........
@ पियुशा,मसाले तेच ठेऊन आवडती
वाह , मस्त पाक कृती, मी राहते
छान आहे पाककृती. वाखू साठवली
मस्त!
सोप्पे आणि मस्त!
छान पाकृ! नक्की करणार.
वॉव सहिच्च....कोलंबी
दिपक.कुवेत
दिपक.कुवेत
Mastach